अवर्गिकृत

सजीवांची झोप

Category:

 

माणूस, प्राणी, पक्षी, जलचर वगैरे सजीव दिवसातला काही काळ तरी झोपेत घालवितात. आहार, श्वसन, उत्सर्जन या क्रियांइतकीच निद्राही सजीवांना आवश्यकच असते. अगदी युध्दआघाडीवर असलेल्या सैनिकांचीदेखील पुरेशी झोप झाली नाही तर ते सक्षमदृष्ट्या लढू शकणार नाहीत. थकल्याभागल्या जीवांना, लहानशी डुलकी जरी काढली तरी, ताजेतवाने वाटते.

व्यक्ती-परिचय

डॉ. श्रीकृष्ण लक्ष्मण कर्वे

Category:

 

डॉ. श्रीकृष्ण लक्ष्मण कर्वे (जन्म १६-०८-१९३४) मुंबई विद्यापीठाचे बी.कॉम (स्टॅट.) एल.एल.बी., एम.ए. (भाषाविज्ञान) पीएच.डी. फेलो, इन्शुरन्स इन्स्टिट्यूट्स ऑफ इंडिया राष्ट्रभाषा प्रवीण, हिंदी शिक्षक बंद, मराठी साहित्य विशारद, मराठी साहित्य भूषण, वंग भाषा कोविद, तामिळ पदविका, फ्रेंच पदविका, अनेक वर्षे सामाजिक जाणीवेतून हिंदी प्रचारक.

लेखसंग्रह

शेतकर्‍यांवर संकटांची मालिका !

Category:

 

शेतकर्‍यांची परिस्थिती उत्तरोत्तर बिकटच होत असेल, तर कुठेतरी मुळातच चूक होत असावी, हे सरकारच्या कसे लक्षात येत नाही? आजपर्यंत केवळ कुचकामी ठरलेले उपायच सरकार पुन्हा पुन्हा का योजत असते? जगातला कुठलाही उत्पादक आपले उत्पादन त्या उत्पादनासाठी आलेल्या खर्चापेक्षा कमी भावात विकत नाही. व्यापाराचे, धंद्याचे हे मूलभूत तत्त्व आहे, तशीच परिस्थिती आली तर तो आपला धंदा बंद करेल; परंतु भारतातील आणि त्यातही महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकरी वर्षोनुवर्षे हा घाट्याचा सौदा करीत आलेला आहे, त्याला तसे करणे भाग पडत आहे, कारण सरकारची धोरणेच तशी आहेत.

अवर्गिकृत

मर्ढेकरांची कविता – हाडांचे सापळे हासती

Category:

 

मर्ढेकरांच्या हाडांचे सापळे हासती ह्या कवितेवर अश्लीलतेच्या कारणावरून त्या काळात खटला भरण्यात आला होता. ह्या कवितेचा अर्थ वेगळ्या संदर्भात ऊलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

अवर्गिकृत

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता : अध्याय २, श्लोक २२.

Category:

 

आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व (जेनेटिक मटेरियल) हाच आत्मा असतो. त्यामुळे तो अणूरूपच आहे. या विश्वाची निर्मिती हे वास्तव आहे. या निर्मितीस जे काही कारणीभूत आहे तोच ईश्वर असे वैज्ञानिक मानतात. पण तो, अध्यात्मात वर्णन केल्यानुसार नाही असेही मानतात. कार्बन, हैड्रोजन, ऑक्सीजन, नायट्रोजन, कल़्शियम, फॉस्फोरस वगैरे सारख्या अचेतन मूलद्रव्यांपासून, सजीवांचे चेतनामय शरीर ज्या कारणामुळे निर्माण होते तो आत्मा असे वैज्ञानिक मानतात. आनुवंशिक तत्व हे आत्म्याचे वास्तव स्वरूप आहे.