नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

सकाळी सकाळी प्रधानजीकडे महाराज धावतच पोहचले.हे दृष्य उभ्या आयुष्यात प्रधानजींनी बघितले नव्हते.कारण धावायची पाळी त्यांचीच असायची.राजाकडे सगळयांनी धावायचे.राजाने नव्हे.त्यामुळे महाराज दिसताच प्रधानजींनी नैऋत्य दिशेकडे बघितले.आज सूर्य तिकडून तर निघाला नाही ना,याची खात्री करुन घेतली.
October 28, 2013
त्यांनी आपल्या शाळेतून ‘वंदे मातरम्’ चे गायन सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली. लॉर्ड कर्झन ह्यांच्या विचारांची पोल सगळ्यांसमोर उघडी केली, ते नेहमी पाश्चिमात्य संस्कृतीचे उदात्तीकरण करत आणि पूर्वेकडील संस्कृती ला कमीपणा देत. भगिनी निवेदित्यांच्या प्रयत्नांनी लॉर्ड कर्झन ला सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली. भारतीय लोकांमध्ये स्वदेशीचा प्रचार, प्रसार केला.
August 21, 2022
जगातल्या ५ महत्त्वाच्या सस्पेंशन ब्रिज मधील सर्वोत्तम! जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज पेक्षा लांब व मोठा असलेला इंजीनियरिंगचा चमत्कार! माणसाने ठरवलं तर अशक्य काहीच नसतं हे आपण बऱ्याचवेळा ऐकतो आणि लोकांना समजावतो सुद्धा! ह्याची पुरे पुर प्रचिती देणारी एक जागा म्हणजे जपान मधला सस्पेंशन ब्रिज! आकाशी खाईक्यो ..
August 23, 2020
एके दिनीं मी निघून जाईन निरोप घेवून ह्या जगताचा
प्रवास माझा अनंतात तो कसा असेल त्या वेळेचा
आकाशाच्या छाये खालती विदेही स्थितींत फिरत राहीन
'तू' आणि 'मी' च्या विरहीत मी गत कर्माचे करिन मापन
बाल्यातील चुका उमगल्या तरूणपणाच्या उंबरठ्यावरी
सळसळणारे यौवन रक्त वृधावस्तेतील खंत ठरी
पूनर्जन्म तो घेण्याकरितां गर्भाची मी निवड करीन
गत जन्मींच्या चुका टाळूनी आदर्शमय ते जीवन जगेन
शंकेची परि पाल चुकचुके राहील का स्मृति गत जन्माची
नसतां पूनरपि चक्र फिरेल विस्मृति होतां गत कर्माची...५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 12, 2018
एक श्रीमंत जमीनदार शेतकरी होता. आपल्या बायका-मुलांसह तो शेतावरच राहात असे. त्याला पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती. फक्त हे ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगायचे नाही, असे त्याच्यावर बंधन होते. त्याने ते ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगितले तर त्याच्या वाट्याला मृत्यू येणार होता. त्यामुळे हे रहस्य त्याने कुणालाच कळू दिले नव्हते. पण या भाषिक देणगीमुळे त्याला पशु-पक्ष्यांच्या भावभावना चटकन समजायच्या. गोठ्यातले वासरू भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याच्या आईचा धावा करते आहे; घोड्याला कंटाळा आला आहे, त्याला चक्कर मारून आणली पाहिजे हे त्याला चटकन कळायचे. मांजरांची भांडणं, कोंबड्यांचा कलकलाट, पक्ष्यांचे गुंजन यातला भावार्थ त्याला समजायचा.
October 22, 2025
उत्खनन करताना काही नाजूक,हळवे आणि कोवळे क्षणही सापडतात “या” कोटा गांवात ! वयच असं असतं या शहरातल्या लोकसंख्येचं की आपोआप तलम नातेबंध तयार व्हायला सुरुवात होते. ती अलगद कलाकुसर बघण्याची चीज आहे. अभ्यास हा जोडणारा स्वाभाविक सेतू असला तरीही स्पर्शाधारित नसलेलं कोवळिकीचं प्रेम येथे भेटतं. मुलींचं हॉस्टेल /पीजी सोय अर्थातच स्वतंत्र असलं तरीही वयापुढे/सहवासापुढे काही चालत नाही.
October 19, 2021
विश्वविख्यात पंडित विष्णू शर्मा यांनी पाचव्या शतकात रचलेल्या संस्कृत भाषेतील अक्षर बोधकथांचा जगद्विख्यात संग्रह म्हणजे पंचतंत्र.
June 11, 2026
आपल्या दुर्दैवाने आजवर आपल्याला सावरकरांबद्दल पाठ्य पुस्तकातून फक्त दीड पान माहिती दिली गेली. त्यांच, लंडन मधील कार्य,जगप्रसिद्ध बोटीतील उडी,आणि अंदमानातील दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा. पुस्तकातील सावरकर एव्हढ्यावरच जाणूनबुजून संपवले गेले. गेली ७० वर्षे सावरकरांवर जाणूनबुजून अन्याय केला गेला. केवळ अन्यायच नाही तर बदनामी व उपेक्षा केली आहे.सावरकर हे केवळ क्रांतिकारक,द्रष्टे, समाजसुधारक किंवा भाषासुधारक नव्हते.तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते.त्यातील काही पैलू माझ्या लिखाणातून क्रमिक लेखात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण पुढील पिढीला व ज्यांना सावरकर आणखी समजून घ्यावसे वाटतात त्यांच्यासाठी मी हा अल्पसा प्रयत्न करत आहे,तरी तुम्हाला लिखाण आवडेल अशी मी आशा करतो.
September 17, 2022
हिंदी सिनेमात एक दृश्य नेहमी दिसते. हॉस्पिटलच्या पॉश कॉरिडॉरमध्ये हीरो अस्वस्थ फेऱया मारीत असतो. लाल दिवा लावलेल्या काचेच्या दरवाजातून एक नर्स धावत येते. ``मुबारक हो आपको बेटा हुआ है,' असे म्हणते. मग तो हीरो पळत आत जातो स्नेहार्द नजरेने हीरॉईनाचा हात हातात घेतो वगैरे.....
प्रसूतीपूर्व गर्भसंस्कार करून आपले बाळ चांगले जन्मावे म्हणून अत्यंतिक काळजी घेणारे समृद्ध सुशिक्षित; मॅटर्निटी लिव्ह सोबत पॅटर्निटी लिव्ह एन्जॉय करणारे इलाईट नोकरदार; प्रसूतीपूर्व तपासणीचे महत्त्व; प्रसूती काळातला आहार लसीकरण यांचे महत्त्व सांगणारे राष्ट्रीय कार्यक्रम ः टीव्हीवरच्या या संबंधातल्या जाहिराती या सगळ्या गोष्टी माझ्या मनासमोरून सरकत गेल्या. या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि कळा येणार्या आपल्या पत्नीला एकटे सोडून दारू प्यायला पळणारे पतीराज दुसरीकडे! खरंच, त्यावेळी त्या स्त्रीच्या मनात काय विचार आले असतील, आपला खंबीरपणा तिने कसा टिकवला असेल? आपल्या बाळाला त्याची जन्मकहाणी तिने सांगितली असेल? असंख्य प्रश्न मनात येत राहतात.
-- किशोर कुलकर्णी
May 26, 2006
यशवंत आणि चंदू ह्यांच्यासमोर एक चाळीशीचा तरूण बसला होता.
कपड्यांवरून तो परदेशांतून आला असावा, असे वाटत होते.
यशवंतांची त्याने रितसर फोनवर वेळ घेतली होती आणि तो आला होता.
एवढ्या उमद्या सुस्थितींतील तरूणाची समस्या काय असावी, ह्याचा यशवंत अंदाज घेत होते.
अशोक मनोहर हें नांव त्यांनी अलिकडेच पेपरमध्ये वाचलं होतं.
तो म्हणाला, “मी आपल्याला माझे नांव फोनवर सांगितलेच आहे.
February 2, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti