(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आवाजाचा किमयागार – उदय सबनीस

    एका क्षेत्रावर आपली पकड मिळवलेली असतानाच वेगळ्या कलाक्षेत्रात आपली ओळख निर्माण करू पाहणं हे एका कलाकारासाठी तसं आव्हानात्मकच असतं. उदय सबनीसांनी मात्र हा धोका पत्करला आणि यशस्वी दुहेरी ओळख निर्माण केली. अभिनय क्षेत्रावर आपली चांगलीच पकड मिळवलेली असतानाच म्हटलं तर संबंधित आणि म्हटलं तर तशा स्वतंत्र अशा आवाजाच्या जादुई दुनियेवरही आपली छाप उमटवण्यात उदयला चांगलंच यश मिळालं आहे.

      November 13, 2018


  • भारतीय लेखक, पत्रकार खुशवंत सिग

    पत्रकार, संपादक, साहित्यिक, कवी, इतिहासकार, संशोधक, विनोदकार, वादग्रस्त लेखक अन् अतिशय सर्जनशील, संवेदनशील माणूस... खुशवंतसिंग यांची ही विविध रूपे. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १९१५ रोजी पाकिस्तानात असलेल्या हदली येथे झाला.तब्बल सात दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे लेखक तसे विरळेच. खुशवंतसिंग त्यांपैकी एक. वृत्तपत्रांतील स्तंभ असो वा कादंबरी; किस्से असोत की चुटके... प्रत्येक माध्यमांतून ते मैफल रंगवत होते आणि रसिक त्यांचा आस्वाद घेत होते.

    खुशवंत सिग यांचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. प्राथमिक शिक्षणाचे धडे त्यांनी आपल्या जन्मगावी घेतले. त्यानंतर लाहोर, दिल्ली आणि लंडनमधून शिक्षण पूर्ण केले. 'बार अॅट लॉ' झाल्यावर १९३९ ते ४७ या दरम्यान लाहोर हायकोर्टात त्यांनी वकिली केली. देश स्वतंत्र झाल्यावर त्यांनी परराष्ट्र खात्यात नोकरी स्वीकारली. सरकारने त्यांची वार्तांकन सहाय्यक या पदावर नियुक्ती केली. त्यानंतर लंडनच्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयात जनसंपर्क अधिकारी म्हणून आणि युनेस्कोच्या मास कम्युनिकेशन विभागातही त्यांनी काम पाहिले. नभोवाणी मंत्रालयाच्या योजना नियतकालिकाचे संपादकत्व त्यांनी काही वर्षे सांभाळले. सरकारी नोकरीनंतर त्यांनी अध्यापनाकडे मोर्चा वळविली आणि अमेरिकेतल्या प्रिस्टन विद्यापीठात प्राध्यापकी केली. त्यांच्या कर्तृत्वाला खरा बहर आला, तो त्यांनी 'बेनेट कोलमन अँड कंपनी'च्या 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया' या साप्ताहिकाचे प्रमुख संपादकपद स्वीकारल्यावर. त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा हे मासिक म्हणजे फक्त उच्चभ्रू वर्तुळासाठीच असणारे असा समज होता; पण हा समज त्यांनी त्यांच्या कार्यशैलीने बदलून टाकला. सामान्यांपर्यंत पोहोचले तरच ते यशस्वी होईल, असे त्यांचे मत होते. त्या दृष्टीने त्यांनी मासिकात अनेक बदल केले. हे बदल यशस्वी ठरले आणि मासिकाचा खप ६५ हजारांवरून चार लाखांवर पोहोचला. 'विथ मॅलिस टू वर्ड्‌स वन अँड ऑल' हा त्यांचा साप्ताहिक स्तंभलेख अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्घ होत असे व तो वाचकप्रियही झाला होता. वाचणाऱ्याला मजा येईल, असे त्यांचे लेखन असे. त्या काळात असणारी संपादकाची प्रतिमा त्यांनी संपूर्ण बदलली. सहजतेने कोणालाही भेटणारे, पदाची आढ्यता न बाळगता काम करणारे आणि सहज संवाद साधणारे अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्यासोबत काम करणारेही सहज संवाद साधू शकायचे, हेही त्यांचे मोठे वैशिष्ट्य होते. संपादकीय पान म्हणजे फक्त बुद्धिजीवी लोकांचे ही प्रतिमाही त्यांनी मोडून काढली. सामान्य माणसाला काय वाटते, त्याच्या काय अपेक्षा आहेत यापासून पत्रकारिता दूर जाऊ नये यासाठी ते झटत असत. अर्थात त्यांच्या कारकिर्दीतील अनेक विधाने वादग्रस्तही ठरली. इंदिरा गांधींशी, अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी घरोबा असतानाही त्यांनी कधी कुठलीही एकच राजकीय बाजू घेतली नाही. आपल्या विधानांवरून उठलेली वादळेही ते खुशीने स्वीकारत असत. खुशवंतसिंग यांनी त्यांच्या लेखणीचा पट्टा चौफेर फिरवला. राजकारण, समाजकारण, प्रेम, इतिहास, भाषांतर, लघुकथा, शीखांचा इतिहास अशा सर्व प्रांतात त्यांनी मुशाफिरी केली आहे. स्त्रियांविषयीचे अत्यंत उघड श्रृंगारिक वर्णन, तिरकसपणा आणि नर्मविनोदीपणा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होय. त्यांना देशाविषयी प्रचंड अभिमानही होता. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी 'ट्रेन टू पाकिस्तान' ही कादंबरी खूप गाजली. फाळणीच्या दरम्यान घडलेल्या घटनांची आणि फाळणीच्या परिणामांची कहाणी त्यांनी अत्यंत प्रभावी शब्दांमध्ये मांडली आहे. हातोहात खपलेल्या या कादंबऱ्यांच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. या पुस्तकाला गोव्ह प्रेस अॅवॉर्डही मिळाले. तिचे कथानक वापरून पुढे 'ट्रेन टू पाकिस्तान' हा चित्रपटही निघाला, 'द हिस्ट्री ऑफ शीख्स' या पुस्तकाचे तीन खंड त्यांनी लिहिले. ही पुस्तके विश्वसनीय कागदपत्रे आणि पुराव्यांवर आधारलेली आहेत. या पुस्तकांत शिखांचा सचित्र इतिहास देण्यात आला आहे. मात्र, त्यांनी लिहिलेले रणजितसिंग यांचे चरित्र व्यक्तिपूजक आणि अवास्तव महती गाणारे असल्याची टीका झाली होती. त्यांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून होता. हातातले पेन वृद्धत्वामुळे गळून पडत होते; पण मनातील उत्साह कायम होता. 'द सनसेट क्लब' हे त्यांचे पुस्तक त्यांच्या वयाच्या ८०व्या वर्षी प्रसिद्ध झाले; पण ८० व्या वर्षीही त्यांनी जगण्याविषयी, राजकारणाविषयी आणि समाजाविषयी इतके भरभरून लिहिले आहे की थक्क व्हायला होते. त्यामुळेच ९८व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी निवृत्तीनंतर कसे जगावे हे सहजतेने लिहिले आहे. या ९८व्या वाढदिवशी ते म्हणाले होते, 'पुढे नेण्यासाठी माझ्यापाशी खूप थोडे उरले आहे; पण आठवून पाहावे आणि त्यात रमावे असे खूप काही मी जमवले आहे. आयुष्याच्या जमा खात्यावर ८० पुस्तके, कादंबऱ्या, लघुकथा, आत्मचरित्र, इतिहास, पंजाबी आणि उर्दूत केलेली भाषांतरे आणि अनेक निबंध आहेत. वयाच्या ९८व्या वर्षीही ते लिहित होते. प्रतिभेचे लेणे घेऊन आलेले मा.खुशवंतसिंग सर्व माध्यमांतून त्याचा आविष्कार घडवत गेले. म्हणूनच लोकप्रियतेची उंची त्यांना गाठता आली. मा.खुशवंतसिंग यांचे २० मार्च २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    खुशवंतसिंग यांची ‘द कंपनी ऑफ विमेन’ ही एक वादग्रस्त कादंबरी.
    एका उद्योगपतीचं बिनधास्त आत्मवृत्त..खुशवंतसिंगांच्या बेधडक शैलीतून...
    चैतन्य प्रेम विविध जातींच्या, धर्मांच्या, वयाच्या स्त्रियांशी मुक्त शरीरसंबंध ठेवून त्यांच्या सहवासात अहोरात्र बुडलेल्या एका कामपिसाट उद्योगपतीचं हे बिनधास्त आत्मवृक्ष आहे. खुशवंत सिंग यांनी हे सारे उष्ण अनुभव आपल्या लेखणीच्या साहाय्यानं यात जिवंत केले आहेत.

      March 21, 2017


  • गीतकार नितीन आखवे

    गीतकार नितीन आखवे

    संगीतकार श्रीधर फडके यांच्याशी त्यांचे विशेष सूर जुळले होते. या जोडीची ‘फुलले रे क्षण माझे फुलले’, ‘मी राधिका, मी प्रेमिका’, ‘कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला’ इत्यादी गाणी खूप लोकप्रिय झाली.

      April 8, 2022


  • फॉर्मूला वन चा माजी विश्वविजेता मायकेल शुमाकर

    फॉर्मूला वन'चा माजी विश्वविजेता मायकेल शुमाकरचा जन्म ३ जानेवारी १९६९ रोजी हुर्थ, पश्चिम जर्मनीत झाला.
    मायकेल शुमाकरने १९९१ साली बेल्जियम ग्रँड प्रिक्सजमध्येद पर्दापण केले होते. त्या ने २००० ते २००४ असे सलग पाच वर्षे एफ वनचे विजेतेपद पटकावले होते. फॉर्म्युला वन स्पर्धा जिंकणारा तो पहिला जर्मन नागरीक होता त्याच्या यशामुळे फॉर्म्युला वन स्पर्धा जर्मनी मध्ये फार लोकप्रिय झाली. २००६ सालाच्या फॉर्म्युला वन चहात्यांच्या सर्वेक्षणानुसार तो सर्वात लोकप्रिय चालक होता. सर्वात पहिल्यां६दा त्याॉने २००६ साली निवृत्ती घेतली होती. मात्र २०१० साली मर्सिडिज संघातून त्या ने पुनरागमन केले होते.

    शुमाकरला १९९७ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदासाठी अपात्र घोषित करण्यात आले होते.त्याने युनेस्कोचा ब्रँड अॅफम्बेसीडर म्हणूनही काम केले आहे. २०१२ साली त्याचे २० अब्ज् रूपये वार्षिक उत्पशन होते. मायकेल शुमाकर हा फॉर्म्युला वन शर्यती नंतर तो घोडेस्वारी करून आपले मन रमवत असे. जर्मन शेफर्ड आदी कुत्रे पाळण्याची त्याला आवड होती. मायकेल शुमाकर हा फॉर्म्युला वन रेसिंग व समाजसेवा या दोन्हींमध्ये सर्वात पुढे राहिला. अपघात ग्रस्त होण्याआधी मुलांचा सर्वांगीण विकास, गरीब व भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी सढळ हाताने मदत करत असे. सात वेळा फॉर्मूला वन चॅम्पियनशिप पटकावणारा शूमाकर १९९९ ते २०१० च्या दरम्यान अनेकदा दुखापतग्रस्त झाला. २९ डिसेंबर २०१३ रोजी आल्प्सवर स्कीइंग करताना शूमाकर पडला होता.

    शूमाकरच्या डोके दगडावर आपटले गेल्याने त्याच्या गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो कोमातच होता. त्यााला वॉड युनिर्व्हहसिटीच्याक रुग्णागलयात ठेवण्यायत आले होते. मृत्युशी झुंज देवून आता तो घरी परतला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 3, 2019


  • ज्योती चांदेकर

    मराठी सिने-नाट्य क्षेत्रातील एक चतुरस्त्र अभिनेत्री म्हणजे ज्योती चांदेकर.

    पुण्याच्या सरस्वती नाट्यमंदिरात शिकताना केवळ आवड म्हणून ज्योती चांदेकर यांनी तिथल्या नाट्यवाचन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. याच वाचनावेळी बाबा ओक यांनी ज्योती यांची गुणवत्ता हेरुन त्यांना' सुंदर मी होणार' या नाटकासाठी विचारलं. त्यांच्या नाटकातल्या कलाकाराची झालेली अडचण लक्षात घेऊन ज्योती यांनी अवघ्या १४ व्या वर्षी रंगमंचावर पाऊल ठेवलं आणि अल्पावधीतच ती हौस न उरता त्यांचं प्रोफेशन बनलं. या नाटकातलं त्यांचं काम पाहून 'नाट्यसंपदा' च्या प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या 'बेइमान' या नाटकासाठी विचारणा केली. ज्योती तिथेही उभ्या राहिल्या त्या बदली खेळाडू म्हणूनच. यावेळी त्यांचा सहकलाकार होते सतीश दुभाषी. नवोदित ज्योती यांच्यांवर शाबासकीची पहिली थाप पडली ती दुभाषी यांच्याकडूनच.

    मुंबईतल्या नाटकांमध्ये चुणूक दाखवतानाच, त्यांनी आपलं मूळ गाव पुणे मात्र सोडलं नाही.'थ्री स्टार्स' या बाबूराव गोखले यांच्या संस्थेतून 'वर्‍हाडी माणसं', 'स्वयंसिद्धा', 'प्रेमा तुझा रंग कसा ?' आदी अनेक नाटकं केली. घरातल्या दोन धाकट्या बंधूंची असलेली जबाबदारी लक्षात घेऊन ज्योती यांनी त्याकाळी ऑर्केस्ट्रामधून आपलं नृत्यकौशल्यही दाखवलं. अनेक लोकनाट्यातून काम केलं. परंतु, अभिनेत्री म्हणून मोठी लोकमान्यता त्यांना मिळाली ती १९७५ साली आलेल्या 'रखेली' या नाटकामुळे. अरुण सरनाईकही या नाटकात मुख्य भूमिका करत. हे नाटक होतं आशयघन. पण त्या काळी 'प्रौढांसाठी' च्या नाटकांचं पेव फुटलं होतं. त्यात हे नाटक विनाकारण भरडलं गेलं असलं, तरी ज्योती यांच्या कामाचं कौतुक होत होतं. त्यानंतर 'श्रीचिंतामणी', 'सुयोग' आदी बड्या संस्थांमधून त्यांनी अनेक नाटकं केली. 'नाट्यदर्पण', 'रंगदर्पण' आदी अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.

    अनेक नाटकांतून त्यांच्या अभिनयाचा धडाका सुरू असतानाच, आठ वर्षांपूर्वी आलेल्या 'मित्र' नाटकानंतर मात्र तब्येतीच्या कारणास्तव ज्योती यांनी नाट्यसृष्टीतून काढता पाय घेतला. पुढे पाचेक वर्षं ज्योती पुण्यातच होत्या. त्यांचं मोठं कमबॅक झालं ते 'सुखान्त' या सिनेमातून. यातील भूमिकेसाठी 'मटा सन्मान', 'झी' यांसह अनेक पुरस्कार पटकावले. त्यानंतर मात्र ज्योती यांनी मागे वळून पाहिलं नाही. समोर आलेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. ही त्यांची दुसरी इनिंग होती. त्यानंतर आलेल्या 'मी सिंधुताई सपकाळ', 'पाऊलवाट' या सिनेमांमधल्या भूमिकांसाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे अनेक पुरस्कार मिळाले. आगामी काळात त्यांचे आणखी काही सिनेमे येणार आहेत. पुण्यात राहून ज्योती यांनी हे योगदान कोणताही गाजावाजा न करता दिलं आहे. गेल्या ४५ वर्षांचं त्यांचं नाट्य, सिनेसृष्टीतील योगदान लक्षात घेऊन अ. भा. चित्रपट महामंडळाने त्यांचा 'चित्रकर्मी' पुरस्काराने उचित गौरवच केला आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017


  • बॉलीवूडचा फिट अभिनेता जॉन अब्राहम

    आज बॉलीवूडच्या फिट अभिनेत्यांमध्ये जॉन अब्राहमच्या नावाची गणना होते. जॉन अब्राहम इंडस्ट्रीतील सर्वाधिक शिकलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.

      May 27, 2019


  • नमिता राऊत

    महिला सक्षमीकरणाचा नवा व समर्थ चेहरा म्हणून नमिता राऊत यांच्याकडे पाहिले जाते. महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. महिला बचत गट स्थापन करून महिलांसाठीच्या हिताची कामे करण्यास सुरूवात केली.

      January 22, 2015


  • कवयित्री आणि बालसाहित्यकार डॉ. लीला गणेश दीक्षित

    त्यांच्या पुस्तकांमध्ये कोकणातील निसर्ग केंद्रस्थानी होता. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३५ रोजी गुहागरमध्ये झाला. पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातून मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले होते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या त्या माजी अध्यक्षा आणि गेली सुमारे वीस वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहात होत्या. डॉ. दीक्षित यांनी ‘प्राचीन मराठी वाङ्मयातून दिसणारे स्त्री दर्शन’ या विषयावर पीएचडी प्राप्त केली होती. त्यांना चार राज्य पुरस्कार, भा. रा. तांबे पारितोषिक, ना. धों. ताम्हनकर पारितोषिक, वा. ल. कुळकर्णी पारितोषिक, दि. के. बेडेकर पारितोषिक आणि मसाप पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. बालसाहित्याशिवाय त्यांनी विविध विषयांवर संशोधनपर लेखन केले. ‘प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. परभणीला २००५ साली झालेल्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

    डॉ. दीक्षित यांची विविध विषयांवरील सुमारे ५० पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये ‘अंतरीचे धावे’, ‘बहाद्दर बल्लू’, ‘मुके मित्र’, ‘मैत्री मोलाची’ ‘आजोबांचं घर’, ‘आनंदयोगिनी’, ‘कोकण - विविध दिशा आणि दर्शन’, ‘गंमत गाव’, ‘गाणारं झाड’, ‘घर आमचं कोकणातलं’, ‘चंदनवेल’, ‘नाच रे मोरया’ ‘पंख नवे’, ‘पोपटाचं झाड’ आदी पुस्तके आहेत. ‘फुलांना मिळाले रंग’ हे बालनाट्य त्यांनी लिहिले. ‘स्वामी अपरान्ताचा’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. डॉ. लीला गणेश दीक्षित यांचे १३ ऑक्टोबर २०१७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 4, 2019


  • भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव

    जगातील सर्वोत्तम ऑलिम्पिक क्रीडा कुंभमेळ्यात भारताकरिता पहिले ऐतिहासिक वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये केला होता. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी झाला.

    महत्त्वाचे म्हणजे खाशाबाच्या पदकानंतर तब्बल ४४ वर्षे आपली वैयक्तिक पदकांची पाटी कोरी होती. कुस्तीतही पाच दशकांनंतर दुसरे पदक आले. फिनलंड देशाच्या राजधानीतील १५ व्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाईल बॅंटमवेट कुस्ती गटात कॅनडा, मेक्सिको, जर्मनीच्या मल्लांना चितपट करून कराडजवळील गोळेश्वर गावातील खाशाबांनी ऑलिम्पिक कांस्यपदक पटकावण्याची किमया २३ जुलै १९५२ रोजी घडवली. कुस्तीची पंढरी कोल्हापुरात राजाराम महाविद्यालयात बी.ए.चे शिक्षण घेत असतानाच खाशाबांनी १९४८ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये सहावे स्थान पटकावले होते.

    या ऑलिम्पि-कसाठी त्यांनी बोटीतून कंटाळवाणा प्रवास केला होता. ऑलिम्पिक पदकाचा निर्धार त्यांनी तेथेच केला होता. सलग चार वर्षे घाम गाळल्यानंतर त्यांची सुरुवातीला कुस्तीतील राजकरणामुळे निवडही झाली नव्हती. पंजाबच्या मल्लांनी आपल्या अन्यायाला वाचा फोडली तेव्हा खाशाबांनाही न्याय मिळाला. एक एक रुपया गोळा करून खाशाबांनी दुसरी ऑलिम्पिक वारी केली होती. कोल्हापूरच्या मराठा बॅंकेने त्यावेळी ३००० रुपयांचे कर्ज दिले नसते तर खाशाबांचा हेलसिंकीला जाण्याचा मार्ग बंद झाला असता. ही अडथळ्यांची शर्यत जिंकत हेलसिंकीत पोहोचलेल्या खाशाबांना ज्या दिवशी पदकाची लढत होती त्याच दिवशी प्रशिक्षकांनी खाशाबांना विश्रांती घेण्यास सांगून ते हेलिसिंकी शहरात फिरायला गेले होते. योगायोगाने खाशाबा स्पर्धेसाठी पोहोचले आणि त्यांनी पदकाची बाजी मारली.

    पदकानंतर सहा वर्षे ते बेकार होते. अखेर महाराष्ट्र पोलीस दलात त्यांनी कशीबशी नोकरी मिळाली. तेथेही त्याच्या क्रीडाकौशल्याचा उपयोग कमीच करून घेण्यात आला. त्यांचे जन्मगाव गोळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑलिम्पिकच्या वर्तुळांसोबत प्रेरक स्तंभ उभा केला आहे. खाशाबा जाधव यांचे निधन १४ ऑगस्ट १९८४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / प्रा. संजय दुधाणे

    खाशाबा जाधव यांच्यावर प्रा. संजय दुधाणे यांनी केलेली कविता
    पंचरंगी ही वर्तुळे, सांगती आलिम्पिक गाथा।
    मैत्री, मानवतेद्वारे क्रीडावीर रचति पदक कथा ।।1।।
    जिंकुनी पहिलं मानाचं पदक, वाहिलं भारतभू चरणी।
    खाशाबा आद्य ऑलिम्पिकवीर, जन्मती कराड भुवनी ।।2।।
    रोवूनिया झेंडा मराठी मल्लविद्येचा, हेलसिंकी रणांगणी।
    कॅनडा, जर्मनी मल्ल चित, ऐतिहासिक 23 जुलै 1952 दिनी ।।3।।
    पहिला भारतीय, एकमेव मराठी वीर, कीर्ती दिगंतर।
    ऑलिम्पिकवीरा नमन, प्रेरणेची मशाल उजळती अंबर ।।4।।

      August 14, 2021


  • किशोर आयलवार

    कर्करोगामुळे स्वरयंत्र गमावलेतरी केवळ नाटकाच्या प्रेमापोटी 'मी मूकनायक' या नाटकाच्या माध्यमातून नागपूरचे किशोर आयलवार यांनी रंगमंचावर रिएन्ट्री घेतली. नागपुरातील नाट्यक्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून ते सक्रिय आहेत. रसिकांकडून वाहवा मिळवणारे किशोर आयलवार हे रंगस्वानंदीच...

    रंगस्वानंदी रंगकर्मी

      July 24, 2015