आयुष्यावर काही क्षणिका

आयुष्य म्हणजे काय एकच विचार मनात येत होता. कदाचित, जगणे म्हणजे सूर्याचा प्रकाश, दिवस आणि रात्र .. आहे गगनी सूर्य जोवरी वेचून घ्या आनंदी फुले..





कमरेच्या दुखण्यामुळे गेल्या चार दिवसांपासून घरीच होतो. मन स्वैर-भैर भटकत होत. आयुष्य म्हणजे काय एकच विचार मनात येत होता.

कदाचित, जगणे म्हणजे सूर्याचा प्रकाश, दिवस आणि रात्र …

(१)

आहे गगनी सूर्य जोवरीवेचून घ्या आनंदी फुले.

(२)

किती ही जोडाउरणार शेवटी “शून्य”.

(३)

सकाळची चंचलतादुपारची स्थिरतासायंकाळची उदासीनताविराम रात्रीचा.

(४)

अस्ताचलचा सूर्यरोखण्यास धावतो.हरणार युद्धरोज खेळतो.

— विवेक पटाईत

Author