जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे.
July 7, 2022
सूक्ष्म देहाने मंगळावर व गुरूवर जाऊन त्यांनी तेथील माहिती अवकाशयानांनी मिळविण्याची आधीच प्रसिद्ध केली, असे म्हटले जाते.
March 29, 2022
कवी गिरीश यांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९३ रोजी झाला. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत. कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते.
कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली. कवी गिरीश यांचे ०४ डिसेंबर १९७३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 6, 2019
सत्तेच्या राजकारणात निवडणूका या अत्यंत महत्वाच्या असल्या तरी जनमाणसांच्या मनात आपुलकीचं नातं निर्माण करणारा नेता हाच खरा लोकनायक समजला जातो. प्रत्येक राजकीय पक्षाला संघर्ष हा करावाच लागतो. निवडणुकीत जय – पराजय हा नित्याचाच आहे. उतार चढाव हा तर राजकारणाचा स्थायीभावच आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतोच. आणि सध्या अशा संघर्षातून राज ठाकरे नावाचा योद्धा तावून सुलाखून बाहेर पडत आहेत.
October 29, 2018
सी. रामचंद्र यांचे पूर्ण नाव रामचंद्र चितळीकर, ‘सी. रामचंद्र’ हे नाव त्यांनी सिने दिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१८ रोजी झाला. आपल्या निकटवर्तीय व आप्तेइष्टांमध्ये ते ‘अण्णा’ या नावाने प्रसिद्घ होते. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांची ठिकठिकाणी बदली होत.त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले. शालेय शिक्षणात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते; पण संगीत क्षेत्राविषयी निस्सीम प्रेम व भक्ती असल्याने याच विषयात कारकीर्द गडवण्याच्या हेतूने नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त प्रवेश घेऊन त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले. गांधर्व संगीत महाविद्यालयात त्यांनी पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या हाताखाली गायकीचे धडे घेतले; व उत्तम गाणारा मुलगा असा लौकिक मिळविला. जयकोडी या तमीळ चित्रपटासाठी त्यांनी प्रथम संगीतरचना केली.
सुखी जवान हा त्यांनी संगीत दिलेला पहिला हिंदी चित्रपट! मा. भगवान यांनी तो निर्माण केला. त्यात सारे जहाँसे अच्छा या इक्बाल यांच्या विख्यात गीतासाठी सी रामचंद्र यांनी चाल दिली. या जोडीचा अलबेला हा चित्रपट तुफान चालला. त्यात मास्टर भगवानची नृत्ये आणि सी.रामचंद्र यांचे अफलातून संगीत यांची जादू आजही कायम आहे. त्यातील भोली सुरत दिलके खोटे हे गीत तर जाम धमाल आहे. सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले सरगम,पतंगा, सगाई, अनारकली इत्यादी अनेक चित्रपट आले. काही संगीतदृष्टया चांगलेच गाजले. त्यात अनारकली हा ऑल टाईम ग्रेट आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत सुमारे २५० हिंदी, मराठी, तमिळ , तेलुगु चित्रपटाना संगीत दिले. त्यांच्या बहराचा काळ १९४४ ते १९५५ हा मानला जातो. १९४९ ते १९५८ या काळात त्यांच्यासह लता मंगेशकर गात असत. पण नंतर त्यांचा वाद झाला. पण लता आणि त्यांचे बिनसले आणि ते नंतर जवळजवळ या व्यवसायातून बाहेर फेकले गेले. १९६० नंतर त्यांची कारकीर्द संपली.
१९६४ च्या सुमारास कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख मे भर लो पानी या गीताला सी. रामचंद्र यांनी संगीत दिले. लता मंगेशकर यांनी ते गीत गायिले होते. त्यांनी हलक्या फुलक्या पाश्चात्य संगीतावर मनापासून प्रेम केले आणि त्या संगीताच्या सादरीकरणाचे एक नवे युगच निर्माण केले. भारतीय संगीत आणि पाश्वात्य संगीताचा एक अप्रतिम संगम त्यांनी घडविला. कव्वाली या संगीत प्रकाराला संजीवनी देण्यातहि त्यांचा महत्वाचा वाटा होता. अनारकली या १९५३ साली आलेल्या चित्रपटात त्यांनी यह जिंदगी उसी की है या गीताला दिलेलं संगीत अत्यंत सुंदर आहे. त्या गीतात वापरलेली सतार अविस्मरणीय आहे. ते अष्टपैलू संगीतकार होते. मा.सी.रामचंद्रांनी माझ्या जीवनाची सरगम हे आपले आत्मचरित्र लिहिले आहे. मा.सी. रामचंद्र यांचे ५ जानेवारी १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 12, 2018
‘मला आई व्हायचंय’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमातून घराघरात ओळखली जाणारी प्रतिभावंत अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर. तिचा जन्म ४ मे १९८६ रोजी पुणे येथे झाला. उर्मिला ही एक उत्तम अभिनेत्री आहे सर्वांना माहित आहे मात्र ती एक उत्तम क्लासिकल डान्सर असल्याचे फार कमी चाहत्यांना माहित असेल. प्रसिद्ध कथ्थक गुरू आशा जोगळेकर यांच्याकडे उर्मिलाने कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. उर्मिला ओडिसी नृत्यशैलीचेही शिक्षण सुजाता महापात्रा यांच्याकडून घेतले आहे. गांधर्व महाविद्यालयाची नृत्यालंकार ही पदवी तिने प्राप्त केली आहे. ‘श्रृंगारमणी’ हे टायटल सुद्धा मिळालं आहे. अभिनयासोबतच ती क्लासिकल डान्स शिकवण्याचे सुद्धा काम करत असते.
उर्मिला कानेटकर कोठारे हिच्यावरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
# Kanetkar-Kothare, Urmila
June 5, 2017
प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ मा.भालबा केळकर हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले
May 25, 2019
‘कथालक्ष्मी’ नावाचे मासिकही ते चालवत असत. त्या मासिकाचे तब्बल वीस वर्षे त्यांनी संपादन केले. या मासिकाच्या निमित्ताने त्यांनी मराठी कथाविश्वाला अनेक नव्या लेखकांचा परिचय करून दिला. त्या मासिकासाठी त्यांनी भालबा केळकर, केशवराव भोळे यांनाही लिहिते केले.वाटवे हे मुलाखतकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी घेतलेल्या शरद तळवलकर, प्रभाकर पणशीकर, राजा गोसावी, विवेक, लालन सारंग यांच्या मुलाखती विशेष गाजल्या. त्यांची अनेकांशी मैत्री होती. चित्रपट क्षेत्राबाबतच्या गप्पांमध्ये ते रंग भरत, जुने किस्से सांगत.
March 16, 2022
ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि समालोचक रिची बेनो यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९३० रोजी झाला.
बेनो हे ऑस्ट्रेलिया संघातील महान अष्टपैलू खेळाडू होते. ऑस्ट्रेलियाकडून ६३ कसोटी सामने खेळतानाच त्यांनी २८ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले. यात हजारांपेक्षा अधिक धावा तसेच २०० पेक्षा अधिक बळी मिळवण्याची कामगिरी केली. १९६४ मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली. तत्पूर्वी, कारकीर्दीत एकही मालिका गमावणारा कर्णधार म्हणून त्यांनी विक्रम रचला होता. बेनो यांनी त्यांच्या क्रिकेट करीअर मधील सर्वात रोमांचक सामना १९६०-६१ मद्ये वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या गाबा मैदानात खेळला. हा सामना टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील पहिला टाय सामना ठरला. पाकिस्तानात श्रॄंखला जिंकणारे पहिले कर्णधार सुद्धा ठरले. बेनो फलंदाजीतही त्यांची छाप सोडण्यात यशस्वी ठरले. त्यांनी त्यांच्या करीअरमध्ये तीन शतकं लगावले. त्यांनी एकूण २,२०१ रन्स काढले आहेत.
बेनो यांनी १९६०च्या दशकात बीबीसी’साठी कमेंटेटर म्हणून काम करणे सुरू केले. त्यानंतर १९७७ मध्ये केरी पॅकर्स वर्ल्ड सिरीज क्रिकेट स्पर्धेसाठी कॉंमेंन्ट्री करण्यासाठी ऑस्ट्रेलियन चॅनल नाइन सोबतही जुळले होते.
बेनो यांना २००७ मध्ये एलन बॉर्डर सन्मान समारोहात क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या हॉल ऑफ फेम’ मध्येही जागा देण्यात आली आहे. त्यानंतर दोन वर्षांनी क्रिकेट परीषदेच्या हॉल ऑफ फेम’ यादीतही त्यांचे नाव नमूद करण्यात आले.
रिची बेनो यांनी तारुण्यात क्रिकेटचे मैदान गाजवले, तर नंतर मैदानाबाहेर राहूनही क्रिकेटशी असलेले नाते तुटू दिले नाही. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील आजी-माजी खेळाडूंचे ते आदर्श राहिले आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि बेनो हे एकमेकांस पूरक असे अविभाज्य घटक झाले होते. रिची बेनो यांचे निधन १० एप्रिल २०१५ रोजी झाले.
April 11, 2022
कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी…’ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला.
May 10, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti