लेखसंग्रह

कामगिरीचे निर्देशक, पण एकमेकांविरुद्ध

Category:

 

ही गोष्ट अशा काळातली आहे जेव्हा मी मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत बिझिनेस मॅनेजर म्हणून कार्यरत होतो. हा काळ सन २००३-२००४ चा होता जेव्हा आम्ही तीव्र स्पर्धेला सामोरे जात होतो. वर्षाच्या सुरुवातीला आम्ही आमची व्यावसायिक उद्दिष्टे निश्चित केली, त्याचप्रमाणे काही अजूनही धोरणे ठरवली, ती अशी होती.

  July 1, 2026


लेखसंग्रह

क्वालिटी : क्लॉक रेडिओची कथा

Category:

 

आजकाल आपल्या बऱ्याच उपकरणांमध्ये अगदी अचूक वेळ दाखवणारे इलेक्ट्रोनिक घड्याळ [क्लॉक] असते. संपूर्ण वर्षात ते फारतर एखादे मिनिट मागेपुढे होते. piezoelectric crystals त्यात वापरले जात असल्यामुळे हे शक्य झाले आहे.

  June 29, 2026


Uncategorized

हृदयीचा झरा

Category:

 

“बर आहे साहेब, लवकर PUC करून घ्या, नमस्कार !” असे म्हणत त्या रुबाबदार इन्स्पेक्टरने मला खाडकन सलाम केला. मी तर चक्क उडालोच. पोलीस या जमातीला सर्वसाधारणपणे घाबरून असणाऱ्या सामान्य जनतेचा मी एक भाग. असे असून सुद्धा काही अपवादा‍त्मक अनुभव येतात हेही खरे आणि इथे तर पोलीसाचाच मला सलाम म्हणजे फारच झाले. हो सांगतो ना काय झाले ते.

  June 29, 2026


लेखसंग्रह

गरज ही नवीन कल्पक नाविन्याची [innovation] पण जननी असते.

Category:

 

आपल्याला सर्वांनाच हे माहित आहे की गरज ही शोधाची जननी असते. मला अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले की जेथे मला पटले की गरज ही नाविन्यपूर्ण कल्पक विचारांची सुद्धा जननी असते. ही कथा अशाच एका कल्पक विचाराची आहे.

  June 28, 2026


लेखसंग्रह

उद्योगाचे 4 थे आवर्तन – नवीन लाडका शब्द की एक संधी

Category:

 

उद्योग क्षेत्रात ५० वर्षे वावरल्यानंतर, वारंवार वापरले जाणाऱ्या नवनवीन लाडक्या शब्दांबद्दल मी जरा सावधच असतो. काही वेळा तर असे नवीन शब्द वा घोषणा म्हणजे ‘बाटली नवीन पण दारू तीच’ अशी परिस्थिती असते. अशा शब्दांचा संध्याकाळच्या सोशल पार्टीमध्ये वापरण्यापलीकडे फारसा उपयोग नसतो. असे शब्द फारसे टिकत पण नाहीत. मात्र काही नवीन शब्द त्यांच्यामधील बळकट संकल्पनेमुळे काळाच्या प्रवाहात टिकून रहातात. उदा. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट [TQM], रिव्हर्स इंजिनियरिंग इ.

  June 25, 2026


लेखसंग्रह

कल्पकता: चौकटी बाहेर जाऊन विचार

Category:

 

साधारणतः १९९७ च्या सुमारास माझी एका मोठया कारखान्याच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली. तो कारखाना इलेक्ट्रिक बल्ब आणि ट्यूब लाईट याची निर्मिती करत असे. कारखाना वर्षाचे सर्व ३६५ दिवस दिवसरात्र चालू असे. हा कारखाना कळवा – बेलापूर औद्योदिक पट्टयात [industrial belt] होता.

  June 23, 2026


लेखसंग्रह

विचारसरणीतला स्पष्टपणा

Category:

 

एके दिवशी माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करत होतो. चर्चेचा विषय होता वय आणि मानसिक परिपक्वता किंवा विचारांचा स्पष्टपणा यातील परस्पर संबंध. माझे मन एकदम भूतकाळात गेले आणि एका घडलेल्या प्रसंगाची मला आठवण झाली. तेव्हा मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत, डिझाईन इंजिनीअर, हे पद सांभाळत होतो. मी इतरांना म्हणालो, “अनुभवातून माझ्या मनाला एक गोष्ट पटली आहे की वय आणि मनातील विचारांची स्पष्टता याचा परस्पराशी फार जवळचा संबंध असत नाही.”

  June 21, 2026


लेखसंग्रह

सर्वांगीण दर्जा व्यवस्थापन : एक दृष्टीकोन

Category:

 

मागील काही वर्षे गुणवत्ता किंवा दर्जा ही संकल्पना औद्योगिक क्षेत्रासह इतर क्षेत्रात खूपच पुढे येते आहे. तिचे मूळ किंवा प्रारंभ “inspection” ह्या शब्दापाशी आहे. त्यानंतर ती संकल्पना quality control, quality assurance, quality engineering अश्या रुपात पुढे सुद्रुढ होत गेली. एखाद्या वस्तूचे उत्पादन करताना ते उत्पादन विभागाकडून आधी दिलेल्या तपशीलाप्रमाणे [specification] केले जाते. वस्तू चांगल्या गुणवत्तेची बनवण्यावर साहजिकच भर दिला जातो.

  June 18, 2026


लेखसंग्रह

काय साध्य करायचं आहे त्यावर सतत नजर ठेवणे

Category:

 

माझ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील जीवनापैकी पुष्कळशी वर्षे विविध देशात कार्यरत असलेल्या एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करण्यात गेली. २००० साली माझी बदली, प्रमुख म्हणून त्या कंपनीतील एका व्यवसायात झाली की जिथे सतत पाच वर्ष वाढत्या प्रमाणात तो व्यवसाय नुकसानीत जात होता. त्या व्यवसायावर सगळीकडून टीकेचा भडीमार होत होता, साहजिकच त्यामुळे व्यवसायाच्या कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत होते.

  June 16, 2026


लेखसंग्रह

ध्येय, भूमिका आणि संपर्क

Category:

 

मी आता सेवानिवृत्त झालो आहे. पुष्कळदा माझे एकेकाळचे सहकारी माझ्या घरी गप्पा मारायला येतात. अश्याच एका प्रसंगी माझा सहकारी निलय (तो बंगाली असल्यामुळे, ह्या शब्दाचा उच्चार आम्ही निलोय असा करतो) माझ्या घरी आला आणि काही इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने मला विचारले, “सर रोल,गोल आणि कम्युनिकेशन या गोष्टींची आमच्यासारख्या जुनिअर सहकाऱ्याना समजण्याची उपयुक्तता किती आहे ह्याबाबतीत तुमचे काही अनुभव सांगाल का?”

  June 14, 2026