नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
डॉ. शांताराम कारंडे यांच्या ‘आयुष्य’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहातील माझी सर्वात आवडती म्हणजे माझ्या मनाला भावलेली कविता ‘वेश्या’ या कवितीचे रसग्रहण मी येथे लिहणार आहे. आपल्या या कवितेत डॉ.शांताराम कारंडे सुरवातीच्या चार ओळीत लिहतात...
मी पण एक स्त्री आहे,
अडगळीत पडलेली
‘वेश्या’ म्ह्णतात मला,
पोटासाठी अडलेली
या चार ओळीतून कविला सुचवायचे आहे की वेश्येकडे समाजाने एक उपभोगाची वस्तू म्ह्णून न पाहता एक स्त्री म्ह्णून पाहायला हवे जसे आपण आपल्या आया - बहिणींकडे पाहात असतो. आणि त्या जे काही व्यवसाय म्ह्णून करत आहेत आहेत ते आपल्या पोटापाण्यासाठी आपल्या मनाविरूद्ध करत आहेत हे ही लक्षात घ्यायला हवे.
इच्छा मन भावना माझ्या,
सार्या काही मेलेल्या
उरल्या – सुरल्या त्याही,
किंमत मोजून गेलेल्या
या पुढच्या चार ओळीत
या ओळीतून कविने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोणतीही स्त्री स्वतःच्या मर्जीने वेश्या झालेली नसते. वेश्या होण्यापूर्वी तिने आपल्या मनाला आपल्या भाव-भावनांना आवर घातलेला असतो असं नाही तर तिने त्यांचा गळा घोटून त्यांना ठार मारलेले असते. इतक करूनही जर काही भावना जिवंत राहिल्याच तर त्याही त्या त्यांना पैशाच्या बदल्यात विकाव्या लागलेल्या असतात.
उघड्या डोळ्यांनी अनुभवतो,
स्वतःवरील बलात्कार...
तरीही आशेवर जगतो,
घडेल काही चमत्कार...
या पुढच्या ओळींमध्ये कवितेत दडलेली दाहकता जाणवते. कोणतीही स्त्री स्वतःच्या मर्जीने वेश्या झालेली नसते त्यामुळे तिचा जेंव्हा जेव्हा पुरूषांशी शारीरिक संबंध येतो तेंव्हा प्रत्येक वेळी तो तिच्या मनाच्या विरूद्धच असतो त्यामुळे त्या प्रत्येक वेळी तिला तिच्यावर बलात्कार झाल्याचाच अनुभव येत असतो. पण ती हे सारं निमूटपणे सहन करत असते. आणि कधी तरी आपली सुटका करणारा कोणीतरी आपल्या आयुष्यात येईल या आशेवर जगत असतात. हे कवीने अगदी नेमक्या शब्दात मांडलेले आहे.
रोजच होतो मधुचंद्र,
तरीही हक्काचा नसतो कोणी
मंगळसूत्र फक्त शोभेला,
कुंकवाचा नसतो धनी
या ओळीत कवीने वेश्यांच्या मनाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे मधुचंद्र या गोष्टीला प्रत्येकाच्या जीवनात एक वेगळे महत्व असते. पण वेश्या व्यवसाय करणार्या स्त्रियांना तो अनुभव जीवघेणा वाटत असतो कारण त्यांच्या मनाविरूद्ध त्यांचा रोजच मधुचंद्र होत असतो.
वेश्या व्यवसाय करणार्या काही स्त्रिया विवाहित ही असतात पण त्यांच्या नवर्यांनीच त्यांना या व्यवसायात ढकलेले असते अथवा यांच्या जीवावर ते जगत असतात बांडगुळासारखे. ते त्यांच्या कुंकवाचा आधार फक्त नावाला असतात प्रत्यक्षात त्यांना त्यांचा आधार कधीच मिळत नाही.
पोटच्या आमच्या गोळ्याला,
नावं नसतं बापाचं
जन्माआधीच मरण,
भोगतो आमच्या पापाचं
या चार ओळीत वेश्यांना होणार्या मुलांची बाप म्ह्णून कोणी जबाबदारी घेत नसतो आणि समाज त्यांच्याकडे एक पाप म्ह्णूनच पाहात असतो आणि पुढे जाऊन ते पापीच होणार हे त्यांच्या जन्मा अगोदरच गृहीत धरतो हे कवीने सुचविले आहे.
तारूण्यात आमच्या,
जगण्याला असतो ‘अर्थ’
म्हातारपणात मात्र
जगणंच होतं व्यर्थ
जो पर्यंत वेश्या व्यवसाय करणार्या स्त्रिया तरूण असतात तोपर्यत त्यांचा उपभोग घेणार्यांचा राबता असतो पण त्यांचे तारूण्य ओसरले की सारेच त्याच्याकडे पाट फिरवतात आणि त्यांच्या जगण्यालाही काही अर्थ उरत नाही हे कविने या चार ओळींतुन अगदी सहज सुचविले आहे.
लखलखत्या प्रकाशात असताना,
आंम्ही स्वतःच करायचो अंधार
आता रोज सूर्य उगवतो तरी,
आयुष्याचा झालाय अंधार
या कवितेच्या शेवटच्या चार ओळीत कवी
सुचवतो की काही स्त्रियां आपल्या सौंदर्याच्या अभिमानात आणि तारूण्याच्या जोशात आणि पैशाच्या हव्यासापायी स्वतःच्या मर्जीनेही वेश्या व्यवसाय व्यवसाय म्ह्णून स्वीकारतात त्यांच्या वाटयाला ही शेवटी फक्त अंधारच येत असतो हे सत्य मांडलेले आहे.
लेखक – निलेश बामणे
February 22, 2016
आयुष्याचा प्रवास आता उत्तम आहे.. जरी जग रडत असॆ तरी.. ती तीच आहे.
August 16, 2021
शहरीकरणानंतर घरातल्या दोघांनी काम करणं आवश्यक झालं, मग त्यातून शहरातल्या लहान जागेमुळे आजी आजोबा गावी आणि मुलं शहरात. कुटुंब लहान होत गेली, त्यातून मुलांवर संस्कार करणारी पिढीच नामशेष होऊ लागली. त्यामुळे मुलंही त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ वेगळाच घेऊ लागली आणि नको त्या संगतीत रमू लागली तेव्हा कुठेतरी सहिष्णुतेचे गणित बिघडू लागलं आणि मग अरेरावी, मुर्दाडपणा, फक्त मी आणि मी ही भावना वाढू लागली.
August 19, 2023

माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मैत्रिणींना राज माझा होणारा जिजू आहे असंच माहिती होतं. तो कधीकधी कॉलेजवरून जाताना मला भेटायला येत असे. मग आम्ही कॉफीशॉपमध्ये जाऊन गप्पा मारत असू. कधी लेक्चर्स ऑफ असतील तर मुव्ही बघायला पण जात असू.
September 30, 2019
थोर भारतीय संस्कृती’‘असें आपण सदासर्वदा म्हणत असतो, आपल्याला या संस्कृतीचा अभिमानही असतो. संस्कृतीतील चांगल्या गोष्टीबद्दल अभिमान असणें रास्त आहे ; पण संस्कृतीचें हेंही दुसरें, अयोग्य, हीन रूप आहे, आणि त्याला राजमान्यता होती , ‘शिष्टजनां’ची मान्यता होती, हेंही आपण विसरतां कामा नये.
March 9, 2019
मी एकदम शॉकड्… जायचं हे माहित होतं. पण असं? नीलम पुढे म्हणाली, तुझा पासपोर्ट, व्हिसा, तिकीट आणि करंन्सी तुला अटेंडंट एअर पोर्ट वर रात्री 12 वाजता आणून देईल. तू आत्ता फोरेक्स् कार्ड घे झेराकडून आणि घरी जाऊन तयारी कर. तसही तुझा पासपोर्ट येई पर्यंत 7- 8 वाजतील.
February 3, 2022

स्त्री कोणत्या घरांत जन्मली आहे ह्यापेक्षा तिचं सौंदर्य, तिची कोमलता, तिचा कमनीय बांधा, तिची मोहकता, तिचा स्वाभाविक डौलदारपणा, तिचे उत्स्फूर्त विलोभनीय वागणे आणि तिचं चातुर्य ह्या गोष्टी स्त्रीचं योग्यता ठरवतात आणि एखाद्या झोपडीतील मुलीलाही एखाद्या राजकुमारीच्याच पातळीवर आणून ठेवतात.
March 30, 2022
पँरीसहून सुमारे तीन तासांनी सीमा ओलांडुन आम्ही ब्रुसेल्स या बेल्जीयमच्या राजधानीत पोहोचलो. दोन तीन शतकाहूनही पूर्वीच्या गॉथिक आर्कीटेक्चरच्या बुलंद वास्तू, त्यांचे टोकदार कळस, जागोजागी कथा पुराणातल्या योध्यांचे पुतळे या सर्वांविषयी योगेश भरभरुन माहिती देत होता. जर्मन, फ्रेंच आणि डच भाषा बोलली जाणारे ब्रुसेल्स हे एके काळी युरोपच्या व्यापाराच्या केंद्रस्थानी होते. अॉलेंपिक ब्रुसेल्समधे झाल होत तेंव्हाची अणूरेणूची महाप्रचंड देखणी प्रतिकृती आज टूरीस्टस्चा फोटो स्टॉप बनला आहे.
कन्फेक्शनर्स, बेकर्स, चॉकलेटीयर्स, बिअर बार्स खाणं -पिणं, आईस स्क्रीम, सूसू करणारा बॉय (Manneken Piss Statue of a little boy) सर्वत्र फुल टू धमाल, म्युझिकमस्ती, बडबड, आनंद आणि जल्लोश म्हणजे Grand Place परंतू ओंगळपणा मात्र कोठेच नाही. . Town Hall, Guild Houses, Serclaes Monument वगैरेही याच परिसरात आहेत. गालीच्यांसाठी बेल्जीयम प्रसिध्द आहे तसे काही गालीचेही दिसले. सर्व प्रकारच्या शॉपिंगसाठीही हा परिसर गजबजलेला असतो.
ब्रुसेल्सहून दोन तासानी वाटेत जेवण आटोपून हॉलंड (रोटरडँमच्या) हॉटेलमधे चेक-इन केल.
प्रकाश तांबे
8600478883
September 30, 2019
जेव्हा पासून समजायला लागले तेव्हापासून अलिबाग मधील मांडव्याला मामाकडे जाताना, भाऊच्या धक्क्यावरून रेवस धक्क्याला जायला लाँच मध्ये बसल्यावर त्या लाकडाच्या लाँच मधील डिझेल व इंजिनच्या धुराच्या वासाने आणि इंजिन च्या घरघरने त्रास किंवा इरिटेट होण्याऐवजी गंम्मत वाटायची आणि मजा यायची.
October 27, 2021
भारतातील शिक्षण व्यवस्था ही इंग्रजांनी बनवलेल्या प्रमाणे चालते आहे. त्यात आपले शालेय वर्षाचा कालावधी पण येतो जसं पावसाळा ते हिवाळा शाळा आणि उन्हाळ्यात सुट्ट्या. तसं पाहायला गेलं तर अशी रचना त्यांनी त्यांच्या सोयीसाठी बनवली होती त्याला माझ्या माहिती प्रमाणे एक प्रमुख कारण होतं भारतातील कडक उन जे इंग्रजांना सहन होत नव्हते. त्यासाठी ते भर उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी मुक्काम ठोकत आणि त्याच प्रमाणे त्यांनी शालेय वर्ष पण योजले होते.
August 27, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti