नॉनव्हेज मांचुरियन

नॉनव्हेज मांचुरियन – Recipe



मांचुरियन नॉनव्हेजही करतात. एग मांचुरियन, चिकन मांचुरियन व प्रॉन्स मांचुरियन असे त्याचे प्रकार आहेत.

बेक्ड बीन्स टोस्ट

साहित्य: – ४ ब्रेड स्लाईसेस, २ मोठे चमचे राजमा, ३ चमचे टोमॅटो सॉस, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा मिरपूड, अमूल बटर.

कृती: – प्रथम राजमा कोमट पाण्यात दोन तास भिजवावा व कुकरमधून शिजवून घ्यावा. नंतर एका लहान पॅनमध्ये एक चमचा अमूल बटर गरम करून त्यात राजमा घालावा. थोडा परतावा. आच बंद करावी. नंतर त्यात टोमॅटो सॉस, मीठ, मिरपूड घालून चमच्याने चांगले ढवळावे.
ब्रेडच्या स्लाईसेस टोस्टरमधून तांबूस भाजून घ्याव्या व नंतर त्याच्या एका वाजूस अमूल बटर सुरीने किंवा चमच्याने लावून त्यावर वरील राजमाचे मिश्रण पसरावे. चार बेक्ड वीन्स टोस्ट तयार होतात. ते एका ट्रेमध्ये ठेवून सर्व्ह करावेत.

फ्रेंच टोस्ट

साहित्य: -४ ब्रेड स्लाईसेस, २ अंड्याचे पांढरे, कृती ६-७ कोथिंबिरीच्या चिरलेल्या काड्या (ऐच्छिक), अर्धा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची (ऐच्छिक), अर्धा चमचा मिरपूड, चवीनुसार मीठ, लोणी

कृती: – ब्रेड, मिरपूड सोडून सर्व साहित्य एका वाऊलमध्ये फेटावे, ब्रेड स्लाईसेस टोस्टरमधून लालसर भाजून घ्याव्या. नंतर प्रत्येक स्लाईस वरील अंड्याच्या मिश्रणात बुडवून नॉनस्टिक तव्यावर १ चमचा लोणी घालून ठेवावा. मंद आचेवर ब्रेडच्या दोन्ही वाजू भाजाव्या. एका मोठ्या डिशमध्ये हे टोस्ट ठेवून वरून मिरपूड भुरभुरावी.

टीप: नुसते अंड्याचे पांढरे न घेता संपूर्ण अंड्याचा बलक वापरला तरी चालतो.

मिश्र डाळींचे वडे (नागपुरी वडे)

साहित्य: – अर्धी वाटी हरबरा डाळ, कृती: -पाव वाटी मटकी डाळ, पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी उडीद डाळ, (वरील सर्व डाळी ८-१० तास वेगवेगळ्या भिजवाव्या) फोडणीचे साहित्य: -५ चमचे तेल, ८-१० हिरव्या मिरच्या, १०-१२ कढीलिंबाची पाने, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद.
मसाला भरड वाटून: -२-३ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, २ चमचे धने, ६-७ कोथिंबिरीच्या चिरलेल्या काड्या, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल..

कृती: – भिजलेल्या डाळी व कडधान्ये भरड वाटावीत. नंतर फोडणी करून त्यात मिसळावी. त्याचप्रमाणे भरड वाटलेला मसाला व मीठ घालून चांगले ढवळावे. हे मिश्रण वडा थापण्याएवढे वट्ट असावे, लिंबाच्या आकाराचे (किंवा थोडे मोठे) गोळे करून प्रत्येक गोळा जरा थापून तो चांगल्या तापलेल्या तेलात फिकट लाल रंग येईपर्यंत मंद आचेवर तळावा.
हे वडे नुसते खाण्यासही चांगले लागतात.

Author