नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
बंकटमल नावाचे एक व्यापारी होते. चांगला व्यापार करून त्यांनी भरपूर धन मिळविले होते. इतके, की ही संपत्ती ठेवायची तरी कोठे या चिंतेने त्यांना ग्रासलेले होते. त्यामुळे एवढा प्रचंड पैसा असूनही त्यांना सुख म्हणजे काय? हेच माहीत नव्हते.
एकदा ते असेच संपत्तीची काळजी करत करत गावाबाहेर फिरायला गेले. सायंकाळ सरत आली होती. पाखरे आपल्या घरट्यात परतत होती. निसर्गामुळे वातावरण सुंदर बनले होते. रस्ताच्या एका कडेला असलेल्या शेतात एक शेतकरी अत्यंत आनंदाने व उत्साहाने गाणे गात आपले काम करत होता.
बंकटमल त्याच्या जवळून जाताना त्याने त्यांना पाहिले व गाणे थांबवून स्मितहास्य केले. ते पाहून बंकटमलही तेथे थांबले. त्यांना त्या शेतकऱ्याच्या आनंदाचे रहस्य जाणून घ्यायचे होते. ते त्या शेतकऱ्याला म्हणाले, ' आज तुम्ही भलत्याच खुशीत दिसता. काय कोठे जमिनीत पैशाचा हंडा सापडला की काय?'
त्यावर शेतकरी म्हणाला, ' ' छे छे, मी एक साधा शेतकरी आहे. दिवसभर शेतात राबतो. जी काही कमाई होते तिचे मी चार हिस्से करतो व माझी ती जबाबदारी आहे, असे समजून कर्तव्यपूर्तीच्या आनंदात समाधान मानतो.
त्यावर बंकटमल म्हणाले, की चार हिस्से म्हणजे? त्यावर शेतकरी म्हणाला, ''माझ्या आई-वडिलांनी मला वाढविले. मात्र आता ते थकले आहेत; त्यामुळे कमाईचा एक हिस्सा त्यांना देतो. दुसरा हिस्सा माझ्या लहान मुलाबाळांना देतो कारण त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी माझी आहे तर समाजाचे ऋण म्हणून तिसरा हिस्सा दानधर्मात खर्च करतो व चौथ्या हिश्श्यात मी माझे घर चालवितो. ''
बंकटमलला पैसा कसा खर्च करायचा व आनंद कसा मिळवायचा याचा वस्तुपाठच मिळाला होता. त्याप्रमाणे त्याने 'सुखी' होण्याचा निर्णय घेतला.
January 2, 2018

मी ऐकलं होतं की स्मार्टफोनवर बरीच ॲप्स डाऊनलोड करून घ्यावी लागतात. मग ती वापरतां येतात. पण त्यासाठी मला फोनवर कुठेच इंटरनेट सांपडेना. खूप खटपट केली. पण फोनवर ठराविक तीच चित्रं वगैरे दिसायची. टच फोन होता. पण वारंवार टचटच करूनही कांही त्या मोबाईलला दया येत नव्हती.
March 3, 2022
प्रेमाच्या दिनी
गुलाब भेट दिली.
प्रेमाची ‘राजधानी’
हृदयी धडधडली.??????
February 18, 2012
भव्य मंडप उभारण्यात आला होता. मुख्य प्रवेशद्वारावर कानापर्यंत थोबाड फाकवलेल्या, उर्मटचेहऱ्याच्या माणसाचा हात जोडलेला, पांढऱ्याशुभ्र कपड्यातला, बाराफुटी कट आऊट बोर्ड, स्वागताला उभा केला होता. डीजेच्या भिंती, आणि बाकी — वेगळं काहीच नव्हतं. नेहमीची लगीन घाई, माणसांची वर्दळ, तेच ते.
March 24, 2021

माझे जीवन असंख्य अनुभवांनी घडलेले आहे. मला लिहिण्याची (लिखाणाची) सवय नव्हती. परंतु कित्येक घटना अशा अनुभवल्या की त्यांना शब्दात उतरविण्याची इच्छा झाली. एका छोट्याश्या गावामधून राज्याच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचण्याच्या माझ्या प्रवासात मला आलेले अनुभव की ज्यापासून मी काही शिकले, प्रेरणा मिळविली व त्याचप्रमाणे माझे व्यक्तिमत्व घडले, त्यांना पुस्तक स्वरुपामध्ये गोष्टीरूपात मी प्रसिद्ध करीत आहे.
November 27, 2016
खरं पहाता, ती एक हिंदी सिने अभिनेत्री.. मात्र तरीदेखील तिच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटते.. कारण आपण तारुण्यात असताना, तिचा अभिनय आपल्याला मनापासून आवडलेला असतो.. तिची मनातील ‘मोहक’ छबी, ही कधीही पुसली जात नाही.
September 22, 2021
November 24, 2022
संभाजी महाराजांच्या काळात म्हणजेच १६८० मार्च नंतर ते १६८९ सुरुवातीपर्यंत अनेक लढाया झाल्या. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर जणू डोलत होते. औरंगजेब सारखा विषारी सर्प स्वराज्याला चारही बाजूने विळखा घालून बसला होता.
December 26, 2021
नाना घड्याळे दुरुस्तीचा व्यवसाय करीत . घड्याळ कोणतेही असो ते, स्वस्त दारात दुरुस्त करण्याबाबत नानाचा खास लौकिक होता. त्यांचे घड्याळाचे दुकान वगैरे नव्हते.पण घड्याळे घरी आणुन ते दुरुस्त करीत व एकदा दुरुस्त केलेल्या घड्याळाची ते ग्यारंटीच देत . त्यांच्या अशा काही गुणांमुळेच त्यांचा एक विशिष्ट गिरह्याईक वर्ग निर्माण झाला होता.व तोआजतागायत टिकुन आहे.
September 1, 2021
अपेक्षा न ठेवता फळाची कर्म करत रहायचे असे ऐकले आहे. पण सामान्य माणूस संतवृत्तीचा नसतो. फार फार नाही पण किमान जाणिव ठेवली तरी खूप आहे. मी सुद्धा एक सामान्य माणूस आहे. आणि अशा वेळी मला शांत बसवत नाही. शाळेत असताना रोज आम्ही भेटलो की एक शिक्षिका स्मित हास्य करत वर्गावर जायच्या. एकदा त्या वरच्या मजल्यावर वर्गावर जात असताना मी तिथेच होते. पण त्या सरळ निघून गेल्या. मात्र मला वाईट वाटले. आज त्या अशा कशा गेल्या न हसता. चैन पडली नाही. मधलीसुट्टीत विचारले की माझे काही चुकले का? त्या म्हणाल्या नाही हो बाई वरच्या वर्गातील मुले जरा वेगळी आहेत. मी जाई पर्यंत नको असलेले भांडण होतात म्हणून मी घाईघाईत गेले. माझच चुकले. मी मु. अ. इथेच नव्हे तर मंडईतील भाजी विकणारी. दूध आणणारा. भांडी घासणाऱ्या अशा अनेक ठिकाणी घडल्या होत्या. याचे कारण म्हणजे माझा स्वभाव आणि सवय झाली होती एकमेकांना. पण पुढे पुढे मात्र याची सवय होऊनही माझ्यात बदल केला नाही मी....
साधारण पणे बारा वर्षे झाली असतील एका नातेवाईकांनी माझ्या बाबतीत जे केलं होतं त्यातून मी शिकायला हवे होते. परत तोच अनुभव आला या आठपंधरा दिवसात पणजी झाले होते. खूप दिवसाचे चांगले सबंध आहेत पण आम्ही दोघेही जात नाहीत कुठल्याही कार्यक्रमात. आणि बारसे तर थाटामाटात मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे वाटल की लोक येतात. जेवण करून अगदी सोन्या चांदीचे दागिने देतात. आणि मी निदान कल्पना करुन आपण खूश राहू शकतो. शिवाय बाजारात सगळे काही विकत मिळते. मात्र मायेची ऊब आणि आशीर्वाद मिळत नाहीत. त्यामुळे मी याच नात्याने एक आशीर्वाद देत असल्याची छोटीशी कविता आणि माझ्या साड्यांची घोधडी पाठवली. त्यामुळे सहाजिकच अपेक्षा होती की खूप छान आहेत दोन्ही गोष्टी. गोधडी बाजारात मिळते. पण मायेची ऊब नसते आणि आशीर्वाद तर कुठेच कितीही किंमत मोजली तरी नाहीच मिळत याची तरी जाणिव .आणि आशीर्वाद फारच मोलाचे असतात ते मिळाले. फक्त एवढेच जरी म्हटले असते तर मी भरुन पावले असते. पण नाही . विरस झाला होता. हॉटेल मध्ये पाणी चहा दिला की लगेच वेटरला थॅंक्स म्हणणारी ही पिढी आपल्याला काहीही म्हणत नाही. याचे वाईट वाटले. कोणतीही वस्तू देताना कृष्णार्पण असे म्हणतात ते बरोबर आहे देवाला अर्पण करून अपेक्षा ठेवू नये. हेच खरं आहे आणि तसेही मी बाळकृष्णालाच दिले होते ना एक गोष्ट नक्की आपलेपणा. माया. प्रेम या दिल्यान वाढतात नाही तर बूमरँग सारखे आपल्या वरच उलटून येतात. काय शिकायचे पुढील पिढीने. बघा आले ना मी मूळ पदावर तुम्ही काय प्रतिक्रिया देणार याची वाट पहात आहे.
–सौ. कुमुद ढवळेकर.
September 1, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti