तृप्तीचे आभाळ

गुलमुसलेली सांज केशरी...
गतआठवांचे थवे नभाळी...
भावनांचे अंतरंग लाघवी...
शब्दांचे प्रतिध्वनी नभाळी...
स्वरगंगेत नाहता भावप्रिती...
गोधुलीची ही सांज आगळी..
मनस्पर्श तुझा गं स्वर्गानंदी...
प्रीतभारली तू कोमलकळी...
सत्यप्रीती , हे दान भाळीचे...
मकरंद , अमृती हा मधाळी...
तृप्तीचे आभाळ अलौकिक...
घुमते पावरी हरिची नभाळी..
सांजाळलेल्या केशरी उदरी..
उमलणारी प्रभात सोनसळी..
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना क्र. 61 / ६ - ५ - २०२१
( मुक्तरचना)
?9766544908


गुलमुसलेली सांज केशरी…
गतआठवांचे थवे नभाळी…
भावनांचे अंतरंग लाघवी…
शब्दांचे प्रतिध्वनी नभाळी…
स्वरगंगेत नाहता भावप्रिती…
गोधुलीची ही सांज आगळी..
मनस्पर्श तुझा गं स्वर्गानंदी…
प्रीतभारली तू कोमलकळी…
सत्यप्रीती , हे दान भाळीचे…
मकरंद , अमृती हा मधाळी…
तृप्तीचे आभाळ अलौकिक…
घुमते पावरी हरिची नभाळी..
सांजाळलेल्या केशरी उदरी..
उमलणारी प्रभात सोनसळी..
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना क्र. 61 / ६ – ५ – २०२१
( मुक्तरचना)
?9766544908

Author