(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अरुण पुराणिक

    एक अभ्यासक म्हणून अरुण पुराणिक यांना आजही मुंबईतल्या सोमय्या कॉलेज, किर्ती कॉलेजमधून बोलावणी येतात. एशियाटीक लायब्ररीमध्ये त्यांची व्याख्यानं होतात. काला घोडा फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या संग्रहातील काही गोष्टींचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं. तिथे लोकं भेटतात, बोलतात. पण ते पुरेसं नाहीये. या विषयात अधिक संशोधन करणारी माणसं निर्माण झाली पाहिजे. हा सगळा संग्रह लोकांना पहाता यावा, सिनेमाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताळता यावा यासाठी एक स्टडी सेंटर उभारण्याचा पुराणिक यांचा विचार आहे.

      June 18, 2022


  • इतिहासाचे भीष्माचार्य वासुदेव सीताराम बेंद्रे

    संभाजी राजांची पराक्रमी, संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारी, धोरणी, मुत्सद्दी अशी तेजस्वी प्रतिमा लोकांसमोर आणण्याचं श्रेय बेंद्रे यांचंच. तसंच संभाजीराजांची वढू गावाची समाधीसुद्धा त्यांनीच शोधून जगासमोर आणली होती.

      February 13, 2022


  • ज्येष्ठ अभिनेत्री नलिनी कृष्णराव चोणकर

    इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) या त्यांच्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

      June 27, 2022


  • अलका कुबल

    अलका कुबल यांना आपण ९० च्या दशकातील यशस्वी सिने अभिनेत्री म्हणून ओळखतो. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९६३ रोजी झाला. शालेय वयापासून नाटकाची आवड असलेल्या अलका कुबल यांनी शालेय स्पर्धांत काम तर केलेच, पण त्यानी महत्त्वाचे नाटक केले ते म्हणजे "नटसम्राट'. या नाटकात अप्पासाहेब बेलवलकरांच्या नातीची भूमिका त्यांनी वठवली होती. त्यानंतर "वेडा वृंदावन' नाटकात काम केले. "नटसम्राट'मध्ये तर दत्ता भट यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम केले.

    विजया मेहतांबरोबरही त्यांनी "संध्याछाया' नाटकात काम केले होते. विसाव्या वर्षी तिने मायानगरीत प्रवेश केला. आज मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करून तीस ते पस्तीस वर्षे पूर्ण झाली असतील तरी ही सुंदर अभिनेत्री या इंडस्ट्रीवर राज्य करीत आहे. १९९१ च्या काळात कोणत्याही प्रकारचा प्रमोशन फंडासारख्या गोष्टी नसतानादेखील ११८ आठवडे त्यांचा माहेरची साडी हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर कल्ला करीत होता. अलका कुबल यांनी मराठी इंडस्ट्रीला ‘वहिनीची माया’, ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘शुभ बोल नाऱ्या’, ‘लपवाछपवी’, ‘नातीगोती’ असे अनेक चित्रपट दिले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      October 3, 2017


  • सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी

    महानुभाव पंथ प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांची ओळख करून देणे तसेच मानवी मूल्याणा नवसंजीवनी देण्यासाठी स्वामींची ओळख करून देने अत्यावश्यक आहे

      August 20, 2020


  • संतूरवादक पं. उल्हास बापट

    अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक होते.

    त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ संतूर वादक होता. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली होती. पं. उल्हास बापट यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, हे एक उत्तम गायक होते. वयाच्या पाचव्या वर्षी मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांच्या लक्षात आला आणि पंडित उल्हास बापट यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याच्या शिकवणीसाठी पाठविले गेले. या बालवयातील संगीतशिक्षणामुळे उल्हास बापट यांना तालाचे उत्तम ज्ञान झाले, आणि ते पुढील आयुष्यात सातत्याने उपयोगी पडले.

    पुरसे तबला शिक्षण झाल्यावर उल्हास बापट आपल्या वडिलांकडे कंठसंगीत शिकले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोद वादक श्रीमती झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू केले आणि त्यांच्याकडे असलेल्या रागशास्त्र, बंदिशी आणि खयाल गायन यांच्या माहितीच्या अफाट साठ्यातले थोडेफार हस्तगत केले.

    दोन घराण्यांच्या गायकीचा केलेल्या अभ्यासातून त्यांना संगीतातील सौंदर्याचा साक्षात्कार झाला. गायन शिकताना पंडित उल्हास बापट यांना, संतूर या वाद्यात गोडी निर्माण झाली, आणि त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. संतूरची 'क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: संशोधन केलेली पद्धत होती.

    संतूर वाजवताना साधारणत: जो राग वाजवायचा त्या रागाचे स्वर एका बाजूस लावून घेण्याची पद्धत प्रचलित होती पण पं उल्हास बापट यांनी एक सर्वस्वी भिन्न अशी पद्धत शोधली. या 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अनावश्यक स्वर कौशल्याने वगळून केवळ रागात समाविष्ट असलेले स्वर वाजवण्याचे नैपुण्य त्यांनी संपादन केले जे निश्चितच कौतुकास्पद आहे. संतूरवर 'मींड' काढण्याचीही त्यांची खास पद्धत असे. त्यामुळे ते रागमाला (अनेक राग अंतर्भूत असलेली रागांची मालिका) तसेच अनेक भावगीतेही 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अतिशय परिणामकारक रित्या सादर करत असत.

    प.उल्हास बापट यांच्या संतूरमधून श्रावणधारा झिरपत असत. तिन्ही सांजा, केतकीच्या बनी, मी मज हरपून, श्रावणात घननीळा, समईच्या शुभ्र कळ्या, रिमझिम झरती, स्वर आले दुरुनी, या चिमण्यांनो, पैल तो गे, मालवून टाक दीप अशा अनेक गीतांचे संतूरवादन त्यांच्या 'संतूरच्या भावविश्वात' या CD द्वारे आपल्याला अनुभवता येते. या गीतांकडे त्यांनी 'बंदिश' म्हणून पाहिले व त्यानुसार त्या गीतांचा स्वरविस्तार केला. आर.डी बर्मन यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केले होते. पंचमदाचे लाडके संतुर वादक होते.

    पंचमदांच्या अनेक अजरामर गाण्यांच्या संगीतात उल्हास बापट यांच्या संतूरचे सूर गुंजले. तसेच पंडित उल्हास बापट यांनी अनेक हिंदी मराठी गीतांना संतूर सुरांनी सजवलं होते. इजाजत मधील मेरा कुछ सामान, जैत रे जैत मधील मी रात टाकली, शिवाय तळव्यावर मेंदीचा अशा कितीतरी गाण्यांसाठी पं. उल्हास बापट यांनी संतूर वाजविले आहे. पं.उल्हास बापट यांनी बाहुलीचं लगीन,चुलीवरची खीर अशी काही बालगीतं संगीतबद्ध केली होती.

    पंडित नारायण मणी यांच्याबरोबर उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे ’इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स’ नावाचे दोन आल्बम प्रकाशित झाले आहेत. पं.उल्हास बापट यांनी त्यांच्या "सहज स्वरांतून मनातलं" हे आत्म चरित्रपर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात संतूर आणि तबला वादनाबरोबरच त्यांचे भाषेवर ही उत्तम प्रभुत्व आढळून येते. शास्त्रीय संगीत, तसेच चित्रपट सृष्टीशी जवळचा संबंध असल्यामुळे, त्यांच्या गाठीला अनेक आठवणी होत्या. त्या त्यांनी ,मिश्किलपणे आणि रंगतदार करून पुस्तकात सादर केल्या आहेत.

    दि. ४ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.

    पं.उल्हास बापट यांचे संतूर वादन
    https://www.youtube.com/watch?v=HdIsFM9hwiE
    http://gaana.com/artist/pt-ulhas-bapat-1

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #PtUlhasBapat #UlhasBapat

      June 7, 2022


  • संजय बेलोसे

    बेलोसे, संजय

    एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात यशाची पहाट फुलत असावी आणि त्याच वेळी त्याचे आयुष्य संपावे, हा दैवदुर्विलास शनिवारी रात्री घडला. यावेळी काळाचा घाला पडला तो संजय बेलोसे या कल्पक लेखकावर! यांच्या प्रतिभेने नुकती कुठे भरारीला सुरुवात केली असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

    कोकणातल्या दापोली तालुक्यात, ‘सानेगुरुजींचे गाव’ अशी ख्याती असलेल्या पालगड या गावी संजय यांचे बालपण गेले. दापोली येथे त्यांचे शिक्षण झाले. मुंबईत आल्यानंतर संजय बेलोसे यांनी अभिनयाचे विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या विजया मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली काही नाटकांत कामे केली. त्यांनी अभिनय केलेले ‘नागमंडल’ हे नाटक विशेष गाजले. या काळात त्यांच्यावर बाईंच्या दिग्दर्शनाचा प्रभाव पडला नसता तरच नवल! संजय बेलोसे यांनी या कालावधीत प्रचंड निरीक्षण केले. ‘पगला घोडा’ हे नाटकही त्याच काळातले. त्यानंतर ‘लफडं सोळातलं’ आणि ‘खरंच, माझ्यासाठी?’ या दोन नाटकांसाठी तर त्यांना अभिनयासाठीचा नाटय़दर्पण पुरस्कारही मिळाला. संजय बेलोसे यांचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी केवळ अभिनय एके अभिनय न करता आपल्या प्रतिभेला इतर मार्गानीही वाव दिला. त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेली अनेक नाटके गाजली. ‘घर आईचं’, ‘लढ बापू लढ’, ‘मोस्ट वॉण्टेड’ ही काही नाटके वानगीदाखल सांगता येतील. ही नाटके प्रेक्षकांच्या पसंतीला तर उतरलीच, पण त्यातील गुणात्मक मूल्यामुळे त्यांनी समीक्षकांचीही पसंती मिळवली. ‘भैरू पहेलवान..’ या चित्रपटाच्या संवादलेखनात त्यांचा सहभाग होता. त्यात त्यांनी छोटी भूमिकाही केली होती. याच दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीही त्यांचा दरवाजा ठोठावत होती. नीरज व्होरा यांच्यासाठी त्यांनी ‘फिर हेराफेरी’ आणि ‘खट्टामिठा’ हे दोन चित्रपटही केले. नुकताच त्यांचा ‘काय करू नि कसं करू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एका मोठय़ा संघर्षांनंतर आयुष्यात स्थैर्य येत असतानाच अपघाताने गाठले आणि या कलाकाराची अनपेक्षित एग्झिट झाली.

      August 5, 2017


  • संगीत समीक्षक आणि लेखक दत्ता मारुलकर

    आता ती मैफलही सुनीसुनी!
    बऱ्याच वर्षांपूर्वीची संध्याकाळ. शास्त्रीय संगीताच्या एका मैफलीत एक उंच, सावळे व्यक्तिमत्व दाखल झाले. चालणे, डौल ‘नमवी पहा भूमी हा चालताना’ असे. कुतूहल चाळवले ते मैफलीत दाद देण्याची रीत पाहून. लहान-सहान जागांनाही जाणकारीने पण हळुवारपणे तर कधी ‘क्या बात है.’ अशी मोकळी दाद. मैफल संपल्यावर जेवणाआधीच्या ‘मैफली’त ओळख झाली- मी दत्ता मारुलकर! त्यांचे स्फुट लिखाण अनेकदा वाचले होते. थोडय़ाच वेळात ‘अरे-तुरे’वर आलो. नंतर दत्ता घरचाच झाला.

    माणसे त्यांना जास्त आवडायची का संगीत हा प्रश्नच. सदैव गप्पांचा फड जमवण्याची आवड व जागरण करण्याची अमर्याद ताकद. सैन्यातली नोकरी त्याने प्रामाणिकपणे केली पण साहित्य-संगीतापासून दूर असणाऱ्या जगात तो रमू शकला नाही. १०/११ वर्षांतच त्याने सैन्यातून बाहेर पडत खासगी नोकरी पत्करली. त्या निमित्त दिल्ली, इंदूर, मुंबई, अहमदाबाद व शेवटी पुणे अशी भटकंती केली. पुण्यात मात्र तो स्थिरावला. नोकरीत कसूर नाही पण उरलेला वेळ गाणी ऐकणे, त्या समुदायात वावरणे, पुस्तके वाचणे असा ‘आनंदी आनंद गडे.’ वाचन, विशेषत: ललित मराठी वाचन हे दत्ताने प्रयत्नपूर्वक जपले होते.कादंबरी, नाटक, कथा, कविता अशा ललित साहित्याच्या प्रांगणात तो सुजाण वाचक म्हणून वावरायचा, त्यातली सौंदर्यस्थळे गप्पांच्या बैठकीत दाखवायचाही. मुळात तल्लख पण परिस्थितीमुळे महाविद्यालयीन जीवनाला पारखा असल्याने इंग्रजी ललित-वैचारिक लेखनापासून आपण बाजूला पडलो, ही त्याला खंत होती. ती उणीव भरून काढायला असे वाचन असलेल्या मित्रांकडून तो कुतूहल शमवायचा. कुतूहल लहान मुलांमध्ये असते तसे, सदैव जागरूक असे. दत्तामध्ये लपलेले हे ‘बालक’ कधी जागे होईल याचा अंदाज कधीच आधी येत नसे. मात्र अशा प्रसंगी त्रागा, वैताग या बरोबर ‘माता दिसली समरी विहरत’ याचा प्रत्यय येत असे. दत्ताचा कुठलाच मित्र, या ‘गेट आऊट’ ते ‘पुन्हा तोंड पाहणार नाही’ अशा रॅपिड फायर वर्षांवापासून वाचला नसेल. त्यातल्या त्यात सौम्य म्हणणे ‘आय अ‍ॅम सॉरी पण.’ असे यायचे. हे क्षणिक आहे, पुढच्या २/३ मिनिटांत गाडी पुन्हा रुळावर अशी खात्री- अनुभव गाठीशी असल्याने दत्ताशी मैत्री तुटणे अशक्य होते.

    ‘गाणे ऐकणे’ या नादापायी त्याने किती प्रवास केला, त्या क्षेत्रातल्या एकेका शिखरासोबत संवाद साधला, अनेक ठिकाणी जवळीकही झाली याची मोजदाद त्यालाही अशक्य होती. ललित साहित्याच्या डोळस वाचनाने, त्याही क्षेत्रात व्यक्तिगत ओळखी असल्याने प्रसन्न शैली त्याने कमावली होती. त्याच्या लेखनाचे संग्रह प्रकाशित झाले. संगीतावर जाणकारीने लिहिणारा-बोलणारा अशी प्रतिष्ठाही दत्ताला मिळाली. नोकरीच्या ठिकाणी घडलेल्या मालक-मजूर तंटय़ामागच्या तणावामधले नाटय़ रंगवणारी कादंबरी हे त्याचे पहिले स्वतंत्र ग्रंथलेखन.

    कुठेतरी, केव्हातरी ‘संगीत’ या त्याच्या पंचप्राणाशी संबंधित स्वतंत्र ग्रंथनिर्मितीवर हा प्रवास त्याला घेऊन जाणार होता. तो योग आला आणि ‘गानसरस्वती’सारखे लक्षणीय पुस्तक आले. मात्र या निर्मितीनंतरचा अनुभव त्याला एकीकडे मनस्ताप देणारा तर दुसरीकडे आर्थिक नुकसान करणारा ठरला. या सर्व प्रकरणातले क्लेश त्याने पचवले. तिथे जन्म झाला ‘स्वरहिंदोळे’ या पुस्तकाचा. भारतीय संगीतविश्वातल्या सात शिखरांची शब्दचित्रे रेखाटताना दत्ताची लेखणी बहरली.

    नंतर श्रीनिवास खळ्यांच्या सांगीतिक चरित्राला हात घातला गेला. यासाठी खूप धावपळ, परिश्रम केले पण ग्रंथ प्रकाशित झालेला पाहण्यास तो नाही.

    एकदा माणूस आपला म्हटला, की त्याच्यासाठी दत्ता खस्ता खायला नेहमीच तयार असायचा. ओळखीच्या कुणाच्या आयुष्यातला, कुटुंबातला जीवघेणा प्रसंग कळला तर तो विव्हल होत असे. हे हळवेपण त्याच्या निखळ माणूसपणाचा भाग होते, पारदर्शी होते. एक-दोन वेळा आलेल्या अनुभवांमुळे असे वाटले होते की, आजाराला दत्ता हळवा आहे. प्रसंग किरकोळ होते. मात्र ही समजूत त्याच्या शेवटच्या आजारात खोटी ठरली. मधुमेह सोबती होता. बऱ्याचदा प्रकरण मर्यादेबाहेरही जाई.

    दत्ताच्या सैन्य सोडल्यानंतरच्या आयुष्यातल्या अनेकानेक जागा फुलल्या त्या पुष्पावहिनींमुळे. शेवटची अनेक वर्षे घरची आर्थिक आवक, घर सांभाळणे, मुलींची लग्ने, दत्ताचा लोकसंग्रह असा सर्व व्याप शांतपणे सांभाळत पुन्हा स्वत:चे वाचन-महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती असे सर्व करायला लागणारी ऊर्जा वहिनींकडे कुठून येत होती हे मला आजही कोडेच आहे.

    दत्ताचा उल्लेख संगीत समीक्षक म्हणून व्हायचा. व्याख्यानांमध्ये त्याची शैली हरिदासी कीर्तन परंपरेच्या सर्व वैशिष्टय़ांसह प्रकट व्हायची. असे चित्रदर्शी लिखाणही त्याचे वैशिष्टय़. वसंतराव देशपांडय़ांवरील लेखात दत्ताने, ‘स्वर्गात भरलेल्या संगीतसभेत वसंतराव नसल्याने रंग भरेना म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वसंतरावांना तिकडे बोलावून घेतले गेले’, असे चित्र रंगविले होते. अशा सभा सध्या तिथे वारंवार भरत असणार. दत्ताचे श्वास असलेले कुमार गंधर्व, माणिकताई, मोगूबाई कुर्डीकर, जितेंद्र अभिषेकी, शोभा गुर्टू. असे गायक व पु.ल., रामूभय्यांसारखे रसिक जाणकार यांच्या सभेत वसंतराव गात आहेत आणि एका जीवघेण्या ‘जागेवर’ मंडपातून दाद निनादताना ‘बहोत अच्छे’, ‘क्या बात है’ अशी उंच आवाजात ‘ठाण्’ स्वरात साद घातली जाईल ती या ‘हरितात्या’चीच असेल. ती जाणवून आजही त्याच्याशी बोलावे म्हणून अनेकदा हात फोनपर्यंत जातोच. दत्ता मारुलकर यांचे १२ फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.

    विश्वास दांडेकर
    संकलन.संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      February 12, 2019


  • नर्गिसबानू चिखलीकर

    नर्गिसबानू यांचा जन्म निपाणीजवळच्या चिखली या छोट्या गावामध्ये झाला. कलावंतांचं कुटुंब असल्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी चिमुकल्या नर्गिसने कथ्थक शिकायला सुरुवात केली होती. इतरांना थक्क करून टाकणारी तिची ही नृत्य कला बाबासाहेब मिरजकर या तिच्या रत्नपारखी गुरूंनीही त्यावेळी चांगलीच ओळखली होती. त्याकाळी कोल्हापुरात लावणी-लोकनाट्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठल्याने अशा नतिर्कांना नेहमीच मागणी असे. उत्तम बांधा, आकर्षक व्यक्तिमत्त्व व नृत्यकौशल्यात पारंगत असणार्‍या नगिर्स यांच्यात अभिनयगुणांचीसुध्दा बिलकुल कमतरता नव्हती. त्यांनी प्रथम लोकनाट्यातून रंगमंचावर पाऊल ठेवलं.

      July 26, 2011


  • हुतात्मा भाई कोतवाल

    ९ ऑगस्ट १९४२ च्या महात्मा गांधीजींनी सुरु केलेल्या चले जाव चळवळीत ही ते सहभागी होते. ब्रिटिशांनी सदर चळवळीत सामील झालेल्या मोठ्या नेत्यांना अटक केली होती. त्यात भाई कोतवाल हि होते.त्यानंतर ते भूमिगत झाले. भूमिगत होऊन त्यांनी “कोतवाल दस्ता”नावाची संघटना स्थापन केली.

      January 2, 2022