बॅटमॅन, जेम्स बाँड कॉमिक्सच्या माध्यमातुन प्रसिध्द करणारे डग्लस माँच
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteडग्लस माँच हे प्रामुख्याने ओळखले जातात, ते त्यांनी लिहिलेल्या ‘बॅटमॅन’च्या कथांबद्दल! ‘बॅटमॅन’ व्यतिरिक्त, मून नाइट हा सुपरहिरो, ब्लॅक मास्क हा सुपरव्हिलन, डेथलॉकसारखा सायबॉर्ग, इलेक्ट्रिक वॉरिअर हा रोबॉट, सिक्स फ्रॉम सीरिअस हे विश्वातल्या आकाशगंगांमधले एजंट्स आणि मास्टर ऑफ कुंग फू अशा त्यांनी निर्माण केलेल्या अद्भुत व्यक्तिरेखांची दुनिया डीसी कॉमिक्स आणि मार्व्हल कॉमिक्समधून बच्चेकंपनीचं वर्षांनुवर्षं मनोरंजन करत राहिली.