वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नसतात,
अंतरीच्या जखमांचे कुणीही हक्कदार नसतात.
हास्य सारे वाटतात मेळ्यातल्या गर्दीसारखे,
अश्रूंच्या या वाटेवर मेळे, बाजार नसतात.
खांद्यावरती हात ठेवून बोलणारे लाख भेटती,
मन जपाया शब्दांचे एवढे आधार नसतात.
रात्र माझी, चंद्र माझा, सावलीही सोबत असते,
दुःख पेलण्या चांदण्यांचे हातभार नसतात.
जन्मभर मी शोधले जे नाव नात्यांच्या वळणावर,
काळ म्हणतो वेदनांना कुठले व्यवहार नसतात.
वादळांनी शिकविले, झाड व्हायचे खोल मुळांचे,
फांद्यांवरी विसावणारे सारे संसार नसतात.
एकट्याने चालताना एवढेच उमगून गेले
स्वतःपाशी हरलेल्यांचे कधी पराभव नसतात.
वेदनांना फक्त साथीदार असतात, भागीदार नसतात,
मन जळाले की राखेचेही कुणी वारसदार नसतात.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Post Views: 1