मोनॅको बिस्किटे व टॉपिंग्ज

मोनॅको बिस्किटे व टॉपिंग्ज – Recipe



साहित्य: -२५-३० मोनॅको खारी बिस्किटे, २५-३० चीजचे बारीक तुकडे, पुदिना+मिरची+कोथिंबीर + मीठ यांची चटणी -पाव वाटी, टोमॅटोचे बारीक चौकोनी तुकडे, कांद्याचे बारीक चौकोनी तुकडे.

कृती: – एका ट्रेमध्ये मोनॅको खारी बिस्किटे मांडावीत. चमच्याने प्रत्येकावर पुदिन्याची चटणी मध्यभागी ठेवून थोडी पसरावी. ल्यावर चीजचा बारीक तुकडा, टोमॅटोचा तुकडा व कांद्याचा तुकडा ठेवावा. स्टार्टर म्हणून खाण्यास योग्य.

टीप: – आवडीप्रमाणे इतर साहित्य वापरूनही टॉपिंग करता येते.

Author