(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • उक्ती आणि कृतीतील अंतर

    कोणतेही कार्य करताना, विशेषतः सामाजिक - उक्ती आणि कृतीमध्ये अंतर ठेवून चालत नाही. हे अंतर पडले, की ते सामाजिक कार्य, सामाजिक राहत नाही. समाजकार्याचे व्रत निष्ठेने स्वीकारलेल्या सावित्रीबाईंनी आपल्या सख्खा भावाला हे सोदाहरणासह पटवून दिले होते. एकदा सावित्रीबाई खूप आजारी पडल्या. विश्रांतीसाठी म्हणून त्या आपल्या भावाकडे काही दिवस राहायला गेल्या होत्या. भावानेही आपल्या आजारी बहिणीची मनोभावे सेवा केली. आजारातून बऱ्या झाल्यावर सावित्रीबाई जेव्हा पुण्यास परत जायला निघाल्या, त्या वेळी भाऊ त्यांना म्हणाला, ' 'ताई, तुला राग येणार नसेल तर सांगतो. तू हे समाजकार्य आता ताबडतोब सोडून दे. एकतर तू खालच्या जातीमधील लोकांच्या कल्याणाचे काम हाती घेऊन आमच्या कुळाला बट्टा लावला आहेस; शिवाय समाजाने तुम्हाला वाळीत टाकल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आम्हालाही भोगावे लागतात. तरीही तुमचा सामाजिक कार्य चालू ठेवण्याचा अट्टहास आहेच. '' भावाचे हे कठोर बोलणे ऐकून सावित्रीबाई त्याला शांतपणे म्हणाल्या, की '' या कार्यामुळे आमची होणारी निंदा-नालस्ती तसेच अवहेलना तुला पाहवत नसेल. आमच्यावरील प्रेमापोटीच हे तू सारे बोलला आहेस हे मला माहीत आहे. मात्र इतरांप्रमाणेच तुझी बुद्धीही कोती ठेवू नकोस. आम्ही जे काम करीत आहोत ते चांगलेच काम करीत आहोत उच्चवर्णीय आपल्यावर श्रेष्ठत्व गाजवितात ते केवळ विद्येमुळे मग ही विद्या शिकली तर बिघडले कोठे? तुम्ही प्रसंगी जनावरांनाही जवळ करता. मात्र खालच्या जातीतील माणसांना दूर लोटता. म्हणजे तुम्ही भूतदया दाखविता. मात्र मानवतेला कलंक फासता. शिवाय वारकरी म्हणून तुम्ही नुसत्याच पंढरपूरच्या वाऱ्या करता. रंजल्या-गांजल्यांना जवळ करा. असे म्हणणाऱ्या संतांचे तुम्ही गोडवे गाता. मात्र त्यांचे शब्द वा विचार कृतीमध्ये आणत नाहीत. '' सावित्रीबाईंचे हे बोल ऐकून भाऊ ओशाळला व त्यांनी आपल्या बहिणीची माफी मागितली. मात्र सावित्रीबाईंनी त्याला केव्हाच माफ केले होते.

      February 8, 2017


  • मराठीत “लागण्याची” गंमत बघा

    मराठी भाषा अफाट आहे आणि पुलंसारख्यांनी तिची गोडी आणखीनच वाढवलेय.. एखादा शब्द किंवा क्रियापद घेउन किती सुंदर वाक्यरचना केली जाऊ शकते याचे हे उदाहरण

      October 8, 2016


  • दुःख दुःख ते काय? (सुमंत उवाच – ३२)

    सुमंत जयंत परचुरे. 

    सुखा मागूनी येते दुःख, दुःखा मागूनी सुख असं असतंच.

      September 23, 2021


  • शाकाहारी का मांसाहारी ?

    इथ शाकाहार कि मांसाहार किंवा काय चांगल काय वाईट ? हा विषय च नाहीये. कोणी काय खाव हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण एवढच सांगण आहे कि कोणाच्या दबावाखाली किंवा एखाद्या बंधनात अडकून आपल मन मारू नका ..

      November 6, 2020


  • माणुसकीचा झरा

    मला 24 नोव्हेंबर, 1990ची ती उत्तररात्र आजही आठवतेय. रात्रीचा सव्वादोन-अडीचचा सुमार असेल. माझ्या पत्नीला दुसऱयांदा दिवस गेले होते. प्रसृतीची तारीख 30 नोव्हेंबर होती. एक पाच वर्षांचा मुलगा आधी होता. आता तो 21 वर्षांचा आहे.
    माझ्या पत्नीला सहा दिवस अगोदरच प्रसृतीवेदना होत होत्या. मी माझ्या आईला व पत्नीला तयार राहण्यास सांगितले. एखाद्या वाहनाची व्यवस्था होते काय, हे बघण्यास घराबाहेर पडलो. तेव्हा आम्ही मुलुंड (पू.) मध्ये रहायचो. आम्ही नाव नोंदविलेले प्रसृतीगृह मुलुंड (प.) ला होते. मला रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी मिळाली नाही. शेवटी आसपासच्या दोन-तीन रिक्षावाल्यांच्या घरी गेलो; पण त्यातील दोघे जण गावाला गेले होते. तिसरा म्हणाला, की त्याची रिक्षा नादुरुस्त आहे. मला खूपच दडपण आले. शेवटी मी पूर्व महामार्गावर उभा राहिलो. दिसेल त्या वाहनाला थांबण्याची विनंती करीत होतो; पण कोणीही आपले वाहन थांबविण्यास तयार नव्हता. त्यात त्यांची तरी काय चूक होती म्हणा! त्या उत्तररात्री वाहन थांबविण्याचा धोका कोण पत्करेल? इकडे माझ्या पत्नीचा व आईचा काळजीयुक्त, वेदनायुक्त चेहरा दिसत होता. इतक्यात मुलुंड चेक नाक्यावरून एक मारुती मोटर आली. मी तिला हात केला. आश्चर्य म्हणजे ती थांबली. मी त्यांना माझी असहाय्य व अगतिक परिस्थिती विशद केली. ते गाडी घेऊन माझ्या घरी आले.

    घरी आई व पत्नी डोळ्यांत प्राण आणून माझीच वाट पाहात होत्या. मी त्यांच्यासह गाडीने प्रसृतीगृह गाठले. तिथले प्रवेशाचे सोपस्कार पार पडले. खाली येऊन गाडीवाल्याचे आभार मानले व किती पैसे द्यायचे अशी विचारणा केली; पण तो भला मनुष्य होता. तो म्हणाला, ``मी माझ्या बहिणीला दवाखान्यात दाखल केलं असं समजतो. तेव्हा त्याचे कसले पैसे? उलट काही गरज भासली, तर मला

    केव्हाही हाक मारा.'' माझ्या स्वतवर विश्वासच

    बसला नाही. सध्याच्या काळात माणुसकीचा गहिवर असणारी अशीही माणसे असतात. बोलण्याच्या ओघात त्याने मला सांगितले, की त्याचे नाव शेट्टी असून, चेकनाक्यावर त्याचे हॉटेल आहे. ते बंद करून घरी जात असताना माझी भेट झाली. तो म्हणाला, ``करायचं असेल तर एकच करा. जेव्हा तुमची पत्नी बाळंत होईल, तेव्हा मला हॉटेलमध्ये येऊन पेढे द्या.'' दुसर्‍याच दिवशी, म्हणजे 25 नोव्हेंबर 1990 ला मला सकाळी आठ वाजता कन्यारत्न झाले. मी लगेच त्याला मिठाई नेऊन दिली.

    मनात विचार केला, की तो जर देवरूपाने मला भेटला नसता, तर आमची काय अवस्था झाली असती? तेव्हाच मी ठरविले, की आपल्याला संधी मिळाली तर आपणही दुसऱयांच्या अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी निरपेक्षपणे मदत करून सात्विक समाधान प्राप्त करून घ्यायचे.

    -- किशोर कुलकर्णी

      May 19, 2006


  • सदरा’ घातलेला ‘सुखी’ माणूस

    सुखी माणसाचा सदरा मिळणे म्हणजे परीस मिळण्यासारखंच असतं..सुखी माणसाचा सदरा ही एक सुंदर कल्पना असल्याचे सर्वांनीच मान्य केले असले तरी त्या सदऱ्याचा शोध सुरूच असतो, निरंतर सुरुच राहाणार..

      September 6, 2016


  • बैल आणि खेचर

    एक श्रीमंत जमीनदार शेतकरी होता. आपल्या बायका-मुलांसह तो शेतावरच राहात असे. त्याला पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती. फक्त हे ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगायचे नाही, असे त्याच्यावर बंधन होते. त्याने ते ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगितले तर त्याच्या वाट्याला मृत्यू येणार होता. त्यामुळे हे रहस्य त्याने कुणालाच कळू दिले नव्हते. पण या भाषिक देणगीमुळे त्याला पशु-पक्ष्यांच्या भावभावना चटकन समजायच्या. गोठ्यातले वासरू भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याच्या आईचा धावा करते आहे; घोड्याला कंटाळा आला आहे, त्याला चक्कर मारून आणली पाहिजे हे त्याला चटकन कळायचे. मांजरांची भांडणं, कोंबड्यांचा कलकलाट, पक्ष्यांचे गुंजन यातला भावार्थ त्याला समजायचा.

      October 22, 2025


  • अस्तित्वाचा शोध

    अस्तित्वाचा शोध हा माझ्या सर्वच लेखनाचा महत्वाचा धागा आहे. अर्थात सर्वांच्याच प्रेरणा या अस्तित्वाच्या शोधात असतात. आज एक वेगळी कविता आपल्यासमोर सादर करतोय.

      December 30, 2019


  • व्हॅलेंटाईन डे

    Valantine Day is essentially the concept & part & Parcel of western culture. In the present Era of ''Global Village'' The cultural Trails of cultures Eastern and Western - ''Go hand in hand''. It is to say that the ''Blending of Cultural Traits is on fast track.

    “व्हॅलेंटाईन डे” अर्थात प्रीती-दिन, प्रेम-दिवस ही संकल्पना पश्चिमेकडून आपल्याकडे आली प्रेम, आत्मीयता अंत:करणापासून आतुन मनापासुन असावं लागतं त्याच्या प्रकटीकरणासाठी या अभिव्यक्तीसाठी ठराविक दिवसांत नियोजन करणं ही गोष्ट आपल्या हिंदू संस्कृतीत न सामावणारी आहे. तथापि वैश्विक व्यापकतेच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडेदेखील “व्हॅलेंटाईन डे” ही संकल्पना रुजत चालली आहे. पाश्चिमात्य आणि पौर्वात्य संस्कृतीचा सुरेल संगम दर्शविणारी ही प्रथा आहे.

    प्रेम! पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, बहिण-भाऊ, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मित्र-मित्र, आई मुलगा, पिता-पुत्री, आई वडील आणि मुले अशा नानाविध व्यक्तींमध्ये व्यक्त होणारी ही मृदु सुकोमल भावना !! या सर्व स्नेह-बंधामधून आई-वडिल आणि मुले यांच्या मधील स्नेह, जिव्हाळा, आपुलकी, आत्मियता, ममता, प्रेमाचा उमाळा व्यक्त करणारी संकल्पना सर्वांत स्तुत्य आणि लौकिकार्थानं व्यापक
    अशा अभिजात संकल्पनेला उचलून धरण्याची किमया आपल्या आदरणीय प्रसाद सरांनी करुन दाखविली. मुलांमध्ये आई वडिलांविषयी नि:सीम प्रेम जोपासण्याची प्रसाद सरांची ही कल्पक झेप खरोखरच वाखाणण्यासारखीच आहे.

    “मातृदेवोभव-पितृदेवो भव”

    या आपल्या परंपरेला आदरणीय प्रसाद सरांनी एका वेगळ्या ऊंचीवर नेऊन ठेवले आहे त्यांची ही विचारसरणी, कृती-शीलता आणि वर्तनशैली नि:संशय स्पृहणीय, अनुसरणीय, अनुकरनीय आहे यांत तीळमात्र शंका नाही. मला वाटते, अशा तर्‍हेचे “सांस्कृतिक व्हॅलेंटाईन डे” प्रत्येक पाठशाळेत रुजल्यास ते एक, क्रांतिकारक सामाजिक कार्य ठरेल, तरुण पिढी घडविल्यास निश्चितच हातभार लागेल.

    माता पित्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय, याचे दाखले आपल्या हिंदू संस्कृतीत ठायी ठायी अढळून येतात. श्री गजानन अखिल विश्वाचं आराध्य दैवत त्याच्या प्रथम पूजना विषयी कोणतेही शुभ कार्य सुरु होत नाही. त्या विघ्नहर्त्या गजाननाची कथा सर्वकृत आहे. आई-वडिल-शंकर-पार्वती हेच एकमेव आपले विश्व, हेच आपले ब्रम्हांड हे सत्य आई-वडिलांना एक प्रदक्षिणा घालुन सिद्ध करणारा सिद्धिविनायक म्हणूनच जगात वंद्य ठरला. ही कथा सर्वश्रुत आहे, याविषयी जास्त सांगणे न लागे.

    श्रावण-बाळ! आपल्या अंध आणि वृद्ध माता-पित्याच्या सेवेसाठी त्यानं जिवाचं रान केलं. माता-पित्यांच्या श्रांत, तुझ देहाला आराम देण्यासाठी कावडी मधून आपल्या खांद्यावरुन त्यांना रानावनांतुन घेऊन जातांना त्याला परमानंद होत असे, कृतार्थता वाटत असे. आई-वडिलांचे त्याला कधीच ओझे वाटले नाही. त्यांच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर होता त्यांची तहान भागविण्यासाठी त्याला आपल्या जीवनांच मोलद्याव लागलं! असा आदर्शबाळ - श्रावणबळ पुन्हा होणे नाही !!

    मर्यादा पुरुषोत्तम दशरथी राग ! प्रभुरामचंद्रांनी आपल्या पित्याच्या राजा दशरथाच्या वचनपूर्तीसाठी आणि कैकयी मातेच्या इच्छापूर्तीसाठी ----- आज्ञा शब्द शिरोतार्थ ठेवुन बारा वर्षे वनवास स्विकारला! आई-वडिलांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणारं असं पुरुषोत्तम व्यक्तीमत्व होणे नाही. मला कैकयी जरी सावत्र माता असली तरी माताही माताच असते, ती कधीच सावत्र नसते! माय- पित्याच्या आज्ञेचा, सेवेचा उचुंग अन् उल्लेखनीय मापदंड प्रभु रामरायानं जगासमोर ठेवला.

    भक्त पुंडलिक ! आई-वडिलांची मनोभावे सेवा हीच ईश्वर सेवा हीच प्रभुसेवा - या शाश्रत संकल्पनेचा सर्वोत्तम उदाहरण. असा भक्त होणे नाही.

    आपल्या वृद्ध माता पित्यांची सेवा करण्यांत तो रममाण होत असे, तल्लीन होत असे, एकचित्त होत असे, आई-वडिलांची सेवा करीत असतांना त्याच्या मुखांतुन विठ्ठल नामाचा अखंड गजर सुरु होता. देहभान विसरुन सेवावृत्ती अवस्थेत नामस्मरण सुरु होते भगवंताला आपल्या भक्तीची परीक्षा घेण्याची लहर येते ------ साक्षांत विठ्ठ्ल पुंडलिकाच्या दारासमोर येऊन उभा ठाकला. क्षणभर थांबून विठ्ठल माऊली म्हणाली.

    “पुंडलिका, बाळा ये, तुझ्या भक्तीभावानं मी तुजवर प्रसन्न झालो आहे. ये माझ्या भेटीला ये!”
    त्यावर भक्त पुंडलिक विनम्रपणे वदला
    “पायचेपितो माय-पित्याचे,
    करु द्या ही चाकरी।
    विठ्ठला, उभे रहा तोवरी ।।

    असं म्हणून जवळच असलेली वीट, पांडुरंगाकडे सरकवली,
    भगवंत तेव्हा पासुन उभे आहेत.

    युगे अठ्ठावीस
    कर ठेवुनि कटिवरी,
    उभा विठ्ठल विटेवरी।

    अज्ञा नानाविध कथांमधून आणि दाखल्यांतून आई-वडिलांची महती वर्णन करण्यास शब्द थिटे पडतात, वाणी अपुरी पडते माता पित्यांची सेवा हीच ईश्वर सेवा होय. मनापासून आई-वडिलांची सेवा केल्यास, आपल्या हातून घडल्यास वेगळी भगवत् प्रसाद हीच ईश्वर सेवा होय, आई-वडिलांची सुयोग्य सेवा हीच ईश्वर प्राप्तीची गुरु किल्ली.

    मुलांच्या मनांत, अंतरंगांत उत्तमोत्तम विचार रुजविण्याचे बिंबवण्याचे काम आई-वडिल निश्चितपणे करीत असतात. मनापासून केलेल्या गोष्टीला, उशिरा का होईना प्रतिसाद मिळतोच असा माझा अनुभव आहे.

    वडीलधार्‍यांविषयी आदर, आई-वडिलांविषयी आपुलकी, प्रेम, थोरामोठ्यांची कदर, मानसन्मान आणि संतांविषयी पूज्यभाव आधि पैलुंची जाण देण्याचे काम आई वडिलांनीच करावयाचे असते. नैतिक अधिष्ठानचा उगम माय-पित्यापासून होतो हे सत्य आहे, नाहीतर संत कबीराच्या ओव्या प्रमाणे

    “बोया पेड बाबुल का, आम कहॉ से आया ”

    अशी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही, उत्तमपेरा, उत्तम उगवेल यांत शंकाच नाही. सर्वांभूती ईश्वर पाहण्याची दृष्टी थोडीफार का होईना देतां आली तरी खूप झाले अशा तर्‍हेचे “सामाजिक व्हॅलेंटाईन डे” वरचेवर साजरे झाल्यास बातमी निर्माण होण्यास -------- हातभार लागले.

    मुलुंड (पूर्व)
    १३-०२-२०११

    -- गुरुदास / सुरेश नाईक

      June 25, 2015


  • चिचा

    आमच्या आगरी भाषेत चिंचेला चिच बोलतात. ड ऐवजी र आणि ळ ऐवजी ल तसेच चिंच ऐवजी चिच. चिंचेच्या झाडावर चढला असे कोणाला सांगायचे असेल तर ” तो बघ चिचेच्या झाराव चरला ” असे बोलले जाते.

      June 9, 2021