निवड क्षणाची, आवड आयुष्यभराची
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 26, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 26, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकप्रेरणा कुठून आणि कोणापासून मिळेल हे सांगता येत नाही. कुणाला साहित्यातून तर कुणाला गाण्यातून, कुणाला भाषणामधून तर कोणाला आचरणा मधून प्रेरणा मिळते. प्रेरणेला मन नियंत्रित करतें. एखाद्याला संपवणे त्या व्यक्तीची प्रेरणा असू शकते व एखाद्याला वाचवणे सुद्धा काहींची प्रेरणा असू शकते आणि हे त्या त्या परिस्थितीत तुमचं मन कसं तुम्हाला प्रेरणा देतं यावर सर्व अवलंबून आहे. मनाची मशागत, मनावरील संस्कार हे माणसांच्या स्वभावावर परिणाम करतात.
June 26, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रहमला नेहमी वाटायचं की, आपल्याला दोन/ तीन नवीन नाटकं मिळाली. पण आपण अजून आपल्या अभिजात संगीत नाटकांत ( ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘शारदा’, ‘मानापमान’ इत्यादी ) भूमिका केल्या नाहीत. त्या आपण करायला हव्यात, पण कशा? त्यावेळी रंगभूमीवर या नाटकांचे प्रयोग विविध कलाकारांच्या संचात होत होते. सर्वांची कामे बसलेलीच होती. छोटा गंधर्व, राम मराठे, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, मा. अनंत दामले, भार्गवराम आचरेकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम अशी सर्व मंडळी या अभिजात नाटकांतून भूमिका करत होते. त्या नाटकांचे प्रयोग संयुक्त नटसंच किंवा अशाच काहीतरी नावाने केले जात. आम्हाला तालमीशिवाय नाटकाला उभं रहाणं शक्य नव्हतं. तालीम हवी म्हटलं की काम मिळत नसे. त्यांना तयार नट हवे असत.
June 26, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिककाही शाळा मुख्याध्यापकामुळे ओळखल्या जातात. पण काही शाळा संस्थाचालकामुळेही ओळखल्या जातात. त्यापैकीच एक नागेश जोशी. औरंगाबाद येथील ज्ञानदा इंग्लिश स्कूलला भेट देण्याचा योग आला. भारतीय शिक्षण व्यवस्थेला अनुसरून भारतीय संस्कार व मूल्यांवर आधारित एक चांगली शाळा पाहायचा योग आला.
June 26, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकपत्रास कारण की भावनांचं आदान-प्रदान करणारं पत्र, आज अचानक गायब झालं आहे. वैभव पाहिलेलं पत्र, आज अस्तंगत झाल्याचं पाहून फार वाईट वाटतं. किती जणांचे आयुष्य पत्रांनी घडवलं, किती जणांना व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळालं, माणसाच्या मनातले तरंग एरवी विरून गेले असते; पण पत्रामुळे त्या भावना मनामनांत पोहोचतात. पत्राने व्यक्तिमत्त्व समृद्ध झाली, त्यांना वळण लागले, शिस्त लागली. पत्रातून माणसं घडली, पत्रातून इतिहास घडला, पत्राला समृद्ध वारसा आहे. पत्र म्हणजे आयुष्याची सुंदर ठेव, जपून ठेवावी वाटणारी. जणू अत्तराच्या कुपीतले अत्तर. पत्र म्हणजे पारिजातकाचा सडा. दुसऱ्याच्या अंगणात पडून, त्यांना सुखावणारा तो तो एक मित्र आहे.
June 26, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 26, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 25, 2026
Category:
लेखसंग्रहउद्योग क्षेत्रात ५० वर्षे वावरल्यानंतर, वारंवार वापरले जाणाऱ्या नवनवीन लाडक्या शब्दांबद्दल मी जरा सावधच असतो. काही वेळा तर असे नवीन शब्द वा घोषणा म्हणजे ‘बाटली नवीन पण दारू तीच’ अशी परिस्थिती असते. अशा शब्दांचा संध्याकाळच्या सोशल पार्टीमध्ये वापरण्यापलीकडे फारसा उपयोग नसतो. असे शब्द फारसे टिकत पण नाहीत. मात्र काही नवीन शब्द त्यांच्यामधील बळकट संकल्पनेमुळे काळाच्या प्रवाहात टिकून रहातात. उदा. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट [TQM], रिव्हर्स इंजिनियरिंग इ.
June 25, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकवाचनाला प्रेरणा देणाऱ्यापैकी एक गोष्ट म्हणजे परीक्षा पद्धती होय. आज विद्यार्थ्यांचे वाचन परीक्षेपुरतच सिमीत झालं आहे. संकल्पना जरी स्पष्ट झाल्या नाही तरी पाठांतर करून व कॉपी करू मुलें पास होत आहे त.अवांतर वाचन संदर्भासाठी खूप उपयोगी पडतं, पण मुलांचं आवांतरवाचन आज जवळजवळ नाहीच.घोकाओका एवजी विचार करा आणि लिहा असेच परीक्षेचे स्वरूप आता राहणार आहे.
June 25, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकपुस्तकं आणि माणसं वाचायलाच हवीत. वाचून समजून घ्यायला हवीत. वाचल्याशिवाय दोन्हीही समजत नाहीत. एखादं पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतं, तसंच माणसांचंही आहे. काही माणसं पुन्हा पुन्हा वाचावीशी, अंगीकारावीशी वाटतात. वर वर माणसं कळली असं वाटतं; पण त्यांचे मन जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणसं वाचली, कळली असे म्हणता येत नाही. सरड्यापेक्षाही जलद रंग बदलणाऱ्या काही माणसांबद्दल अनुमानच बांधता येत नाही. मूल्य न बदललेली माणसं तत्त्वनिष्ठ असतात व तत्त्वाला धरूनच आयुष्य कंठतात. समोर असणारी माणसं कधी कधी अचानक क्षणात जातात, असेपर्यंत कुणी ठसा उमटवतं, कोणी पायवाट निर्माण करतं.
June 25, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti