(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नाट्य मंदिरी ‘वसंत’ फुलताना..

    सिनेमा जाहिरातीच्या पहिल्या कामापासूनच वसंत आमच्या संपर्कात होता. ‘सासू वरचढ जावई’ हा चित्रपट गजानन सरपोतदारांचा होता, त्यांच्या आधीच्या ‘दुनिया करी सलाम’ चित्रपटापासून त्यांच्या प्राॅडक्शनचे तो काम पहायचा.

      November 5, 2021


  • खाद्याविष्कार

    प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलेल्या खास पाककृतींचा हा संग्रह आहे. पुस्तकाचं वेगळेपण हे, की त्यांनी विविध फळांचा वापर करून पदार्थ कसे तयार करायचे याचं मार्गदर्शन केलं आहे.

      August 24, 2023


  • जीवननाट्य नाटीका क्र. ३ (आठवणींची मिसळ २३)

    आधीच्या दोन नाटीकांत पाहिलतं ना मुखवटे कसे घालावे लागतात ते आणि ते मुखवटे कसा चेहरा मोहराच बदलून टाकतात ते? तरीही मुखवटे घालण्याची हौस कांही जात नाही. जोपर्यत मानवजात ह्या जगांत आहे तोवर तोंडाला रंग फासणे चालूच रहाणार.

      September 8, 2022


  • काळपुरुष

    शहापूर जिल्हा ठाणे. शासकिय ग्रामीण रुग्णातयांत वैद्यकीय अधिकारी असतानाचा प्रसंग. शवविच्छेदनासाठी एका पन्नाशीतील व्यक्तीचा मृतदेह आणला होता. पोलीस पंचनामा रिपोर्ट वाचला. त्या प्रमाणे घटनेचा तपशील अंतर्मुख करायला लावणारा खचितच असा होता.

    भास्कर बहिर व त्याचा मित्र सुनील जाधव दोघेजण बागेतील एका बाकड्यावर बसले होते. मंद मंद वारे वाहत होते. भास्करला आळस आला होता. आळेपिळे देत शरिराला शिथील करण्यासाठी त्याने तोंड उघडून वर बघत जांभई दिली. अचानक त्याचक्षणी हवेमुळे उडत आलेली एक छोटी वस्तू त्याच्या तोंडात शिरली. बघता बघता ती गिळले जाऊन घशांत शिरली. त्याने भास्कराला श्वास घेणे कठीण करून टाकले. भास्करची तगमग झाली. खोकून ओकून ते काढण्याचा प्रयत्न झाला. तोंडात बोटे घालून ते काढणे व श्वास मोकळा करणे याची घडपड केली गेली. कांही मिनीटे तडफड झाली. सुनील जाधव भास्कराला त्याच्या श्वासोच्छास करण्यासाठी आपल्यापरी मदत करु लागला. जवळचे इतरही जमले होते. कुणी वारा घाल, कुणी त्याची छाती दाबून कृत्रिम श्वासोच्छास करण्यास मदत कर, हवा घाल, तोंडावर पाणी मार हे झाले. एकाने तर कांदा आणून फोडून नाकाला लावला. परंतु सारे सारे प्रयत्न व्यर्थ गेले. कांही हलचाली वा रुग्णालयीन मदत मिळण्यापूर्वीच , एक सशक्त आणि निरोगी भास्करचा,केवळ थोड्याश्या मिनीटांत अंत झाला.

    खूप बारकाईने शवविच्छेदन ( Post Mortem ) केले गेले. विच्छेदनांत त्याच्या शवनलिकेच्या सुरवातीच्या तोंडावर, स्वरयंत्राजवळ Near the Vocal Cord एक झाडाचे छोटेसे पान दबून बसलेले सापडले. त्याला व्यवस्थीत काढून बाटली मधील फॉर्म्यालीनमध्ये (Formalin) सीलबंद केले.

    एका मृत्युला कारणीभूत होणारे ते पान होते. मी बारकाईने त्या पानाचे निरीक्षण करु लागलो.

    माझ्या डोळ्याना दिसले नाही. परंतु निश्चीत भासले की त्या पानांत काळपुरुष लपून बसला होता. वेळेची त्याला चाहूल लागतांच त्याने अलगदपणे झडप घातली.

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      March 21, 2016


  • नारायण भंडारीचं काय झालं ? – भाग ४

    मी त्याच्याकडे बघत राहिलो. आणि डोळ्यासमोर न्यूज चॅनल्सचे पडदे आले.. कोरोना , परदेशातील बातम्या , व्हायरल व्हिडिओचा तपास , राजकारण , क्षुल्लक गोष्टींवरच्या चर्चा या व्यतिरिक्त भारतीयांना दुसरं जीवन नसावं असं सगळं चित्रण माथी मारलं जात होतं आणि देशापुढचा धोका जनतेसमोर येऊ दिला जात नव्हता .

      February 4, 2026


  • आयुष्यावर काही क्षणिका

    आयुष्य म्हणजे काय एकच विचार मनात येत होता. कदाचित, जगणे म्हणजे सूर्याचा प्रकाश, दिवस आणि रात्र .. आहे गगनी सूर्य जोवरी वेचून घ्या आनंदी फुले..

      May 21, 2012


  • सर्वात वाईट वस्तू

    एक मौलवी होते. त्यांनी सगळीकडे आपल्या प्रामाणिकपणाचा प्रचार प्रसार केला. मशीदीत बसून दिवसभर मुलांना शिकवित असत आणि जी फी मिळे त्यात आपला उदर निर्वाह करीत असे. एक दिवस संध्याकाळी ते घरी आले आणि पत्नीला म्हणाले, “आज काय स्वयंपाक केला आहे. फार भूक लागली आहे.” ती म्हणाली, “आपण जेवावयास बसा. मी कोंबडा बनविला आहे.” “कोंबडा कुठून आणला?” मौलवीनी विचारले.

      September 26, 2024


  • गोष्ट एका मिशीची

    लहानपणापासून माझ्या मनात बरीच कुतुहले आहेत. मोठा झाल्यावर त्यातली बरीच कमी झाली‚ काही आणखी नवी आली. बालपण खेडयात गेले असल्याने सुरवातीची बरीच वर्षे दुरच्या डोंगराच्या पायथ्याची वाहने बघून ती आपोआप कशी धावतात याचे कुतूहल वाटायचे.

      August 21, 2018


  • हॅप्पी दिवाळी!!

    सोनू, अगं उठ, आज दिवाळी, अशी उशीरा उठून कसं चालेल? आज लवकर उठायचं, पहाटे पहाटे अंगाला उटणं लावून गरम गरम पाण्यानं आंघोळ करायचा दिवस. हो, रोज जरी तू आंघोळ करत असलीस तरीही, आजची गोष्टच वेगळी. त्यात आज आपण लोकांना शुभेच्छा द्यायला जायचंय, हॅप्पी दिवाली असं म्हणायचंय. असं, काय करतेस, तुला मी शिवसेना किंवा मनसे चा अजेंडा उचलायला सांगितला नाहीये, आपण दिवाळीच्या शुभेच्छा, असं संकुचित मराठीत बोलायचं नाही, आपण धेडगुजरी समाजात रहात असल्याने, आपण हॅप्पी दिवाली असंच म्हणायचं!! चल आटप लवकर. आपण थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला जाऊ या मुंबईला.

      October 18, 2009


  • वसुबारस’ची कहाणी

    आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती, तिला एक सून होती. गाई-गुरं होती. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळी-मुगाळी वासरं होती. एके दिवशी काय झालं, आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी सकाळी म्हातारी उठली, शेतावर जाऊ लागली.

      November 25, 2025