(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चष्मा (गूढकथा)

    पंतांना नुकतीच गाढ झोप लागली होती. वयोमान प्रमाणे, त्यांची झोप कमीच झाली होती, साडेबारा एक तर निद्रादेवीच्या आगमनाची, नेहमीचीच वेळ! अचानक त्यांना जाग आली. कोणी तरी हलवून जागे केल्या सारखी! काही क्षण ते अंथरुणावर तसेच पडून राहिले. आपण कोठे आहोत? हि कोणती जागा आहे? कोकणातली कारली तर नाही? 

      May 19, 2021


  • जे का संकटी अडकले

    आज मुंबईत हजारो करोडपती आहेत, त्यातील एखाद्याच सोनूला समाजासाठी काहीतरी करावं असं वाटणं हे देखील फार मोलाचं आहे. कोरोनामुळे अनेकांनी परराज्यातील लोकांसाठी आपले दरवाजे बंद केले, सोनू सूदने आपल्या हृदयाचे दरवाजे उघडून त्यांना सन्मानाने त्यांच्या घरी पोहचविले.

      December 26, 2021


  • मुंबईचा हवालदार

    मुंबईतील गर्दी हीच सुरक्षिततेचा विश्वास देते. पूर्वी मुंबईचा पोलीस हे नागरिकाना सुरक्षेच प्रतीक वाटायच. पण आता काय झालंय कुणास ठाऊक, पण मुंबईच्या पोलिसांचा ताल बदललाय.

      July 10, 2022


  • सौंदरानंद

    महान संस्कृत महाकवी अश्वघोष यांनी लिहिलेले सौंदरानंद हे संस्कृत साहित्यातील एक श्रेष्ठ महाकाव्य आहे. भगवान गौतम बुद्ध यांचा सावत्र भाऊ नंद आणि त्याची स्वरुपसुंदर प्रिय पत्नी सुंदरी यांच्या प्रेमावर आणि राजा नंदाने बुद्धधर्माचा स्वीकार करणे या आधारभूत कल्पनेवर हे महाकाव्य रचलेले आहे.

      June 11, 2026


  • धारधार तरी उगाच चालुनी जाते (सुमंत उवाच – ५५)

    सुमंत जयंत परचुरे. 

    पूर्वीच्या काळी रणांगणावर आपले कर्तृत्व दाखवायला अनेक प्रकारची शस्त्रे असायची. तलवार, भाला, धनुष्यबाण इत्यादी पण जसा काळ बदलत गेला तशी शस्त्रे सुद्धा अपग्रेड होत गेली.

      October 16, 2021


  • हवा हवाई

    दिसत नाही, मात्र जाणवते.. ती ‘हवा’! मंद हवेची लहर आली, तर तिला ‘झुळूक’ म्हटलं जातं.. तिचं जर वेगाने आली तर तो होतो, सोसाट्याचा वारा.. अशा वाऱ्यानं वेगाची परिसिमा ओलांडली की त्याचं रूपांतर वादळात होतं..

      June 11, 2022


  • मला देव दिसला – भाग २

    त्या परमात्म्याच्या शोधात अनेक यात्रा केल्या. अनेक तीर्थस्थानाना भेटी दिल्या. जसे श्री कैलास मानसरोवर, चारधाम, दत्तधाम, सर्व ज्योतीर्लिंग स्थाने, वैष्णवदेवी अमरनाथ, रामेश्वर आणि अशी अनेक देवालये, मंदिरे यांना भेटी दिल्या. भारतातील जवळ जवळ सर्व प्रसिध्द मंदिराना भेटी दिल्या, देवदेवतांचे भक्तीभावाने दर्शन घेतले. ही सारी महान देवस्थाने, लाखो करोडो भक्तांच्या भक्तीरसांत वाहून निघालेली होती.

      March 14, 2021


  • आपण सारे संजय…

    दिव्यदृष्टीधारी त्या संजयाची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे आपण सारे त्या संजयाची भूमिका आता वठवत आहोत… कसे… आधुनिक काळात सर्वांच्या सोयीसाठी आणि संवादाचे साधन म्हणून आपण सारे मोबाईलधारी झालेलो आहोत. हा मोबाईल म्हणजे आपल्या सर्वांची दिव्यदृष्टी. या मोबाईलच्या माध्यमातून जगभरात घडणाऱ्या घटना घडामोडींची माहिती क्षणात आपल्यापर्यंत पोहचते.

      April 25, 2020


  • चोरलेले पुस्तकच भेट म्हणून मिळते तेंव्हा – – –

    शालेय शिक्षण पुरे करून, महाविद्यालयात जाऊ लागलो. नवा उत्साह, नवे मित्रमंडळ आणि उच्च ते वातावरण. मनाचे, विचारांचे आणि बागडण्याचे एक वेगळेच स्वतंत्र…..

      October 30, 2013


  • काळाची काठी !

    एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक विचार आला की हा किडा दाराजवळ पडलेला आहे, लोकांची जा ये चालू आहे. दुर्दैवाने कुणाच्यातरी पायंदळी तो चिरडला जाईल. मी त्याला एका काडीवर उचलून बागेतल्या एका छोट्या झाडावर नेऊन ठेवले. मानसिक समाधान वाटले, की आपण त्याला त्यावेळी तरी मृत्यूपासून दूर नेले. पण केवळ कांही क्षणच गेले असतील, एक पक्षी तेथे झेपावून आला व त्याने त्या किड्याला अलगद उचलून नेले. एका जीवाचा अंत होताना दिसला. माझे मन खंतावले. माझा तर्काधीष्टीत हिशोब चूक वा बरोबर? समाधान हे देखील एक मानसिक शास्त्र असते. निर्माण झालेली परिस्थिती माणूस बदलू शकत नाही. परंतु त्याला वेगळा मार्ग देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या विचारांचे जे स्तर असतील त्याप्रमाणे तो योजना आखण्याचा विचार करतो. निसर्गाला मात्र तसेच अभिप्रेत असेल असे नाही. निसर्ग आपली चाल त्याच्याच पद्धतीने चालू ठेवतो. येथेच वैचरिक विविधता निर्माण होते. काळाच्या हाती एक दंडक (काठी) असतो असे म्हणतात . ज्याच्या एका टोकावर स्थळ व दुसऱ्या टोकावर वेळ ही कोरलेली असते. जेंव्हा एक टोक स्थळ निर्देश करते, त्याच वेळी दुसरे टोक वेळेची चाहूल टिपते. जीवनाच्या अंतिम मार्गावर स्थळ आणि वेळ यांची विधात्याने नोंद केलेली असते. म्हणूनच ते प्रत्येकाला अनिश्चित घटना परंतु निश्चत सत्याकडे नेते. काळाचा दंडक स्थळ व वेळ ह्याची जेथे गांठ पडेल तेथेच आघात करतो.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      September 30, 2015