नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
गेल्या काही महिन्या पासून आमच्या गावाचं नाव या पेपरात झळकतंय ! चार मुडदे पडलेत ! हो या रेल्वेस्टेशनच्या परिसरात ! कोणी तरी एकट्या दुकट्याला गाठून डोक्यात दगड घालून खून करतोय ! का ? माहित नाही. पोलीस पण चक्रावलेत .
December 17, 2017

“तुमची मानव जमात अगदी भांडखोर, क्षुद्र आणि कोत्या मनोवृत्तीची आहे. हेवा, दावा, स्वार्थ मत्सर शी. हे सगळे वाईट गुण आम्हाला आमच्या ग्रहावर नको होते. या गुणांची लागण आमच्यातल्या काही कमकुवत देवांनाही झाली. ते कोपिष्ट होऊ लागले. ज्याला त्याला शाप देऊ लागले. शेवटी आम्ही सर्वांनी ठरवलं की तुम्हा मानवांचा सहवासच टाळला पाहिजे. म्हणून एकूण एक मानवप्राणी शोधून काढला आणि पृथ्वीवर पाठवून दिला. बसा भांडत. आम्ही तुमच्यावर नजर ठेवून होतो. किती तन्हांनी भांडता येतं. किती तन्हांनी मानवा मानवात भेद पाडता येतात आणि लोकांना आणि स्वतःलाही कष्टी करता येतं हे तुमच्यावरून आमच्या लक्षात येत होतं. तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आणि शक्ती नुसती भांडणात आणि दुसऱ्यांचं वाईट करण्यात जाते
December 19, 2025
शाही सोहळ्यासाठी मिलिंद गुणाजीने चाळीस लाख रुपये खर्च करुन, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना रोजगार मिळवून दिला. मुंबईहून आलेल्या वऱ्हाडी मंडळी व खास पाहुण्यांची चोख व्यवस्था ठेवून इतरांसाठी एक आदर्श घालून दिला..
February 6, 2022
श्री. पाळंदे तीस वर्षे गिरिभ्रमण करताहेत. उदंड अनुभवाचा इतरेजनांना फायदा व्हावा, या सद्हेतूने त्यांनी `डोंगरमत्री’चं लेखन केलं. यातील तीसही लेख अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक आहेत. गिरिकंदरामध्ये भटकण्याचा अनुभव घरबसल्या रसिकाला घेता येईल, या दृष्टीने पुस्तकाची जडणघडण डोळ्यात भरते.
January 25, 2010
तुकाराम महाराज म्हणतात भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान.. किती वास्तव सांगितले आहे ना. एरवी साधी चौकशी न करता मजेत जेवणारे पिंडदानच्या वेळी कावळ्याची वाट बघत बसतात. नाहीच आला कावळा तर दर्भाचा कावळा असतोच. चिऊ काऊचा घास खाऊन मोठी झालेली हे सगळे विसरून जातात.
February 21, 2022
इतक्यात घड्याळाचा टोल वाजतो आणि त्यामुळे आदित्य दचकतो. काही क्षणातच पुन्हा त्याला, त्याच्या आरामखुर्ची हलण्याचा आवाज येतो. इतक्यात थंडीतही आदित्यच्या कानामागून घाम ओघळू लागतो. आदित्य हळूहळू आरामखुर्चीच्या दिशेने निघतो आणि समोर जे काही बघतो, ते बघून त्याची पाचावर धारण बसते.
February 4, 2026
शुटींग सकाळी आठला सुरु झालं होतं.. मला जायला थोडा उशीर झाला.. तोपर्यंत भरत जाधवचा सीन शूट झालेला होता.. साधा झब्बा व धोतर नेसलेल्या अभिनेत्याची व माझी, ती दुसरी ‘भरत-भेट’ होती.
January 18, 2022
नुकतेंच, लोकसत्ता, मुंबई आवृत्तीमध्ये, ‘जे आले ते रमले’ हें सुनीत पोतनीस यांचें सदर सुरूं झालें आहे. या सदरात वर्षभर बरेच उपयुक्त व इंटरेस्टिंग मटीरियल वाचायला मिळेल अशी आशा आहे. परंतु, या सदरात आत्तांपर्यंत जो मजकूर आलेला आहे, त्याबद्दल कांहीं ‘जास्तीची’ (additional) माहिती पुढें ठेवणें मला आवश्यक वाटतें, म्हणून ही प्रतिक्रिया.
January 12, 2018
संध्याकाळच्या सुमारास गाईम्हसरं डोंगरातून चरुन आल्यावर, जेवणाची पंगत बसायची. गावातील गुरवाकडून हिरव्या मोठ्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळ्या आणि द्रोण आणल्या जायच्या. गावातील चव्हाट्याच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला लांबलचक ओळीने बाप्या माणसं व त्यांच्याबरोबरची चिलीपिली मुलं, पाण्यासाठी बरोबर आणलेला तांब्या घेऊन जमिनीवर बसायची.
August 3, 2021
(लेखक – विवेक माधव, आम्ही साहित्यिक ग्रुप) बबन्या. एक सर्वसाधारण हमाल. रोज हमाली करून जे मिळेल त्यात समाधानाने गुजराण करणारा एक सामान्य माणूस. आज तो एका कारखान्या बाहेर उभा होता. तो कारखाना होता मुर्त्यांचा. आज गणेश चतुर्थी. कितीतरी लोक आपण निवडलेले गणपती आज त्या कारखान्यातुन आपल्या घरी नेत होते. त्यांना गणपतीची मुर्ती उचलून देताना तो मदत करत होता. कोणी काही बिदागी दिली तर……
September 13, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti