(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • उंबरठ्याच्या आतली घुसमट

    मनोविकास प्रकाशन संस्थेने तामिळ लेखिका सलमा यांचे व सोनाली नवांगुळ यांनी अनुवाद केलेले पुस्तक ज्याला साहित्य अकादमीचा नुकताच पुरस्कार मिळाला हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. या कादंबरीला उत्कृष्ट अनुवादिसाठी साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविलेली आहे. तसे प्रत्येकाचे तास ज्याचे त्याचेच असतात. जिथे प्रेम आहे तिथे काही तासावर दुसऱ्यांचीही हुकुमत असते. मध्यरात्रीनंतरचे तास आपल्या हातात नसतात, त्यांच्यावर आठवणींची, विचारांची,शरीराची, प्रेमाची, वासनेची हुकुमत असतें.लैंगिक घुसमट होणाऱ्यांची मध्यरात्रीनंतर अवस्था  बेचैन  करणारी असतें.

      April 26, 2022


  • ऋणमुक्त

    आज मला वेगळेच समाधान व आनंद मनास वाटू लागला होता. ऋणमुक्ततेचा आनंद. उपकाराची  परत फेड व्हावी आणि त्यासाठी  एखादी नैसर्गिक घटना घडावी   ह्यासारखी   समाधानाची दुसरी गोष्ट  असू शकत नाही. कृत्रिमरित्या  व आपल्या प्रयत्नाना   आपण एखद्या  गोष्टीचे ऋण फेडणे, वेगळे. ते फेडण्यासाठी निसर्गाने तुम्हास मदत करणे ह्यात खूप फरक पडतो.

      December 10, 2020


  • आत्मस्वरांच्या हाका !

    आत्मस्वर स्पष्ट असो वा कुजबुजीच्या स्वरात तो केव्हाही पथदर्शकच ठरू शकतो विशेषतः त्याची गरज भासत असते तेव्हा! आत्मस्वर हा भावनांच्या, क्षणिक आवेगाच्या पार असतो आणि आपल्याला एखाद्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवू शकतो. हा आत्मस्वर कालातीत असतो- भूतकाळाचे अनुभव जोखून मार्ग अधिक निष्कंटक करीत असतो, वर्तमानाची काळजी तर घेत असतोच पण भविष्याचा रस्ता प्रकाशित करीत असतो.

      April 11, 2022


  • दहाव्या वाढ दिवसाच्या सदिच्छा

    मोठ्या नातवाचा आज दहावा वाढदिवस. सर्व घर आनंदाने फुलून गेले होते. त्याचे मित्र मंडळी शेजारचे, काका मामा आत्या …..

      June 5, 2013


  • गुलाबी रिबिन

    एका कॉलेजचा शेवटचा दिवस होता. एका वर्गातल्या शिक्षिकेने आपल्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाशी हस्तांदोलन केले व त्या मुलाच्या किंवा मुलीच्या कपड्यावर एक सुंदर गुलाबी रंगाच्या रिबिनीचा बोलावला. ती मुलांना म्हणाली “It makes a difference by who you are.” तुझ्या असण्याने माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे असे तिला म्हणायचे होते.

      May 29, 2024


  • पिझ्झा

    "आज कमी कपडे धुवायला टाका. आजच नाही, हा आठवडाभर कमीच कपडे धुवायला द्या." तिने नवऱ्याला आणि मुलांना बजाविले.

    “काय ग, काय झाले? ” सर्वांनी एक सुरात विचारले. तिने त्यांना सांगितले की कामवाल्याबाईने रजा घेतली आहे. तिच्या नातवाच्या पहिल्या वाढदिवसासाठी तिला गावी जायचे आहे.

    बाईच्या जाण्याने तिला अडचण होणार होती परंतु तिच्या आनंदासाठी तिने तिची रजा मंजूर केली. ती निघायला लागल्यावर तिने बाईला पाचशे रुपयाची नोट काढून दिली. तिनेही हसून ती घेतली. “चार दिवसांनी येते बाई.' एवढे बोलून ती गेली.

    इकडे घरात काहूर माजले. नवऱ्याने डोळे मोठे करत तिला विचारले, “एवढे पैसे देण्याची गरज काय होती? आपला एक पिझ्झा त्या बाईवर तू खर्च केलास.” त्याच्या आवाजातली नाराजी तिला स्पष्ट जाणवत होती. तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करुन ती म्हणाली, “जाऊ दे, तिलाही आनंद मिळू दे.” घरात तिचे वागणे कोणालाच पटले नव्हते. सगळी मंडळी तिच्यावर रुसली.

    चार दिवसांनी तिची बाई परत आली. तिच्या नवऱ्याने बाईला खोचकपणे विचारले, “काय बाई, कसा झाला नातवाचा वाढदिवस? आम्ही दिलेल्या पैशांचे तुम्ही काय केलेत? ”

    बाई हसली आणि तिने पाचशे रुपयांचा हिशोबच सादर केला. एकूण आठ गोष्टींवर तिने खर्च केला होता. नातवाला भेटवस्तू आणि पोषाख, जावयासाठी आणि मुलीसाठी भेटवस्तू, देवळात चढवलेला प्रसाद, कोणाच्यातरी औषधासाठी केलेला खर्च, गाडीभाडे आणि मुलीच्या सासरी दिलेली मिठाई असा तो खर्च होता.

    “तुमच्या पैश्यांमुळे मी माझी मान ऊंच ठेवू शकले. गावातही माझी इज्जत राखली गेली.” बाई गहिवरुन म्हणाली. तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर कृतज्ञता दिसत होती.

    बाईचे बोलणे ऐकून तिचा नवरा खजिल झाला. बाई आपले काम उरकून गेल्यावर ती त्याला म्हणाली, “आपण पिझ्झा घेणार होतो. त्यामध्ये आठ तुकडे असतात. त्या प्रत्येक तुकड्याचे सार्थक झाले आहे. त्या बाईला आणि तिच्या कुटुंबाला आनंद मिळाला आणि आपल्याला दुआ. आता सांगा आपल्याला पिझ्झा हवा होता की हा पुण्याचा संचय? ”

    त्या एका हृद्य प्रसंगाने तिच्या मुलांवरही खोल परिणाम झाला. आता कधीही चैन करण्यापूर्वी ते कोणी गरजू आहेत का याचा आधी शोध घेतात. तिलाही भरुन पावल्यासारखे वाटते.

    कैकदा आपल्या ऐषआरामापेक्षा दुसऱ्याला, विशेषतः गरजूला केलेली मदत आपल्याला अतोनात समाधान देऊन जाते. शेवटी जीवन म्हणजे फक्त आपलाच आनंद नाही तर त्यात इतरांचा आनंद आणि समाधानही समाविष्ट आहे. सहज गंमत म्हणून आपणही या पिझ्झा सारखे किती आनंदाचे क्षण मिळविले याचा विचार करु या.

    -- नीला सत्यनारायण

    अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

      May 15, 2024


  • स्ट्रेंजर इन द सिटी

    मणीपाल , उडुपी येथील बीचेस , मंगलोर येथील काही लोकेशन्स याचा अप्रतिम वापर करून त्यांनी कथानकाला एक वेगळं अवकाश प्राप्त करून दिलं आहे .

      October 2, 2021


  • मोरीला झालाय गोऱ्हा गनुबा………….!!!

    “गाय येली मोरी गनुबा,गाय येली मोरी;मोरीला झालाय गोऱ्हा गनुबा,मोरीला झालाय गोऱ्हा”

    ही गाण्याची गावठी धून आज सायंकाळी सर्वत्र ग्रामीण भागात आणि विशेषतः शेतकऱ्याकडे नक्की ऐकायला मिळाली असेल.आज वसुबारस त्यामुळे गायी-वासराची पूजा आज सर्वत्र केली जाते.तिच्याजवळ तेलाचा दिवा लावून त्या उजेडात तिचे पूजन केले जाते तसेच विविध गाणीही म्हटली जातात.हिंदू धर्मात गायीला दैवत मानले आहे आणि वसुबारस हा दिवस तिची पूजा करण्याचा दिवस मानला जातो.अर्थात गायी-वासराच्या अंगी असणारी उदारता,शांतता व समृद्धीची भावना सामान्य माणसाच्या अंगी वृद्धिंगत व्हावी अशी त्यामागची भावना असते.शेतकऱ्याच्या घरी अशी समृद्धी गायी-वासराच्या आणि दुध-दुभत्याच्या रुपाने सतत नांदत राहावी व त्यातून शेतकऱ्याची सर्व बाजूंनी भरभराट व्हावी ही भावनाही पूजा करण्यामागे नक्कीच असते.हल्ली कोणतीही पूजा सहेतुक होत असली तरी त्यामागे श्रद्धेचा,संस्कृतीचा,परंपरेचा एक भाग म्हणून त्याकडे बघितले जाते.

    पूर्वीच्या काळी शेतकऱ्याकडे खूप गायी असायच्या.त्यांची नावेही भवळी,मोरी,कपिली,खिलारी,तांबडी अशी छान असायची.प्रत्येक घरात एक तरी गाय असायचीच आणि त्यामुळे आहारात हमखास दुध व दुधाचे पदार्थ असायचेच असायचे.जर गावात एखादी गायी व्याली तर शेजाऱ्यांना कच्च्या दुधापासून बनविलेला खरवस खायला लोक आवर्जून बोलवायचे.दही-दुधाचा घरात नुसता पूर असायचा.पण पुढे ‘जिथं पिकतं तिथ विकत नाही’ या म्हणीला छेद गेला आणि शेतकरी सक्षमीकरणासाठी राबविलेल्या योजनेंतर्गत स्थापिलेल्या दुध-संघाने दुध घ्यायला सुरुवात केली.एकदा दुध विकण्याची गोडी निर्माण झाल्यावर दरात मनमानी सुरु झाली आणि एकूण व्यवसाय खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणून दुधाची गुणवत्ता खालावत गेली व मनाचा कोतेपणा वाढत गेला.ज्याच्या घरात चार-पाच गायी आहेत तोही बिचारा बिगर-दुधाचा चहा पिऊ लागला.दह्या-दुधाचा माठ हा शब्दप्रयोग फक्त गाण्यातच(गवळणीत) दिसू लागला.आता त्याची जागा किटली आणि वाटीने घेतलीय.शहरात पूर्वी थोड्या-फार प्रमाणात गायी दिसायच्या पण आता त्यांची संख्या खुपच कमी आहे.शहरात प्राण्यांच्या संकल्पना स्पष्ट करताना शिक्षकांना प्रतिकृती किंवा चित्राचा आधार घ्यावा लागतो.फार फार तर शहरात एखाद्या मंदिराच्या बाहेर उभी असलेली गाय आणि चारा घेऊन असलेला गोरक्षक दिसतात.भाविक मग त्या गोरक्षकाकडील चारा विकत घेतात.गायीला चारतात आणि गोमातेचे दर्शन झाले या आनंदात घरी परततात.

    शेतकरी मोसमी हंगामामुळे शेतीपासून दूर जात आहे.ग्रामीण भागातून शहरात होणाऱ्या स्थलांतरित लोकांची वाढत जाणारी संख्या आणि त्यातून वाढणारे शहरीकरण यामुळे काही सांस्कृतिक बाबी काळाच्या ओघात लुप्त होतात की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे.१९९० च्या दशकात शिक्षक,भूगोल किंवा अर्थशास्त्र शिकविताना ग्रामीण भागात ७०% व शहरी भागात ३०% लोकसंख्या राहते असे सांगायचे.आता त्यांनाच ग्रामीण भागात ५५% व शहरी भागात ४५% लोकसंख्या राहते असे अलीकडच्या सर्वेनुसार सांगावे लागते.त्यामागे विविध कारणे आहेत.बदल हा जरी सृष्टीचा नियम असला तरी तो आश्वासक असला म्हणजे पचनी पडायला सोपा जातो.

    अशी ही गाय आणि तिचे मानवी जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.गायीच्या पूजेच्या दिवशी आणि नेहमीच देशी,गावरान आणि एकूण सर्वच गायींचे मानवी जीवनातील नैसर्गिक महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे आणि तिचे गाणेही जोपासले पाहिजे-

    “दिन दिन दिवाळी,गायी-म्हशी ओवाळी;गायी कुणाच्या?...........लक्षीमनाच्या”.

    - भाऊसाहेब लाला टुले
    tulebhausaheb1986@Gmail.com

      December 7, 2016


  • निकाल

    माणसाला निकालाची खूपच उत्सुकता असते. कारण त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पण सगळ्यात लहानपणापासून एका निकालाची उत्सुकता तर असतेच पण धडधडही असते.

      February 11, 2022


  • माती न विसरावी कधी (सुमंत उवाच – ५०)

    सुमंत जयंत परचुरे. 

    उच्चशिक्षित मुलगी, हुशार मुलगा, कॉर्पोरेट जगात कामाचा बोलबाला पण गाव आपलं महाराष्ट्र या महान राष्ट्राच्या एखाद्या गावात आहे हे मात्र तो विसरून जातो.

      October 11, 2021