जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल शैलीतील बंदिशींच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणा-या एक प्रयोगशील गायिका नीला भागवत यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९४२ रोजी पुणे येथे झाला.
कृष्णराव पंडीत व शरच्चंद्र आरोलकर हे त्यांचे गुरु. त्यांची मीराबाई व कबीराच्या भजन गाण्याबद्धल विशेष प्रसिद्ध आहेत. जयपूर आणि ग्वाल्हेर अशा दोन्ही घराण्यांमधली गायकी त्या शिकल्या, ती आत्मसात केली आणि अवलंबलीही, मात्र ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल (खयाल-कल्पना) गायकीमध्ये त्या मनापासून रमल्या. ग्वाल्हेर घराण्यात बोलाला सर्वाधिक महत्त्व आहे. बोलात सगळंच अंतर्भूत असतं, या कल्पनेनं झपाटलेल्या नीला यांनी ख्यालाचा मूळ पिंड कधीच सोडला नाही. त्या व्यवसायाने प्राध्यापक व भाषांतर कार आहेत. आजही पारंपरिक गायिकीसोबतच जीवनातील अनुभव बंदिशींमधून मांडत नवता, प्रयोगशीलताही त्या जपत आहेत. शास्त्रीय रागांसह ‘पियानो’सारख्या पाश्चिमात्य वाद्याबरोबरही त्या जितक्या एकरूप होतात, तितक्याच परदेशी मूकबधिर मुलांना गायन शिकवतानाही होतात.
संत कबीर, मीराबाई, चोखामेळा, संत तुकाराम, महात्मा फुले ते अगदी महात्मा गांधी यांसारख्या संत आणि महापुरुषांच्या विचारांवर, काव्यांवर बंदिशी बांधून त्यांचं सांगीतिक चित्र समाजापुढे मांडत आहेत. आज वयाच्या पंच्याहर्या वर्षीही नीला भागवत यांचा नवनिर्मितीचा, सृजनशीलतेचा उत्साह कायम आहे. त्यांना एसएनडीटी विद्यापीठ आणि वायएमसीए संस्था यांच्यातर्फे ‘कॉन्ट्रिब्युशन टू विमेन्स कल्चर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच
केंद्र सरकारतर्फे संगीतातील संशोधनासाठी मानद शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली आहे.
नीला भागवत यांचे साहित्य.
मोनोग्राफ ऑन कृष्णराव शंकर पंडित (१९९२)
तिहाई (कवितासंग्रह) (१९९२-९३)
कबीर गाता गाता (२००४)
शरच्चंद्र आरोलकर – लेणे प्रतिभेचे (२०१२)
https://www.youtube.com/watch?v=0WLgyPkL5dI
https://www.youtube.com/watch?v=Ukghy6LIqlA
#NeelaBhagwat
May 5, 2022
ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. ‘सावरकर’ चित्रपटाचेही सुरवातीचे लेखन त्यांनी केले होते, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
June 25, 2022
तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते.
May 19, 2021
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध बोलपट निर्माते, दिग्दर्शक व्हि.शांताराम आणि ज्येष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा सहवास लाभलेले श्रीराम बोरकर हे ठाण्यातल्या लेखकांमधल एक परिचित नाव
May 23, 2014
कानन देवी यांचे नाव 'कानन बाला' होते. कानन देवी यांचा जन्म बंगाली परिवारात झाला. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९१६ रोजी झाला. आपल्या वडिलाच्या निधनामुळे लहानपणीच आईला मदत करू लागल्या होत्या. वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी 'ज्योति स्टूडियो' निर्मित 'जयदेव' या बंगाली चित्रपटात काम केले. १९३४ साली आलेल्या मा या चित्रपटापासून नाव झाले. नंतर कानन देवी मुंबईला आल्या व न्यू थिएटर मध्ये हिंदी चित्रपटात गाणे व अभिनय असे दोन्ही काम करू लागल्या, त्या साठी उस्ताद अल्ला रखा व भीष्मदेव चटर्जी याच्याकडून संगीताचे धडे घेऊ लागल्या. १९३७ मध्ये आलेल्या 'मुक्ति' या चित्रपटाने कानन देवी यांना न्यू थिएटरच्या पहिल्या कलाकारा मध्ये नेऊन बसवले. १९४१ मध्ये कानन देवी यांनी न्यू थिएटर सोडले व स्वतंत्रपणे काम करू लागल्या. १९४२ साली आलेल्या 'जवाब' हा चित्रपट कानन देवी यांचा सर्वाधिक हिट समजला जातो. यातील "दुनिया है तूफान मेल", हे गाणे खूपच गाजले. या नंतर कानन देवी यांचे 'हॉस्पिटल', 'वनफूल' व 'राजलक्ष्मी' असे हिट चित्रपट आहे.
१९४८ साली आलेला 'चंद्रशेखर' हा कानन देवी यांचा शेवटचा चित्रपट. ज्यात अशोककुमार हिरो म्हणून होते. १९४९ मध्ये कानन देवी यांनी 'श्रीमती पिक्चर्स' या नावाखाली वामुनेर में, अन्नया, मेजो दीदी, दर्पचूर्ण, नव विद्यान, आशा, आधारे आलो, राजलक्ष्मी ओ श्रीकांता, इंद्रनाथ, श्रीकांता, औ अनदादीदी या चित्रपटांची निर्मीती केली होती. १९७६ साली त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सम्मानित केले होते. कानन देवी या पहिल्या बंगाली अभिनेत्री होत्या ज्यांना हा पुरस्कार मिळाला होता. आपल्या तीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी साठ चित्रपटात काम केले. त्यांचे उल्लेखनीय चित्रपट 'जयदेव', 'प्रह्लाद', 'विष्णु माया', 'माँ', 'हरि भक्ति', 'कृष्ण सुदामा', 'खूनी कौन', 'विद्यापति', 'साथी', 'स्ट्रीट सिंगर', 'हार-जीत', 'अभिनेत्री', 'परिचय', 'लगन', 'कृष्ण लीला', 'फैसला' और 'आशा'.
कानन देवी यांनी अभिनय व पार्श्वगायन या दोन्ही क्ष्रेतात नाव कमवले होते. कानन देवी यांचे १७ जुलै १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 22, 2017
जन्म. २४ फेब्रुवारी १९५५ ग्रीन बे अमेरिका येथे.
सिरीयाचा मुस्लिम विद्यार्थी अब्दुल फतेह जॉन जंदाली व जोआन शिबिल यांनी विवाहाआधी जन्मलेले मूल अनाथालयाला दिले होते. त्यासाठी त्यांची एकच अट होती. त्यांचे मूल दत्तक घेणारे कुटुंब हे सुशिक्षित असले पाहिजे. कॅलिफोर्नियातील पॉल व क्लरा जॉब्स या आर्मिनियन कुटुंबाने त्यांचे मूल दत्तक घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. जॉन - जोआन यांचे मूल त्यांना दत्तक देण्यात आले. त्या मुलाला स्टिव्हन पॉल जॉब्स असे नाव मिळाले. जॉब्स यांचे कुटुंब मजुरी करणारे आहे हे समजल्यानंतर त्यांची आई जोआनने स्टीव्हला दत्तक देण्यास आक्षेप घेतला. सहा महिन्यांच्या चर्चेनंतर जोआन दत्तक करारावर स्वाक्षरी केली. या ओढाताणीचा स्टीव्ह याच्या मनावर गंभीर परिणाम झाला. कुणालाच न आवडणारा मी एकमेव मुलगा आहे, असे त्याचे मत बनले होते.
हायस्कूलमध्ये असताना स्टीव्हला ह्यूलेट पॅकर्डच्या कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. येथेच त्याची स्टीव्ह व्होज्नियाकसोबत ओळख झाली. जॉब्स आणि रीड कॉलेजमधील त्यांचा मित्र स्टीव्ह व्होज्नियाकने शिक्षण अर्ध्यावरच सोडले होते. १९७१ मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा जॉब्स १६, तर व्होज्नियाक २१ वर्षांचा होता. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या व्होज्नियाकने पहिल्या व्हिडिओ गेमचा टेलिटाईप व नंतर मायक्रोप्रोसेसर बनविला होता. मात्र, त्या वेळी हा गेम विकावा कसा, अशी अडचण होती. ७०च्या दशकात कॉम्प्युटर क्षेत्रात नवनवे प्रयोग व नवनिर्मिती होत होती. नेमकी हीच नस पकडत जॉब्स यांनी १९७६ मध्ये व्होज्नियाकवर कॉम्प्युटर निर्मितीची जबाबदार सोपवीत स्वत: मार्केटिंगमध्ये लक्ष घातले. अशा रितीने ॲपलची सुरुवात झाली. त्यांना ५० कॉम्प्युटर्सची पहिली ऑर्डरही मिळाली खरी, मात्र हे संगणक वेगवेगळ्या सुट्या भागांत न देता पूर्णपणे एका मशिनीच्या स्वरुपात मिळावे, अशी अट होती. आजचे वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेत त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच कॉम्प्युटरच्या व्यवसायात शिरकाव केला. तंत्रशिक्षणाची पदवी नसल्याने त्यांनी या क्षेत्रातील तरबेज सहकार्याने निवडले. बाजारपेठेच्या गरजेची नस पकडत जॉब्स यांनी एकापेक्षा एक अत्याधुनिक व सरस उत्पादने धूमधडाक्यात उतरवली. प्रख्यात कॉप्युटर कंपनी आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटर आणण्याच्या चार वर्षे आर्धीच त्यांनी आपला ॲपल-१ हा पीसी लाँच केला. ॲपलच्या सहकाऱ्या सोबत मतभेद झाल्याने आपलीच कंपनी सोडली. १९८६ मध्ये स्टीव्हने नवा प्रयोग करण्याचे ठरवले आणि फिल्म निर्देशक जॉर्ज लुकास यांच्यासह १० मिलियन डॉलरची भागीदारी असणारी एक कंपनी स्थापन केली. तिला नाव देण्यात आले पिक्सार. येथे ॲनिमेशन फिल्म बनवण्यात आल्या. फाइंडिंग निमो सारख्या फिल्मने मोठे यश मिळाल्यावर त्याने ही कंपनी बाजारात आणण्याचे ठरवले. यासाठी वॉल्ट डिझ्नीसोबत करारही करण्यात आला होता. १९९७ मध्ये तोट्यात चालत असलेल्या ॲपलच्या सल्लागारपदावर ते परतले. २००७ मध्ये ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. यानंतर त्यांनी बाजारात आयपॉड, आयफोन आणि आयपॅड सादर केला. त्यांच्या या नेतृत्व व दूरदर्शीपणास जगभराने सलाम ठोकला.
२००१ साली ॲपलने ५ गिबाबाईट क्षमतेचा पहिला आयपॉड लाँच केला. हा सर्वांत लहान म्युझिक प्लेअर होता. यात एक हजार गाणे स्टोअर करता येतील, असे कंपनीने सांगितले होते. ॲपलच्या मार्केटिंगने सोनी वॉकमनला कडवे आव्हानच दिले नाही तर बाजारपेठेतून जवळपास बाहेरच रवानगी केली.
ॲपल कंपनीच्या घडामोडींवर पुस्तक लिहिणाऱ्या जिम कार्लटन यांनी ॲपल हे नाव कसे निवडण्यात आले या मागिल कहाणी सांगितली आहे. बिटल्स ॲपल रेकॉर्ड या कंपनीच्या लोगोमधून हे नाव घेण्यात आले आहे. स्टीव्हला हा त्या कंपनीचा हिरवेगार ॲपल असलेला लोगो फार आवडायचा म्हणून त्याने कंपनीचे नाव ॲपल ठरवले आणि लोगो म्हणून एक तुकडा तोडलेले ॲपल निवडण्यात आले. यामुळे या दोन कंपन्यांमध्ये कायद्याची लढाई रंगली.
२००७ वर्षात आयफोनच्या लाँचही केला. टचस्क्रीन आणि सोप्या इंटरफेसमुळे हा मोबाईल अपेक्षेपेक्षा अधिक लोकप्रिय झाला. वर्षभरातच कंपनीने आयफोन थ्रीजीही सादर केला. याच्या वेगवान डाटा ट्रान्स्फरने मोबाईल वेड्यांना आणखीच वेड लावले. २०१० साली आलेला पहिला टॅब्लेट पीसीने पुन्हा जगभरातील गॅजेटप्रेमींना वेड लावले. हा टॅब्लेट हातोहात विकला गेला. टचपॅड तंत्रज्ञानावर आधारलेल्या या अतिशय छोट्या कॉम्प्युटरने अनेक उणीवा असतानाही इंटरफेस, वेगवान प्रोसेसर आणि चित्राच्या स्पष्ट गुणवत्तेमुळे लोकप्रिय झाला. नंतर आयपॅड थ्रीजी आणि आयपॅड-२ मध्ये अनेक उणीवा दुरुस्त करण्यात आल्या.
जॉब्स अनेक वर्षांपासून अन्नाशयाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. या मृत्यूची चाहूल त्यांन आधीच लागली असावी. ॲपलचे सहसंस्थापक वॉल्टर आयजॅक्सन यांचे स्टीव्ह जॉब्स यांच्यावरील पुस्तक लिहिले आहे.
स्टीव्ह जॉब्स यांचे निधन ५ ऑक्टोबर २०११ रोजी झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
February 24, 2022
मोटारीच्या शंभरहून अधिक वर्षांच्या इतिहासात अनेक कार कंपन्या जन्माला आल्या आणि काळाच्या ओघात विलुप्तदेखील झाल्या. मात्र यातील काही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढय़ा कंपन्या आहेत ज्यांची प्रतिष्ठा आणि रुबाब हा अद्याप अबाधित आहे. आणि त्यांपैकी एक कंपनी म्हणजे रोल्स रॉयस.
April 25, 2021
मूकचित्रपटाचे नायक भाऊराव दातार यांचा जन्म १४ जानेवारी १९०३ रोजी सातारा येथे झाला. कृष्णाजी विश्वनाथ दातार ऊर्फ भाऊराव दातार यांचा जन्म एक श्रीमंत कुटुंबात झाला पण काही कारणाने त्यांच्या वडीलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आणि त्यांना नाशिकला जाण्यास भाग पाडले. तेथे त्यांच्या वडिलांनी विजयनंद थिएटरच्या जवळ एक चहाचे दुकान सुरु केले. आपल्या वडिलांना चहा देण्यासाठी मदत करताना, भाऊराव दातार यांनी मास्टर दीनानाथ आणि बाल गंधर्व यांच्यासारख्या नामवंत कलावंतांचे अभिनय बघीतले आणि ते अभिनयाकडे आकर्षित झाले आणि त्यातून ते अभिनयनाचा पहिला धडा शिकला. अभिनय शिकता शिकता ते व्यायामशाळेत जाऊ लागले आणि लवकरच एक पहेलवान बनले आणि नाशिक मध्ये त्यांनी अनेक पदके जिंकली. त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने त्यांना दादासाहेब फाळके यांच्या स्टुडिओमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यांनी सुमारे ११९ चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेते म्हणून उल्लेखनीय योगदान दिले.
दातारांनी आपला चित्रपट मूकपटांच्या युगात सुरू केला. ते फाळके स्टुडिओशी निगडित होते आणि ११९ चित्रपटांपैकी ८० मूकपट मराठी चित्रपट, २० मराठी चित्रपट आणि एका हिंदी चित्रपटात काम केले.
दादासाहेबांच्या ११९ चित्रपटांपैकी १९१८ ते १९२८ दरम्यान ८० चित्रपट तयार झाले होते. ८० चित्रपटांपैकी ६० चित्रपटांमध्ये भाऊराव दातार विविध भूमिकेत होते. नानासाहेब सरपोतदार, मास्टर विनायक आणि भालजी पेंढारकर यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकासह त्यांनी मूक आणि बोलपटांच्या चित्रपटांमध्येही काम केले. त्यांनी मूकपटांमध्ये अभिनय केला, दादासाहेब फाळकेच्या कंपनीला सोडल्यानंतर ते नानासाहेब सरपोतदारांची पुणे येथे असलेली आर्यन कंपनीत काम करण्यास सुरवात केली. तेथे त्यांनी २० पैकी १५ चित्रपटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. राजकुमार ठकसेन मध्ये 'ठकसेन' म्हणून त्यांची भूमिका, समशेर बहादूर मधील समशेर, गुड बाय विवाहमधील डॉ. मदन, भवानी तलवार इ. मधील रामदास यांची अत्यंत प्रशंसा झाली. ललिता पवार यांच्याबरोबर त्यांनी दशरथ्री राम, सुभद्रा हरण, चतुर सुंदरी, ठाक़ुई माशी, समशेर बहादूर आणि पृथ्वीराज संयोगिता अशा अनेक मूकपट केले. त्यांनी नंतर 'दुनिया ची क्या' आणि 'नेताजी पालकर' मध्ये एकत्र काम केले. १९३३ साली त्यांनी मुंबईच्या चित्रपट उद्योगाच्या जगात प्रवेश केला. अर्देशर इराणी यांच्या ईम्पीरियल फिल्म कंपनीत गेले. तेथे नानासाहेब सरपोतदार यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी तेथे त्यांनी रुक्मिणी हरण, चलता पुतला, पृथ्वीराज संयुक्ता आणि देवकी सारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या. चलता पुतला मधील त्यांची खलनायकाची भूमिका प्रसिद्ध झाली. त्यांनी चिमुकला संसार, धर्मवीर, माझे बाळ, नेताजी पालकर या मराठी चित्रपटात काम केले.
भाऊराव दातार आपल्या अभिनेता करीयर नंतर मेकअप आर्टीस्ट म्हणून काम केले. नंतर ते दादा दातार नावाने ओळखले. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मेकअप मास्टर म्हणून सेवा केली. ते सर्वात लोकप्रिय मेकअप कलाकार होते आणि त्यांनी प्रसिद्ध 'साधना कट' बनविला होता. भाऊराव दातार यांच्यावर त्यांचे नातू भरत कान्हेरे यांनी एक डॉक्युमेंटरी फिल्म बनविली आहे. भाऊराव दातार यांचे १५ सप्टेंबर १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 15, 2018
स्व. कुशाभाऊ ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे ४थे अध्यक्ष होते. त्यांनी १९९८ ते २००० या कालावधीत पक्षाचे अध्यक्षपद भूषविले. भाजपाचे ते पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष.
April 21, 2011
सर गारफील्ड सोबर्स म्हणजेच गॅरी सोबर्स. गॅरी सोबर्स यांना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान अष्टपैलू म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांची कारकिर्द १९५४ ते १९७४ पर्यत राहिली. त्यांचा जन्म २८ जुलै १९३६ बार्बाडोस मधील ब्रिजटाऊन येथे झाला. सोबर्स यांच्याकडे तब्बल पाच प्रकारची कौशल्य होती. फलंदाज-क्षेत्ररक्षक-स्पीन-मनगटाच्या जोरावर स्पीन आणि जलद-मध्यमगती मारा अशा पाच प्रकारची कौशल्य त्यांना अवगत होती.
प्रामुख्याने विकेटजवळ किंवा कुठेही ते चपळाईने क्षेत्ररक्षण करायचे. पाकिस्तानविरुद्ध त्यांनी केलेली ३६५ धावांची नाबाद खेळी हेच त्यांचे कारकीर्दीतील पहिले कसोटी शतक होते. त्या इनिंगचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांचे पहिलेवहिले शतक होते. त्याआधी त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती ८०. दहा तास चौदा मिनिटांच्या खेळीत त्यांनी आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदविले. २७ फेब्रुवारी १९५८ रोजी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ते २० धावांवर नाबाद होते.
तिसऱ्या दिवसअखेर २८ फेब्रुवारी रोजी त्यांनी २२८ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर १ मार्च रोजी त्यांनी हटनचा उच्चांक मोडल्यानंतर विंडीजचा डाव घोषित करण्यात आला. ३८ चौकारांसह त्यांनी नाबाद ३६५ धावांची खेळी केली. त्यावेळी सोबर्स केवळ २१ वर्षाचे होते. त्यांचा वैयक्तिक धावांचा विक्रम ३६ वर्षे अबाधित राहिला. गॅरी सोबर्स वेस्ट इंडिजकडून १९५४ ते १९७४ असे २० वर्षे प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळले. यादरम्यान त्यांनी वेस्ट इंडिजकडून ९३ कसोटी सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी ८००० हून अधिक धावा केल्या तर २३५ विकेट घेतल्या.
कसोटीत २६ शतके ठोकताना नाबाद ३६५ अशी त्रिशतकाची खेळीही त्यांनी एकदा केली होती. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्यांनी ४० हजाराहून अधिक धावा केल्या तर १४०० च्या घरात विकेट घेतल्या. तर ५५० हून अधिक झेल टिपले. त्याच्या काळात वन डे क्रिकेट जन्माला आले नव्हते. ते निवृत्तीच्या उंबरट्यावर असताना वन डे क्रिकेटचा शुभारंभ झाला होता. गॅरी सोबर्स आयुष्यात एकमेव असा वन डे सामना खेळले. मात्र ते शून्यावर बाद झाले. मात्र त्यांनी १ गडी बाद केला होता. ३१ ऑगस्ट १९६८ रोजी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळताना त्यांनी माल्कम नॅश याच्या गोलंदाजीवर एकाच षटकात ६ षटकार ठोकून क्रिकेट विश्वात एक विक्रम नोंदवला होता.
सोबर्स यांच्या कारकिर्दीचे आकडे थक्क करणारे आहेत. त्यांच्यावेळी क्रमवारीची पद्धत नव्हती. नंतर विस्डेनने ती लागू केली. त्यावेळी सोबर्स यांना तब्बल आठ वेळा मोसमातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार मिळाला होता. अशा सोबर्स यांच्याच नावाने हा पुरस्कार आज दिला जातो, जो त्यांचा नव्हे तर क्रिकेट खेळाचाच सन्मान होय.‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ (१९६४) तसेच ‘विस्डेन’च्या शतकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंमध्ये सोबर्स यांचा समावेश होता. १९७५ मध्ये त्यांना ‘सर’ किताबानेही गौरवण्यात आले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
July 28, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti