(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सुखाचे संदर्भ

    रविवार या एकाच दिवशी मनासारखे झोपायला मिळते म्हणून जाग आलेली असतानाही मी आणि माझा दहा वर्षाचा मुलगा अंथरुणावर लोळत पडलो होतो. बायको उठली आहे हे किचनमधल्या भांडयाच्या आवाजावरून कळत होते. कुठलेही भांडे गॅसवर ठेवण्याआधी ते टिकाऊ आहे की नाही हे आपटून बघते की काय कळत नव्हते.
    “अरे दहा वाजले, उठा आता दोघेही.”
    “काय यार मम्मी पण, संडे असून आजही झोपून देत नाही.” माझा मुलगा एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर होत बोलला.
    “खूप झालं आता. दोघेही उठा.” म्हणत खेचून पांघरुणे गुंडाळायलाच काढल्यावर नाईलाजाने उठावे लागले. हिचं किचनमध्ये काहीतरी चालूच होतं. ब्रश आणि अंघोळ उरकून खिडकीतून खाली पहात बसलो. आमच्या बिल्डिंगच्या मागेच दुसर्‍या एका इमारतीचे बांधकाम चालू होते. रविवारी तर डोके उठवणारा कर्कश आवाज असतो. पण त्यादिवशी बहुतेक सुट्टी असावी. एका माणसाशिवाय कोणीही दिसत नव्हते.
    त्याच्या अंगात खादीचा बनियन आणि कमरेखाली धोतर होते. दोन्ही वस्त्रे कमालीची मळलेली होती. कुठूनतरी स्लॅबसाठी लागणार्‍या फळया आणून तो मोकळया जागेत ठेवत होता. खूप सकाळीच कामाला लागलेला असावा कारण बराच मोठा ढीग झाला होता.
    इमारतीखाली बनवले जाणारे काँक्रिट वर नेण्यासाठी एका सरळ रेषेत केलेली बांबूच्या स्कॅफ फोल्डींगची व्यवस्था बघत बसलो हातो. त्या माणसाचे फळया टाकायचे काम बहुतेक झाले असावे कारण इमारतीच्या आवारात असणार्‍या बोअरींगची मोटर चालू करून त्याने पाईपच्या साहाय्याने इमारतीवर पाणी मारायला सुरवात केली.
    इतक्यात बायकोने बटर लावलेली गरमागरम सँडविच समोर आणून ठेवली. सँडविच हा बंड्याचा वीक पॉईंट आहे. वाऊ करून तो त्यावर तुटून पडला. मी मात्र “हा ब्रेकफास्ट?” म्हणून उगाचच तिच्यावर वैतागलो. दोन दिवस ऑफिसच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ब्रेकफास्टसाठी सँडवीचच होती. त्यामुळे मी त्यांना कंटाळलो होतो. नेमके ते सोडून काहीतरी वेगळे मला पाहिजे होते. पण त्या बिचारीला काय ठाऊक! एखाद्या रविवारी तरी किचनमध्ये नेहमीसारखा पसारा नको म्हणून तिने पटकन नाष्ता बनवला होता.
    माझ्या अचानक चिडण्यावर काहीच न बोलता ती तिथेच खाली मान घालून उभी राहिली. तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आल्यावर मी वरमलो. बायकोचा हा अवतार मी कधी पाहिला नव्हता. असे काही झाले की ती नेहमी भांडायच्या मूडमध्ये असते. अचानक हिला काय झाले ते मला समजेना. मी प्रचंड गोंधळलो.
    आपल्या ऑफिसला किमान रविवारी तरी सुट्टी असते पण बायकोला कधी सुट्टी असते का हा विचार मी कधी केलाच नव्हता. अजून वादावादी नको म्हणून गुपचूप सँडविच खायला लागलो. माझं लक्ष खिडकीतून मघाशी त्या पाणी मारणार्‍या माणसावर गेलं.
    त्याने चालू पाण्याचा पाईप बांधकामावर तसाच बाजूला ठेऊन एका ग्लासमध्ये पाणी घेतले. तिथेच बाजूला ठेवलेल्या त्याच्या सामानातून त्याने कसलेतरी पॅकेट काढले. पॅकेट कसले, बिस्किटचा पुडा होता तो! नुकत्याच टाकलेल्या फळ्यांच्या ढीगाला टेकून तो आरामात बसला आणि पुडा फोडून त्यातली बिस्कीटे एकेक करून पाण्यात बुडवून खाऊ लागला.
    बंड्या सँडविच उडवण्यात दंग होता. मी आणि बायकोने एकाचवेळी त्या माणसाला पाहिलं. ती काही बोलली नाही पण दोन क्षणांपुरता का होईना तिने एक अर्थपूर्ण कटाक्ष माझ्यावर टाकला आणि किचनमध्ये निघून गेली. अचानक काय झाले कळले नाही पण माझ्या तोंडातल्या सँडविचची चव झटकन बदलली आणि त्याबरोबरच्या गरमागरम कॉफीने तर मूडच बदलून टाकला.
    सुखाचे संदर्भ चुकले की आयुष्यातले समाधान हरवून जाते हे त्यादिवशी मला नव्याने उमजले.

    ©विजय माने, ठाणे

    https://vijaymane.blog

      July 31, 2018


  • मनं खुलविणारी माणसं

    विदेशी नि त्यातल्यात्यात पाश्चिमात्य संस्कृतीबद्दल माझ्या मनात गैरसमजाचं काहूर माजलं होतं. पारतंत्र्याच्या काळात भारतीयांवर इंग्रजानी केलेल्या अन्याय, अत्याचारांमुळे त्यांच्याविषयी मनात घृणाच अधिक होती. परंतु सगळेच गोरे तसे नसतात याची अनुभूती कॅनडातील गोऱ्या लोकांच्या बाबतीत मला आली. अनेक चांगल्या, अनुकरणीय गोष्टी इथे पहायला मिळाल्या नि शिकता आल्या. त्यांची आगळी संस्कृती अनुभवता आली.

      August 11, 2020


  • समृध्द प्रेमाची भेट (संक्षिप्त रुपांतरीत कथा २६)

    ह्या कथेवर १८ चित्रपट झाले. शिवाय लहान पडद्यावर अनेक कथा, मालिकांत ही गोष्ट घेण्यांत आली. शाळा/महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमांत आली. कथा इतकी लोकप्रिय आहे की ती छोट्या रूपात लेखकाचे नाव न देता सामाजिक माध्यमांवरही फिरते. खूप लोकप्रिय हळवी कथा.

      June 19, 2022


  • कवी-लेखक-बालसाहित्यिक – अरुण वि. देशपांडे

    आज आपणा सर्वांस  ज्यांनी इतरांसोबत मला ही मार्गदर्शन केलं, ज्यांनी मला लिहायला शिकवलं. साहित्य प्रकारची अतिशय चांगल्या पद्धतीने ओळख करून देऊन, मला समृद्ध केलं. लेखनशैली उत्तम होण्यासाठी वेळात वेळ काढून कायम तत्परता दर्शवली. असे जेष्ठ साहित्यिक श्री.अरुण वि.देशपांडे यांच्याबद्दल आणि त्यांच्या दीर्घ लेखन-प्रवासाबद्दलचा हा परिचय लेख.

      June 13, 2020


  • आला आला पाऊस आला…

    आला आला पाऊस आला…मला भिजवून ओलेचिंब करून गेला…असे मनातल्या मनात गुणगुणत असेल ती उन्हाने लाही लाही झालेली आपली धरणी माता. जगभरातील शेतकरीच नव्हे तर प्रत्येक माणूस पावसाची, पावसाळा सुरू होण्याची चातकासारखी वाट पाहत असतो. त्याच्या आगमनाला जरा जरी उशीर झाला तरी शेतकर्‍यांसह सर्वांचाच जीव कासाविस होतो. पहिल्या पावसात सारेच भिजण्यासाठी आतूर असतात.

      July 11, 2014


  • कार्य सिद्धीस नेण्या झाले पलायन

    सुमंत जयंत परचुरे. 

    मनात राग, मत्सर, द्वेष अथवा डावलून टाकलेले पुढचे पाऊल हे स्वराज्याच्या विरोधात पडलेले पाऊल म्हणूनच गणले गेले. पण जर सर्वांचे हित, प्रेम, विश्वास टिकवून जर पाऊल पडले अन त्याला नामस्मरणाची साथ मिळाली तर स्वराज्य पुर्ती काही अशक्य नाही.

      February 2, 2022


  • कृष्णा- कोयना- सख्ख्या बहिणींचा प्रितीसंगम

    कराडचा प्रीतिसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे. उत्तरेहून वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहून येणारी कोयना दोघी अगदी आमनेसामने येऊन एकमेकीना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावात नाही. पण कराडचा प्रीतिसंगम मात्र त्याला अपवाद.

      July 1, 2017


  • विमर्श

    Vimarsh-front-300
    मराठी साहित्यविषयक विविध मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह.

    त्यात महात्मा फुले यांची मराठी वाङमयाला देणगी, प्रा. वा. म. जोशी यांच्या तात्विक लेखनातून प्रकटणारी जीवनदृष्टी, साने गुरुजींचे निबंधखन, कला म्हणजे काय? वाङमयीन वादळ, गो.वि. करंदीकरांचे अॅिस्टॉटलच्या काव्यशास्त्रविषयक, सुखांतिका, अभिजात साहित्य आणि लोकप्रिय साहित्य, अनुभवामृताचे साक्षेपी विवेचन, र. धों. कर्वे प्रकल्पाची फलश्रुती, ज्योत्स्ना देवधर: एक सफल लेखनप्रवास, नाट्यदर्पणकार रामचंद्र - गुणचंद्र आणि त्यांची रसविषयक भूमिका, स्त्रियांच्या साहित्यातील देशीयतेचा आविष्कार, स्त्री-पुरुष संबंधाच्या चित्रनाच्या समस्या, मराठी नाटकातील स्त्रियांची रुपे, कवितेचा अन्वयार्थ, इत्याची लेखांचा अभ्यासपूर्ण आढावा या पुस्तकात एस.एन.डी.टी विद्यापीठातील मराठी भाषा विभागाचे प्रमुख डॉ. विलास खोले यांनी घेतलेला आहे.

    विमर्श
    लेखक
    : विलास खोले
    प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
    मूल्य :

      October 18, 2016


  • शुभ, मंगल समय येता

    सुमंत जयंत परचुरे. 

    काय करायचे आहे हे पक्के झाल्याशिवाय काय करायचे नाही हे कळत नाही. म्हणून आयुष्यात काय करायचे हे ठरवणे महत्वाचे. काय करायचे ठरले की त्याविषयी जिद्द, महत्वाकांक्षा, विश्वास आपोआप निर्माण होतो. पण जर काय करायचे हेच ठरवले नाही तर सगळेच करायचे यावर समय निघून जातो अन हाती काहीच लागत नाही.

      February 1, 2022


  • लगन गंधार !

    पुण्याहून येताना त्यादिवशी असंच वातावरण होतं. किंबहुना जास्तच . पुढचं काही दिसत नव्हतं . अशा परिस्थितीत गाडी थांबवण्याशिवाय पर्याय नव्हता . त्या अंधुक गूढ वातावरणात लगन गंधारचा बोर्ड दिसला आणि गाडी थांबवली . पळतच हॉटेलात घुसलो . त्या गारठ्यात गरम चहाची तल्लफ आली होती . पण ऑर्डरचे शब्द तोंडात येण्यापूर्वी कानात कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनाचे स्वर घुमू लागले .

      September 26, 2019