मिनी सामोसे

मिनी सामोसे – Recipe



साहित्य: – सारण: –
४ उकडून कुस्करलेले बटाटे, दीड चमचा आले-लसूण-मिरची-पुदिना पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा लिंबूरस, चवीनुसार मीठ.

आवरणाचे साहित्य: -१ वाटी मैदा, पाव वाटी कणीक, १ चमचा वनस्पती तूप,
अर्धा चमचा बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ.

कृती: – एका वाऊलमध्ये सारणाचे सर्व साहित्य एकत्र करून मळून ठेवावे. एका लहान परातीत मैदा, मीठ, गरम केलेले वनस्पती तूप व बेकिंग पावडर एकत्र करून आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून घट्टसर गोळा मळून ठेवावा.

मध्यम आकाराची पुरी लाटून तिचे सुरीने दोन भाग करावेत. प्रत्येक भागावर १ चमचा सारण ठेवून नंतर त्रिकोणी सामोसा तयार करावा. कड जरा दाबावी म्हणजे तळताना सामोसे फुटणार नाहीत.

गरम केलेल्या तेलामध्ये हे सामोसे खरपूस तळून काढावेत. व एका सुंदर डिशमध्ये मांडून ठेवावेत. हे लहान सामोसे फार छान दिसतात व चविष्टही लांगतात. चिंचेच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉसबरोबर द्यावेत.

Author