Articles by गुरुदास
भिकाऱ्यांचे डॉक्टर
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकवेदनेला आणि दुःखाला गळ्याला लावायला कोणाला आवडेल? दुसऱ्यांचं दुःख पाहायला सुद्धा काही लोकांना आवडत नाही. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांचे दुःखं समजून त्यांनी आणलेली भीक सुद्धा त्यांच्याबरोबर खाऊन त्यांना आपलेसे करणारे व असे काही भिकारी जे अनेक दिवस एका जागेवर सर्व विधी करणारे व त्यामुळे त्यांच्या हातापायांना संसर्ग झालेला असला तरी त्या हाताने खाणारे व संसर्ग हातात नसून मनात असतो असे मानणारे आगळे वेगळे डॉक्टर केवळ त्या भिकाऱ्याविषयी सहानुभूती दाखवत नाहीत तर त्यांच्या वर उपचार करून योग्य त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून, त्यांनां नातेवाईकांनी सोडले असले तरीही पुन्हा आयुष्यात आणणारे व वेळ प्रसंगी एखाद्याला पुढील आयुष्य जगण्यासाठी स्वतःच्या पायावर उभा करणारे डॉक्टर अभिजीत सोनवणे हे झपाटलेलं व्यक्तिमत्व आजही कार्यरत आहे.
राजा सूर्यदेवा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाअभिजात संगीत नाटकांकडे
Category:
मनोरंजन लेखसंग्रहमला नेहमी वाटायचं की, आपल्याला दोन/ तीन नवीन नाटकं मिळाली. पण आपण अजून आपल्या अभिजात संगीत नाटकांत ( ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘शारदा’, ‘मानापमान’ इत्यादी ) भूमिका केल्या नाहीत. त्या आपण करायला हव्यात, पण कशा? त्यावेळी रंगभूमीवर या नाटकांचे प्रयोग विविध कलाकारांच्या संचात होत होते. सर्वांची कामे बसलेलीच होती. छोटा गंधर्व, राम मराठे, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, मा. अनंत दामले, भार्गवराम आचरेकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम अशी सर्व मंडळी या अभिजात नाटकांतून भूमिका करत होते. त्या नाटकांचे प्रयोग संयुक्त नटसंच किंवा अशाच काहीतरी नावाने केले जात. आम्हाला तालमीशिवाय नाटकाला उभं रहाणं शक्य नव्हतं. तालीम हवी म्हटलं की काम मिळत नसे. त्यांना तयार नट हवे असत.
ज्ञानदा इंग्लिश स्कूलचे वेगळेपण
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिककाही शाळा मुख्याध्यापकामुळे ओळखल्या जातात. पण काही शाळा संस्थाचालकामुळेही ओळखल्या जातात. त्यापैकीच एक नागेश जोशी. औरंगाबाद येथील ज्ञानदा इंग्लिश स्कूलला भेट देण्याचा योग आला. भारतीय शिक्षण व्यवस्थेला अनुसरून भारतीय संस्कार व मूल्यांवर आधारित एक चांगली शाळा पाहायचा योग आला.
उद्योगाचे 4 थे आवर्तन – नवीन लाडका शब्द की एक संधी
Category:
लेखसंग्रहउद्योग क्षेत्रात ५० वर्षे वावरल्यानंतर, वारंवार वापरले जाणाऱ्या नवनवीन लाडक्या शब्दांबद्दल मी जरा सावधच असतो. काही वेळा तर असे नवीन शब्द वा घोषणा म्हणजे ‘बाटली नवीन पण दारू तीच’ अशी परिस्थिती असते. अशा शब्दांचा संध्याकाळच्या सोशल पार्टीमध्ये वापरण्यापलीकडे फारसा उपयोग नसतो. असे शब्द फारसे टिकत पण नाहीत. मात्र काही नवीन शब्द त्यांच्यामधील बळकट संकल्पनेमुळे काळाच्या प्रवाहात टिकून रहातात. उदा. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट [TQM], रिव्हर्स इंजिनियरिंग इ.
उरूभङ्गम्
Category:
साहित्य - ललितसंस्कृत साहित्यात अपवादाने सापडणारी गोष्ट म्हणजे शोकांतिका. करूण रसाचे कितीही वर्णन केले तरी शेवटी आनंदी करणे ही भारतीय भूमिका. मात्र संस्कृत साहित्यात शोकांतिका नाहीच असे कोणी म्हणू नये म्हणून महाकवी भास यांची रचना म्हणजे उरूभङ्गम् !
महाभारताचा अंतिम कथा भागावर आधारित या नाटिकेत दुर्योधनाला नायक म्हणून रंगविले आहे.