लेखसंग्रह

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ३

Category:

 

गणिताचा प्रश्न पाहिल्यावर थिजल्यासारखे होते. काय करू काही सुचतच नाही!!! हा माझाच नव्हे,अनेकांचा अनुभव आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सुरू कुठे करावं हा प्रश्न असतो, तर तितक्याच विद्यार्थ्यांना समीकरण मांडणे अवघड जाते. म्हणून स्ट्रेटजी उपयोगी ठरते. त्यावरचा उपाय – ‘स्ट्रॅटजि’ – ‘रणनीती’. पहिले काय करावं हे सुचावं लागत नाही, माहित असते आणि ते केले के कोंडी फुटते … पुढची वाट दिसू लागते …

  April 1, 2021


अध्यात्मिक-धार्मिक

निरंजन – भाग ४३ – मिटला वाद हरिहराचा…..

Category:

 

ही कथा एका अशा भक्ताची आहे ज्याच्या हृदयामध्ये सदैव शिवभक्ती आणि श्वासांमध्ये ॐ नमः शिवाय गुंजत होते. त्यांचे नाव आहे, “संत नरहरी सोनार…..”

  April 1, 2021


साहित्य - ललित

निसर्गाची ध्यान प्रक्रिया

Category:

 

ऋषी, संत महात्मे, थोर व्यक्ती, ध्यान धारणा, समाधीयोग यांची महती अनुभवाने गातात. जागृत राहून याचा आनंद घ्या म्हणतात. सत्य आहे. परंतु सामान्यांसाठी कठीण. निसर्गानेच कदाचित् सर्व जिवीत प्राण्यासाठीं गाढ निद्रेच्या मार्गातून, अवस्थेतून धान परिणाम साध्य करण्याचे योजीले नसेल कां ?

  April 1, 2021


व्यक्ती-परिचय

बॉलिवूडचा विनोदी अभिनेता जगदीप

Category:

 

जगदीप यांना भेटलो तेव्हा आम्ही तिघे होतो , त्यांच्याबरोबर जावेद जाफरी होता , स्वाक्षरी घेतल्यावर आमचा फोटो जावेद जाफरी ने काढला. परंतु जावेदच्या स्वाक्षरी घेतली नाही कारण , जगदीप समोर असताना माझ्या डोळ्यासमोर ‘ सुरमा भोपाली ‘ होता.

  April 1, 2021


लेखसंग्रह

पुष्पा, आय ‘लव्ह’ टिअर्स !

Category:

 

आतून पोखरलेला पण बाह्यतः कणखर खन्ना वेळोवेळी पुष्पाला मात्र आय “हेट” टिअर्स म्हणत सावरत असतो. देखण्या, तरुण नंदूला त्याच्या बालपणीच्या आठवणीतल्या झाडापाशी खन्ना आणून सोडतो आणि माय -लेकरांना भेटवतो. आता त्याला कळतं – अश्रू कायम खारट नसतात. एका भेटीच्या कुशीत दुसरा निरोप दडलेला असतो. आणि निरोप म्हटलं की अश्रू मस्ट !

  April 1, 2021


लेखसंग्रह

राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी….

Category:

 

राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या मूळ स्वरुपाच्या विरोधात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले राजकारणी निवडणूक प्रक्रियेला दूषित करतात. माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी विविध सूचना दिल्या असूनही कोणताही राजकीय पक्ष त्याच्या वतीने गुन्हेगारी घटकांच्या उन्मुलनासाठी पाऊल उचलताना दिसत नाही.

  March 31, 2021


लेखसंग्रह

आ री आजा, निंदिया तू ले चल कहीं !!

Category:

 

केव्हाही, कोठेही हे गीत ऐकले की आत काहीतरी अनामिक कालवाकालव होते. बापाची लेकासाठीची धडपड डोळ्यांसमोर येते. ती खोटी, फसवी असू शकत नाही (भलेही चित्रपटात ती बऱ्यापैकी बटबटीत दाखविली असली तरी ! ).आणि दरवेळी बापाने अंगाई म्हणायलाच हवी असे कुठाय? त्यासाठी त्याने कुठून आणायचा किशोरचा “सोलफूल ” आवाज ? शेवटी बापाला स्वतःची धडपड, धावाधाव असतेच की !

  March 30, 2021