त्यात काय अवघड आहे?

मी निवृत्त झाल्यानंतरच्या दिवसातील एक आठवण. निलय बऱ्याच दिवसांनी भेटायला आला होता. सुरुवातीला जरा हवापाण्याची चर्चा झाल्यावर त्याने एक चांगली बातमी दिली आणि पेढ्याचा पुडा माझ्यासमोर ठेवला. तो त्याच्या नवीन कामावर वरिष्ठ अधिकारी झाला होता. कामाच्या व्यापामध्ये बरेच दिवस भेटायला पण येऊ शकला नव्हता. मग म्हणाला, “ साहेब, एक प्रश्न विचारू का? माझ्यावर आता पूर्ण धंद्याची जबाबदारी आहे. रोज कितीही काम केले तरी दिवस पुरत नाही. संध्याकाळी दमतो पण समाधान झाल्यासारखे वाटत नाही. काही वेळा तर गोष्टी हाताबाहेर गेल्यासारख्या वाटतात आणि उद्विग्नता येते. तुम्ही मात्र तुमच्यावेळी धंदा अगदी सहजपणे साम्भाळल्यासारखे वाटे. सहसा उशीरा काम करत नसत. तुम्हाला वेळ अपुरा पडल्यासारखे दिसत नसे. बऱ्याचवेळा आम्हाला वाटे की तुम्ही तुमच्या कामात आनंदी आहात. मला जरा समजावून सांगा की हे कसे शक्य होते.”

मी पण हसत हसत सांगितले, “ निलय, तू म्हणतोस ते खरे आहे. अरे धंदा व्यवस्थित करणे खरच तेव्हढे अवघड नाही. आपणच आपल्या चुकीच्या शैलीमुळे आपले काम अवघड करून घेत असतो. तुला माहित आहे की, एखादा धंदा चालवणे ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असून त्या प्रक्रियेवर अनेक अंतर्गत आणि बाह्य गोष्टींचा प्रभाव पडत असतो.

ह्या बाह्य गोष्टींचा बहुतेक वेळा आधी अंदाज येऊ शकत नाही. कदाचित ह्याचमुळे अश्या गोष्टी व्यवस्थापकांच्या कह्यात नसतात. तरीसुद्धा वेळोवेळी अशा गोष्टीना व्यवस्थापकांना तोंड द्यावे लागतेच.”

थोडा दम घेऊन मी निलयचे माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे ना ते बघितले. कारण माझा असा अनुभव होता की बऱ्याचवेळा तरुण मुलांचे लक्ष अगदी सहज विचलित होत असते. पण जेव्हा निलय म्हणाला, “ हे तर सगळ्यांना माहित असते. पण पुढे काय?”

माझी खात्री झाली की तो खरच गंभीरपणे माझे बोलणे ऐकत आहे. मी पुन्हा सुरु केले, “ ह्या विरुद्ध ज्या गोष्टींमुळे व्यवसायाच्या अंतर्गत अडचणी निर्माण होऊ शकतील अशा गोष्टी मात्र बहुधा व्यवस्थापकांच्या कह्यात असतात. जर व्यवस्थापकांनी वेळच्या वेळी अशा गोष्टींचे निराकरण केले तर त्यांना बाहेरून अडचणी आणणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देण्यास नक्कीच जास्त वेळ मिळू शकतो.”
“माझ्या स्वतःच्या कार्यकाळात आणि नंतर इतर कंपन्यांना सल्ला देण्याच्या कामात मला असे लक्ष्यात आले की अंतर्गत अडचणींकडे लक्ष देतादेता व्यवस्थापकांचा इतका वेळ खर्च होत असतो की त्यांना कंपनीच्या उद्देश्यांकडे, बाजारातील बदलांकडे आणि ग्राहकांच्या समाधानाकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळच शिल्लक रहात नाही.”

“माझं म्हणशील तर मी अंतर्गत अडचणींचे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात निराकरण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची एक यादीच तयार केली होती. या यादीची एक प्रत मी तुला देऊन टाकतो. ती अशी आहे –

1. तुमची ध्येय आणि उद्दिष्ट स्पष्टपणे निश्चित करा.
2. ग्राहकांच्या अपेक्षा नीट समजावून घ्या.
3. तुमची उद्दिष्टे कंपनीतील सर्व लोकांना स्पष्टपणे समजावून सांगा.
4. ती उदिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येकाने काय काम करायचे आहे हेही स्पष्ट करून सांगा.
5. प्रत्येकाने करावयाच्या कृतींचा आराखडा तयार करा.
6. त्यासाठी लागेल अशी योग्य साधनसामग्री पुरवा.
7. आवश्यक तेथे प्रशिक्षण द्या आणि प्रेरणा निर्माण करा.
8. स्वतःच्या वागणुकीचा आदर्श निर्माण करा.
9. वेळोवेळी प्रगतीचा आढावा घ्या.
10. एकमेकांना विसंगत असलेल्या कामगिरी निर्देशाकांचे निराकरण करा.
11. योग्य परिणाम दिसत नसल्यास कृतींमध्ये योग्य असे बदल घडवून आणा.
12. यश मनसोक्तपणे साजरे करा.
वरील सर्व कृती संपूर्णपणे व्यवस्थापकांच्या कह्यात असतात आणि असे वेळच्यावेळी घडवून आणल्यावर, अंतर्गत मुद्द्यांचे वेळोवेळी निराकरण करण्यासाठी व्यवस्थापकांना फार कमी वेळ व शक्ती लागते. आणि नंतर साहजिकच त्यांना धंद्याची उद्दिष्टे, बाजारातील घडामोडी आणि ग्राहकांच्या समाधानाकडे लक्ष द्यायला योग्य तो वेळ मिळू शकतो.

आता तूच सांग, यात काय अवघड आहे? काहीच नाही.” “ निलय, वरील मुद्द्यांकडे पुरेसे लक्ष न दिल्यामुळे व्यवस्थापकांचे आयुष्य उगाचच अत्यंत अवघड आणि बऱ्याच वेळा निराशाजनक होते. याशिवाय रोज पुन्हापुन्हा त्याच त्याच येणाऱ्या समस्यांमुळे आणि सतत आवश्यक लागणाऱ्या अथवा भासणाऱ्या पाठपुराव्यामुळे जास्तीचे काम उशीरापर्यंत करावे तर लागतेच शिवाय पुरेसे चांगले परिणामही घडून येत नाहीत.”

“निलय, तू पण आत्मपरीक्षण कर आणि बघ काय परिणाम दिसतात ते.”
परतला तेव्हा निलयच्या चेहेऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होते. लवकरच त्याने धंद्यातील सर्वांगीण प्रगती आणि ती सुद्धा सहजपणे घडवून आणत असल्याचे कळविले. शिष्य असावा तर असा आणि गुरूला अजून काय पाहिजे असते?

सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच गोष्टींचा शेवट अवलंबून असतो.

विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/

Author