वैचारिक लेखन

आदर्श

Category:

 

इतिहासात पण आपण वाचलेले आहे, आदर्श पुरुषांना सामाजिक विचारांना , समाजाच्या विरोधाशी संघर्ष करून समाजासाठीच काहीतरी चांगले घडवायचे असते आणि त्यात ते यशस्वी होतात आणि म्हणुत ते आदर्श होतात .

  September 18, 2026


मनोरंजन

पंचवीस वर्षाने रेकॉर्ड झालेले गाणे

Category:

 

प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी १९५१ मध्ये नेहरुवर टीका करणारे काव्य लिहिले . त्यामुळे त्याना तुरुंगात टाकले. त्याना सांगण्यात आले माफी मागा तर सुटका करतो . ते माफी मागायला तयार नव्हते . त्यामुळे त्यांची सुटका होत नव्हती. हे राजकपुरला कळले. त्याला माहिती होते की आपण पैसे दिले तर मजरूह ते घेणार नाहीत.

  September 18, 2026


आधुनिक जगाचा धातू – टायटॅनियम
विज्ञान / तंत्रज्ञान

आधुनिक जगाचा धातू – टायटॅनियम

Category:

 

१७९१ साली इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ व खनिजशास्त्रज्ञ विल्यम ग्रेगॉर यांना एक नवा धातू मेनकॅनाइट खनिजात सापडला त्याव्रून त्यांनी त्याचे नाव मेनाकिन असे ठेवले. पुढे १७९५ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ मार्टिन हेन्रिक क्लॅपरॉथ यांना रुटाइलच्या खनिजात हा धातू सापडला. क्लॅपरॉथ यांना आधीच्या शोधाबद्दल काहीच माहित नव्हते, त्यांनी त्याचा शास्त्रीय अभ्यास करून त्यास टायटॅनियम असे नाव दिले. क्लॅपरॉथ यांनाच टायटॅनियमच्या शोधाचे श्रेय दिले जाते.

  September 18, 2026


राधे राधे – कृष्ण कृष्ण
कथा

राधे राधे – कृष्ण कृष्ण

Category:

 

द्वारकेच्या महालाच्या प्रांगणात वावटळीने रिंगण धरले होते.

धुळीचा उभा खांब हेलकावे खात आकाशापर्यंत पोचत होता. त्यात अडकलेली सुकलेली पाने, झुडपे आपली सुटका करून घेऊन इतस्ततः पडत होती. गाई,गुरे झाडांचा आसरा शोधून गप्प उभी होती.

महालाच्या बाहेर उभे असलेले प्रतिहारी जवळपासचा खांब पाहून त्याच्या आडोश्याला उभे राहिले होते.

  September 18, 2026


जागा मिळाली नाही… पण एक वाचक मिळाला!
ललित लेखन

जागा मिळाली नाही… पण एक वाचक मिळाला!

Category:

 

मी नोकरीनिमित्त अमरावतीला असतो. सुट्टी मिळाली की मन आपोआप गावाकडे ओढ घेतं. गाव म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, तर मनाला विसावा देणारी जागा असते. असाच एक दिवस सुट्टीच्या निमित्ताने गावाकडे जाण्यासाठी मी ट्रेन पकडली. स्टेशनवर पोहोचलो तर नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती. ट्रेन आली आणि डब्यात चढण्यासाठी अक्षरशः धावपळ सुरू झाली. कसाबसा गर्दीतून वाट काढत मी ट्रेनमध्ये घुसलो. आत शिरलो खरा; पण आता पुढचा प्रश्न होता बसायला जागा कुठे मिळणार?

  September 18, 2026