(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भुताला बढती

    मग त्या भुतानं त्याला मक्यापासून दारू कशी बनवायची ते दाखवून दिलं. शेतकऱ्यानं कडक दारू बनवायला सुरुवात केली. स्वत: प्यायला आणि मित्रांनाही पाजायला लागला.

      July 13, 2022


  • प्राजक्त

    मातीकडून घेतलेल्या जीवनरसाचं देणं, सुगंधाच्या रूपात निसर्गाला परत करायचंय. उपकारांची परतफेड करायची आहे याची जाणीव आहे त्याला. कृतघ्न व्हायला…तो काही माणूस नाही नं.

      July 25, 2017


  • कावळे (कथा) – भाग 4

    वासंतीला जाऊन आता पंधरा वर्ष होऊन गेलीत. बरेच वर्षांनी परवा एक बिल्डर आला होता. चांगला गल्लेलठ्ठ होता! उंचापुरा, दोन्ही हाताच्या बोटात हिऱ्याच्या अंगठ्या, पांढरा शुभ्र सफारी सूट, गळ्यात जाड सोनसाखळी, हातात हिऱ्यांच्या पट्ट्याचे घड्याळ, चकचकीत बूट, खिशाला हिऱ्याच्या क्लिपचे पेन…. श्रीमंतीचा दिमाख अगदी उबग आणण्याजोगा! आपली आलिशान गाडी सफाईने पायऱ्यापर्यंत आणून तो खाली उतरला आणि जणू आपल्याच घरात शिरतोय अशा रूबाबात सोळा पायऱ्या चढून वर आला! पायऱ्या चढून त्याला धाप लागली होती!

      July 24, 2022


  • जीवनाचा मूलमंत्र

    गावाबाहेर नदीच्या काठावर एका झोपडीत एक सत्पुरुष राहात होते. ही झोपडी त्यांनी स्वतःच बांधली होती. नदीच्या काठावरच शंकराचे देऊळ होते. तेथे दर्शनासाठी बरेच लोक येत. सर्व लोक निघून गेल्यावर हे सत्पुरुष त्या मंदिरात जायचे व त्या मंदिराची स्वच्छता करायचे. त्यांचा हा दिनक्रमच होता. काही लोक त्यांच्या दर्शनाला यायचे मात्र ते सत्पुरुष कोणाकडे काही मागायचे नाहीत वा कोणी दिले तरी ते घ्यायचेही नाहीत. स्वतः कष्ट करून पोटासाठी लागेल तेवढीच ते कमाई करायचे. एकदा त्यांच्याकडे एक तरुण आला व त्यांना म्हणाला की, मी आतापर्यंत जे जे केले त्यात मला अपयश आले. त्यामुळे नैराश्य आले असून, मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ जाताना तुमच्यासारख्या सत्पुरुषाला भेटावे म्हणून आलो आहे. त्या सत्पुरुषाने त्याची सर्व हकीकत ऐकून घेतली व त्याला आपल्या झोपडीत नेले. ते त्याला म्हणाले की, तुझा निर्णयच झाला असेल तर तू अवश्य आत्महत्या कर. फक्त आता मला भूक लागली आहे. मी जे काही करेन ते तूही खा व नंतर तू तुझ्या मनाप्रमाणे वागू शकतोस. असे म्हणून त्या सत्पुरुषाने घरात जे काही किरकोळ सामान होते, त्याचा उपयोग करून गव्हाची छान खीर केली. ती खीर शिजताना तिचा सुवास दरवळत होता. त्यामुळे तो तरुण सुखावला होता. खीर तयार झाल्यानंतर त्या सत्पुरुषाने खिरीचे भांडे त्या तरुणाच्या हातात देत म्हटले हे बाहेर घेऊन जा व तेथे बाहेर उकीरड्यावर फेकून दे. सत्पुरुषाचे हे बोलणे ऐकून त्या तरुणाला फारच आश्चर्य वाटले. तो म्हणाला एवढी चांगली सुंदर खीर तुम्ही बनवलेली व ती न खाता बाहेर उकीरड्यावर फेकून द्यायला सांगता. त्यावर सत्पुरुष त्याला म्हणाले की, तू जे काही करतोस तेच मीही करतो आहे. तुझे जीवन या खिरीसारखेच छान व सुंदर आहे. परंतु, तू आत्महत्या करून ते नष्ट करीत आहेस. त्या तरुणाला सत्पुरुषाच्या उपदेशातील मर्म कळले व आत्महत्येचा विचार सोडून तो त्यांचे आशीर्वाद घेऊन तेथून गेला.

      December 30, 2017


  • बगळ्याची कथा

    बगळ्याची कथा

    "यार तेरे बगळे में कुछ होताही नही...no nothing.. डार्लिंग माल डाल माल !!"

    ऐकनाऱ्या त्यांनी सांगितलं. पण मला यात काय माल टाकावं कळलंच नाही.

    "फेस्टिवल टाईप पिच्चर है ... कमर्शिअल व्हॅल्यू (चूक चूक chuckle) पर अच्छा है, देखेंगे. करेंगे आपन"

    ऐकनाऱ्यानी हे ही मला सांगितलं. पण पुन्हा त्यांनी बगळ्याकडे वळून सुद्धा पाहिलं नाही.

    मेट्रो कर, माल पाहिजे, काहीतरी मोठ्ठा ट्विस्ट यायला पाहिजे, खूप गुडी गुडी आहे, इराणी आहे etc etc ऐकण्यात ऐकण्यात दोन तीन वर्ष निघून गेले. आणि एक दिवस महेश आला. खूप दिवसांनी भेटल्यावर जल्लोष करतो तसा त्याही रात्री सुरु झाला. नवं काय जुनं काय याची उजळणी झाली. मग बोलण्या बोलण्यात विषय निघाला. रायटर असोसिएशनचं कुंकु (ठप्पा )लावून टेबलावर पसरलेली बगळ्याची स्क्रिप्ट होतीच. ती त्याला दाखवली. आणि पहिल्या सीनपासून द एन्ड पर्यंत ती त्याला ऐकवली. आणि पहिल्यांदाच कुणी वजन असलेलं बोललं

    "प्रसादया हे एक नंबराय."

    मी भरून पावलो. मग मह्या तिच्याबद्दल, बगळ्याच्या स्क्रिप्ट बद्दल बोलत राहिला. आणि तो कोणत्याही कलाकृतीविषयी फार खोलात जाऊन सिरीयसली बोलतो. उगाच बोलायचं म्हणून बोलतंच नाही. त्यामूळं मी त्याला खूप जास्त सिरीयसली घेतो. त्यानं स्क्रिप्टची बांधणी कशी झालीय सांगताना आर्चचं उदाहरण दिलं. आणि सांगितलं की एका गोष्टीला धरून कसा मस्त बगळ्याचा डोलारा उभा राहिलाय. एक जरी वीट काढली की कसा तो ढासळणार. मग त्याने काही सूचना केल्या जशा

    “प्रसादया चिंत्याला पैशे मागणार संत्या अजून तीन चार जागी यायला पाहिजे. त्याची आकरा रुपयाची धास्ती थोडी अधोरेखित कर”

    मग लहानपणी खेळात येणाऱ्या राज्याच्या गोष्टी निघाल्या. कसं ते राज्य स्वतःवर आल्याचं 'भय' आपल्याला गांगरून टाकायचं, वैगेरे वैगेरे बोलणं झालं. बोलण्या बोलण्यातंच ती बाटली संपली. ती रात्र संपली. पण दोन वर्ष तुंबलेला बगळ्याचा विषय असा परत एकदा नव्यानं सुरु झाला. मी माझ्या 'बगळा' या स्क्रिप्टमध्ये ते बदल केले. फेरबदल केले. पण प्रोड्युसर लोकांचा नन्नाचा पाढा काही केल्या पुढे सरकला नाही.

    पुन्हा काही महिने गेले आता 'बगळा' जमालगोटा मला जोरात लागला होता. मला वाटत होतं व्हायला पाहिजे यार ही पिच्चर. पण वाटनंच ते...त्यानं थोडंच काही होतं. आणि अशातच पुन्हा एकदा महेशबरोबर बैठक जमली. पुन्हा आपेय आचमनाबरोबर बगळ्याचाच विषय. मग तो बोल्ला

    "प्रसादया मला यात कादंबरी दिसतीय.. तू लिही मी छापतो”

    मला छापतो हा शब्द ऐकून भारी वाटलं. बगळा कुणाला तरी दिसतो. आणि तो मी करतो असं म्हणतोय ही भावनाच भारी वाटवायला लावणारी होती माझ्यासाठी. पण तसं पुस्तकातल्या लेखकासारखं लिहणं मला जमणार नाही याबद्दल मला खात्री होती.

    'मोठं काम असतं ते' आणि आपण त्यातले नाही असं वाटत होतं. पण महेश बोलला

    “अरे नाही बघ तुला जमेल”

    आणि ‘बगळा’ पोटुशी राहिला.

    मी मह्या म्हणालाय म्हणून लिहीतो म्हणलं. पण कादंबरी? ती खूप मोठी असते, खूप विचार मोठा लागतो, अनुभव हा हवाच. आणि महत्त्वाचं टाईपपण करावं लागतं खूप भरपूर. आणि गेली कित्तेक वर्ष टीवीसाठी दिग्दर्शन आणि तीस सेकंदाच्या कॉप्या लिहणाऱ्या माझ्यासारख्याला ते जमेल का?

    आदमी एक प्रश्न अनेक.

    पण महेश पुनः उवाचला,

    “प्रसाद्या तू लिही जमेल तुला आणि कसं आहे त्या निम्मिताने तुझ्या स्क्रिप्टला आणखी मजबूती येईल नवं काहीतरी मिळेल ना” आणि त्याच्या स्क्रिप्ट को मजबुती या विधानाला मी कॉन्व्हिन्स झालो. बम भोले म्हणत लॅपटॉप समोर बसलो.

    बगळयाचं कथासूत्र, सुरुवात, मध्य आणि द एन्ड सगळं माझ्या डोक्यात आणि पेपरवर आधीपासून होतंच. पण फॉर्म वेगळा होता. मी लिहलेली पटकथा होती आणि आता लिहायची होती 'कादंबरी' ती कशी होणार.

    प्रश्न?.

    उत्तरासाठी फोन केला पण मह्या पहाटे ११च्या आत उठतंच नाही. मग ? आजून ६ तास बाकी होते. तरी मी लॅपटॉप उघडलाच होता. मग सवयीनं कीज दाबायला सुरुवात केल्या रोमनमधून मराठीत काहीतरी आकारलं जात होतं. लिहिण्याची टोट्टल प्रोसेस 'ऑटो'मोड मध्येच. मी लिहिताना काही ठरवलं नव्हतंच म्हणजे तसंही काही ठरवण्याइतकी योग्यता किंवा माझा तितका वकूबही नव्हताच. चार दोन चांगल्या कादंबऱ्या वाचल्या होत्या पण याक्षणी ते काही डोक्यात नव्हतंच. पण १३/१४ वर्ष काम करत असतानाच्या अनुभवानं एक शिकलो होतो

    “करत गेलं की काहीतरी होतंयच”.

    आणि तसंही मी केलेल्या नोकऱ्यात मी एकाच प्रोफाईलवर अजिबात काम केलेलं नाही नेहमीची सुरक्षितता त्रासदायक वाटायची. टीव्ही'शोज'चं डिरेक्शन करताना मला नेहमी त्याच्या लिखानात सुद्धा उत्सुकता असायची. शोज लिहिताना ऍड लिहिणारे भारी वाटायचे. टीव्ही करताना रेडिओ आवडायचा. अन रेडिओ करताना प्रोमोज. त्यातलं chllenge खुणवायचं. एकंच फंडा होता आपण जे पण करायचं पडून, आपटून, झोकून करायचं, हातचं राखून काहीच नको. थोडक्यात माझ्या अंगात किडे अन मला लागत्या घोड्यांची खूप आवड. आताही मी काही तरी नवीन घेतलेलं करायला ते पण आयुष्यात आधी कधीच नं केलेलं कादंबरी आणि मी.

    वर्ड फाईलचा इंटरफेस कोरा होता. आणि टाइपिंग मला करता येत होतं. मग काय दे दणादण. महेश उठेपर्यंत ४/६ प्रकरणं लिहून झालेली. ती त्याला दिली पाठवून आणि फोन करून सांगितलं त्याला म्हटलं फीडबॅक दे. तो बोलला तोंड धुवून देतो. मी मग त्याचं आटपेपर्यंत मी लिहलेलं वाचू लागलो. लिहण्याची सुरुवात मी अगदी स्क्रिप्टमध्ये होती तशीच केली होती. आणि लिहिताना मला अजिबात जाणवलं नव्हतं पण आता मीच लिहलेलं वाचताना लक्षात आलं की, मी मराठीत लिहिताना बोलल्यासारखं लिहिलेलं आणि लिहिन्यात ऑटोमॅटिक माझी बोली भाषा आलेली. वाचलं अन म्हणलं 'गयी भैंस पानी में' आपला प्रकाशक आता आपल्याला तात्काळ 'तखलिया' बोलणार. पण... झालं उलटंच तो एकदम झुमो नाचों गावो मूड मध्ये बोल्ला

    "तुला सापडलंय आता थांबू नको” त्यानं मग मला सांगितलं तू ज्या भाषेत लिहतोय तसंच लिही. आणि मग त्यानं मला सांगितलं की कशे एकाऐवजी अनेक न्यारेटर माझ्याकडून वापरले गेलेत. मला त्यानं मला मी लिहलेलं उकलून दाखवायला चालू केलं. मी काय बरं लिहलंय, माझ्याकडून काय चांगलं आलंय, कसं आणखी चांगलं येण्याच्या शक्यता आहेत, चिंत्याच्या स्टोरीत कुठंच चिंत्या येऊन कसा काही बोलत नव्हता, आणि तेच किती चांगलं आहे वैगेरेवैगेरे. थोडक्यात माझी म्हैस पाण्यात जाऊन आता पव्ह्नी खेळूलालती. ती डुबली नव्हती.

    आता मला कळूलालतं की की मी चिंत्याची गोष्ट तशीच रचत चाललोय. जशी आपण नकळत कोण्या 'फलाण्या'ची रचतो. त्या फलाण्याबद्दल घरात आई बोलते. तसं बाहेर बाबा बोलतीलंच असं नाही मग शेजार पाजारचे, गावातले,गावाबाहेरचे अशे सगळे आपआपलं व्हर्झन बोलतात आणि ज्याला जसा तो 'फलाना' दिसलाय तसं ते आपल्यासमोर आणत जातात अगदी आपण लहानपणी ऐकीलेल्या 'सात आंधळे अन एक हत्ती' या गोष्टीतल्यासारखं. प्रत्येक आंधळ्याच्या हातात जो पार्ट येतो तसाच त्याला हत्ती दिसतो म्हणजे कुणी कान चाचपडल्यावर त्याला हत्ती सुपासारखा वाटतो तर कुणी तोच हत्ती त्याची सोंड चाचपडून मोठ्या पाइपसारखा आहे म्हणून सांगतो. थोडक्यात या सगळ्यांच्या तुकड्यातुन फलान्याचा कहाणीचा कोलाज आपल्या डोक्यात आकार घेत जाते...'बगळा' मधल्या हिरोचं, चिंतामण पुरुषोत्तमराव सरदेशमुखचं म्हणजे चिंत्याचं अगदी तसंच झालेलं. लिहण्याची सुरुवात झाली ती त्याच्या दोस्तांच्या सांगण्यावरून आणि त्या दोस्तानं त्यानं चिंतूला जितकं पाहिलं तितकं दाखवलं आणि जिथं त्या दोस्तानं चिंत्याला आणून सोडलं तिथून ज्यानं कुणी चिंतूचा हात पकडला त्याच्याप्रमाणे चिंतू चालत-वाहत गेला. मग आई, बाबा, काका, आव्वा, दोस्तायची फौज, गुरुजींचे दल, शंकरमामा, पिंकी, केशा etc etc सांगत गेले आणि चिंतूचं जग उभा राह्यलं.

    पटकथा लिहिताना सगळ्या गोष्टी दिसतील अशा लिहाव्या लागतात उदाहरणार्थ आपण जेव्हा लिहितो

    "...आणि त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं" ते पडद्यावर दाखवणार कसे ? त्याची ही अवस्था चितारणार कशी ?? त्यामुळे मग सीन घडवावा लागतो जेणेकरून त्याची ती अवस्था लोकांसमोर येईल. मी तसंच लिहिलं जितकं लोकांना शब्दांमधून दिसेल उगीचंच शब्दांचे वाफारे मांडणं माझ्या कुवतीबाहेरचंच होतं. चिंतूच्या जागी मी मला नकळत ठेऊन दिले होते त्याकाळात मग माझ्या आजूबाजूला जे कोणते इंटरेस्टिंग एलिमेन्ट्स होते किंवा मला ते तसे वाटले त्यांना मी घेऊन आलो जशे गल्ल्या बोळं,परिसर, वातावरण, लोकांची नावं जे जे मला भावलं ते ते मी उचललं आणि पेपरवर ठेवलं. जसं गर्जे माझ्या वर्गात होता त्याच्या वडिलांचं घड्याळाचं दुकान होता पण तेवढंच खरं. तो नापाश्या,हडकुळा वैगेरे नव्हता त्याच्यात मी दुसरा कुणी मिसळलेला. संदीप नकाशे याच नावाचा माझा शाळेतील मित्र, तो पण बोबडा होता आणि भरडी सुपारी खाऊन त्याची जीभ जड झाली होती. तुम्ही तसं करू नका असं आमचे सर सांगत तिथून मी संदीप उचलला. मग त्याची आई मी आमच्या आजोळी पाहिलेल्या पाटील काकुवरून उचलली त्याचं मोठ कुंकू डोक्यात राहिलेलं. आणि त्याचं घर मी एका माझ्या दुसऱ्या मित्राच्या घरावरून उचललं. त्याची चिडखोर आजी मी आमच्या भावकीतल्या एका म्हातारीवरून उचलली. आणि या वेग वेगळ्या सगळ्यांची मोट बांधून त्याचं एक कुटुंब बनवलं आणि ते बगळ्यात वापरलं. बगळ्यात येणारं प्रत्येक पात्र मी कुठे नं कुठे पाहिलेलं आहे. कोणाचं दिसणं घेतलं आणि कुणाची बोलण्याची लकब घेतली. कुणाचा आवाज घेतला आणि माझं बगळ्यातलं पात्र उभं केलं. आणि एकदा माझी पात्र उभी राहिली त्यांचं दिसणं असणं घर बार ठरलं की मग मात्र त्यांनी जसं मला समोर नेलं तसं मी जात गेलो. माझ्या मर्जीप्रमाणे त्यांना वापरलं नाही. त्यांनी जशी कथा पुढे नेली तशीच ती मी टाईप केली. मला नेहमी असं वाटत आलेलं की बोली प्रत्येकाची स्वतंत्र असते. तोच शब्द, तीच भाषा प्रत्येकजण आप आपल्याप्रमाणे वापरत असतं, उच्चारत असतं. म्हणून मग मी जेंव्हा लिहीत गेलो तेंव्हा पात्रांच्या प्रमाणे बोलत पण गेलो. आणि जो जसं बोलेल असं मला वाटत होतं तशेच्या तशे उच्चार मी टाईप करत गेलो. मग त्यामुळे एकच शब्द कुठे हृस्व आला कुठे दीर्घ.

    'बगळा' मी आधी जे लिहिलं होतं जितकं लिहलं होतं ते सगळं रोमन मराठीतून. वाचताना कधी कधी माझं मलाच ते आप लिखे खुदा पढे सारखं व्हायचं . ते तसं बाड टाईप करायला सुद्धा कुणी घेत नव्हतं. मग आम्ही ते टाईप करण्यासाठी सोपं व्हावं म्हणून स्वतः हातानी लिहायचं ठरवलं. आणि महेशने ते मुद्धाम मला तसं सांगितलं की कुणी करण्यापेक्षा तूच कर. मग हातानी लिहीत असताना बऱ्याच वेळेला त्यात सुधारणा होत गेली. काही नवं सुचलेलं टाकता आलं आणि जुनं आता जून वाटत होतं ते माझं मलाच उडवता आलं. थोडक्यात साधारण महिनाभर चाललेलं हे काम आमच्या पथ्यावर पडलं. याच दरम्यान पार प्रकाशनचा बगळा लोकांपर्यँत पोहचावा म्हणून त्याचं शून्य पैसे कॅम्पेन करायचं ठरवलं. आणि पात्रांच्या वन लायनर व्हाट्स अँप आणि फेसबुकवर टाकायला सुरुवात केली. त्यासाठी वन लायनर लिहिताना सुद्धा मला बऱ्याच वेळेला काहीतरी मस्त मिळायचं आणि मग ते बगळ्यात पेरलं जायचं. या वन लायनरचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे या वाचूनंच मनोज मानेने स्वतःहुन याचं मुखपृष्ठ करण्याची इच्छा जाहीर केली. आणि त्याने ३ मुखपृष्ठ डिझाइन्स बनवून दिले. ते तिन्ही इतके सुंदर होते कि मग महेशने मोठ्या मुश्किलीने त्यातले दोन बाजूला ठेऊन एक निवडलं. गणेश वसईकर, वार्जेश सोलंकी यांनी बगळ्याचं वाचन करून आम्हाला प्रोत्साहित केलं. पहिलटकर माझा आत्मविश्वास वाढवला. आणि सगळ्यात महत्वाचं बऱ्याच लोकांनी बगळ्याची भाषा नागर करा किंवा बोलीभाषेचा फक्त फ्लेवर वापरा म्हणजे लोक स्वीकारतील अशा हितचिंता व्यक्त केल्या असताना देखील आम्ही उदगिरी बोली ठेवणार या आमच्या मताला त्यांनी कॉन्फिडन्टचं टॉनिक पाजलं. आणि

    आणि साधारण अथक पूर्णवेळ सहा महिन्यामध्ये महेशलीलापंडितांची पारावर बसून आमच्या बगळ्याची साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.

    ही कादंबरी निर्मितीची प्रक्रिया, श्री. बाळासाहेब घोंघडे यांच्या नव साहित्यास वाहिलेल्या "अक्षरपेरणी" या सकस मासिकाच्या जुलै ऑगस्टच्या अंकातून पूर्वप्रकाशित.

    बगळा

    लेखक :- प्रसाद कुमठेकर.

    प्रकाशक :- महेशलीला पंडित

    पार पब्लिकेशन्स

    किमत :- ३००

      November 3, 2017


  • बाई आली पणात

    सुगीचे दिवस आले होते अन् समधी माणसं कशी पटापटा आपल्या कामाला लागली व्हती. शाळूकाढायला आला व्हता. कारडी गहू, हरभऱ्यानी रानं कशी फुलून तरारली व्हती. चिंचोळलीमधी जिकडं तिकडं घाई गडबड चालू व्हती. समधं शेतकरी लई कामात व्हढाचढीनं मरमर मरोस्तवर काम उरकीत व्हती. गावात शिंद्याची आळी विठ्ठल रखमाई दोन्ही हात देवळात कमरेवर ठेवून जणू चिंचोलीची राबणारी कष्टकरी बाई बाप्पे पाहत होती.

      June 11, 2022


  • जैसे देणे तैसे घेणे (सुमंत उवाच – ७९)

    सुमंत जयंत परचुरे. 

    आपण जे कर्म करतो, त्याची परतफेड याच जन्मात करावी लागते. म्हणून म्हटले जाते की जेवढे पाप करावे तेवढे मरण सोपे नाही.

      November 21, 2021


  • कथातरंग – अनुपच्या शब्दात सल्ला

    साधारण पांच एक वर्षांपूर्वी धोंडीबा कडे सहा एकर बागायती शेती होती, आणि शेताच्या एका कोपर्‍यात तीन खोल्यांचे छोटेसे पण देखणे असे कौलारू घर होते. त्यात धोंडीबा, राधा आणि त्यांची एक मुलगी राहत असे. दिवसभर कष्ट करून त्याने हे माळरान नंदानवनात फुलवले होते. कोणाकडे काही मागायची गरज पडणार नाही अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालला होता.

      March 12, 2023


  • समज गैरसमज

    काही वर्षांपूर्वीची गोष्ट. भल्या सकाळी सहाच्या सुमारास आमच्या घराची बेल वाजली. घरी सर्वांची नीजानीज झाली होती. रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघणे आणि मग सकाळी उजाडेपर्यंत ताणून देणे हा आमच्या घरचा शिरस्ता. पहाटे दूधवाल्याने झोपमोड करु नये म्हणून आमच्या दाराला पिशवी बांधलेली असते. या पिशवीतले पैसे दूधवाल्याने न्यायचे आणि पिशवीत दूधाच्या पिशव्या ठेवायच्या. एवढया सकाळी दरवाजात कोण उपटल असा विचार करत मी चरफडत दार उघडलं. बघतो तो समोर कुणी पोसवदा मुलगी उभी. "कचराऽऽ" ती केकाटली. इथे मी हैराण.

      July 9, 2022


  • लाघवी करस्पर्श (संक्षिप्त रूपांतरीत कथा – ४२)

    मी तिचं नाव तेव्हा ऐकलंच नव्हतं पण माझ्या विचारांत ती मला लाघवी करस्पर्श म्हणूनच आठवते.
    किती जादू होती तिच्या हातांत!
    केवळ आश्चर्यकारक.
    कधी आणि कुठे, हे महत्त्वाच नाही पण केव्हा तरी एकदा मी माझ्या भ्रमंतीमधे एका विरळ लोकवस्तीच्या जिल्ह्यातून जात असतांना अचानक रात्र झाली.
    मी चालत जात होतो त्यामुळे आता ज्या गांवात मला पोहोचायचे होते, तिथे पोहोचणे शक्यच नव्हते.
    आजच्या रात्रीपुरता जवळपास आसरा शोधणं भाग होतं म्हणून मी प्रथमच जे साधं छोटं घर दिसलं त्याच्या दरवाजावर ‘टक टक’ केलं.
    मी जेव्हा त्या घराजवळ पोहोचलो तेव्हां संधिप्रकाश संपून काळोखी रात्र सुरू झाली होती आणि खिडक्यांना पडदे नसल्याने त्यांमधून दिसणारा मंद, प्रसन्न प्रकाश मला ह्या घरांत आराम आणि आनंद मिळेल याची खात्री देत होता.
    मी ज्या मुख्य रस्त्यावरून पाय ओढत चाललो होतो त्यापासून ते घर थोडं आत होतं. घराला छोटंस कुंपण होतं.
    मी बाजूला वळून कुंपणाच्या लाकडी बिजागराला कसंबसं लोंबकळत असलेलं छोटं फाटक ढकलून आंत घराजवळ गेलो.
    ते फाटक परत बंद झाल्याचा आवाज येण्याच्या आधी मी घराच्या अंगणात पोहोचलो होतो आणि माझ्या येण्याची चाहूल लागलेली एक शिडशिडीत किशोरवयीन मुलगी माझी वाट पहात उभी होती.
    दार बंद झाल्याचा आवाज झाला आणि जणू त्याचा प्रतिध्वनी यावा तसा कुत्र्याच्या तीव्र भुंकण्याचा आवाज आला आणि एखादं भूत वगैरे अचानक अवतरावं तसा एक मोठ्ठा कुत्रा अकस्मात तिथे उगवला.
    मी तो जंगली कुत्रा नीट पाहू शकेन अशा अंतरावर होतो आणि मला दिसत होते की तो माझ्यावर उडीच घेण्याच्या पवित्र्यात होता.
    त्याचं लांडग्यासारखं गुरगुरणं खरंच भयकारक होतं.
    तो आता नक्की उडी घेणार असं वाटत असतांना एक हलका हात त्याच्या मानेवर फिरला व त्या मुलीने हलक्या आवाजात एखादा शब्द उच्चारला.
    “घाबरू नका, तो कांही करणार नाही.” मला एक गोड, मंजुळ आवाज ऐकू आला.
    मी थोडा पुढे आलो पण माझ्या मनांत त्या मुलीच्या त्या कुत्र्यावरील हुकमतीबद्दल शंका होती.
    अजून त्या कुत्र्याच्या जाडजूड मानेवर तिचा नाजूक बालिश हात होता परंतु कुत्र्याने माझं तिथे येणं अद्यापही पसंत केलं नव्हतं आणि तो भूंकून असमाधान व्यक्त करत होता.
    ती मुलगी हुकुमत गाजवणा-या आवाजात नाही तर अत्यंत लाघवी आवाजात पण आपली आज्ञा मानली जाईलच अशा खात्रीने कुत्र्याच्या मानेवर गोल हात फिरवत म्हणाली, “टायगर, आंत जा.” आणि क्षणात तो भयानक कुत्रा गुपचूप आत निघून गेला.
    “कोण आहे तो?” आंतून कर्कश्श आवाज आला आणि कुत्र्याची जागा एका आडदांड माणसाने घेतली.
    “कोण आहेस तू? कायं हवय तुला?” त्या माणसाने तिरस्कार आणि अडवणूक करणा-या स्वरात विचारलं.
    त्या मुलीने आपल्या लाघवी करस्पर्शाने हलकेच त्या आडदांड माणसाचा हात दाबला आणि ती थोडी त्याच्याकडे झुकली.
    मी विचारले, “इथून ......गांव किती दूर आहे?”
    हा प्रश्न मलाच फार योग्य वाटत नव्हतां पण बोलायला सुरूवात करणे आवश्यक होते.
    “.........गांव म्हणतां! तें इथून सहा मैल दूर आहे.” तोच आडदांड माणूस म्हणाला पण आता त्याचा आवाज अतिशय सौम्य होता आणि मगासच्या अडवणूकीचा मागमूसही त्यात नव्हता.
    मी म्हणालो, “बरंच दूर आहे तर! मी ह्या भागांत नवा आहे आणि मी चालत निघालो आहे. मला जर सकाळपर्यंत रहायला जागा द्याल तर फार उपकार होतील.”
    त्या मुलीने हात वर नेऊन आता त्या माणसाच्या खांद्यावर ठेवल्याचे मला दिसले आणि त्याच्या अधिक जवळ गेली.
    तो म्हणाला, “आत ये. बघू काय करता येईल ते?”
    त्याचा आवाज आता पार बदलला होता.
    तो मी त्या खोलीत प्रवेश केला.
    तिथे उष्णतेसाठी एक छोटी शेकोटी होती.
    शेकोटीजवळ बसलेले दोन गुटगुटीत मुलगे माझ्याकडे रागाने पहात होते.
    मध्यम वयाची एक स्त्री टेबलाजवळ उभी होती.
    मुलं मांजरीच्या पिल्लाबरोबर खेळत होती.
    माझं नकारात्मक स्वागत करणारा तो आडदांड माणूस म्हणाला, “अग, तो प्रवासी आहे, त्याला आजची रात्र जागा हवी आहे.”
    ती स्त्री माझ्याकडे संशयाने पहात म्हणाली, “आम्ही इथे हाॅटेल चालवत नाही.”
    मी म्हणालो, “ते मला माहित आहे पण मला ......गांवला जायचे आहे आणि आता फार रात्र झाली आहे.”
    तो माणूस म्हणाला, “थकलेल्या आणि चालत जाणा-या प्रवाशाला ते अशक्यच आहे. तेव्हा अधिक बोलण्यात कांही मतलब नाही. आपण त्याला झोंपायला जागा द्यायलाच हवी.”
    एवढ्यामधे ती मुलगी अलगद कधी त्या स्त्रीच्या जवळ पोहोचली होती हे माझ्या लक्षातही आलं नव्हतं.
    ती त्या स्त्रीला हलक्या आवाजात काय बोलली तेंही मला ऐकू आलं नाही पण मी हे पाहिलं की बोलतांना तिचा लाघवी हात त्या स्त्रीच्या हातावर होता.
    त्या करस्पर्शात काय जादू होती कुणास ठाऊक पण आता त्या स्त्रीच्या स्वरांतला तिटकारा जाऊन ती स्वागत करणा-या स्वरांत म्हणाली, “हो, ........ गाव इथून फार दूर आहे. आम्ही करू कांहीतरी सोय. तुम्ही जेवलात कां?”
    मी म्हणालो, “नाही.”
    अधिक कांही न बोलता त्या स्त्रीने एक भिंतीत बसवलेलं टेबल खाली आडवं केलं आणि त्याच्यावर भाकरी, चटणी, भाजी, लोणचं, पापड ह्यांनी भरलेलं ताट व एक दूधाचा प्याला ठेवला.
    ही सर्व तयारी होत असतांना मला बारकाईने निरिक्षण करायला वेळ मिळाला.
    मी वर्णन केलेल्या त्या मुलीच्या आणि घरांतील इतरांच्या मधे वरवर खूप फरक वाटत होता पण मला जाणवलं की ती स्त्री आणि मुलगी ह्यांच्यात साम्यही होतं.
    त्या स्त्रीचा चेहरा आता टक्के टोणपे खाऊन रापलेला वाटत होता तरीही नक्कीच ती त्या मुलीची आई होती.
    मी जेवायला सुरूवात केली तोच ते जमीनीवर बसलेले दोघे मुलगे आपापसात मोठ्या आवाजात भांडू लागले.
    वडील मोठ्याने दरडावत एका मुलाला म्हणाले, “जगन, जा, आता जाऊन झोपा बघू.”
    जगनला ते ऐकू न येण्याचा प्रश्नच नव्हता पण त्याने तिकडे दुर्लक्ष केले.
    वडील पुन्हा रागाने ओरडले, “ऐकलं ना मी काय सांगितलं ते? मुकाट्याने जा बघू आत.”
    जगन कुरकुरत ओरडला, “मला नाही जायचं आत!”
    वडिल पुन्हां म्हणाले, “मी सांगतो ना, निघ पाहू.”
    पण दोन्ही मुलांनी आत जाण्यासाठी कांही हालचाल केली नाही.
    जगनच्या चेह-यावर बंडखोरी स्पष्ट दिसत होती.
    आता प्रकरण चिघळणार आणि मुलांना मार खावा लागणार असं वाटत असतांनाच बहीण, म्हणजे ती मुलगी, त्या मुलांजवळ गेली आणि वांकून दोघा भावांचे हात तिने हातात घेतले.
    तीने शब्दही उच्चारला नव्हता पण ती मुलं आज्ञाधारक असल्यासारखी उठली. त्यांच्या चेह-यावरील हटवादीपणा झटकन मावळला आणि ती आत निघून गेली.
    मी जेवण संपवल तेवढ्यात एक शेजारी आत आला.
    तो घरच्या मालकाबरोबर राजकारणावर व बातम्याबद्दल बोलू लागला.
    त्या चर्चेत संवादापेक्षा आपलं मत ठाम मांडणच जास्त होतं.
    माझ्या मालकाचे विचार सुस्पष्ट नव्हते तर शेजारी शब्दबंबाळ आणि अघळ पघळ बोलणारा होता.
    अशा चर्चेत नेहमी होतं, तेंच झालं.
    माझा मालक थोड्याच वेळात चिडला व शेजा-याला अद्वातद्वा बोलू लागला आणि शेजारीही त्याच भाषेत अधिकच भडकवणारी उत्तरं देऊ लागला.
    त्यावेळी मला पुन्हा त्या लाघवी करस्पर्शाचा साक्षात्कार झाला.
    ती हलकेच कधी आपल्या वडिलांजवळ जाऊन पोहोचली होती, तेही मी पाहिलं नव्हतं पण आता तिचा हात हलकेच वडीलांच्या कपाळाला स्पर्श करून त्यांच्या केसांत हलकेच गोल गोल फिरू लागला होता.
    तिच्या वडिलांचा आवाज हळू हळू खाली येत गेला व त्यातला कडवटपणा संपला. वाद चालूच होता.
    जेव्हां जेव्हा वडिलांचा आवाज वाढत असे किंवा त्यांच्या तोंडून रागाने एखादा कडवट शब्द बाहेर येई, तेव्हा तेव्हा ती मुलगी आपला हात त्यांच्या केसांत हलकेच फिरवू लागे.
    ते फारच छान दृश्य होतं.
    मी ते पाहून, सर्वांच्या हृदयांना नकळत भारून टाकणा-या, त्या हलक्या करस्पर्शाच्या ताकदीचा विचार करून अत्यंत आश्चर्यचकीत झालो.
    तिला तिथे उभी पहातांना ती परमेश्वराने माणसाच्या सहज भडकणा-या भावनांना शांत करण्यासाठी पाठवलेली शांततेची देवताच वाटत होती.
    ती दुर्दैवाने चुकीच्या ठीकाणी होती.
    उध्दट आणि भडक वृत्तीच्या लोकांकडे, ज्यांना अशा आर्जवी, सहज शांत करणा-या आणि क्षणात माणुसकी निर्माण करणा-या स्पर्शाची गरज आहे, त्यांचा मी विचार करत होतो.
    त्या संध्याकाळी नंतरही मी अनेकदा त्या आर्जवी करस्पर्शाची आणि तशाच मृदू पण हुकूमी आवाजाची ती ताकद मी पहात होतो.
    सकाळी न्याहरी झाली.
    मी निघायच्या तयारीत होतो.
    तेव्हा घरचा मालकाने मला अर्धा तास थांबायला सांगितलं.
    थोड्या वेळाने त्यांची घोडागाडी कांही कामासाठी तिकडेच जाणार होती.
    मीही त्यातून यावं, असं तो म्हणाला. मी आनंदाने त्याच आमंत्रण स्वीकारलं.
    कांही वेळाने त्यांची गाडी घराबाहेरच्या रस्त्यावर आणली गेली.
    मला गाडीत बसायला सांगण्यात आले.
    मी गाडीत बसतांना घोड्याकडे नजर टाकली.
    तो तट्टू चांगला सशक्त होता पण जरा नाठाळ वाटत होता.
    जेव्हा मालक येऊन माझ्या बाजूला बसला तसं सर्व कुटुंब आम्हाला निरोप द्यायला बाहेर आलं.
    लगाम हातात घेत मालक म्हणाला, “चल, मोती" आणि त्याने लगामाला हिसका दिला.
    पण मोती जागचा हलला नाही.
    मालक म्हणाला, “मोती, काय मस्ती आली कां?” आणि त्याने चाबकाचा आवाज मोतीच्या कानाजवळ काढला.
    तरीही मोती ह्या दुस-या धमकीवजा विनंतीनेही हलला नाही.
    तो तसाच अवज्ञा करून उभा राहिला.
    मग मालकाने संयम सोडून पुढला कोरडा मोतीच्या पाठीवर ओढला.
    लागल्यामुळे मोती जरा हलला पण त्याने पाय पुढे टाकला नाही.
    मालकाने आणखी पाच सहा कोरडे ओढले पण मोती जागच्या जागीच उभा राहून मार खात होता.
    मग घरातला गुटगुटीत मुलगा पुढे आला आणि मोतीच्या तोंडावरचा पट्टा पुढून धरून त्याला ओढू लागला. तोंडाने तो अशा वेळी वापरण्यांत येणा-या शिव्याही देऊ लागला.
    मोतीने ह्या नव्या शत्रूला तोंड देण्यासाठी पाय जमिनीवर एका विशिष्ट कोनात रोवले व तो अधिकच हट्टाने उभा राहिला.
    मुलाने मोतीच्या नाकावर ठोसा मारला व क्रूरपणे त्याचा लगाम पुढून खेचू लागला. त्याने कांही फरक पडला नाही.
    मोती अशा उपायांना दाद देण्याच्या मन:स्थितीत नसावा.
    आतून तो मधुर आर्जवी आवाज आला, “जगन, असा मारू नकोस त्याला.”
    मी मान वळवली.
    ती मुलगी फाटकातून बाहेर येतांना दिसली.
    पुढच्या मिनिटाला तिने जगनचा हात धरून त्याला घोड्यापासून दूर केला होता.
    त्या मुलाला दूर करायला तिने जराही ताकद वापरली नव्हती.
    तिने त्याचा हात धरताच तो आज्ञाधारकपणे तिचे सगळे ऐकायला तयार होता.
    त्याने तिला थोडासाही विरोध केला नव्हता.
    मग तो मऊ हात मोतीच्या मानेवर जरा खाजवत होता आणि ती हलक्या आवाजात मोतीशी दोन शब्द बोलली.
    मोतीचा सारा नाठाळपणा झटकन निघून गेला.
    ती म्हणाली, “बिच्चारा मोती!”
    मग त्याचा तोंडावरील पट्टा तिने पुढल्या बाजूने धरला व कृतक कोपाने म्हणाली, “बरं बरं! ए अडेलतट्टू, आता जा बाबांबरोबर!”
    मोती आपली मान तिच्या दंडाला घासत होता.
    तिच्या तोंडचे शब्द ऐकताच कान ताठ करून तो अशी सुंदर दौड करत निघाला की जणू कांही त्याने कांही हट्ट केलाच नव्हता.
    जसे आम्ही निघालो तसा मी माझ्या बरोबरच्या मालकाला म्हणालो, “किती आश्चर्यकारक ताकद आहे त्या लाघवी करस्पर्शामधे!”
    त्याने क्षणभर माझ्याकडे आश्चर्याने पाहिले मग माझ्या बोलण्याचा आशय त्याच्या लक्षात आला.
    तो म्हणाला, “ती फार चांगली आहे. प्रत्येकजण आणि प्रत्येक गोष्ट तिच्यावर प्रेम करते.”
    ते तिच्या ताकदीचं रहस्य होतं कां?
    तिच्या अंतरंगाची ओळख तिच्या लाघवी करस्पर्शातून अगदी नाठाळ जनावरालाही होत होती कां?
    तिच्या वडिलांचे सांगणे अर्थातच खरे होते.
    तरीही मी तेव्हांपासून आतापर्यंत तिच्या हातातील जादूच्या ताकदीचा किती उपयोग होऊ शकला असता याची कल्पना करत असतो.
    मी अशा ताकदीचा अनुभव इतरही कांही प्रेमळ आणि सद्गुणी व्यक्तींमधे घेतला आहे पण तिच्याइतका कधीच पाहिला नाही.
    तिचं नाव मला माहित नसल्यामुळे मी तिला लाघवी करस्पर्श असंच म्हणतो. आपल्यापैकी किती कमी जण लाघवी करस्पर्श, नम्र शब्द, ह्यावर विश्वास ठेवतो. विशेषत: एखाद्या चांगल्या उद्दीष्टप्राप्तीसाठी बळकट इच्छाशक्ती मनांत बाळगून? अगदीच कमी जण, नगण्य.
    तरीही जगांत अनेक चांगले मोठे बदल असेच गुपचूप, फार आवाज न करतां सुरूवातीला सामान्य वाटणा-या शक्तीच घडवून आणत असतात.
    ह्या सर्वांत आपल्या सर्वांसाठी मोठा धडा नाही कां?

    -- अरविंद खानोलकर.

    मूळ कथा - जेन्टल हॅंड

    मूळ लेखक - मेरी रॉबर्टस राईनहार्ट

      August 12, 2022