साहित्य: -अर्धी वाटी किसलेला कांदा, १ वाटी लाल भोपळ्याचा कीस (साले काढून किसणीने किसावा), १ चमचा लसूण पेस्ट, १ चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी किसलेले गाजर, दीड वाटी शिजविलेल्या नूडल्स, १ चमचा चिरलेली कोथिंबीर.
कृती :- वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यावर मिश्रण पसरावे व शिजवून घ्यावे. थोडे गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्या. वड्यांचा आकार लहान असावा. एका डिशमधे ठेवून वरून कोथिंबीर पसरावी. चविष्ट लागतात.
Author
Post Views: 3