जागा मिळाली नाही… पण एक वाचक मिळाला!
Category:
ललित लेखन वैचारिक लेखनमी नोकरीनिमित्त अमरावतीला असतो. सुट्टी मिळाली की मन आपोआप गावाकडे ओढ घेतं. गाव म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, तर मनाला विसावा देणारी जागा असते. असाच एक दिवस सुट्टीच्या निमित्ताने गावाकडे जाण्यासाठी मी ट्रेन पकडली. स्टेशनवर पोहोचलो तर नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती. ट्रेन आली आणि डब्यात चढण्यासाठी अक्षरशः धावपळ सुरू झाली. कसाबसा गर्दीतून वाट काढत मी ट्रेनमध्ये घुसलो. आत शिरलो खरा; पण आता पुढचा प्रश्न होता बसायला जागा कुठे मिळणार?
September 18, 2026