साहित्य: -अर्धी वाटी उकडलेल्या नूडल्स, अर्धी वाटी बारीक चिरलेली फरसबी, अर्धी वाटी बारीक किसलेला कोबी, अर्धी वाटी किसलेले गाजर, १ चमचा मोडाचे मूग, १ बारीक चिरलेला कांदा, चवीपुरते मीठ, १ चमचा मिरपूड, १ चमचा सोयासॉस, २ चमचे तेल.
कव्हरसाठी दीड वाटी मैदा, दोन चमचे तेल, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर.
कृती: – तेल, मीठ व बेकिंग पावडर घालून मैदा पाण्यात मळून ठेवावा. कढईत दोन चमचे तेल गरम करून त्यात भाज्या घालून परताव्यात. दोन मिनिटे झाकण ठेवावे. नंतर त्यात मीठ, सोयासॉस, नूडल्स घालून परतून घ्यावे. झाकण घालून आच बंद करावी.
मळलेल्या मैद्याच्या छोट्या (एक वीत व्यासाच्या) पोळ्या लाटाव्यात. त्यावर वरील मिश्रण एका टोकाला ३ चमचे ठेवून जरा लांबट पसरावे व अळूवडीप्रमाणे गुंडाळी करावी. शेवटी कडाही दुमडून दाबाव्यात. नंतर तेलात तळून घ्याव्या. एका डिशमध्ये ठेवून २ इंचाचे तुकडे कापावेत, चिली सॉससोबत खाण्यास द्यावे.