शाळेचा रस्ता
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 24, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 24, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 23, 2026
Category:
लेखसंग्रहसाधारणतः १९९७ च्या सुमारास माझी एका मोठया कारखान्याच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली. तो कारखाना इलेक्ट्रिक बल्ब आणि ट्यूब लाईट याची निर्मिती करत असे. कारखाना वर्षाचे सर्व ३६५ दिवस दिवसरात्र चालू असे. हा कारखाना कळवा – बेलापूर औद्योदिक पट्टयात [industrial belt] होता.
June 23, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका बाल-साहित्य
June 23, 2026
Category:
साहित्य - ललितमहाकवी भासांच्या तेरा नाटकांपैकी एक तीन अंकी संस्कृत नाटक आहे पंचरात्र. हे महाभारताच्या विराट पर्वावर आधारित नाटक आहे. या नाटकांची कथावस्तू अशी द्यूतात पराभूत झाल्यानंतर पांडव बारा वर्षांच्या वनवासाला गेले आहेत. तो संपल्यावर अज्ञातवासाचे एक वर्ष ते विराटच्या नगरीत वेषांतर करून राहत आहेत.
June 23, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकस्वप्नांना दृष्टिकोनाची गरज असते. दृष्टीहिनांनीही स्वप्न पाहून इतिहास घडविला आहे. भारतातील सगळ्यात तरुण उद्योजक श्रीकांत बोला २०२१ मध्ये फोर्ब्सच्या ३० अंडर ३० च्या यादीतही त्याला स्थान देण्यात आले आहे. ज्यांना वाटते की, शारीरिक अक्षमता एखाद्या व्यक्तीच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकते, त्यांच्यासाठी श्रीकांत बोला हे एक आदर्श उदाहरण आहे. श्रीकांत अंध असून ही कोट्यवधींचा मालक झाला आहे. श्रीकांतने हे खरं करुन दाखवलं आहे की, स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांची गरज नाही, स्वत:वरील विश्वास तुम्हाला तुमचं यश गाठायला मदत करु शकतो.श्रीकांत बोला याचा जन्म ७ जुलै १९९२ रोजी झाला. आंध्र प्रदेशातील सीतारामपुरम येथील मछलीपट्टणम येथे जन्मलेला श्रीकांत आयुष्याच्या सुरुवातीपासूनच अंध होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती.
June 23, 2026
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञान‘सत्यम शिवम सुंदरम’ ब्रीदवाक्य असलेला हा लोगो भारतीय दूरचित्रवाणीच्या सुवर्णकाळाचे प्रतीक असून, २०२४ मध्ये तो केशरी रंगात अद्ययावत करण्यात आला आहे. भारतीय प्रसारमाध्यमांचा इतिहास आणि कोट्यवधी भारतीयांच्या भावना ज्या एका चिन्हाशी जोडल्या गेल्या आहेत, ते चिन्ह म्हणजे दूरदर्शनचा हा गोल फिरणारा लोगो. आजच्या डिजिटल आणि शेकडो वाहिन्यांच्या युगातही या लोगोची जादू आणि त्यामागील इतिहास तितकाच रंजक आणि प्रेरणादायी आहे.
June 22, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 22, 2026
Category:
मराठी नाटक व्हिडिओज - Marathiकेशव महालातील पंत कुटुंबाची आणि त्यांच्या विचित्र समस्यांची ही नाट्यमय कथा आहे. घरातील सदस्यांच्या अतरंगी वागण्यामुळे निर्माण होणाऱ्या विनोदी प्रसंगांची ही मालिका आहे.
June 22, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रहखरं तर ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव’साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात ‘नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार’ हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी ‘नभी चंद्रमा धवल पौर्णिमा’ हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर’ हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं.
June 22, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti