नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मला कुत्रा या प्राण्याची फार ओढ. मलाच कशाला, आमच्या घरातील सर्वांनाच कुत्रा प्रिय. तसे सर्वच प्राणी आम्हाला आवडतात, परंतू मुंबईसारख्या शहरात त्यातल्या त्यात कुत्रा पाळणं सोयीचं, म्हणून कुत्रा एवढंच. मांजरही तशी छान वाटते, पण तिचा आपल्या विषयी पुरेसा विश्वास पटेपर्यंत ती काही आपल्या वाऱ्याला उभी राहात नाही.
July 12, 2017
शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते.
एक आकाश आणि पोकळी सर्वत्र जाणवते. बाहेर घरांत पेटीत डबीत आणि सुक्ष्म अशा अणूमध्येही. पोकळी तेथे हवा अर्थात आकाश. विशाल वा सुक्ष्म. ह्याच माध्यमातून जगातल्या सर्व वस्तू एकमेकांच्या संपर्कात असून बांधल्या गेलेल्या आहेत. हा वायुरुप पोकळ्यांचा संपर्क असेल. माणसाच्या देहामध्ये देखील हवेचा संपर्क असतो. तसेच आकाशाच्या पोकळी असलेल्या अनेक जागा असतात. प्राणवायु तर जीवंतपणाचे लक्षण होय. वातावरणातील हवेचा सतत संपर्क येणे ह्या क्रिया फुफूसामार्फत देहात चालू असतात. अंतरदेहाचा बाह्य जगाशी ह्याच माध्यमाने संपर्क असतो.
महासागर समुद्र नदीनाले तलाव विहीरी ढग पाऊस आणि सुक्ष्म असा पाण्याचा थेंब. ह्या जगातील अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या द्रवरुप माध्यमाची ही जाण आहे. जमीनीपेक्षाही प्रचंड प्रमाणात पाण्याची रचना केलेली दिसते. मानवाच्या शरिरांत देखील असेच पाण्याचे प्रमाण खूप असते. पाणी हेच जीवन समजले गेले आहे. प्रत्येक अवयवांत व त्याच्या सुक्ष्म पेशीत, सेल्समध्ये मुबलक पाण्याचे प्रमाण असते. देहाच्या जगण्यामधला पाणी हे महत्वाचे अंग असते.
पृथ्वी म्हणजे काय ? प्रचंड प्रमाणात जीचे अस्तित्व असते तो जगाचा भाग. केवळ माती व दगड ह्यानी व्यापलेला. हलकी भुसभुशीत ती माती, व ज्याचे स्वरुप कठीण वाटते तो दगड. तसे दोन्हीही एकच. माती म्हणजे काय असते ? अधुनिक शास्त्राने त्याचे विश्लेशन केले आहे. मातीमध्ये जवळ जवळ ११० मुळ घटक पदार्थ अर्थात Elements (धातू) सापडले आहेत. जसे सोने, चांदी, लोह, तांबे, जस्त, सोडीयम, पोट्याशियम, ऑक्सीजन, हैड्रोजन, क्लोरीन, इत्यादी. हे घटक पदार्थ निरनीराळ्या प्रमाणात मातीमध्येच असतात. वा त्याच्याच प्रमाण बद्धतेनुसार निरनीराळ्या प्रकारची माती बनत असते. माती दगडाचे दृष्य स्वरुप हे भिन्न वाटत असले तरी विश्लेशनात्मक दृष्टीने ते अन्तीमतः मुळ घटक elements याचेच मिश्रण वा संयुक्त होय. निरनीराळे नैसर्गिक गुणधर्म बाळगुन. मानवी देह हा काय आहे ? त्याचेही घटनात्मक विश्लेषन करु लागलो तर तो सुद्धा मातीचाच बनलेला लक्षांत येते. इंद्रिये, अवयव, रक्त , मास, हाडे, कातडी, ह्या सर्व भागांचे विश्लेषन दाखविते की त्याचे गुणधर्म फक्त मातीचेच असतात. ज्यात फक्त असतात मुळ घटक पदार्थ ( Elements). निरनीराळ्या प्रमाणे प्रमाणशील बांधलेले. मृत देह जाळला वा पुरला तर तो शेवटी मातीमध्येच एकरुप होतो. म्हणूनच विद्वानानी मानवी देहाला मातीचा घटाकार म्हटले आहे.
ह्या संपूर्ण घटक पदार्थाचे जर सुक्ष्म रितीने विश्लेषन केले तर आपण अणू (Atom ) ह्या संकल्पने पर्यंत जातो. मुळ घटक पदार्थ ( Elements) नैसर्गिक गुणानी भिन्न भिन्न असतात. आजच्या अद्यावत विज्ञानाप्रमाणे अणूचे विभाजन पून्हा परमाणू त्यांत धन (Positive ) व ऋण (Negative ) शक्ती इत्यादी वर्णने आहेत. ही अणूतील उर्जा शक्ती प्रचंड असते. जी उर्जा अणूत आहे तशीच ती पेशीत देखील सुप्त अवस्थेत असते. पेशीमधल्या एकत्रीत शक्तीमुळेच शरीर मनाचे कार्य़ चालू असते. मानव देहातले तेज म्हणतात ते हेच.
पंच महाभूतांचे म्हणजे आकाश वायु आप (पाणी) पृथ्वी आणि तेज ह्याचेच आस्तित्व ह्या संपूर्ण जगामध्ये , मानवामध्ये असल्याचे जाणवते. वस्तू निराळ्या, नांवे निराळी, गुणधर्म निराळे, परंतु सर्वाचे मुळतत्व एकच असल्याचे आम्हास जाणवू लागते. दिसणारा भासणारा पदार्थ आणि त्यांत असलेली शक्ती. कोणतेही कार्य ज्यातून केले जाते त्या माध्यमाला पदार्थ संबोधले गेले. ज्यामुळे ते कार्य होऊ शकते त्याला चेतना अथवा उर्जा वा शक्ती म्हटले गेले. त्यामुळे प्रत्येक पदार्थ आणि त्यातील उर्जा हे दोन दिसत असले तरी ते एकच समजले गेले आहे. विचारांच्या लाटेत, ज्ञानाच्या सागरांत, समजण्याच्या प्रांतात हे भिन्नतेने वर्णीले जाते. पदार्थ व शक्ती ह्याना एकच स्वरुपांत मानणारे अद्वैत संकलपनेत जातात. जे एकांतले दोन्ही गुणधर्म याना अलग अलग समजतात त्यांची द्वैत विचारसरणी असते. विचार सामान्यजनाला समजण्यासाठी असतात.
२
परंतु सत्य आपल्याच जागी राहते. ते केंव्हाच बदलणारे नसते. ह्यालाच तर म्हटले आहे सत्याची जाणीव Reality Consciousness. परमेश्वर जो आहे म्हणतात तो ह्याच्यापेक्षा वेगळा असू शकेल कां ?
कोणत्याही पदार्थाचे व्यक्तीचे वा तथाकथीत देवाचे वर्णन त्याच्या फक्त गुणांत असते. कदाचित वेगळेपणासाठी प्रत्येकजण त्याला आकाररुपांत जाणू इच्छीतो. मात्र खऱ्या अर्थानी त्याची ओळख पटते ती फक्त गुणवर्णनावरुन. अंटार्टीका ह्या बर्फाछादीत प्रदेशांत राहणारा मानव (एस्कीमो ) सर्व साधारण कुणी बघीतला नाही. वा कुणी सहजतेने तेथे जावून तो बघू शकत नाही. तरी देखील तेथे राहणारा मानव कसा असेल हे आम्हास त्याच्या केवळ गुणधर्मावरुनच कळते. कारण मुख्य गुण समजल्यावर आकार,रंग रुप इत्यादी दुय्यम ठरतात. त्या परमेश्वराचा आकार,रंगरुप इत्यादी गोष्टी समजणे जाणणे ओळखणे ह्या गोष्टी देखील दुय्यम स्वरुपाच्याच नव्हे काय ? परमेश्वराला कुणीही बघीतले नाही असे म्हणतात. ते सत्य असेल. करण गुणधर्म हे स्थीर, स्थीत, आणि सदैव असतात., म्हणूनच त्याला त्याचे हे गुणधर्म संबोधले गेले. मात्र रंग रुप आकार हे अस्थीर व बदलणारे असल्यामुळे असत्य वाटतात. पदार्थ बदलत गेला तरी मुळ गुणधर्म सदैव कायम असेल. हिंदू धर्मात ३३ कोटी देवांची संकल्पना आहे. ह्यात अनेक रंग रुप आकाराचे देव आहेत. हे जरी सत्य मानले तरी सर्वांत एक प्रमुख गुणधर्म अस्तीत्वात आहे, आणि त्याला आम्ही म्हटले " देवत्व, Devine Power, Real Consciousness " हे सर्वात एकच असते. तो सर्व व्यापी, अविनाशी, सर्वशक्तीमान, आणि निराकार असेल तर ह्याच गुणातील अविष्काराचे जाणीवेचे अनुभव मिळणे हा प्रयत्न असावा. सत्य समजण्याचा हाच मार्ग असेल. सगुण रुपाचे दर्शन मिळाले तरी ते अपूर्ण असेल. निराकार आणि सर्वत्र जाणलेले स्वरुप म्हणजे सुक्ष्म पदार्थात अणूरेणूमधली उर्जाशक्ती. जी प्रचंड तर आहेच परंतु सर्वत्र समावलेली आहे. सुक्ष्मापासून स्थुलात. ह्या जगाच्या संकल्पनेत जेंव्हा दोन्ही अर्थात पदार्थ व शक्ती एकच समजले गेले ते परमेश्वराचे स्वरुप. अद्वैत स्वरुप.
मानव आपल्याला चांगलाच समजला आहे. दैनंदीन जीवन चक्रांत आम्ही संपूर्ण जग देखील जाणले. तो महान परमेश्वर सर्वत्र चराचरांत, अणूरेणूत, महासागरांत, नदीतलावांत, डोंगरदऱ्यांत, वनश्रीमध्ये, वन्यप्राण्यात, आगदी तुमच्या आमच्या शरीरांत देखील पसरलेला आहे. त्या परमेश्वराचा अनंत स्वरुप पसारा जाणण्याची कोणतीही शक्यता आपल्या इंद्रियामध्ये नाही. मग तो परमेश्वर कसा दिसू शकेल.
पौरानीक कथा सांगते की श्री कृष्णानी फक्त अर्जुनाला ते ईश्वरी दिव्य स्वरुप दाखवण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाला ते सहन झाले नाही. त्याने स्वतःचे डोळे एकदम मिटून घेतले.
हां एक मात्र शक्य आहे . त्या परमेश्वराचा अंशात्मक अनुभव तुम्हाला मिळू शकतो. जीवनचक्रामध्ये प्रत्येकाला मिळणारा आनंद – समाधान-शांतता अर्थात सत् चित् आनंद हेच तर त्या परमेश्वराचे स्वरुप होय. ह्यालाच म्हणतात Reality of Consciousness वा सत्याची जाणीव
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 2, 2016
श्रावण म्हणजे काळ्या मातीला पडलेलं हिरवं स्वप्न. वृक्षवेलींनी टाकलेली कात म्हणजे श्रावण. काळ्या मातीशी गूज सांगणारा ऋतु म्हणजे श्रावण…. नव्या उल्हासाला उधान आणणारा ऋतु म्हणजे श्रावण…या श्रावणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच…
August 18, 2024

जिम कॉर्बेटचे भारतावर व भारतीय लोकांवर अतिशय प्रेम होते. तो म्हणतो, 'माझ्या भारतातील बहुसंख्य लोक नि:संशय भुकेकंगाल आहेत, धनहीन आहेत. पण ते अतिशय साधे, भोळे, प्रामाणिक, निष्ठावान व कष्टाळू आहेत. माझे त्यांच्याशी प्रेमाचे नाते जडलेले आहे.' जिम बऱ्याच वेळा परदेशी गेला होता पण तो कुठेच रमू शकला नाही कारण त्याचे भारताविषयीचे प्रेम व ओढ! भारत हा त्याचा देश होता. भारताविषयी उल्लेख करताना तो नेहमी 'माझा भारत' असा करत असे. आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकाला त्याने 'माझा भारत' नाव देऊन ते भारतीय जनतेला अर्पण केले आहे. त्याच्या शब्दा-शब्दात भारत व भारतीय लोकांच्याबद्दलचे प्रेम स्पष्ट होते.
आज लोकांना पर्यावरण व पर्यावरणाच्या संरक्षणाचे महत्त्व कळू लागले आहे. पण जिम कॉर्बेटला हे महत्त्व त्याच वेळी कळले होते. जनजागृतीचे कार्य तेव्हाच त्याने सुरू केले होते. तो सभा घेऊन लोकांना पर्यावरणाचे व पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगत असे. १९२६ पासून त्याने पर्यावरण रक्षणाच्या जागृतीसाठी आपली लेखणी उचलली. जंगलतोड, जंगलाच्या भूमीवर अतिक्रमण, पशुहत्त्या, जंगलात लावले जाणारे वणवे या विषयावर तो वृत्तपत्र, मासिकात लिहून जनजागृतीचे काम करत होता. विशेषत: तरूण पिढीला या विषयीचे महत्त्व पटवून देण्याकडे त्याचा जास्त कल असे. "The all India conference for preservation of Wild Life" या संस्थेने पर्यावरणाचे महत्त्व ओळखून त्याच्या रक्षणासाठी प्रयत्न सुरू केले. या संस्थेने जिमशी जवळीक साधली.आता जिमला पण एक चांगले व्यासपीठ मिळाले. या संस्थेच्या Indian Wild Life या मासिकाचा प्रकाशन समारंभ जिमच्या हस्ते झाला होता.
जिमने अनेक लेख लिहिले व त्याला चांगली प्रसिद्धी पण मिळाली. त्याचा "Wild life in village. An appeal" हा लेख तर खूप गाजला. जंगलात लावल्या जाणाऱ्या वणव्याविषयीच्या लेखाची सुरुवात त्याने, "Stop! You fools. Stop." अशी केली होती. या लेखात त्याने अशा लावल्या जाणाऱ्या आगीबद्दल राग प्रगट केला होता. वनाधिकारी, ब्रिटिश अधिकारी तसेच राजे-रजवाडे यांच्याकडून होणारी वन्य प्राण्यांची हत्या व जंगलाचे नुकसान याबद्दल त्याने खूप नाराजी व राग व्यक्त केला होता. पर्यावरणाचे महत्त्व ओळखून त्याच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी प्रयत्न करणारी जिम कॉर्बेट ही भारतातील पहिली व्यक्ती असावी.
जिम कॉर्बेट निसर्गवेडा होता. तो म्हणतो, "निसर्ग ग्रंथाला अंतही नाही व आरंभही नाही. निसर्गाचे ज्ञान निसर्गात राहून शोषले पाहिजे. माझ्या आनंदी जीवनाचे निसर्ग हेच कारण आहे." जिम पर्यावरण, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी मनापासून प्रयत्न करीत होता. त्याच्या सामाजिक कार्यामुळे तो कुमाऊं भागात आदराने ओळखला जात होता.
वन्य प्राण्यांना बंदुकीने शूट करण्यापेक्षा कॅमेराने शूट करणे त्याला जास्त पसंत होते. ही प्रेरणा त्याला फ्रेड चॅम्पियन व त्याच्या 'विथ ए कॅमेरा इन टायगर लँड' या पुस्तकाकडून मिळाली. फ्रेड चॅम्पियनने फ्लॅशलाईटचा वापर करून वाघाचे फोटो घेतले तर त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन जिम कॉर्बेटने दिवसाउजेडी फोटो घेतले. त्याच्या एका उदार दोस्ताने त्याला बेल अँड हॉवेल कंपनीचा सोळा मिलीमीटरचा कॅमेरा दिला. मग त्याने तो कॅमेरा घेऊन जंगलात मनसोक्त भटकंतीचा कार्यक्रम सुरू केला. काही वेळा आपल्या भक्ष्याजवळ, पिल्लाजवळ जिमला भटकताना पाहून वाघांनी नाराजी व्यक्त केली. काही वेळा तो वाघांजवळ पोहचला सुद्धा पण त्याला मनपसंत छायाचित्रीकरण करता आले नाही. कधी कमी जास्त प्रकाश तर कधी काचेवर पाने, धूळ, कोळीष्टके पडत. शेवटी त्याने एक जागा निवडली. दिडशे फूट रूंदीचे खोरं. दोन्ही बाजूला झाडे-झुडपे. मधूनच वाहणाऱ्या झऱ्याला कृत्रिम अडथळे निर्माण करून छोटे धबधबे तयार केले व या 'जंगल स्टुडिओ'त चित्रीकरणाची तयारी केली. मग जिम वाघांना आपल्या जंगल स्टुडिओत आणू शकला. दहा ते साठ फूट अंतरावरून सूर्यप्रकाशात त्याने ४ वाघ व २ वाघिणी आपल्या कॅमेऱ्याने टिपल्या. हे सर्व करायला त्याला साडे चार महिने लागले. आपल्या जंगल स्टुडिओत तो तासन् तास पडून असे आणि विशेष म्हणजे एकाही वाघाने त्याला पाहिले नाही. ६०० फूट लांबीचे सुरेख चित्रीकरण त्याने केले. दिवसाढवळ्या वाघांच्या इतके जवळ जाणे ही अशक्य कोटीतील गोष्ट म्हणून सकाळच्या पहिल्या प्रहरी दिवसाचा प्रकाश हळूहळू पसरत असताना त्याला वाघावर नजर ठेऊन बसावे लागले. जिमने काढलेले जंगलांचे, वन्य पशूंचे फोटो लंडनच्या 'नॅचरल हिस्टरी म्युझियम' मध्ये आजही जतन करून ठेवले आहेत. या फोटोवरून त्यावेळी भारतात वनसंपदा किती संपन्न होती हे लक्षात येते.
१९२० साली जिम कॉर्बेट नैनिताल नगरपालिकेचा उपाध्यक्ष बनला. आपल्या कारकिर्दीत त्याने नैनितालमध्ये खूप सुधारणा केल्या. नैनितालच्या सरोवराकाठी बँड स्टँड बांधले. भूमिगत विद्युतवाहक तारा, आखीव रस्ते, पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा, ड्रेनेज सिस्टिम, झाडांची लागवड, व्यापारी लोकांकडून कर आकारणीचे नियम व त्या अनुषंगाने कायदे आणि या सर्वांच्या अंमलबजावणीसाठी नियमित बैठका! भविष्यात नैनिताल हे पर्यटन स्थळ बनावे हा सुद्धा त्या मागचा हेतू होता.
नैनिताल नगर परिषदेचा तो सभासद असताना नैनिताल परिसरात वृक्षतोड व पशुहत्येला त्याने बंदी घातली. तसे कायदे केले व त्यांची कडक अंमलबजावणी सुरू केली. नैनितालच्या पायथ्याशी असलेल्या पाटलीदून परिसरातील जंगल व पशुधन वाचवण्यासाठी त्या परिसराला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्याचे त्याने प्रयत्न केले. त्याच्या प्रयत्नांना यश येऊन ६ ऑगस्ट १९३६ साली या परिसराला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला व भारतातील पहिले व जगातील तिसरे राष्ट्रीय उद्यान 'हॅले नॅशनल पार्क' नावाने अस्तित्वात आले. आज हेच पार्क 'जिम कॉर्बेट नॅशनल पार्क' म्हणून जगात प्रसिद्ध आहे.
नैनिताल परिसरात सुद्धा पक्ष्यांचे अभयारण्य त्याने स्थापन केले. पूर्वपरवानगीशिवाय कोणीही झाडे तोडू शकत नव्हते. आणि जर झाड तोडले तर तसलेच झाड लावून त्या झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी झाड तोडणाऱ्या व्यक्तीवर असे. एके दिवशी नैनितालच्यां चर्चचे प्रिस्ट एक झाड तोडण्याची परवानगी मागण्यासाठी जिमकडे आले. कारण त्या झाडामुळे क्लॉक टॉवरवरचे घड्याळ नीट दिसत नव्हते. पण जिमने त्या प्रिस्टनासुद्धा नियमातून कोणतीही सवलत दिली नाही.
इतकेच नाहीतर त्यावेळी घोडे, गाढवे तसेच खेचरांचा कामासाठी वापर केला जात असे. या मुक्या जनावरांनासुद्धा आठवड्यात किमान एक दिवस तरी विश्रांती मिळेल याकडे सुद्धा जिमचा कटाक्ष होता. दुसऱ्या महायुद्धाच्या `समाप्तीपर्यंत नैनिताल व आजूबाजूचा परिसर जिमच्या नजरेखाली होता. त्यामुळे इथे वनश्री बहरली. पशु-पक्ष्यांची वर्दळ वाढली. आज मात्र हे काहीच उरलेले नाही.
१९१४ साली पहिल्या महायुद्धाचा वणवा पेटला. त्यावेळी जिम मोकामा घाट या ठिकाणी रेल्वेत काम करीत होता व त्याचे वय होते ३९ वर्षे! लष्करात द्राखल होण्यासाठी तो कलकत्त्याला पोहोचला. पण त्याचे वय पाहून त्याला लष्करात प्रवेश दिला गेला नाही. १९१७ साली त्याने परत प्रयत्न केला तेव्हा मात्र त्याला लष्करात दाखल करून घेण्यात आले व कॅप्टन हा हुद्दा मिळाला. अल्पावधीतच त्याने कुमाऊंमधील ५०० तरुणांची तुकडी बनवली व सर्वजण १९१७ च्या मे-जूनमध्ये मुंबईमार्गे इंग्लंडला रवाना झाले. ही तुकडी लष्करात No 70 kumoan Company म्हणून ओळखली जाऊ लागली व या तुकडीची फ्रान्समध्ये रणभूमीवर रवानगी झाली. जिमला स्वत:पेक्षा या तरुणांच्या जीवाची जास्त काळजी होती. युद्धानंतर बक्षिसे, ट्रॉफिज मिळवून सर्वजण सुखरूप परत आले. जिम आता कॅप्टनचा मेजर बनला होता. त्याला 'व्हॉलेंटियर्स डेकोरेशन' हा बहुमान देण्यात आला.
१९३९ साली हिटलरने सर्व जगाला महायुद्धाच्या वणव्यात ढकलले. १९४३ साली जपानी सेना ब्रह्मदेशात पोहोचून भारताचा दरवाजा ठोठावू लागली. हा सर्व प्रदेश पर्वतशिखरांनी, घनदाट जंगलांनी वेढलेला! दोस्त राष्ट्रातील तरुण सैनिकांना हे सर्वच अनोळखी होते व जपानी सैन्य याचा पुरेपूर फायदा उठवत होते आणि एके दिवशी जिम लष्करी कार्यालयात हजर झाला. लष्कराला अशा जाणकाराची गरजच होती आणि तसा माणूस मिळाला. जाणकार, सल्लागार, शिक्षक म्हणून जिम, फ्रँक मूर यांना भेटला. ते ३९ व्या ट्रेनिंग डिव्हिजनचे कमांडर होते. जिमची लेफ्टनंट कर्नल म्हणून नेमणूक झाली व छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे नियुक्ती झाली. आता जिमवर जबाबदारी होती या तरुण जवानांना जंगलाचे ज्ञान देण्याची! वनस्पतींची, प्राण्यांची ओळख, त्यांच्या सवयी याविषयी माहिती करून देण्याची! तसेच आणिबाणीच्या प्रसंगी घेण्याची काळजी, दक्षता, कृती, अवघड प्रसंगी मार्ग कसे काढायचे हे सांगण्याची! हे सर्वकाही १४४/ हिमशिखरांच्या सहवासात जिम त्यांना सांगत होता, दाखवत होता, शिकवत होता, पारंगत करत होता. एक अनोखे ज्ञान तो देत होता की जे प्रत्यक्ष युद्धभूमीवर जरूरीचे होते, उपयोगी ठरणारे होते. जिमने काही काळ ब्रह्मदेशातही वास्तव्य केले. तेथील जंगले त्याने निरखली. त्या काळात अनेक अमेरिकन वैमानिक त्याचे मित्र झाले होते.
--प्रकाश लेले
September 30, 2022

“गेटवे” पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभातील प्रमुख पाहुणे कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या भाषणातील निवडक मुद्दे.
April 13, 2022
कागदावर काय नाही अवतरतं याचा विचारही आपण करू शकत नाही. कागदावर भाषण अवतरतं, आश्वासन अवतरत. निवडणूकीची घोषणा अवतरते. इतक्या साऱ्या रंगात न्हाऊनही कागदाचा स्वत:चा रंग मात्र कोराच राहतो. तो रंगतो आपल्या शब्दांत, आश्वासनात त्याचे अंतरंग मात्र कोरेच राहते…. कोरा कागज सारखे… कदाचीत तोही म्हणत असेल का मनातल्या मनात… ‘मेरा जीवन कोरा कागज… कोरा ही रह गया…..!’
October 23, 2019
“मास्क” या शब्दाशी आणि वस्तूशी “सामान्य माणसाचा“ दुरदुरपर्यंत संबंध नसायचा . पण आता काळाची चक्र अशी काही फिरली की “मास्क” हा शब्द तर परवलीचा झालाचं आणि तो वापरणं एक मुख्य गरजही होऊन बसली
September 8, 2021
नैराश्य आणि वैराग्य या दोन वेगळ्या वाटा आहेत, हे ज्याला समजलं तो आपल्या मानसिक स्थितीची योग्य फोड करून त्यावर काम करू शकतो किंवा त्याला सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न करू शकतो.
February 5, 2022
मीरा अजूनही वेशीबाहेर उपेक्षित आहे- मग ते वसंत कानेटकरांचे “मीरा-मधुरा ” हे नाटक असो वा गुलजारचा “मीरा”असो. हायसे इतकेच वाटते की “मीरेवर ” या गोष्टींचा परिणाम होत नाही. ती विरक्तीच्या पल्याड गेली आहे आणि कृष्णात विरून गेली आहे.
November 20, 2022
बलसागर भारत होवो ।
विश्वात शोभूनी राहो । धृ. !।
हे कंकण करि बांधियले ।
जनसेवे जीवन दिधले ।
राष्ट्रार्थ प्राण हे ठरले ।
मी सिद्ध मरायाला हो ।
बलसागर भारत होवो ।।१।।
वैभवी देश चढवीन ।
सर्वस्व त्यास अर्पीन ।
हा तिमिर घोर संहारीन ।
या बंधू सहाय्याला हो ।
बलसागर भारत होवो ।।२॥।
हातात हात घेऊन ।
हृदयास हृदय जोडून ।
ऐक्याचा मंत्र जपून ।
या कार्य करायाला हो ।
बलसागर भारत होवो ।।३।।
करि दिव्य पताका घेऊ ।
प्रिय भारत गीते गाऊ ।
विश्वा पराक्रम दावू ।
ही माय निजपदा लाहो ।
बलसागर भारत होवो ॥४॥।
याउठा करु हो शर्थ ।
संपादु दिव्य पुरुषार्थ ।
जीवन हे ना तरि व्यर्थ ।
भाग्यसूर्य तळपत राहो ।
बलसागर भारत होवो ॥५॥।
ही माय थोर होईल ।
वैभवे दिव्य शोभेल ।
जगतास शांति देईल ।
तो सोन्याचा दिन येवो ।
बलसागर भारत होवो ॥६।।
June 11, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti