प्रतिभा आणि प्रतिमा
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकआमची आजची शिक्षण व्यवस्था दिव्यांगा बद्दल फक्त सहानुभूती निर्माण करते. एक एक अवयव नसलेल्या माणसांचे वेगळे वेगळे प्रश्न आहेत व ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सोडवावे लागतात.प्रतिभा अनेकाकडे असते मग तिला घडविणारे हात मिळाले तर तिची एक आगळी वेगळी प्रतिमा तयार होते. दिव्यांग लोकांमध्येही प्रतिभा असते ती ओळखून त्यांच्यासाठी लागणारी पायाभूत सुविधा आपल्याकडे नाही. या पायाभूत सवलती निर्माण करून अनेक अपंगांना अधिकारी पदावर पोहोचविणारा अवलिया म्हणजे यजुवेंद्र महाजन होय. स्वतःचे घरदार विकून शेती विकून साडेतीनशे अधिकाऱ्यांची फौज निर्माण करणे सोपी गोष्ट नाही. त्यांच्या यशोगाथा मधील मुले आज दिल्लीला दोन्ही डोळे नसलेली अंध जिल्हाधिकारी, कोणी सेल्स टॅक्स ऑफिसर, कोणी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये आहे.दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांचा सामाजिक चांगुलपणा हा नेहमीच एक भाग राहिला आहे. आणि त्यांना जेव्हां हे कळले की श्रीमंत आणि गरीब यांच्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये मोठी तफावत आहे आणि ती बदलायला हवी. भारतात खूप प्रतिभावान लोक आहेत, परंतु त्यापैकी बरेच लोक त्यांच्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे चांगल्या शिक्षणासाठी पैसे नाहीत किंवा त्यांना मदत करण्यासाठी समर्थन प्रणाली नाही. ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचे स्वप्न घेऊन त्यांनी दीपस्तंभ फाउंडेशन सुरू केले दिव्यांगांसोबत काम करण्याचा त्यांचा विचार नव्हता. सुरुवातीला त्यांना आदिवासी आणि आर्थिक दुर्बलांसोबत काम करायचे होते.
July 17, 2026