साहित्य: -२ रताळी (मध्यम आकाराची) उकडून कुस्करलेली, ८-१० पालकाची बारीक चिरलेली पाने, अर्धा चमचा लसूण पेस्ट, २ चमचे लोणी, २ अंडी (फेसलेली), अर्धी वाटी दूध, १ चमचा मिरपूड, १ वाटी किसलेले चीज, चवीप्रमाणे मीठ, १ मोठा चमचा बारीक चिरलेली पार्सली.
कृती: – एका मायक्रोवेव्ह डिशला लोणी लावावे. त्यावर रताळ्याचा अर्धा भाग पसरावा. त्यावर अंडे, दूध, मिरपूड, निम्मे चीज, पालक, पार्सली यांचे मिश्रण करून पसरावे. सर्वात वरून निम्मे राहिलेले किसलेले चीज पसरावे. हे मायक्रोवेव्हमध्ये भाजून घ्यावे. त्यानंतर त्याचे केकप्रमाणे तुकडे करून गरमच खाण्यास
द्यावे. हा नवा पदार्थ भारतीयांना नक्कीच आवडेल.