नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
व्यसनांच्या दिशेने जर स्त्रियांची पावले वळ्त असतील तर त्यांना वेळीच आवर घालावा लागेल अन्यता आपल्या समाजाचं, देशाचं, आपल्या देशातील भावी पिढीचं आणि पर्यायाने स्त्रियांच भविष्यही धोक्यात येईल. त्याहूनही दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे गुन्हेगारी आणि व्यसनाधिनता यांचा फारच जवळ्चा संबंध असतो त्यामुळे गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
March 26, 2016
लहानपणी हा पडदा जे जे दाखवायचा ते ते सारं खरं वाटायचं. अजूनही भावनाप्रधान पाणी येतच टचकन डोळ्यात कधीतरी खूप तीव्र, आतवर भिडणारं बघितलं की, पण त्यावर आता वाढत्या वयाचं लेबल अलगद लावायला शिकलोय मी! चित्रपटगृहाच्या अंधारात याच्याच आश्वासनावर कित्येक तास विनातक्रार घालविले आणि कळालेही नाही, कधी समृद्ध झालो तो! किती शिकवले या पडद्याने- अजूनही त्याची शाळा सुरूच आहे आणि माझ्या हातातील पाटी-पेन्सिलही.
January 31, 2022

खरं तर ह्या वजनाच्या तिकीटावरील भविष्यावर विश्वास ठेवणं आणि मैना आणि कार्ड समोर घेऊन बसणाऱ्याने सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवणं सारखचं आहे. नेहमीच घडू शकणाऱ्या घटनांबद्दल अंदाजपंचे दोन वाक्य लिहायची की ते भविष्य खरं होण्याचे चान्सेस वाढतात.
March 12, 2022
सुमित्रा भावे गेल्या, किशोर नांदलस्कर. अशी चित्रपट क्षेत्रातील एकेक जण ‘एक्झिट’ घेऊ लागल्यावर, काळजात धस्स होऊ लागलं. आज ना उद्या हा कोरोना जाईलही, मात्र जाताना अजून किती जणांना घेऊन जाणार आहे? हे त्याचा तोच जाणे.
June 17, 2021
ख्रिस रॉक आणि विल स्मिथ यांच्यातील ऑस्कर सोहोळ्यातील “देवाण -घेवाण ” दिसलीच असेल दूरदर्शनच्या पडद्यावर ! रॉकने स्मिथच्या पत्नीबाबत खुलेआम एक शेरेवजा विधान केले. त्याबदल्यात व्यासपीठावर जाऊन स्मिथ ने त्याला थोबाडीत दिली. याही घटनेच्या तळाशी काहीतरी शिकवून जाणारा धडा आहे. वरवर न्यायाधीश बनून निकाल देण्याच्या आपल्या (भोचक, अनाहूत) सवयीच्या पलीकडे जाऊन आपली “समज” खोल करणारे काही हाती गवसतंय का हे पाहणे आपल्याला प्रगल्भ करत असते.
May 4, 2022
खेड्यात राहणारा सदाशिव हुशार व चुणचुणीत मुलगा होता. मात्र गरिबीमुळे त्याला फार शिकता आले नव्हते. आपल्या आईबरोबर तो छोट्या झोपडीत रहात होता. मोठा व्यवसाय करून श्रीमंत व्हायचे त्याचे स्वप्न होते. म्हणून शेजारच्या मोठ्या गावी जाऊन नशीब आजमवायचे ठरवून व तसे आईला सांगून त्याने घर सोडले.
त्या गावी एक श्रीमंत सावकार होता. गरजू लोकांना तो कर्ज देतो, असे सदाशिवला कळले होते. त्यामुळे तो त्या सावकाराकडे गेला. परंतु घरात मरून पडलेल्या उंदराकडे बोट दाखवित सावकार म्हणाला की, काहीतरी तारण ठेवल्याशिवाय मी कर्जच काय; हा मरून पडलेला उंदीरही देणार नाही!
सदाशिव सावकाराला म्हणाला, “हा उंदीर मला द्या. मी त्याची एक दिवस तुमच्याकडे नक्कीच दामदुप्पट भरपाई देईन.”
सावकाराला वाटले, बरे झाले ही घाण आपोआप घरातून जात आहे. म्हणून त्याने सदाशिवला मेलेला उंदीर नेण्यास परवानगी दिली. सदाशिव तो उंदीर हातात घेऊन रस्ताने निघाला. एका दुकानदाराने ते पाहिले व त्याला म्हणाला, हा उंदीर माझ्या मांजरासाठी दे, मी त्या बदल्यात तुला थोडी ज्वारी देईन. सदाशिवने त्याच्याकडून ज्वारी घेतली व रस्ताच्या कडेला दगडाची चूल बांधून त्यावर भाजून त्याच्या लाह्या केल्या.
तेथून काही मोळीविके जात होते. लाकडे तोडून त्यांना खूप भूक लागली होती. सदाशिवने कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांना त्या लाह्या दिल्या. मोळीविक्यांनी खूश होऊन त्याला बरीच लाकडे दिली. सुदैवाने त्यात एक चंदनाचेही लाकूड होते. ते विकून सदाशिवला चांगले पैसे मिळाले.
मग त्याने लाकडाचाच धंदा सुरू केला. सदाशिवच्या प्रामाणिकपणामुळे धंद्याला बरकत आली व थोड्याच दिवसात तो श्रीमंत व्यापारी झाला एके दिवशी सदाशिवने एका सोनाराकडून सोन्याचा उंदीर तयार करून घेतला व तो घेऊन त्या श्रीमंत सावकाराकडे गेला.
सदाशिव त्याला म्हणाला, काही वर्षांपूर्वी तुम्ही मला कर्ज म्हणून एक मेलेला उंदीर दिला होता. त्याच्या भरपाईसाठी मी हा सोन्याचा उंदीर घेऊन आलो आहे;. तो तुम्ही स्वीकारावा.
श्रीमंत सावकारालाही तो प्रसंग आठवला व सदाशिव भरपाई म्हणून सोन्याचा उंदीर देत असल्याचेपाहून त्याला आश्चर्य वाटले. नंतर त्याने गावातील समस्त व्यापाऱ्यांना बोलावून खास सभेत ही कथा सांगून सदाशिवचा यथोचित सत्कार केलो.
December 8, 2017
नीलम निघून गेल्यावर प्रतिभा आपल्या खोलीत जाऊन आडवी पडली असता तिच्या मनात विचार आला की रमेश भाऊंच्या बाबतीत सारेच इतके अस्वस्थ का आहेत?
September 2, 2021
गोव्यातील ‘दोना पावला’ बीच पासून पणजीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका टेकडीवर ते छोटेसे टुमदार घर होते. उंचावर असल्याने तिथून दोना पावला बीचचा निसर्गरम्य परिसर आणि दूरवर पसरलेल्या समुद्राचे मोहक दृश्य दिसत असे. प्रसिद्ध उद्योजक शामसुंदर मानकर यांचा तरुण अविवाहित मुलगा सुधीर याच्या मालकीचे हे घर.
December 21, 2019
मल्लिका शेरावत यांना आता कोण ओळखत नाही.याचा अर्थ त्यांना पूर्वी कुणी ओळखत नव्हतं असा होत नाही.पण पूर्वी त्यांची ओळख ही केवळ बांद्रा तलावापुरतीच मर्यादित होती.पण त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी चहा पिण्याचे आमंत्रण दिले ,तेव्हा पासून ,सारं जग त्यांना ओळखायला लागलय.
December 30, 2011
डॉ. रवी बापट यांचे नाव सुरेश भट आणि पंढरीनाथ सावंत यांच्या तोंडून वारंवार ऐकले होते. डॉक्टरांची हे दोघेही कायम स्तुतीच करीत. माझा आणि मुंबईचा तसा संबंध नाही आणि मुंबईतल्या डॉक्टरांचा तर त्याहून नाही. त्यामुळे बापट हे कोणी तरी बडे डॉक्टर आणि अधूनमधून साहित्यिकांवर उपचार करतात, असा एक समज माझ्या मनात होता. या पूर्वग्रहासह मी डॉ. बापट यांचे हे आत्मकथन वाचायला घेतले आणि डॉ. बापट यांच्याबद्दल माझे दोन मित्र जे बोलत त्यातले अक्षरही खोटे नव्हते, हे लक्षात आले.
January 25, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti