वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सी मेंटचा शोध लागण्यापूर्वी बांधकामात इतर पदार्थांचा वापर होत असे. चुन्याचा शोध फार प्राचीन काळीच लागला होता, कारण उत्तर भारतात चुनखडीचे खडक अस्तित्वात होते व आहेत. हे पांढरे खडक इतर खडकांच्या तुलनेत खूपच ठिसूळ व छिद्रमय असतात. ते फोडणे सहज शक्य होते.
January 30, 2023
अनेकांच्या मनात नको त्या शंका, नको त्या वेळी उद्भवतात. आणि स्वतःच गुंता वाढवित जातात.
झाडांच्या फळे, फुले, पाने, बीया, इत्यादीमध्ये म्हणे जीव असतो, मग ते शाकाहारी लोक कसे खातात ?
मुळात शब्दामधेच लोचा आहे. वनस्पतीना जीव नाही असं कुठं कोण म्हणतंय ? सजीव निर्जीव माहीत आहेच सर्वांना. प्रचलीत शब्द शाकाहारी आणि मांसाहारी असे आहेत. जीवाहारी असा शब्दच मुळात केलेला नाही. म्हणजे वनस्पतींना खातोय म्हणजे जीवहत्या वगैरे काही नाही. अखिल मानवजातीला योग्य पूरक अशी रचना निसर्गाने केलेली आहे, हे विसरून चालणार नाही.
आता आणखी एक लघुशंका.. प्रण्यांपासून मिळते म्हणून, दूध पण मांसाहारी म्हणे.
वाद घालायचेच ठरवले तर अश्या शंका ठीक आहेत. पण मुळात मांसाहारी या शब्दामधेच त्याची मर्यादा स्पष्ट होते. ज्यामधे मांस आणि त्यातील रक्त असते, तसेच ते मांस ज्याला चिकटलेले असते ते हाड, किंवा अगदी स्वच्छ शब्दात सांगायचे झाल्यास आयुर्वेदात जे धातु म्हणून वर्णन केले आहेत, तत्या रक्तापासून पुढील धातुंचे सेवन करणे म्हणजे मांसाहार ! असा ढोबळ विस्तार करता येईल. यात दूध येत नाही. पण अंडी येतात.
असो.
व्याख्यांच्या मर्यादेच्या जाळ्यात न अडकता, आपण माणसासाठी, आयुष्य वाढण्यासाठी, वाढलेलं आयुष्य संपूर्ण पणे निरोगी निरौषधी जगण्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण बघतोय ना? मग निरर्थक वादात कशाला शिरा ?
तुटे वाद संवाद तो हितकारी....
आयुर्वेदात हितकर आणि अहितकर या शब्दाचा खूप विस्तृतपणे अर्थ टीकाकारांनी सांगितला आहे.
आयुर्वेदाच्या उपयोगितेचे वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात,
हिताहितम् सुखं दुःखम् ।
आयुस्तस्य हिताहितम्
मानंच्च तच्च यत्रोक्तं,
आयुर्वेद स उच्चते।।
अखिल मानवजातीला योग्य काय अयोग्य काय, हितकर काय अहितकर काय, सुखकर काय दुःखकर काय, या सर्वांची चर्चा किंवा अभ्यास, विचार ज्या शास्त्रात केला जातो, त्यालाच आयुर्वेद म्हणतात.
पशु खातात केवळ पोट भरण्यासाठी
मूर्ख खातात केवळ चव वाढण्यासाठी
संत खातात साधना करण्यासाठी
आणि बुद्धिमान खातात,
शक्ती, आयु, आरोग्य मिळवण्यासाठी...
आपण जो आहार खातो, त्याचा आपले आचार विचार, चिंतन, मनन, व्यवहार, स्वभाव, यांच्याशी घनिष्ठ संबंध असतो. म्हणूनच जैसे अन्न तैसे मन असे म्हटले जाते.
शरीराचे स्वतःचे एक अर्थशास्त्र असते. अत्यंत आवश्यक असेल त्याची पूर्तता पहिल्यांदा केली जाते. त्यानंतर कमी महत्वाच्या गोष्टींकडे शरीर लक्ष देते.
जसे अत्यंत गरीब व्यक्तीला प्रथम पोट भरण्यासाठी अन्न हवे असते. मग कपडे, घर, मनोरंजन, स्वादिष्ट भोजन वगैरे. शरीराच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावरच मनाच्या गरजा लक्षात घेतल्या जातात. मन संतुष्ट झाल्यानंतरच आत्मा प्रसन्न होण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.
शरीराच्या प्राथमिक गरजांच्या पूर्ततेनंतर ऊरलेली उर्जा, मनाच्या संतुष्टीसाठी वापरली जाते. त्यातून शिल्लक असलेल्या उर्जेतून आत्म्याच्या गरजांकडे लक्ष दिले जाते, ज्यांची साधना, उपासना, आराधना योग्य असेल त्यांना या आत्म उर्जेचा लाभ मिळतो. तेव्हाच तो ध्यान समाधी यावर लक्ष केंद्रित करू शकतो.
म्हणजेच ही उर्जा मिळवण्याची सुरवात ही आहारापासून आहे. म्हणून हा आहार जेवढा सात्विक असेल तसे चित्तावरचे संस्कार शुद्ध होत जातात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
16.10.2016
October 16, 2016
…सरेच्या गोलंदाजाने आपल्या घरच्या मैदानावर एकाच डावात दहा गडी बाद करण्याचा पराक्रम केला. 29-11-43-10. 7 झेलबाद आणि 3 यष्टीचित. अर्धा डझन फलंदाज शून्यावरच बाद.
September 2, 2010
मी एक गोष्ट ऐकली ती अशी,एक फॉरेस्ट ऑफिसर नवीन लग्न झालेला जंगलातील कॉर्टर मध्ये राहत होता. त्याच्या बायकोला ब्लीडींगचा त्रास झाला, रक्त थांबत नव्हते, डॉक्टरांनी सांगितले आठ दिवसांची सोबतीण आहे. काय तिच्या इच्छा असतील त्या पूर्ण करा. तो हताश झाला होता. एक पागोटेवाला म्हातारा आला, त्याला म्हणाला तुझी बायको आजारी आहे ना? मी सांगतो ते कर ऑफिसर ने विचार केला ऐवी तेवी बायको मरनार, चला करून पाहू. म्हाताऱ्याने केळी आनन्यास सांगितले. त्यांनी केळी आणली. एक केळ सोलून फाकवुन त्यात पिंजर (हळदीचे कुंकू ) घातले. आणि ते केळ त्याच्या बायकोला खाण्यास दिले. असे २-३ वेळा दिले. ब्लीडींग थांबले आणि दोन दिवसात ती बायको घरात काम करू लागली.
गोष्ट ऐकल्यावर माझ्या मनात विचार सुरू झाले, पूर्वी लहानपणापासून मुलींना कुंकू लावायची आपल्याकडे पद्धत होती. कपाळावर कुंकू लावतात तेथे अक्युप्रेशर पिच्युटरी ग्लॅन्ड चा पॉईंट आहे तसेच तिथे आज्ञा चक्रही येते. तिथे हळदीचे कुंकू लावले की कुंकवातील द्रव्य तिथे अबसॉरब होऊन पिच्युटरी ग्लॅन्ड ऍक्टिव्ह होते. त्यामुळे हार्मोन सिक्रीशन नीट होते. त्यामुळे पूर्वी बायकांना पाळीचे त्रास कमी होते.
मी हळदीचे कुंकवाचे टिंक्चर करून ते होमीओपॅथी पद्धतीने सूक्ष्म करून साखर केली व पाळीचा त्रास असलेल्या स्त्रियांना दिले. त्यांची ३-६ महिन्यात पाळी नॉर्मल होऊ लागली. कुंकवाच्या गोळ्या करून दिल्या, ४ दिवसानंतर होणारे ब्लीडींग थांबले.
आमच्या पूर्वजांनी बायकांनी कुंकू लावायचे ही प्रथा पडून बायकांचे आरोग्य सांभाळले, धंदा केला नाही.
कुंकू हे हळदीपासून तयार केलेले असावे. टिकली लावून उपयोग होत नाही. ज्या शिकलेल्या, फॉर्वर्ड बायकांना कुंकू लावण्याची लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. त्यांनी रात्री झोपताना कुंकू पाण्यात कालवून औषध म्हणून लावावे.
शुद्ध कुंकू कसे ओळखावे - १] कुंकवाला हळदीचा वास येतो. २] थोडे कुंकू हातावर घेऊन त्यावर ओला चुना चोळला तर काळे होते. त्यात रंगाची भेसळ असेल तर रंग लाल राहतो.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
March 9, 2017
नावातील एकही अक्षर सरळ नसणारा हा देव.. प्रत्येक शब्द हा जोडाक्षर. जितकं नांव कठीण तितका समजायला कठीण, पण एकदा समजला जी जीवनाचा अर्थ समजलाच म्हणून समजा.
March 11, 2020
असे म्हटले जाते की क्लोडिया एव्हर्टने आपल्या वडिलांचे बालपणात मृत्यू पावलेल्या एलन आणि लिस्ट या भावंडांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली.
April 10, 2022
आजच्या मिलेनियल जनरेशनला कदाचित हे पटणारच नाही की त्याकाळी आपले आवडते गाणे एखादयाला पुन्हा ऐकायला मिळायला कधी सहा महिने तर कधी वर्षही जायचे. कारण त्याकाळी सर्वसामान्य भारतियांसाठी रेडियो हेच मनोरंजनाचे मुख्य साधन होते. बरं रेडिओमधे सर्व प्रसारण AM Band वरुन असायचे. म्हणजे त्यात खरखर, आवाज जाणे, सिग्नल न मिळणे असे प्रकार व्हायचे. आजच्या FM Band ला ती अडचण नही कारण FM चे तंत्रज्ञान वेगळे आहे..त्यात सिग्नलना अडथळा फार येत नाही. त्यामुळे प्रसारण चांगलं होतं.
June 28, 2022
मराठी खाद्यसंस्कृती जागतिक पातळीवर लोकप्रिय व्हावी ह्या उद्देशाने रिजनल फूड्सची सुरुवात सनी पावसकर ह्यांनी केली (२०१५). ‘मेतकूट’ आणि ‘काठ अन् घाट’ ह्या नावाची एकूण पाच रेस्टॉरंट्स ते यशस्वीपणे चालवत आहेत.
July 25, 2022
यदा श्वेतपत्रायतालंघ्यशक्तेः
कृतांताद्भयं भक्तिवात्सल्यभावात् |
तदा पाहि मां पार्वतीवल्लभान्यं
न पश्यामि पातारमेतादृशं मे ‖ २८ ‖
याच साठी केला होता अट्टहास ! शेवटचा दिस गोड व्हावा !! ही संतांनी मनी जोपासली आपल्या मनात रुजवलेली भावना.
"अंत भला तो सब भला" ही भारतीय संस्कृतीची शिकवणूक.
आचार्यश्री देखील त्याच भूमिकेतून अंतकाल मांगल्याची प्रार्थना करीत आहेत.
ते म्हणतात,
श्वेतपत्रायत - हे श्वेत, विशाल छत्रधारी भगवान शंकरा !
श्वेत म्हणजे पांढऱ्या रंगाचे छत्र हे सम्राट् पदाचे लक्षण. केवळ सम्राटाने पांढरे छत्र वापरण्याचा राजकीय शिष्टाचार असतो.
देवांचे देव असणाऱ्या महादेवांना सम्राट् स्वरूपात आचार्य श्वेतपत्रायत म्हणत आहेत. त्यांना प्रार्थना आहे की,
यदा- ज्यावेळी, अंतिम समयी.
अलंघ्यशक्तेः- ज्यांच्या शक्तीला म्हणजे सत्तेला कोणीही ओलांडू शकत नाही अशा,
कृतांताद्भयं - कृतांत अर्थात यमराजाचे भय, मला सतावेल, भक्तिवात्सल्यभावात् - आपल्या भक्तवत्सल स्वभावाने, माझ्यावर असणाऱ्या आपल्या सहजसुलभ कृपेने,
तदा पाहि मां - त्यावेळी आपण माझे रक्षण करा.
पार्वतीवल्लभ- हे पार्वती वल्लभा, पार्वती हे स्थिरतेचे प्रतीक आहे. पर्वत अविचल असतो. त्या पर्वताची पुत्री ती पार्वती. तशीच शांत, स्थिर ती पार्वती. तशीच हवी श्रद्धा.
तशी दृढ, अटल श्रद्धा म्हणजे पार्वती. अशा पार्वतीचे वल्लभ अर्थात अशा श्रद्धेने प्रसन्न होणारे,
अन्यं
न पश्यामि पातारमेतादृशं मे - मला आपल्या समान माझा अन्य कोणीही रक्षण कर्ता दिसत नाही.
आपणच माझे एकमेव आश्रयस्थान आहात. मी आपल्याला शरण आलेलो आहे. माझे अंतकाळीच्या यमपीडेपासून रक्षण करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 7, 2020
यः श्लोकपंचकमिदं ललिताम्बिकायाः सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते।तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिम्॥६॥
फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या अंतिमत श्लोकात आचार्य श्री ललितांबेच्या कृपेचे वैभव सांगत आहेत.
ते म्हणतात,
यः - जो कोणी, श्लोकपंचकम् इदं - हे श्लोकपंचक. हा पाच श्लोकांचा समुदाय. ललिताम्बिकायाः- देवी ललितांबेतेच्या, प्रार्थना स्वरुप असलेला,
सौभाग्यदं - सौभाग्य दायक असलेला, सुललितं - लालित्यपूर्ण असलेला.
पठति प्रभाते- सकाळच्या वेळी पठण करतो.
तस्मै - त्याच्यावर ललिता झटिति प्रसन्ना - आई ललिता चटकन प्रसन्न होते.
आणि त्याला,
ददाति- प्रदान करते.
काय काय प्रधान करते ती सूची सादर करताना आचार्य श्री म्हणतात,
विद्यां - विद्या अर्थात अध्यात्मविद्या, मोक्षविद्या, आत्मज्ञान.
श्रियं- अर्थात वैभव विमलसौख्य- शुद्ध सुख. अर्थात इतर कोणाच्याही दुःखाला कारणीभूत न होणारे सुख.
सामान्य व्यवहारात माझे सुख कोणाच्या तरी दुःखावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, प्राध्यापक म्हणून मला सुख मिळायचे असेल असेल तर माझ्या विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यासाचे दुःख सहन करावे लागेल. मुलाला खाण्याचे सुख मिळायचे असेल तर आईला स्वयंपाक करण्याचे दुःख भोगावे लागते. त्यामुळे व्यवहारातील सुख निर्भेळ नाही. निर्भेळ सुख एकच. आत्मसुख. आईच्या कृपेने ते प्राप्त होते
अनन्तकीर्तिम्- कधीच न संपणारी कीर्ती.
हे अंतिम पद फार महत्त्वाचे आहे. जगात स्वार्थाने लोक समोर करतात ती स्तुती, प्रसिद्धी. पण आपल्या मागे लोक आपल्याबद्दल जे गौरवोद्गार काढतात ती कीर्ती. की खरी असते. कारण त्यात स्वार्थ नसतो.
आई ललितांबेच्या कृपेने साधकाला अशी कीर्ती प्राप्त होते. अशी कीर्ती मिळावी असे कार्य त्यांच्या हातून घडते. जी शाश्वत असते .चिरंतन असते.
त्यासाठी तिचे हे स्तवन आहे.
जय श्री ललितांबा !
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 2, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti