नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
देशभरातील राजकारणी रोजच्या रोज पुनरोच्चार करत असलेल्या “स्वबळावर” या संज्ञेचा मी किचनमधे वापर करुन स्वबळावर दोघांसाठी उप्पिठ करायचा घाट घातला आणि घात झाला. कीचनमधील कारकीर्दीच्या पहिल्याच प्रयत्नात ” जेवणाशिवाय किचनमधे फिरकू नका ” अशी तंबी मिळाली.
August 31, 2019
दादाचा विश्वासच बसेना. ती त्याला संशोधनाची माहिती सांगितली. आता मी प्राणी किंवा माणूस एक दिवसापासून एक वर्षापर्यंत जिवंत ठेवू शकतो इतकी प्रगती केली आहे हेही सांगितलं. त्याला हे पण स्पष्ट केलं की हे अत्यंत गुप्त संशोधन आहे आणि याची वाच्यता कुठेही करू नकोस. नंतर घरातल्या देवासमोर बेलभंडारा उचलून मी त्याच्याकडून गुप्ततेची शपथ वाहून घेतली.
June 21, 2022
नेहमीच्या कोपर्यावर मी मोटार थांबवली. माझे ऑफिसातले मित्र आंत चढले. मोटार ऑफिसच्या दिशेनं धावूं लागली. ‘‘आज साठे दिसत नाहीं’’, मी म्हणालो. ‘‘तुम्हाला माहीत नाहीं कां पराडकर ? साठेला मुलगी झाली.’’ पाटीलनं सांगितलं, ‘‘हो कां ? अरे वा !’’, मी. साठे हा आमच्या ऑफिसातला एक तरुण ऑफिसर. त्याच्या खेळकर स्वभावामुळे तो सर्वांनाच आवडत असे. दीडएक वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. आतां मुलगी झाली होती. बेटा अगदी खुशीत असणार ! साठे भेटला की त्याचं अभिनंदन करायचं मी ठरवलं.
दुसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मित्र कारमध्ये चढले. आज साठेही होता. ‘‘साठे, अभिनंदन !’’, मी. ‘‘थॅंक्यू’’ , साठे. ‘‘बर्फी हवी बरं का साठे’’, मी. ‘‘छे छे, बर्फीनं भागणार नाही, पार्टीच हवी’’, काळेनं फर्माईश केली. ‘‘देऊं ना’’, साठे म्हणाला. पण त्याच्या बोलण्यात उत्साह दिसत नव्हता.
कार पुढे धावत होती. संभाषणाला खीळ पडली होती. नेहमीचा खेळकर साठे आज इतका गप्प गप्प कां? मी विचार करत होतो. अखेर न राहवून मी विचारले, ‘‘काय साठे, आज अगदी गप्प आहेस ? बाळ बाळंतीण ठीक आहेत ना ?’’. साठेच्या आधी पाटीलनंच उत्तर दिलं, ‘‘त्याचं काय आहे, मुलगी झाली म्हणून साठे नाराज झालाय्’’. ‘‘खरं का रे’’, मी. साठे गप्पच. त्याला समजवत मी म्हणालो, ‘‘अरे, नाराज कशाला व्हायचं? उलट खूषच व्हायला हवं. म्हणच आहे, पहिली बेटी धनाची पेटी’’. ‘‘हो धनाची पेटी ! मला आत्तांपासूनच धन जमवायच्या मागे लागायला हवं, म्हणजे मुलीच्या लग्नासाठी धनाची पेटी तयार करता येईल’’, साठे उद्गारला. ‘‘अरे साठे, मूल होणं ही किती आनंदाची गोष्ट आहे ! त्यातून तुझं तर पहिलं मूल ! मुलगा काय, मुलगी काय, सारखंच’’, काळे म्हणाला. त्याला लग्नानंतर पांच वर्षांनी मूल झालं होतं. पण साठेला काळेचं सांगणं पटलं नाही. ‘‘अरे बाबा, एवढं सोपं नाहीं तें. आज मुलीच्या लग्नाला चार-पांच लाख खर्च येतो. पंचवीस वर्षांनी पंधरा-वीस लाख तरी लागतील. आपण मध्यमवर्गीय माणसं, आपला पगार तो कितीसा, अन् त्यातून शिल्लक किती पडणार ? महागाई तर दिवसेदिवस वाढतेच आहे ! मुलीला वाढवायचं, शिकवायचं, ग्रॅज्युएट-पीजी करायचं. त्यातून तिने इंजिनियरिंग किंवा मेडिकलला जायचं म्हटलं तर झालंच ! एवढं सगळं करून इतके लाख शिल्लक टाकायचे कसे अन मुलीचं लग्न करायचं कसं ?’’, साठे व्यथित झाला होता. जणूं मुलीचं लग्न उद्यावर येऊन ठेपलं होतं !
मी वेगळा मुद्दा मांडत साठेची समजूत काढू लागलो, ‘‘पण मुलगा होणं किंवा मुलगी होणं आपल्या हातात थोडंच असतं ? मग मुलगाच व्हावा अशी अपेक्षा ठेवणं योग्य आहे कां ?’’. ‘‘पराडकर, तुमचं काय जातं असं म्हणायला?’’, साठे चिडून बोलला, ‘‘तुम्हाला दोन्ही मुलगेच आहेत. जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे !’’.
खरं म्हणजे मला साठेशी खूप बोलायचं होतं. मुलगा किंवा मुलगी असा प्रेफरन्स मला नव्हता, हे त्याला सांगायचं होतं. हल्ली मुली मुलांच्या बरोबरीने चमकतात, स्त्रिया पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत, हेही सांगायचं होतं. ह्या विषयाचे वेगवेगळे पैलू आहेत, त्यांची चर्चा करायची होती. पण साठेचा मूड् बघून मी विषय वाढवला नाही. बाकीची मंडळीही उरलेला रस्ता गप्पच राहिली.
संध्याकाळी साठे ओव्हरटाईमला थांबल्यामुळे आमच्याबरोबर नव्हता. साहजिकपणें पुन्हां साठेचाच विषय सुरुं झाला. ‘‘साठेनं मुलगी झाल्याचं फारच मनाला लावून घेतलं आहे’’, मी म्हणालो , ‘‘खरं म्हणजे मुलगा किंवा मुलगी होणं किंवा न होणं हें आपल्या हातात नसतं’’. ‘‘खरं आहे, पण साठेसारखे लोक बरेच आहेत, पराडकर’’ , इति पाटील.
पाटील सांगूं लागला, म्हणाला, ‘‘माझा एक परिचित आहे, लिमये. त्याला दोन मुली आहेत. बायकोची प्रकृती यथातथाच आहे. तिसरं मूल नको असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण ह्या सद्.गृहस्थाला मुलगा हवाच होता, म्हणायचा, ‘मुलगा नसला तर मला सद्गती मिळणार नाहीं’. जग एकविसाव्या शतकात पोंचलंय आणि याचे असे जुनाट विचार ! बायकोला तिसर्यांदा दिवस राहिले. ह्याला कांही चैन नाहीं, मुलगा होईल की मुलगी ? गर्भतपासणी करून घेतली”. ”अरे, पण तशी चाचणी तर बेकायदेशीर आहे”. ”हो, पण तरीही घेतली करून. मुलगी आहे असा निर्णय समजला. झालं. हा पठ्ठ्या बायकोच्या मागे लागला की गर्भपात करून घे. दोनचार दिवस तिनं तग धरला. पण हा कांही पाठ सोडेना. शेवटी ती बिचारी नाइलाजानें तयार झाली. अन् सांगायची गोष्ट म्हणजे गर्भपाताच्या वेळी ती बाई रक्तस्त्रावाने जवळजवळ मेलीच होती, केवळ सुदैव म्हणून वाचली ! त्या वेळी तिची मोठी मुलगी होती चार वर्षांची अन धाकटी दोन वर्षांची. आतां बोला ! ”. ”बिचारी बाई खरोखरच जर मेली असती तर त्या लहान जिवांचे काय हाल झाले असते !’’, काळे त्वेषानं उद्गारला. ‘‘खरी गंमत पुढेच आहे’’, पाटील म्हणाला, ‘‘थोड्या दिवसांनी बाईला पुन्हां दिवस राहिले, अन या वेळी मात्र तिला मुलगाच झाला’’. ‘‘त्या लिमयेला अगदी धन्य धन्य झालं असेल!’’ मी म्हणालो. ‘‘हो ना ! त्याला आता आभाळ ठेंगणं झालंय. आतां स्वर्गात जायची सोय झाली ना !’’ पाटीलची प्रतिक्रिया.
”पण साठे काय किंवा लिमये काय, यांच्या या अवस्थेला आपली समाजरचनाच जबाबदार आहे”, काळे म्हणाला, ”अगदी माझ्या घरातलंच उदाहरण सांगतो. परवाचीच गोष्ट. माझी बायको नलू सांगत होती – ‘दुपारी मी आणि शेजारची सुमा बोलत उभ्या होतो. पलिकडच्या मालतीकाकू त्यांच्या पुष्पाच्या बाळाला घेऊन जात होत्या. त्या आमच्याशी बोलायला थांबल्या. मी कौतुकानं म्हणाले, कित्ती छान जावळ आहे बाळाचं. तर म्हणतात कशा, ‘असं बोलूं नये हो. बाळाला दृष्ट लागेल’. मला अस्सा राग आला. नंतर मी सुमाला म्हटलं सुद्धा, आमची कशी दृष्ट लागेल ? आम्हाला मुलं नाहींत की काय ?’. नलूचं बोलणं ऐकून मी थक्कच झालो . म्हटलं , ‘मालतीकाकूंचं जाऊं दे ; अल्पशिक्षित म्हातारी ती. पण तूं ! तूं तर कॉलेजात फिजिक्सची लेक्चरर आहेस ! दृष्ट लागणं अन त्यातूनही निपुत्रिकेची दृष्ट लागणं असल्या अंधश्रद्धांवर तुझ्यासारखी बाई विश्वास ठेवते म्हणजे मात्र कमाल आहे !’ . ’माझा विश्वास आहे की नाहीं ते जाऊं द्या’, नलू म्हणाली, ‘जगाचा तर आहे ना ! आपला विश्वास असो वा नसो, समाज आपल्याला अशा गोष्टींमध्ये जखडून ठेवतो. इतकी वर्ष आपल्याला मूल नव्हतं. तेव्हां याच बायकांच्या बोचर्या नजरा मला घायाळ करत, त्यांची कुत्सित बोलणी ऐकवत नसत. आतां देवानं मला सोन्यासारखी मुलगी दिली आहे. आतां मी दुसर्यांची बोलणी कां म्हणून ऐकून घ्यावी ?’ या अजब तर्कानं मी सर्द झालो”, काळेंनं गोष्ट पूर्ण केली. मग काळेनं विचार मांडला, ”सांगायचा मुद्दा असा की, समाजाची रचना, समाजाच्या रूढी बदलायला हव्यात. तरच साठे आणि लिमयेसारखे लोक मुलगी झाली म्हणून दुःखी होणार नाहींत”.
*
पाटील अन् काळे नेहमीच्या कोपर्यावर उतरून गेले. कार घराकडे धावत होती. कारबरोबर माझे विचारही धावत होते. कधी बदलणार हा समाज ? दुष्ट रुढी कधी नाहींशा होतील ? कधी स्त्रियांना समाजात बरोबरीचं, मानाचं, स्थान मिळेल ? आपल्यासारखी माणसं त्यासाठी काय काम करूं शकतील? एक ना दोन, अनेक विचार.
विचारांच्या नादात घर केव्हां आलं ते मला कळलंच नाहीं, कार पार्क करतां करतां मी ठरवलं की गेल्या गेल्या लगेचच स्त्रीस्वातंत्र्य-पुरस्कर्त्या आपल्या बायकोला आजची सर्व चर्चा सांगायची.
घरात पाऊल टाकतांच दिसलं की माझी चुलतबहीण रजनी आलेली होती अन् ‘मुलगा व्हावा’ म्हणून कुठलसं व्रत धरल्याचं ती माझ्या बायकोला सांगत होती. मी ओठावरचे शब्द तात्पुरते गिळून टाकले.
+ + +
( Note – This story is based on a real-life experience. The Author has taken some literary liberties. Name of characters have been changed ).
_ _ _
[ पूर्वप्रसिद्धी : ‘कीर्तिस्तंभ’ पाक्षिक, वडोदरा ( बडोदा) , आवृत्ती दि. ०१.०९.१९९६.
कांहीं बदल : १४ फेब्रु. २०१८ ]
= = =
- सुभाष स. नाईक Subhash S. Naik
मुंबई.
M - 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com , www.snehalaatnaik.com
February 19, 2018
पन्नास वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत असताना घरात ‘इस्त्री’ हा प्रकार नव्हता. फक्त वडिलांचेच कपडे अधूनमधून जवळच्या लाॅन्ड्रीतून इस्त्री करुन आणावे लागत. मी सर्वात लहान असल्याने ते काम माझ्याकडेच असायचे. ती ‘लक्ष्मी लाॅन्ड्री’ होती राऊत नावाच्या माणसाची. त्याचा मुलगा माझ्या वडिलांचा विद्यार्थी.
July 3, 2021
सांगली जिल्ह्यातील बिसुर या खेडेगावात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची, वडील सुतगिरणीमध्ये काम करुन उर्वरित वेळेत बिघा – दोन बिघा शेतजमिनीत जमेल तेवढं काम करत होते. आई आमचा सांभाळ करायची. जवळ जवळ सर्व शेती निसर्गावर अवलंबून होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वर्षभर जिकिरीनं पुरवावं लागत होतं. मोठ्या दोन बहिणींची लग्न होवून त्या सासरी गेलेल्या होत्या.
December 27, 2023
पहाट होते.जाग येते.सूर्य उगवतो . तसा वेध लागतो.उरक वाढतो. आंघोळ होते . सकाळचा चहा होतो. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम सुरू असतात. नियमितपणे. बातम्या , भक्तीसंगीत, आरोग्याचे कार्यक्रम वगैरे. जेवणाचा डबा तयार होतो. तोपर्यंत असते दारात हजर वर्तमानपत्र . ठळक बातम्या आणि संपादकीय पानावर लेख वाचण्याची मजा काही औरच. पक्षांचा किलबिलाट.. मंदिरातील घंटा घण्- घण वाजते. सूर्य किरणं हळूच पसरतात जमिनीवर . नकळत बागेतली , दारातली , कुंडीतील फुलं बघतात डोकावून.आज तोडण्यासाठी कुणाचा नंबर आहे ते ?
दिवस सरकत जातो.रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढते.. लालपरी मुक्कामाच्या गावावरून निघते. प्रवाशांची धांदल उडते.भाजीवाले,दुधवाले , खारी, पाववाले ओरडून विकतात.आपला माल... शिक्षक करतात प्रवास गाडीने . जेवणाचे डब्बे असतात सोबतीला.मुलंही पळतात शाळेच्या ओढीने . दप्तरात आपले भविष्य घेऊन . वडाच्या, पिंपळाच्या झाडावर भरते पाखरांची शाळा. गाव, नदी, डोंगर, रस्ता , चौक होतात जागे सेवेसाठी. मुलं शाळेत गोळा झाली की गजबज होतो सुरू. परिपाठाने घुमतो परिसर. सडा रांगोळीने सजते घर. शेतातील कामाची असते लगबग. खुरपणी , कोळपणी, नांगरणी, पाळी, पेरणी, राखणी, गुरांची सोडबांध , वेचणी , तोडणी यांचा असतो समावेश . शाळेत पहिला तास सुरू होतो. प्रसन्न मुद्रेने असतात सर्वचजण. हजेरी होते. वेळापत्रक असते.तासिकेनुसार शिक्षक बदलतात. भाषा, गणित, विज्ञान, कला, इतिहास , भूगोल हे असतात विषय . जे शिकवतात. जे घडवतात उद्याचा भारत. प्राथमिक शाळेतच घडत असते भविष्य .. शाळेत नसतो निर्जिव दगडांच्या सांगाडा .भींत बोलत असते मुलांशी . संवाद होतात फळ्यावरच्या अक्षरांशी. संवाद होतात रंगवलेल्या भिंतीशी.निसर्गातील प्रत्येक घटकांशी.. सकाळ सरून जाते पटकन.दुपारची चाहूल लागते. अंगाला ऊन स्पर्श करून जाते.जाणिव करून देते.पोटात ओरडतात कावळे. न्याहारीचा वखत टळून गेलेला. मुलं बघतात . किचनशेडकडे . भात , वरण , खिचडी की अजुन काही. हात धुवून तयार असतात.गाडीला अडकवलेला डबा पटकन येतो हातात. मनसोक्त होते पंगत . रानात सुटतात मजूर . दुपारच्या भाकरीसाठी. लसणाची चटणी आणि पाट्यावर रगडलेला ठेचा असतो . तोंडी लावण्यापुरता. कामाचा पडतो विसर . कारण कोणते तरी एक गाणं असत सोबतीला.असेच दिवस पडतात मागे एकेक ....प्रत्येक दिवसाची सकाळ असते नविन काही देणारी .. शिकवणारी ...
विठ्ठल जाधव
शिरूरकासार (बीड)
मो.9421442995
vitthalj5@gmail.com
May 17, 2017
आपण विविध भाषांमधील, मृत्युविचार express करणार्या काव्यावर ज़रा नजर टाकूं या. ‘जो न देखे रवि । सो देखे कवि ।’ अशी उक्ती आहे. त्यामुळें, हें पाहणें interesting ठरेल की कवींच्या नजरेतून मरण कसें दिसतें.
July 23, 2017
जेट एअर वेजच्या विमानाने मुंबईतून दुबईच्या दिशेने झेप घेतली. शबानाचे मन त्याच्यापेक्षा अधिक वेगाने आरिफकडे धावले. स्वतंत्र संसाराची सोनेरी स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्याचा क्षण काही तासांवर येऊन ठेपला होता. शबानाचे आरिफशी लग्न होऊन चार वर्षांचा काळ लोटला होता. लग्नानंतर दुसऱ्या वर्षात आरिफला एका कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाल्यामुळे तो तिकडे गेला. कोकणातल्या गावी सासू, सासरे आणि धाकटा दीर यांच्या सोबत शबानाला राहावे लागले. सासूचे आजारपण सततचे असल्यामुळे त्या घराची जबाबदारी शबानावर पडली. आरिफ वर्षातून एकदा एक महिन्याच्या सुटीवर गावी यायचा. तेवढ्या एकच महिन्यापुरते दोघांचे सहजीवन असे. पुढे दिराचे लग्न होऊन जाऊ घरात आली. सासूचा संसार चालवत असल्याची खंत शबानाच्या मनात सलत असे. जावेचे घरात आगमन झाल्यावर तिथून सुटका होण्याची तिची आशा पालवली. तेथून घेऊन जाण्याचा लकडा तिने आरिफकडे सुरू केला. सगळ्यांच्या विचारांचे एकमत होऊन तिची पाठवणी आरिफकडे करण्याचे ठरले. दिराने तिला मुंबईच्या विमानतळावर सोडले. आरिफ तिला घेण्यासाठी विमानतळावर येणार होता, तरीपण दक्षता म्हणून त्याच्या घराचा व कंपनीला पत्ता तिने एका कागदावर लिहून घेतला होता.दुबईच्या एअरपोर्टवरून बाहेर पडण्याचा गेटजवळ तिने थांबावे असे तिला बजावून ठेवले होते. आखाती देशातील वैभव, झगमगाट याविषयी तिने आरिफकडून खूप ऐकले होते. कोकणातल्या लहान गावातून तिकडे जाण्याची भुरळ तिच्या मनाला पडली. नवऱ्यासोबत राहून ती आता जीवनाचा भरपूर आनंद लुटणार होती.
June 12, 2026
ही माझी कथा २८ जुलै २०१९ च्या ‘सकाळ’ मधे कथास्तु या सदरात प्रसिद्ध झाली आहे.
March 17, 2022
सत्यकाम अगदी एकटा पडला. त्याचे सर्व खेळगडी त्याला सोडून गेले होते. त्यांच्या आईबापांनी त्यांची उपनयने करून त्यांना विद्याध्ययनासाठी गुरुगृही पाठवून दिले होते
November 15, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti