(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मन कि बात – नवीन वर्ष..

    उद्या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. जाणार वर्ष कसं गेलं याच्या सिंहावलोकनाचा दिवस. वर्ष जातच असतात आणि नवीन येतच असतात..जाणारं वर्ष बऱ्याच, म्हणजे सर्वांनाच, संमिश्र गेलं असं वैयक्तिकरित्या म्हणण्याचा प्रघात आहे..आणि ते तसंच गेलेलंही असतं..फार चांगलं नाही आणि फार वाईटही नाही.

      January 17, 2017


  • महावीर जयंती

    भगवान महावीर यांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शांती, अहिंसा आणि बंधुभावाची शिकवण दिली. ती शिकवण आजही संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शक आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे २४ वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. चिंतनशील विचारवंत म्हणून ते ओळखले जात.

      April 25, 2021


  • परदेशीय मराठी कुटुंबातली गृहस्वामिनी

    आई बाबा इतके खूष असतात कारण लेकीला परदेशातल्या सुखवस्तु कुटुंबातलं स्थळ मिळतं. आणि  ती ? ती हर्षभराने आकाशाला केव्हाच स्पर्शून येते. धाकटी सोनाली आठवडाभर घरभर नाचत असते, होणार्‍या जिजाजींचे बहारदार वर्णन असलेलं जणू एकच गाणं तिला पाठ येत असतं

      December 23, 2023


  • मनाचे श्लोक – १७१ ते १८०

    असे सार साचार ते चोरलेसे | इही लोचनी पाहता दृश्य भासे |
    निराभास निर्गूण ते आकळेना | अहंतागुणे कल्पिताही कळेना ||171||

    स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या | स्फुरे ब्रध् रे जाण माया सुविद्या |
    मुळी कल्पना दो रूपे तेचि जाली | विवेके तरी सस्वरूपी मिळाली ||172||

    स्वरूपी उदेला अहंकार राहो | तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो |
    दिशा पाहता ते निशा वाढताहे | विवेके विचारे विवंचूनि पाहे ||173||

    जया चक्षुने लक्षिता लक्षवेना | भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना |
    क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो | दयादक्ष तो सक्षिने पक्ष घेतो ||174||

    विधी निर्मिता लीहितो सर्व भाळी | परी लीहिता कोण त्याचे कपाळी |
    हरू जाळितो लोक संहारकाळी | परी शेवटी शंकरा कोण जाळी ||175||

    जगी द्वादशादित्य ते रूद अकःा| असंख्यात संख्या करी कोण शकःा |
    जगी देव धुंडाळिता आढळेना | जनी मख्य तो कोण कैसा कळेना ||176||

    तुटेना फुटेना कदा देवराणा | चळेना ढळेना कदा दैन्यवाणा |
    कळेना कळेंना कदा लोचनासी | वसेना दिसेना तो जनी मीपणाशी ||177||

    जया मानला देव तो पूजिताहे | परा देव शोधूनि कोणी न पाहे |
    जगी पाहता देव कोटयानकोटी | जया मानली भक्ती जे तेचि मोठी ||178||

    तिन्ही लोक जेथून निर्माण जाले | तया देवरायासि कोणी न बोले |
    जगी थोरला देव तो चोरलासे | सदगुरूवीण तो सर्वथाही न दीसे ||179||

    गुरू पाहतां पाहतां लक्ष कोटी | बहूसाल मंत्रावळी शक्ति मोंठी |
    मनी कामना चेटके घातमाता | जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ||180||

    - श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

      January 24, 2016


  • भय इथले संपत नाही

    रशियन चित्रपट आहे द रिटर्न नावाचा. यात वडील अनेक वर्षांनी घरी आले आहेत, पण मुलांना लहानपणापासून ते माहीतच नाहीत. मग मुलांना आपल्या वडिलांचीच अडचण होऊ लागते कारण त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा संकोच होऊ लागतो. मुलं आपल्या भरकटलेल्या बापाला माफ करायला तयार होत नाहीत.

      January 15, 2022


  • कबूतर जा जा जा

    ऋग्वेदातील १०व्या खंडात १६५ व्या सूक्तात चार ऋचा कपोत उर्फ कबुतर या पक्ष्या संबंधित आहे. या ऋचांचा साधारण अर्थ (अध्यात्मिक अर्थ वेगळे ही असू शकतात) कपोतरुपी दूताचे स्वागत केले पाहिजे. अन्न व दुग्ध अर्पण करून त्याचा सत्कार केला पाहिजे. कपोतरुपी दूताचा अपमान किंवा त्या वर प्रहार नाही केला पाहिजे. तो मंगल करणारा असो. अमंगलकरी बातमी आणणारा कपोत उदा: शत्रू सैन्याचे आक्रमण इत्यादी, लवकरात लवकर घरातून दूर निघून केला पाहिजे.

      February 16, 2015


  • चलनी नोटा, सुटे पैसे आणि आरोग्य

    आपल्या देशाचे सरकार आपल्या चलनाचा सांभाळ कसा चांगल्या रीतीने करत येईल याकडे खुपच गांभीर्याने लक्ष देत आहे. चलन फुगवटा होणार नाही, चलनाचे अवमुल्यन होणार नाही, याकडे लक्ष देत आहे.

      April 20, 2013


  • तेजोवलय (Aura) भाग २

    तुमचे तेजोवलय ही तुमची पर्सनल सिग्नेचर म्हणता येईल. जो माणूस आंधळा आणि बहिरा आहे, तो सुद्धा त्याच्या जवळ येणाऱ्या इतर लोकांचे अस्तित्व बरोब्बर ओळखतो.. सांगू शकाल , कसे..? कारण, देवाने दिलेल्या पंचेंद्रियां पैकी जेव्हा एखादे काम करत नाही तिथे बाकीची वइंद्रिये अतिसंवेदनशील होतात. ही लोकं इतरांचे अस्तित्व त्यांच्या तेजोवलयावरून ओळखतात. प्रत्येक माणसाकडे तेजोवलय बघायची, ते ओळखायची, त्याचा अर्थ जाणून घ्यायची जन्मजात क्षमता आहे. फक्त ती विकसित करावी लागते.

      July 21, 2017


  • प्रेशर कुकर

    प्रेशर कुकर पहिल्यांदा बनवला तो फ्रेंच गणितज्ज्ञ डेनिस पॅपिन यांन १६७९ मध्ये त्यांनी एका लोखंडी भांड्याला पक्के झाकण बनवून हा प्रयोग यशस्वी केला होता. कुकरला त्यावेळी डायजेस्टर हा शब्द वापरला जात असे.

      January 28, 2023


  • तुम्हाला काय येत नाही?

    नुकतीच एक छोटीशी कथा माझ्या वाचण्यात आली.

    बर्फाळ प्रदेशात दोन लहान मुले बर्फावर खेळत होती. त्या बर्फाचा पापुद्रा फार पातळ होता. अचानक त्या बर्फाला दडा गेला, एक भोक पडले व त्या भोकातून खेळत असलेल्या मुलांपैकी एक मुलगा घसरून बर्फाखाली असलेल्या थंडगार पाण्यात पडला. दुसर्‍या मुलाने हे पाहीले व लगेच त्याने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी धाव घेतली. तिथे गर्दी पण जमली व कोणीतरी या अपघाताची खबर पोलीसांना दिली. दरम्यान दुसरा मुलगा धावत आला व पाण्यात पडलेल्या आपल्या मित्राला बाहेर खेचून काढायचा प्रयत्न करू लागला. पण भोक लहान असल्यामूळे हे त्याला जमेना. त्याला जवळच एक मोठे झाड दिसले. त्याने पळत जाऊन त्या झाडाची एक मोठी फांदी तोडून आणली व त्या फांदिच्या सहाय्याने भोकाचा आकार मोठा करून पाण्यात पडलेल्या आपल्या मित्राला खेचून बाहेर काढले. तेवढ्यात पोलीस व पॅरॅमेडिकलचे लोक तेथे पोचले. त्यांनी पाण्यात पडलेल्या मुलाला योग्य ती वैद्यकीय मदत दिली व त्या मुलाचे प्राण वाचवले. पण तेथे आलेल्या पोलीसांना व पॅरामेडिकलच्या लोकांना एका गोष्टीचे राहुन राहुन आश्चर्य वाटत होते की एका छोट्या मुलाने झाडाची भली मोठी फांदी तोडून आणलीच कशी. त्यांची याच विषयावर चर्चा चालू होती तेव्हा एक वृद्ध म्हातारबुवा तेथे आले वम्हाणाले, ‘मला महीत आहे की या मुलाने ही झाडाची फांदी कशी तोडली ते.’

    ‘अस मग सांगा या मुलाने ही फांदी कशी तोडली? त्याला हे कसे जमले?’ पोलीसांनी उत्सुकतेने विचारले.

    ‘कारण ‘तु हे करू शकत नाहीस किंवा तुला हे जमणार नाही!’ असे सांगणारा कोणी माणूस नव्हता म्हणून!’ म्हातारबुवांनी मिस्कीलपणे उत्तर दिले.

    आपल्यामधे काहीतरी आगळेवेगळे, अतर्क्य किंवा अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवण्याची एक प्रकारची प्रचंड ताकद किंवा उर्जा दडून बसलेली असते. संकटकाळात ही उर्जा बाहेर यावी व त्यामुळे माणसाने संकटावर मात करावी अशी देवाने योजना केलेली असते. प्रत्येकाकडेच ही उर्जा असते व अनेक वेळा याचा वापर करून काहीतरी आगळेवेगळे करून दाखवावे अशी इर्शा प्रत्येकाच्याच मनातकेव्हा ना केव्हातरी निर्माण होत असते. पण ‘तुला हे जमणार नाही. तुला हे शक्य होणार नाही. तुझ्यात तेवढी ताकद नाही. तुझ्या बुद्धीला हे झेपणार नाही.’ यासारखी‘नकारात्मक’ टिपण्णी करणारेच जास्त भेटतात. ‘तु स्वतःला काय फार शहाणा समजतोस काय? तुला फार अक्कल आली असे वाटले तरी तो तुझा गैरसमज आहे. डोन्ट बी ओव्हरस्मार्ट’अशांसारखी वाक्ये हे लोक सहजरित्या तोंडावर फेकून आपल्याला नामोहरम करत असतात. आपण करायचे नाही व दुसर्‍याला करू द्यायचे नाही असा यांचा खाक्या असतो. मला तर लहानपणापासून अशी माणसे सतत भेटत आली आहेत. यांच्याकडे ‘आपण काय करू शकतो’यापेक्षा ‘आपण काय करू शकत नाही.’ याचीच यादी भलीमोठी असते. दुर्दैवाने मराठी समाजात अशा प्रकारच्या ‘नकारात्मक’ मनोवृत्तीची माणसे मोठ्या प्रमाणावर आहेत असे मला आढळून आले आहे.

    समजा एखाद्याने असे काही ‘अचाट’ काम करण्याचा प्रयत्न केला व त्यात तो अपयशी ठरला तर हीच माणसे, ‘तरी मी त्याला सांगत होतो की नसते धाडस करू नकोस, अंगाशी येईल! तरी मी त्याला सांगत होतो की तु तोंडाघशी पडशील! तरी मी त्याला सांगत होतो की हा असला येडपटपणा करू नकोस!’ असे म्हणत स्वतःच्या शहाणपणाची मिजास मारायला व स्वतःची पाठ थोपटून घ्यायला तयारच बसलेले असतात. ही अशी माणसे एखादी गोष्ट कशी यशस्वी करायची याचे मार्ग शोधत न बसता ही गोष्ट का करू नये याची कारणे शोधत बसतात. बहुतेक वेळा अशा या ‘नकारात्मक’माणसांची सुरवात आपल्या कुटुंबापासूनच होते.

    ज्या समाजात अशी ‘नकारत्मक’ विचारसरणीची माणसे जास्त प्रमाणात असतील तो समाज जास्त विकास करू शकत नाही. आज जरी मराठी समाजाने प्रगतीच्या कितीही डिंग्या मारल्या तरी अनेक बाबतीत मराठी समाज हा अजुनही‘अत्यंत मागासलेला’च आहे व तो पुढारण्याची चिन्हे आज तरी दिसत नाहीत. म्हणुनच गेल्या 400 वर्षांत शिवाजीमहाराजांच्या तोडीचा एकही माणूस या महाराष्ट्रात पैदा होऊ शकला नाही.

    अर्थातच आपण ‘सकारात्मक’ रहायचे का‘नकारात्मक’ रहायचे हे प्रत्येकाने स्वतःचे स्वतःच ठरवायचे नाही का?

    उल्हास हरी जोशी
    मोः-9226846631

    July 26, 2015

      August 1, 2015