व्यक्ती-परिचय

शरद पवार

Category:

 

माती बरोबरच माणसांच्या मनांची मशागत करणारा नेता. राजकारणाच्या पुढे जाऊन कला, क्रीडा, शिक्षण, कृषी सहकार या क्षेत्रांची सखोल जाणीव.

  August 30, 2010


व्यक्ती-परिचय

वसंतराव नाईक

Category:

 

वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री म्हणून एक तपाची कारकीर्द स्थैर्य व गतिमान विकास यासाठी उल्लेखनीय ठरली. दोन युद्धे, तीन मोठी राज्यव्यापी अवर्षण यासारख्या संकटांना तोंड देतानाच त्यांनी शेतीचा अमूलाग्र विकास करुन महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत जवळजवळ स्वयंपूर्ण बनविला; म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते मानले जाते.

  August 30, 2010


व्यक्ती-परिचय

वसंतदादा पाटील

Category:

 

आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्वातंत्र्यलढ्यापासून करणार्‍या वसंत दादांनी तब्बल चारवेळा मुख्यमंत्रीपद भूषविले.

  August 30, 2010


अब्दुल रहमान अंतुले (बॅरिस्टर)
व्यक्ती-परिचय

अब्दुल रहमान अंतुले (बॅरिस्टर)

Category:

 

तडाखेबाज निर्णय घेऊन ते धडाकेबाजपणे अंमलात आणणारे मुख्यमंत्री म्हणून बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांची ख्याती आहे. आपल्या अल्प कारकिर्दीत देखील त्यांनी स्वत:मधल्या कुशल प्रशासकाची जाणीव करुन दिली.

  August 30, 2010


व्यक्ती-परिचय

मारोतराव कन्नमवार

Category:

 

मुख्यमंत्री पदाच्या अल्प कारकिर्दीतही महाराष्ट्रातल्या जनमानसावर आपल्या कर्तृत्वाची छाप ठेवून जाणारा मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार यांचे नाव आदराने घ्यावे लागते.

  August 30, 2010


व्यक्ती-परिचय

बॅरिस्टर बाबासाहेब भोसले

Category:

 

विद्यार्थी दशेपासूनच स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेले बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे प्रखर बुद्धिमत्ता आणि तल्लख विनोदबुद्धी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.

  August 30, 2010


अवर्गिकृत

शेतकर्‍यांनी तयार केली पाण्याची बँक

Category:

 

सातारा तालुक्यात धावडशी हे छोटेसे गाव आहे. या गावातील १५ शेतकर्‍यांनी एकत्र येऊन गावातील विहिरी जोडण्याचा नवा विचार मांडला. सर्वानुमते योग्य नियोजन होऊन विहिरी जोडण्याचा निर्धार पक्का झाला. पाऊसकाळात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी उत्तरेकडील मेरूलिंगच्या डोंगराकडील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पावसाळा संपल्यावर शेतीसाठी जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी या तरूणांनी विचार करण्यास सुरुवात केली. सातार्‍यातील सामाजिक कार्येकर्ते डॉ.अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन त्यांना मिळू लागले. गावातील पोलीस पाटील ज्योतिराम पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पुढाकार घेतला आणि विहिरी जोडण्याचे काम सुरू झाले.

  August 30, 2010


लेखसंग्रह

लाकडी खेळणी बनविणारा कोल्हापूरचा बचत गट

Category:

 

लोणची, पापड, खाद्य पदार्थ यामध्येच आतापर्यंत बचत गट अडकले होते. परंतु काहीतरी नवीन करावे, ही चाकोरी बदलावी या उद्देशानेही काही बचत गट कार्यरत आहेत.

  August 30, 2010


परिचय – परिक्षण

सुवर्णमुद्रा – लखलखती सोनेरी वाटचाल – दाजीकाका गाडगीळ

Category:

 

पु. ना. गाडगीळ आणि कंपनी या पुण्यातल्या सराफी पेढीचे आधारस्तंभ, नव्वदीतही तरुणाईला लाजविणारा उत्साह अंगी असणारे अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांना वाहिलेला मानाचा मुजरा म्हणजे `सुवर्णमुद्रा.’ दाजीकाकांचे नातू सौरभ गाडगीळ यांच्या आग्रहातून तयार झालेल्या उत्कर्ष प्रकाशनच्या या देखण्या पुस्तकाला शब्दसाज चढविला आहे, सहजसुंदर भाषाशैली असलेल्या मंगला गोडबोले यांनी.

  August 29, 2010