साक्षीदार तो साऱ्याचा । ईश्वर अंतर्यामी ॥
मनातील भाव जाणे । सत्याचा तो स्वामी ॥
कर्मांचा लेखा सारा । त्याच्या हाती राहे ॥
उशीर जरी भासे । न्याय कधी न वाहे ॥
खोट्याचा हा डामडौल । क्षणभंगुर ठरे ॥
सत्याच्या एका किरणे । अंधार दूर सरे ॥
अहंकाराचे मनोरे । काळच मोडून टाके ॥
नम्रतेच्या त्या वाटे । ईश्वर भेटी येके ॥
विश्वासाची ठेव मना । नाम स्मरा रे ॥
साक्षीदार तो साऱ्याचा । ईश्वरच कैवारी ॥
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Author
Post Views: 21