(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पसार झाला कान्हा.

    घेउनी सोबत ‘गीता’???

      March 15, 2012


  • साठा करावा योग्यरितीने (सुमंत उवाच – १००)

    सुमंत जयंत परचुरे. 

    स्वकष्टाने केलेले कर्म, स्वकष्टाने सुचलेले शब्द, आतून आलेले लिखाण हे जगास उपयुक्त ठरते. हे श्री समर्थांच्या कडे पाहून मनोमन पटते.

      December 18, 2021


  • भागदेय…

    तो कधी कधी मला त्या बस स्टॉपवर दिसत असे , पण एकटाच ..ठराविक वेळी आठ ते साडेआठच्या दरम्यान.

      November 17, 2023


  • मसनातलं जिनं

    भर दुपारची येळ व्हती.वर आभाळातुन सुर्य आग वकत व्हता.उन्हाळ्याचे दिवस आसल्यानं सगळा परिसर भकास दिसत व्हता.रस्त्यानं चिट पाखरूबी नवतं.आश्यात शिवराम मसनजोगी,त्याची बायको शेवंती,पोरगी सारजी आन पोरगं पिर्‍या बाभळगावच्या दिशेनं निंघाले होते.

      November 19, 2023


  • नांदी स्वर सोहळ्याची

    स्व र-मंच'तर्फे पहिला जाहीर कार्यक्रम संगीतबद्ध करण्याची विनंती मी प्रभाकर पंडितांना केली आणि त्यांनी आनंदाने ती मान्य केली. संपूर्ण तीन तासांचा कार्यक्रम मला सादर करायचा होता, पण प्रभाकरजींनी मला सल्ला दिला की, पहिला कार्यक्रम मी काही मान्यवर कलाकारांबरोबर सादर करावा, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढेल. त्यांचा सल्ला मला पटला. मराठी अभंगांच्या या कार्यक्रमात रंजना पेठे-जोगळेकर आणि मी मध्यंतरापर्यंत आणि मध्यंतरानंतर मान्यवर गायक प्रभाकर कारेकर गातील असे ठरले. कार्यक्रमाच्या निवेदनासाठी मी शंकर वैद्यांना गळ घातली. २ जून १९८६ ही गडकरी रंगायतनची तारीख मला मिळाली आणि कार्यक्रमाच्या रिहल्सल दादरला सुरू झाल्या. हा माझा पहिला जाहीर कार्यक्रम असल्याने मी उत्साहात होतो. पण ते तसे व्हायचे नव्हते. मी आजारी पडलो आणि मला कावीळ झाली. डॉक्टरांनी किमान दीड महिने विश्रांतीचा सल्ला दिला. आता रंगायतनची तारीख बदलून घ्यावी लागणार होती आणि हे काम बिलकूल सोपे नव्हते. माझी स्वर-मंच ही नवीन कंपनी असून मोठ्या कष्टाने मला तारीख मिळाली होती. त्यावेळचे रंगायतनचे व्यवस्थापक श्री. अभय पटवर्धन यांची भेट घेतली. त्यांना माझ्या धडपडीचे कौतुक वाटले असेल कदाचित, पण त्यांनी तारीख बदलून दिली. माझी नवीन तारीख होती १३ ऑगस्ट १९८६. कार्यक्रमातील सर्व कलाकारांच्या तारखा बदलून घ्याव्या लागल्या.

    एकंदरीत पहिल्या कार्यक्रमातच मी अनेक गोष्टी शिकलो. आता कार्यक्रमाच्या खर्चासाठी पैसे उभे करायचे होते. माझ्या पगाराचे काही पैसे माझ्याकडे होते. पण तिकीटविक्री हाच एक उत्पन्नाचा मार्ग आमच्या जवळ होता. माझ्या अनेक मित्रांनी मदत केली. अगदी घरोघरी जाऊन आम्ही तिकिटे विकली. रंगायतनचा प्लॅन ११०० तिकीटांचा होता. त्यातील सुमारे ६०० तिकीटे आम्ही विकली. माझ्या इतकाच उत्साह माझ्या आई-वडिलांचा होता. त्यांनी भक्कम पाठिंबा दिला होता, म्हणूनच मी हे अवघड काम करू शकत होतो. कार्यक्रमाच्या रिहल्सल पुन्हा सुरू केल्या. आयुष्यात पहिल्यांदा वर्तमानपत्रात जाहिरात दिली. त्याआधी जवळ जवळ एक महिना वर्तमानपत्रातील कार्यक्रमांच्या जाहिरातींचा अभ्यास करीत होतो. त्यांचे दर काढले होते. त्या सर्व अभ्यासाचा उपयोग जाहिरात देताना झाला. तेव्हा समजले की गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यासाठी गाण्याबरोबरच आणखी चाळीस गोष्टी याव्या लागतात. मदत करणारे हात अनेक असतात, पण निर्णय स्वतःला घ्यावे लागतात आणि त्याचे चांगले-वाईट परिणाम स्वतः भोगायचे असतात.

    कार्यक्रमाचा दिवस उजाडला. त्या दिवशी मला कार्यक्रमात गायचे असल्याने कमीत कमी बोलण्याचा सल्ला श्रीकांत ठाकरेसाहेबांनी दिला होता. त्यामुळे तोंडाने कमी बोलत मला सगळी कामे उरकावी लागत होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडा पाऊस होता. पण उपस्थिती चांगली होती. मंदिरात जाऊन मी श्रीदत्तगुरूंचे आणि श्रीगणरायाचे दर्शन घेतले. त्यांच्या आणि गुरुवर्यांच्या आशीर्वादानेच 'देवाचिये द्वारी' हा तीन तासांचा मराठी अभंगाचा कार्यक्रम ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये वेळेवर सुरू झाला. स्वर-मंच या माझ्या कंपनीतर्फे माझा हा पहिलावहिला जाहीर कार्यक्रम! थोडेसे दडपण माझ्यावर होतेच, पण त्यापेक्षा कितीतरी जास्त उत्साह होता. माझे गुरु पं. विनायकराव काळे मला आशीर्वाद देण्यासाठी आले होते. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. आ. बुवा हेही उपस्थित होते. शंकर वैद्यांनी कार्यक्रमाचे निवेदन अत्यंत परिणामकारक केले. रंजना पेठे ही तेव्हा खूपच लोकप्रिय गायिका होती. “तू नवीन असलास तरी घाबरू नकोस. आत्मविश्वासाने गा. मी तुझ्याबरोबर आहेच." या शब्दांनी रंजनाने माझा उत्साह वाढवला. मग मध्यंतरापर्यंत आम्ही दोघांनी दहा अभंग सादर केले. मध्यंतर झाला आणि मला हायसे वाटले. कारण या पुढील कार्यक्रम प्रभाकर कारेकर सादर करणार होते. त्यामुळे आता मला गायचे नव्हते. त्यामुळे इतर कामांना मी सुरवात केली.

    मध्यंतरानंतर प्रभाकर कारेकरांनी आपल्या कसलेल्या आवाजात अनेक अभंग सादर केले आणि माझा पहिला जाहीर कार्यक्रम संपला. सर्व कलाकारांचे मी आभार मानले. इतर कामे संपवली आणि रात्री दोनच्या सुमारास घरी पोहोचलो. अतिशय दमल्यामुळे काही मिनिटातच मला झोप लागली. हाती घेतलेले एक अवघड काम केल्याचा आनंद देणारी ती एक कृतार्थ झोप होती.

    या कार्यक्रमाला अनेक पत्रकारांना मी निमंत्रित केले होते. त्यामुळे काही दिवसातच अनेक वर्तमानपत्रांतून या कार्यक्रमाबद्दल लेख आले. बहुतेकांनी पहिल्या कार्यक्रमाबद्दल माझे कौतुक केले होते आणि काही सूचनाही केल्या होत्या. एका वर्तमानपत्राने गाणे गाताना माझा फोटो छापला होता. वर्तमानपत्रात आलेला माझा पहिला फोटो. या छोट्या गोष्टींनी मला भरपूर आनंद दिला. मी इतका खूष झालो होतो की केवळ या फोटोबद्दल मी मित्रांना पार्टी दिली.

    - अनिरुद्ध जोशी

      July 7, 2022


  • असाही पोलिसांचा वापर… दृढ विश्वास पोलिसांवरचा

    आपल्या देशाच्या सिमेवर देशाची सुरक्षा करण्यासाठी भारतीय सैन्य दल तर अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस दल काम करीत आहे. अंतर्गत सुरक्षितते बरोबरच लहान-सहान घटना असतील किंवा २६/११ सारखा देशावरील अतिरेकी हल्ला असो, नैसर्गिक आपत्ती असो अगर कोणतेही मोठे संकट येवो, त्या ठिकाणी हजर राहण्याबाबत आदेश प्राप्त झाले न झाले तरी केवळ अशा घटनेची माहिती मिळताच प्रथम पोलिसच तेथे धावून जात असतो.

      June 13, 2024


  • पिल्लांची पहिली स्पर्धा

    माझ्या दोन्ही बाहुल्यांनी, यावेळच्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच, स्पर्धेत भाग घेतला! आमच्या सोसायटीमध्येच कार्यक्रम होता. त्यामुळे खरंतर प्रेक्षक म्हणून बसलेले सगळे चेहेरे तसे ओळखीचे होते, तरीही ह्यांच्यासाठी हातात माईक धरून, सर्वांसमोर उभं राहून काही करून दाखवण्याचा अनुभव हा पहिलाच होता.

      September 14, 2019


  • आभाळातला जिराफ

    (बुशमन लोकांमधील एक पुरातन दंतकथा)

    आदिवासींचं म्हणणं आहे, काळ जेव्हापासून चालू झाला तेव्हा सूर्याला आपली आभाळातली वाट नीट माहीत नव्हती. प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलानं टक लावून बघणं ही सवय जिराफाला होती. सृष्टीनिर्मात्याला वाटलं की सूर्याकडे लक्ष देण्याची कामगिरी जिराफावर सोपवावी.

      October 5, 2025


  • मोहोरलेले अलिबाग

    हिरव्या गर्द आंब्याच्या झाडावर येणारा मोहोर जसं जसे दिवस वाढत जातात तसं तसा रंग बदलत जातो. सुरवातीला दिसणारे पोपटी किंवा तांबूस कोंब बहरल्यावर हिरवे दिसतात नंतर चॉकलेेटी किंवा ब्राऊन होत जातात आणि मोहोर फुलल्यावर थोडेसे पांढरे दिसल्या सारखे भासतात.

      August 4, 2021


  • पाऊस

    या आनंदमय वातावरणात कोणाही तरूण स्त्रीला या पावसात चिंब चिंब भिजावेसे वाटते. मनोमुराद या पावसाचा आनंद लुटायचा असतो. पण या सर्वात ती वेगळी होती. डोळ्यातून पाणी वाहत असताना ती तिच्या भूतकाळात हरवून गेली. किती चांगले होते तिचे जीवन….

      September 10, 2018