साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३)

Category:

 

या १९६३ सालच्या साहित्य संमेलनात मला सहवास लाभलेले. . . . स्व. लोककवी मनमोहन नातू. स्व. लोककवी मनमोहन नातू म्हणजे ” गोपाळ नरहर नातू ” जन्मगाव तासगांव ( कोल्हापुर). जन्मदिन, ११ नोव्हेम्बर १९११. मनमोहन हे त्यांचे टोपण नाव. माझा भाग्ययोगच की मला जीवनात अनेक साहित्यिकांचा जवळून सहवास लाभला. त्यापैकी कै. लोककवी मनमोहन हे एक होते.

साहित्य - ललित

भुसावळची दिवाळी !

Category:

 

दिवाळीची चाहूल भुसावळला लागायची पाच पावलांनी ! शाळेची सुट्टी, सुट्टीतील लायब्ररी, थंडी, फटाके चिंतन, व आकाशकंदील ! नवे कपडे बहुदा दसऱ्यालाच घेतले असल्याने दिवाळीत त्यावर फुली असे. तसे अप्रूपही  नसायचे. घरातील वडीलधाऱ्यांच्या अंगी सणासुदीलाही क्वचितच नवे वस्त्र दिसे. हट्ट फक्त लायब्ररीची वर्गणी आणि फटाक्यांसाठी असायचा आणि तो पूर्ण व्हायचा.

साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २)

Category:

 

… तेंव्हा अत्रे म्हणाले अरे तुला माझे नाव माहिती आहे कां ? मी म्हणालो हो !.. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. पण मला काय म्हणतात फक्त प्र.के. मग तुझेही असे छोटे नाव ठेवूया !…. विगसा..? हो… विगसा… छान वाटते !.. मी आतापासून तुला ” विगसा ” हाक मारेन..!!!! त्यावेळी त्यांची विनोदबुद्धि मला कळली नाही, पण मी जोपर्यंत त्यांचे रूमवर होतो तोपर्यंत त्यांनी मला विगसा या नावानेच संबोधले.. !!

लेखसंग्रह

सुधींद्र कुलकर्णींना अनावृत्त पत्र

Category:

 

आज दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपला लेख “इस्राईल चे दोन चेहरे” वाचला. सदर लेख तुम्ही वस्तुनिष्ठ राहून न लिहिता, स्वतःची मते घुसडत, इस्राईल व पॅलेस्टाईन वादात ज्यांचा काडीमात्र संबंध नाही अशा हिंदू लोकांना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना, तुम्हाला हवे त्याप्रमाणे गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे, जो निंदनीय आहे, म्हणूनच तुमचा सदर लेख दुर्लक्ष करण्यायोग्य आहे. तथापी हा लेख दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला असून दै सकाळचा वाचकवर्ग हा बुद्धिजीवी व विचारवंत आहे, त्यांचे मत कलुषित होऊ नये यासाठी हा पत्रप्रपंच !