गुणवत्तेची भाषा – quality language

“एकदा या ना आमच्याकडे.” “उद्या भेटूया.” “बरे वाटत नाही आहे.” “गाडी उशीरा पोहोचणार आहे. न्यायला पाठवा कोणालातरी.” “तुला ना शिस्तच नाही” “आपल्या कंपनीचे उत्पादन वाढवायला पाहिजे.” अशी भोंगळ भाषा फारतर साधारण इच्छा किंवा एखादे मत प्रदर्शित करतात. पण ऐकणाऱ्याने नक्की काय करायचे आहे किंवा बोलणाऱ्याची नक्की काय अपेक्षा आहे, हे देवच जाणे. अशी वाक्ये सर्रास कानावर पडतात.



“एकदा या ना आमच्याकडे.” “उद्या भेटूया.” “बरे वाटत नाही आहे.” “गाडी उशीरा पोहोचणार आहे. न्यायला पाठवा कोणालातरी.” “तुला ना शिस्तच नाही” “आपल्या कंपनीचे उत्पादन वाढवायला पाहिजे.” अशी भोंगळ भाषा फारतर साधारण इच्छा किंवा एखादे मत प्रदर्शित करतात. पण ऐकणाऱ्याने नक्की काय करायचे आहे किंवा बोलणाऱ्याची नक्की काय अपेक्षा आहे, हे देवच जाणे. अशी वाक्ये सर्रास कानावर पडतात.

माहिती आधारित समस्या निराकरणचा एक छोटा भाग असतो तो म्हणजे वापरण्यात येणाऱ्या भाषेची गुणवत्ता. अचूक शब्द वापरून केलेल्या संवादातूनसुद्धा [कम्युनिकेशन] खूप गोंधळ गैरसमज आणि चुका टाळता येतात. वापरत असलेली भाषा स्पष्ट असली की दोन व्यक्ती तिचे वेगवगळे अर्थ काढू शकत नाहीत.

गुणवत्तापूर्ण भाषेची काही उदाहरणे –
1. ‘एकदा या ना आमच्याकडे’ ऐवजी येत्या गुरुवारी दुपारी चार वाजता आमच्याकडे उभयता चहाला येता का?
2. ‘ही गोष्ट जरा मोठी झालीय’, च्या ऐवजी ही पट्टी बरोबर ८ इंच लांब आणि ४ इंच रुंद पाहिजे.
3. ‘आपण उद्या भेटू या’, च्या ऐवजी तू आणि मी उद्या दुपारी दोन पासून साडेचार पर्यंत माझ्या ऑफिसमध्ये भेटू या.
4. ‘मला मदत पाहिजे’, च्या ऐवजी येत्या सोमवारपासून मला दोन मदतनिसांची दोन आठवड्यांसाठी गरज आहे.
5. ‘हे मशीन बरोबर काम करत नाही आहे’, च्या ऐवजी हे मशीन गेल्या ५ दिवसात तीन वेळा मोडले.
6. ‘मला ताप येतोय’, च्या ऐवजी मला गेले दोन दिवस रोज संध्याकाळी ६ च्या सुमारास १०२ डिग्री ताप येतो आणि रोज सकाळी तो उतरतो.
7. ‘आपली गुणवत्ता सुधारली पाहिजे’, च्या ऐवजी पुढील तीन महिन्यात आपण आपल्या प्रक्रियेतील चुकीच्या उत्पादनाचे प्रमाण [रीजेक्शन] प्रमाण २% वरून १% पर्यंत खाली आणणे आवश्यक आहे.

अशा तऱ्हेच्या स्पष्ट भाषेचा उपयोग ऐकणाऱ्याला आणि प्रत्यक्ष कृती करणाऱ्याला खूपच होतो.

ह्यात आश्चर्य नाही की प्रत्यक्ष समस्या सोडवताना माझे वरिष्ठ नेहमी म्हणत, “ आमचा देवावर विश्वास आहे, पण बाकीच्या सर्वांनी मात्र खरीखुरी माहिती योग्य शब्दात आणि योग्य वेळी देणे आवश्यक आहे.”

चला तर माहिती आधारित विश्लेषण आणि गुणवत्तापूर्ण भाषा ह्याच्या उपयोगाला जमेल तेव्हढी सुरुवात करू या.

जर मी नुसते ऐकले तर मी विसरतो, मी बघितले तर लक्षात राहाते पण मी केले तर मला समजते.

विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/

Author