युवा-विश्व

पत्रास कारण की

Category:

 

बरं झालं, अब्राहम लिंकन तुम्ही मुख्याध्यापकाला पुन्हा पत्र लिहिलं नाही. कारण पत्र संस्कृती आता राहिलीच नाही.

तुमचं पत्र केव्हाच खुंटीला टांगलंय. पण तुम्ही जसं मुलाला घडवायला सांगितलंय तसं परिपत्रकांमुळे शक्यच होत नाही.

  June 14, 2026


लेखसंग्रह

पुस्तकांनी काय शिकवलं

Category:

 

तुमच्याकडे दहा रुपये असतील तर आठ रुपये स्वतःच्या खर्चासाठी ठेवा. उरलेल्या दोन रुपयांपैकी एक रुपयाचं गुलाबाचं फुल घ्या आणि एक रुपयांचं पुस्तक घ्या अशी एक म्हण आहे. का जगायचं ते गुलाबाकडे पाहून कळेल आणि कसं जगायचं ते पुस्तक शिकवेल. पुस्तके अत्यंत मोलाची आहेत. त्यात मराठी साहित्य ही तर न संपणारी दौलत आहे. जितकी जास्त लुटाल तितकी ती वाढत जाते. एक ज्ञानेश्वरी जरी पुन्हा पुन्हा वाचली तर प्रत्येक ओवीचा अर्थ नव्याने कळतो. आपण मराठी माणसे खरोखर नशीबवान, आपल्याला जसा थोर इतिहास लाभला तशी साहित्याची मोठी परंपराही लाभली. पुस्तकांच्या परंपरेचा हा आढावा घेतला आहे निरेन आपटे ह्यांनी!

  June 14, 2026


साहित्य - ललित

प्रतिमा

Category:

 

रामायणकथेवर आधारीत भासरचित सात अंकी संस्कृत नाटक. भास यांच्या सर्वोत्कृष्ट नाटकांपैकी प्रतिमा हे एक नाटक . यात रामाच्या वनवासात जाण्यापासून ते रावणाचा वध आणि रामाचा राज्याभिषेक या घटनांना भास यांनी स्थान दिले आहे राजा दशरथाच्या मृत्यूनंतर भरत आपल्या आजीच्या घरुन परततांना अयोध्येजवळच्या रस्त्यावर असलेल्या देवकुळात पूर्वजांच्या मूर्ती पाहतो. तेथे दशरथाची मूर्ती पाहून भरताला त्यांच्या मृत्यूचा अंदाज येतो. प्रतिमा दर्शनाचा घटनेमुळे याला प्रतिमा नाटक असे नाव देण्यात आले.

  June 14, 2026


वऱ्हाड निघालंय लंडनला
मराठी नाटक

वऱ्हाड निघालंय लंडनला

Category:

 

प्रा. लक्ष्मण राव देशपांडे म्हणजे अफलातून कलाकार ..कित्येक हजार प्रयोग झाले ह्या नाटकांचे .. अविस्मरणीय आणि प्रत्येक वेळी गदगदून हसवणारा एकपात्री प्रयोग

  June 13, 2026