नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
बस स्टॉप वरील ओळखीतून एकमेकांचा आगापीछा माहीत नसलेले ते दोन अविचारी तरुण जीव, एक महिन्याच्या ओळखीत “एक दुजेके लिये” झाले होते. त्यांना विभक्त केल्याचे पाप मी माथी घेतलं होतं.
August 24, 2022
(ब्रह्मदेशातली लोककथा )
आज आपण जगभरात जेवढी लोकसंख्या पाहातो, तेवढी एके काळी नव्हती. या जगात खूप कमी लोक राहत होते. तेव्हा आजच्यासारखी शहरे नव्हती. प्रत्येक जण उंच बर्फाच्छादित डोंगरांच्या दरीत राहत असत. डोंगरात रहाणाऱ्या या लोकांना ‘चीन्स’ म्हणत.
November 15, 2025
मध्यंतरी वर्तमानपत्रात बालाजी देवस्थान येथील एका भिकाऱ्याची बातमी आली होती. हा भिकारी बालाजीच्या दर्शनासाठी येणाऱ्या मोठमोठ्या सेलिब्रिटींच्या मागे लागून त्यांना पैसे मागायचा. अशी त्यानं अनेक वर्षे भीक मागून जिंदगी घालवली. नुकताच त्याचा मृत्यू झाल्यावर पोलीसांनी त्याच्या झोपडीची झडती घेतली, तेव्हा लाखो रुपयांची रोकड त्यांना मिळाली. एवढे रुपये जवळ असताना, त्याला भीक मागणे सोडून द्यावे, असं कदापिही वाटलं नाही… कारण, काहीही कष्ट न करता, पैसे मिळविण्याचे त्याला जडलेलं ‘व्यसन’!!
July 24, 2021
भोजराजा कलेचा भोक्ता असल्यामुळे त्याच्या पदरी अनेक विद्वान होते. कालिदासासारखे 'नवरत्न'ही दरबारात होते. त्यामुळे दूरदूरहून आलेले अनेक कलावंत आपली कला सादर करायचे व राजाकडून बिदागी घेऊन जायचे.
एकदा एक सुवर्णकार सोन्याच्या तीन मूर्ती घेऊन भोजराजाच्या दरबारी आला. त्या तिन्ही मूर्तीची किंमत वेगवेगळी होती. एका मूर्तीची किंमत होती दहा सुवर्णमुद्रा, दुसरीची होती शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसरीची होती हजार सुवर्णमुद्रा. तिन्ही मूर्ती शुद्ध सोन्याच्या, समान वजनाच्या मात्र त्यांच्या किमती वेगवेगळ्या का, याचे कोडे भोजराजासह सर्व दरबारी लोकांना पडले. मात्र नेमके रहस्य सुवर्णकाराखेरीज कोणालाच माहिती नव्हते व ते ओळखावे म्हणून सुवर्णकार दरबारात आला होता. मात्र कोणालाच त्या मूर्तीच्या किमतीचे रहस्य सांगता येईना. शेवटी भोजराजाने कालिदासाला पाचारण केले.
कालिदासाने तिन्ही मूर्तीचे बारकाईने निरीक्षण केले. तिन्ही मूर्ती शुद्ध सोन्याच्या, समान वजनाच्या व दिसायला सारख्याच होत्या. बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्या मूर्तीमधील रहस्याची गोम कालिदासाच्या लक्षात आली.
त्याने एक मोठी काडी घेतली व पहिल्या मूर्तीच्या डाव्या कानात घातली व सरळ पुढे नेली तर ती उजव्या कानातून बाहेर पडली. तीच काडी त्याने दुसऱ्या मूर्तीच्या डाव्या कानात घातली तर ती त्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. नंतर त्याने ती काडी तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातली, तर ती पोटातच राहिली.
कालिदासाने पहिल्या मूर्तीची (म्हणजे एका कानाने ऐकणे व दुसऱ्याने सोडून देणे) किंमत दहा सुवर्णमुद्रा, दुसऱ्या मूर्तीची (म्हणजे कानाने ऐकलेले लगेच दुसऱ्याला सांगणे) किंमत शंभर सुवर्णमुद्रा, तर तिसऱ्या मूर्तीची (म्हणजे कानाने ऐकलेले आपल्या पोटातच ठेवणे) किंमत हजार सुवर्णमुद्रा असल्याचे सांगितले.
त्या तिन्ही मूर्तीची किंमत कालिदासाने बरोबर ओळखल्यामुळे त्या सुवर्णकाराने खूष होऊन कालिदासाची प्रशंसा केली. नंतर भोजराजानेही माणसातील स्वभाव वैशिष्ठ्ये सांगणाऱ्या मूर्ती तयार केल्याबद्दल त्या सुवर्णकाराचा यथोचित सत्कार करून त्याला परत पाठविले.
November 8, 2017
गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये चिऊताईच्या घरट्यासमोर कोरोना नावाचा परदेशी कावळा येऊन उभा राहिला. आपल्या बाळांच्या जीवाला आता धोका आहे, हे समजून चिऊताई घाबरुन गेली. कावळा बाहेरुन चिऊताईला सारखा ‘दार उघड, दार उघड’ म्हणून सतावत राहिला. त्याचा असा समज झाला की, मागील गोप्टीप्रमाणे चिऊताई बाळांना आंघोळ घालेल, पावडर, काजळ लावेल आणि नंतर दार उघडेल…पण तसं घडलं नाही…
June 7, 2021
मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. दुपारी अडीच तीनची वेळ. कर्जतकडे जाणारी लोकल प्लॅटफॉर्मवर उभी होती. सुटायला वेळ होता आणि सिग्नलही लाल होता. सगळ्यात पुढच्या डब्याच्या सगळ्यात पुढच्या दरवाजात साठीच्या जवळ आलेले प्रभाकरपंत उभे होते. सिग्नल न्याहाळत.
April 28, 2023
पहाटे आई देवा घरी गेली.
वैकुंठात सोपस्कार आवरून घरी परतलो.
दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले. माझ्यासाठी दार उघडून, कांही तरी पुटपुटत, मोकळे केस सोडलेली, आई देवघराकड़े जात होती.
-- © अरविंद टोळ्ये
May 2, 2021
ज्ञानेश्वरीतील पहिल्या काही ओव्या वाचल्या कि माऊलींच्या प्रतिभेची ताकत लक्षात येते. आणि आपण किती नकळतपणे आपला देव अक्षर रुपात पाहू लागतो, याची आपल्याला कल्पनाही येत नाही.
September 8, 2022
हसणं. किती साधी, सोपी कृती! पण कित्येकदा आपण ती विसरून जातो. कधी कधी तर आपल्याला आपण हसलो तर आपली प्रतिष्ठा हरवते की काय असे वाटते.
October 16, 2009

खरे तर मला तिचा लहानपणचा चेहरा नीट आठवत नाही… चाळीमधल्या त्या गमती आहेत… खेळाच्या …त्यावेळी एक खेळ सॉलिड पॉप्युलर होता… तो अर्थात आमच्यापेक्षा मोठ्या मुलींनी शोधून काढला होता… अर्थात त्याचे अनुकरण लहानही करत असत.. त्या खेळाचे नाव होते.. ‘ डॉक्टर …डॉक्टर …’
July 10, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti