(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शासकीय भाषा आणि ( अनेकदा गैरही ) अर्थ !

    शासन व्यवहारात मराठी भाषेच्या सक्तीच्या वापरासंबंधी मध्यंतरी बातम्या प्रकाशित झाल्या. यात खरं नेमकं काय आहे ? आदेश म्हणजे order , परिपत्रक म्हणजे circular , ताकीद म्हणजे warning , शासन निर्णय म्हणजे Government order ( प्रत्यक्षात तो शब्द हवा Government Resolution किंवा Administrative Order ) …आणि या प्रत्येकाचे अर्थ वेगळे आहेत शिवाय त्या प्रत्येक शब्दाला वैधानिक मूल्य आहे आणि अंमलबजावणीच्या ‘तर्‍हा’ही वेगळ्या आहेत हे माहिती असल्यानं संभ्रमच निर्माण झालं .

      July 17, 2018


  • वंध्यत्व

    नलिका बालक (टेस्टूब बेबी) इनव्हिट्रो फरटिलायझेशन ॲण्ड एम्ब्रियो ट्रान्स्फर. १९७८ साली डॉ. रॉबर्ट एडवर्ड आणि डॉ. पॅट्रिक स्टेप्टो यांनी ल्युईस ब्राऊन या नलिका बालिकेला जन्माला घातले आणि त्याबरोबरच एक नवीन युग सुरू झाले. स्त्री बीजाचे शुक्रजंतूंशी (पु. बीजाशी) फलन हे गर्भाशय नलिकेत होते; पण जर नलिका बंद असतील तर? यावर मात करण्यासाठी डॉ. एडवर्डनी एक नवा मार्ग शोधला.

      June 8, 2023


  • पोषण कुणाचे आणि कशाचे?

    2020 पर्यंत भारताला जगातील एक महाशक्ती म्हणून उभे करण्याचे स्वप्न आम्ही बघत आहोत. स्वप्न पाहण्याच्या बाबतीत आमचा हात कुणी धरू शकत नाही. साध्या नाल्यांची, गटारांची व्यवस्था धड नाही, तरीही आम्ही मुंबईचे शांघाय करण्याचे स्वप्न पाहतोच की नाही?

      August 14, 2005


  • पथ्य

    आपले वैद्य जे पथ्य सांगतात त्यांमागे काही कारणं असतात हे नेहमी लक्षात ठेवा. पथ्य पाळणाऱ्या मनुष्याला औषधांची गरजदेखील पडत नाही असं सांगणारं एकमेव शास्त्र म्हणजे आयुर्वेद.

      December 29, 2017


  • वाचक प्रेरणा दिवस

    भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर रोजी असलेला जन्मदिन वाचक प्रेरणा दिन म्हणून राज्यभरात साजरा केला जातो.

      October 15, 2021


  • आजारापेक्षा उपाय अघोरा!

    खेड्यापाड्यात अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे सध्या दणाणले आहेत. बातमीच तशी आहे; राज्याच्या गृहमंत्र्यांनी अशा सावकारांना अगदी कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याचे आदेशच पोलिस विभागाला दिले आहेत. आबांचाच आदेश म्हटल्यावर पोलिस कशाला सुस्ती करतात, ”खंडणी वसुली करायला त्यांना हातात आयतेच कोलीत सापडले.

      November 27, 2005


  • आपली प्राचीन खाद्य संस्कृती

    जगाला वेड लावणारा डोसा किंवा मसाला डोसा (दोसा) हा पदार्थ किती जुना आहे..? निश्चित सांगता यायचं नाही, पण सुमारे दोन हजार वर्ष तरी नक्कीच..! म्हणजे इतिहासाच्या ज्ञात साधनांचा, कागदपत्रांचा धांडोळा घेत मागे गेलो की कळतं, सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी अत्यंत चविष्ट असा हा डोसा दक्षिण भारतात खाल्ल्या जात होता.

      May 16, 2017


  • डॉ. अॅ‍ड्रीअन कॅन्‍ट्रोव्हिटझ्

    डॉ. अॅ‍ड्रीअन कॅन्‍ट्रोव्हिटझ्

    दक्षिण आफ्रिकन हृदयशल्‍यविशारद डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड यांनी जगातील पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केली. दुसरी मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया करण्‍याचा मान डॉ. अॅड्रीअन कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांच्‍याकडे जातो. ६ डिसेंबर १९६७ रोजी अमेरिकेतील न्‍यूयॉर्क मधील ‘मायमोनिडेस मेडिकल सेंटर’ येथे ही शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी हृदयशल्‍यचिकित्‍सेच्‍या क्षेत्रात अतिशय भरीव कामगिरी केली आहे. प्रस्‍तुत शस्‍त्रक्रिया हा त्‍यांच्‍या शिरपेचातील मानाच्‍या तुर्‍यांमधील एक!

    ४ ऑक्‍टोबर १९१८ रोजी न्‍यूयॉर्क शहरात कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांचा जन्‍म झाला. अतिशय लहान असतांना त्‍यांनी ठरविले होते की मोठेपणी त्‍यांना डॉक्‍टर व्‍हायचे आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्‍यापूर्वी त्‍यांनी गणितामध्‍ये पदवी घेतली. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच तंत्रज्ञानाकडेही त्‍यांचा कल होता. निष्‍णात शल्‍यचिकित्‍सेबरोबर हृदयशस्‍त्रक्रिया सुलभ व्‍हाव्‍यात व हृदयविकारावर उपचार करता यावेत म्‍हणून त्‍यांनी काही उपकरणे विकसित केली. भाऊ आर्थर (तो इंजिनिअर होता) याची कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांना यात मदत झाली. खरे तर शाळेत असल्‍यापासूनच त्‍यांची पाउले याकडे वळली होती. तेव्‍हा देखील आर्थरच्‍या मदतीने त्‍यांनी घरीच इलेक्‍ट्रोकार्डिओग्राफ (ईसीजी) तयार केला होता. यासाठी त्‍यांनी जुन्‍या रेडिओच्‍या भागांचा उपयोग केला.

    १९४३मध्‍ये वैद्यकीय पदवी घेतल्‍यानंतर त्‍यांनी दोन वर्षे सैन्‍यदलात नोकरी केली. त्‍यापूर्वी ब्रुकलिन येथील एक रुग्‍णालयात ते प्रशिक्षणार्थी होते. सुरुवातीस त्‍यांचा कल मेंदूविकारतज्‍ज्ञ होण्‍याकडे होता. तेव्‍हा मेंदूवरील शस्‍त्रक्रिया सुलभ रितीने करता याव्‍यात यासाठी त्‍यांनी एक ‘चिमटा’ (क्लॅम्‍प) विकसित केला होता. त्‍यावरील त्‍यांचा शोधनिबंधही प्रसिद्ध झाला.

    तो काळ दुसर्‍या महायुद्धाचा होता. सैन्‍यदलाला मनुष्‍यबळाची गरज होती. प्रशिक्षित डॉक्‍टरांची तर अधिकच होती. कॅन्‍ट्रोव्हिटझ् लष्‍करात दाखल झाले व १९४६ मध्‍ये ‘मेजर’ पदावरून निवृत्त झाले. लष्‍करातून बाहेर पडल्‍यावर त्‍यांनी हृदयशल्‍यचिकित्‍सेचे प्रशिक्षण घेतले. १९५५ पर्यंत ते ब्रॉंक्‍स येथील मॉंटफिअर रुग्‍णालयात कार्यरत होते. तेथे ते शल्‍यचिकित्‍सेचे प्रमुख झाले. येथेही त्‍यांनी प्रचंड काम केले. या रुग्‍णालयात काम करीत असतांना त्‍यांनी श्‍वान तसेच इतरही प्राण्‍यांवर प्रयोग केले व left ventricular assist deviceतयार केले. तसेच‘हार्ट-लंग मशीन’ मध्‍ये वापरता येईल असे प्राणवायूचा पुरवठा करणारे (ऑक्सिजन जनरेटर) उपकरण विकसित केले. याशिवाय हृदयशल्‍यचिकित्‍सेदरम्‍यान रक्‍तवाहिन्‍यांच्‍या जागांची योग्‍य योजना करण्‍यासाठी उपयुक्‍त होईल अशी उपचारप्रणाली देखील विकसित केली.

    याच कालावधीत कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी जिवंत, स्‍पंदन करणार्‍या हृदयाची धडधड नियंत्रित करून ती चित्रफीत प्रदर्शित केली.

    ब्रॉंक्‍स येथील रुग्‍णालयात काम केल्‍यानंतर १९५५ पासून कॅन्‍ट्रोव्हिटझ्ब्रुकलिन येथील मायमोनिडास मेडिकल सेंटर येथे शल्‍यविशारद म्‍हणून रुजू झाले. त्‍या दरम्‍यानची एक महत्त्वाची घटना म्‍हणजे १९५८च्‍या फेब्रुवारी महिन्‍यात एका सहा वर्षांच्‍या लहानग्‍यावर हृदयशस्‍त्रक्रिया करण्‍यात आली. जन्‍मतःच त्‍याच्‍या हृदयामध्ये छिद्र होते. या ‘ओपन हार्ट शस्‍त्रक्रियेत’ कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी विकसित केलेल्‍या हार्ट-लंग मशीनचा वापर करण्‍यात आला. कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी ‘बुस्‍टर-हार्ट’ हे तंत्रही विकसित केले होते. एका श्‍वानावर त्‍यांनी हा प्रयोग यशस्‍वीरित्‍या करून पाहिला. या प्रणालीत ‘बुस्‍टर-हार्ट’ हृदयाचे २५% पर्यंत रक्‍ताभिसरणाचे काम करीत असे.

    १९६०च्‍या दशकात जनरल इलेक्ट्रिक या कंपनीच्‍या सहकार्याने कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी शरीरात बसविता येईल असा (इम्‍प्‍लॅंटेबल) ‘पेस मेकर’ विकसित केला. मे १९६१ मध्ये पहिला ‘पेस मेकर’ एका रुग्‍णाच्‍या शरीरात बसविण्‍यात आला. या उपकरणाला शरीराबाहेरून नियंत्रित करता येई. ६४ ते १२० ठोके अशी त्‍याची व्‍याप्‍ती होती. शारिरीक व मानसिक ताणामुळे हृदयाचे ठोके जलद गतीने पडतात. असे वाढू शकणारे ठोके लक्षात घेऊन तो बनविण्‍यात आला होता. या व्‍यतिरिक्‍त आर्थर बरोबर त्‍यांचे प्रयोग चालूच होते. श्‍वानांवर ते प्रयोग करीत. या प्रयोगांतूनच त्‍यांनी ४ फेब्रुवारी १९६६ रोजी एका रुग्‍णावर शस्‍त्रक्रिया करून ‘पर्मनंट पार्शल मेकॅनिकल हार्ट’ बसविले. दुर्दैवाने शस्‍त्रक्रियेनंतर २४ तासांत तो रुग्‍ण दगावला. परंतु त्‍याचे कारण त्‍याला आधीपासून असलेला यकृताचा विकार हे होते.

    मायमोनिडास रुग्‍णालयात कार्यरत असतांनाच कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी अमेरिकेतील पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया केली. याआधी तीनच दिवस डॉ. ख्रिश्‍चन बर्नार्ड यांनी जगातील पहिली मानवी हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे यशस्‍वी केली होती. कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी केलेली शस्‍त्रक्रिया जरी दुसरी असली तरी ती अतिशय वैशिष्‍ट्यपूर्ण होती कारण डॉ. बर्नार्ड यांनी केलेली शस्‍त्रक्रिया प्रौढ व्‍यक्‍तीवरील होती तर कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी केलेली शस्‍त्रक्रिया एका १९ दिवसांच्‍या नवजात अर्भकावर केलेली होती. नवजात शिशूवरील ही जगातील पहिली हृदय-प्रत्‍यारोपण शस्‍त्रक्रिया त्‍यामुळे अतिशय वैशिष्‍ट्यपूर्ण मानली जाते.

    कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांचे संपूर्ण आयुष्‍य त्‍यांनी वैद्यकीय सेवेला व वैद्यकीय संशोधनाला वाहून घेतले होते. आर्थरसह काम करीत असतांना त्‍यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण उपकरण विकसित केले ज्‍यामुळे हृदयशल्‍यचिकित्‍सा सुलभ होण्‍यास मदत झाली. ते उपकरण म्‍हणजे ‘इन्‍ट्राएऑर्टिक-बलून-पंप’ होय. हे उपकरण अशा पद्धतीने बसविण्‍यात येते की महारोहिणीशी ते निगडित होईल. या उपकरणाच्‍या स्‍पंदनांमुळे हृदयावरील ताण हलका होतो. (It is inserted via the femoral artery in the groin and is placed in the descending thoracic aorta just beyond the origin of the artery to the left arm.)

    १९६७च्‍या ऑगस्‍ट महिन्‍यात या उपकरणाचा प्रथम वापर करण्‍यात आला. एका ४५ वर्षे वयाच्‍या महिलेला हृदयविकाराचा झटका आला असता या उपकरणाच्‍या मदतीने तिचे प्राण वाचू शकले. १९८०च्‍या दशकानंतर याचा विस्‍तृत वापर होऊ लागला. २००८ पर्यंत (म्हणजेकॅन्‍ट्रोव्हिटझ् यांच्‍या निधना पर्यंत) ३० लाख रुग्‍णांसाठी या पंपाचा वापर करण्‍यात आला होता.

    १९८३ मध्‍ये कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांनी त्‍यांची पत्‍नी जीन हिच्‍यासमवेत ‘एल. व्‍हॅड टेक्‍नॉलॉजीज’ या कंपनीची स्‍थापना केली. हृदयशल्‍यचिकित्‍सेसाठी लागणारी उपकरणे तयार करणे व विकसित करणे हेच या कंपनीचे ध्‍येय आहे.

    हृदयशल्‍यचिकित्‍सेतील कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांच्‍या मोलाच्‍या योगदानाबद्दल ‘अमेरिकन सोसायटी फॉर आर्टिफिशिअल इन्‍टर्नल ऑर्गन्‍स’ या संस्थेच्‍या वतीने त्‍यांना २००१ साली ‘जीवन गौरव’ पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले.

    संपूर्ण आयुष्‍य वैद्यकीय सेवा व संशोधनास समर्पित केलेल्‍या डॉ. कॅन्‍ट्रोव्हिटझ् यांचे १४ नोव्‍हेंबर २००८ रोजी, वयाच्‍या ९०व्‍या वर्षी मिशिगन येथील अॅनआर्बर येथे निधन झाले.

    –—–—

      March 17, 2019


  • गारेगार बर्फाचा गोळा

    उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर दिसतो तो गारेगार बर्फाचा गोळा. त्याशिवाय उन्हाळा अपूर्णच वाटतो. काल रस्त्यावर बर्फाचा गोळा विकणारा आला होता. शेजारीन म्हटली, ” घ्यायचा का बर्फाचा गोळा ” ? क्षणभर मनात उत्तर आलं होतं लगेचच ” हो ” म्हणून !! पण मनाला आवर घालत म्हटलं , ” नको !! आता ते येतील इतक्यात. आणि त्यांना नाही आवडत रस्त्यावरचे गोळे किंवा कुल्फी घेतलेली !! ” शेजारीन म्हटली ते यायच्या आत घ्या पटकन खाऊन.

      April 8, 2023


  • शिस्तीचा ढासळलेला बुरुज 

    शाळा नावाचं मंदिर असो की, परमीटरुम, राजकारण्यांची शिफारस लागते, “अर्थ”  असल्याशिवाय शैक्षणिक संस्था मिळत नाहीत, विनाअनुदान, अनुदानित करण्यासाठी “अर्थ” आवश्यक आहे. विनाअनुदानाचे दुकान उघडण्याचे व त्याला अनुदान मिळवून घ्यायचे. राजकारणातल्या  अस्तित्वासाठी, तिकिट मिळवण्यासाठी, शैक्षणिक संस्था, साखर कारखाना, सहकारी संस्था, परमीटरुम, वर्तमानपत्र, खून, बलात्कार हा स्वतःच्या साम्राज्याचा भाग अनेकांना आवश्यक वाटायला लागला.

      April 9, 2019