साहित्य: -तळलेले १ इंच व्यासाचे पापड व पापड्या.
कृती: -एका बाऊलमध्ये ठेवाव्या. स्टार्टर म्हणून खाल्ल्या जातात.
शेंगदाण्याची मिनी भजी
साहित्य: -१ वाटी शेंगादाणे, दीड वाटी डाळीचे पीठ, अर्धा चमचा लाल तिखट, तळण्याकरिता तेल, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद.
कृती: – प्रथम शेंगदाणे भाजून घ्यावेत. भज्याला भिजवितात त्यापेक्षा थोडे घट्ट पीठ भिजवावे. त्यात हळद, मीठ व तिखट, शेंगादाणे घालावेत. मोठ्या कढईत बरेच तेल घेवून गरम झाल्यावर सर्व पीठ त्यात घालावे. व चांगले तळून घ्यावे. गार झाल्यावर प्रत्येक शेंगदाणा वेगळा करावा. त्याला बाहेरून पीठ लागलेले असेल.
