(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निर्णय (कथा)

    ही माझी कथा २८ जुलै  २०१९ च्या ‘सकाळ’ मधे कथास्तु या सदरात प्रसिद्ध झाली आहे.

      March 17, 2022


  • मालगुडीचे दिवस

    आर. के. नारायण यांनी मालगुडी या काल्पनिक गावाच्या पार्श्र्वभूमीवर अनेक कथा लिहिल्या. त्यामध्ये गावातील सर्वसामान्य अशा अनेक व्यक्तीरेखा घेऊन त्यांच्या जीवनातील चढ-उतार, आशा-निराशा, आनंद-दुःख, राग-लोभ अप्रतिमरित्या रेखाटले.

      October 21, 2021


  • अनवट पर्यटन – (उगवता छत्तीसगड – १)

    मध्य प्रदेश राज्यातील दहा छत्तीसगढी आणि सहा गोंडी भाषिक दक्षिण-पूर्व जिल्ह्यांचे विभाजन करून १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड या राज्याची स्थापना झाली. रायपुर हे छत्तीसगड राज्याचे राजधानीचे शहर. छत्तीसकिल्ले असलेले राज्य म्हणून ह्या राज्याला छत्तीसगड असे नांव दिले. ह्या प्रदेशाचा इतिहास रामायण, महाभारत काळापासून होता. वैदिक आणि पौराणिक काळापासून छत्तीसगड अनेक संस्कृतीच्या प्रगती आणि विकासाचे केंद्र होते. येथील पुरातन मंदिरे आणि त्यांचे अवशेष असे दर्शवित आहेत की वैष्णव, शैव, शक, बौद्ध संस्कृतीचा विविध काळात ह्या प्रदेशावर प्रभाव होता.

      February 25, 2022


  • कोजागीरी

    “हो तर ! येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता दीनानाथ नाट्यगृहा समोरून आपली बस निघेल. प्रवास साडेतीन तासांचा आहे. रात्री साडेआठला बस डहाणू समुद्र किनाऱ्यावर पोचेल. वाटेत सुका नाष्टा मिळेल. ही सहल अविस्मरणीय करायला आपल्या सोबत आहेत आपले लाडके वपु.”

      April 29, 2022


  • काव्यमय व्यक्तिचित्रण

    `घरीदारी' या इंद्रजित भालेरावांच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. ही व्यक्तिचित्रे म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तींचा वेगळा परिचय देणारी आहेत. त्यांच्या गुणांनी व स्वभाववैशिष्ट्यांनी नटलेली ही माणसे जात्याच प्रसिद्ध आहेत.

    `घरीदारी' :

    लेखक : इंद्रजित भालेराव

      January 25, 2010


  • मोह, लोभ, क्रोध, भय ते मोक्ष

    जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत "मोह" म्हंटले आहे.

    जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत "लोभ" म्हंटले आहे.

    कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो त्याला गीतेत " इर्षा" म्हंटले आहे.

    काही वेळेस कुल्फी संपण्याच्या अधिक दांडी हातात राहून कॅल्फी गाळून जमीनी वर पडते त्याला गीतेत " क्रोध" म्हंटले आहे.

    झोप पूर्ण होऊन सुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात त्याला गीतेत"आळस"असे म्हंटले आहे.

    हॉटेल मध्ये भोजन झाल्यावर, ओंजळ भर बडीशोप व साखर खातो त्याला गीते मध्ये " भिकारी" पणाचे लक्षण म्हंटले आहे.

    बाहेर जाताना लावलेले कुलूप ओढून पाहाणे ह्याला गीतेत "भय" म्हंटले आहे.

    आपण व्हाट्सअप्प वर मेसेज पाठवल्या वर दोन निळ्या टीका दिसतात की नाही ते पाहतो त्याला गीतेत "उतावळेपण" म्हंटले आहे.

    पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी साधी पुरी, कधी शेवपुरी, कधी गोड पुरी दे रे " भय्या" असे म्हणतो त्याला गीतेत "शोषण " म्हंटले आहे.

    फ्रुटी पिऊन झाल्या नंतर स्ट्रॉने शेवटच्या थेंबा पर्यंत फ्रुटी ओढत राहणे ह्याला गीतेत " मृगतृष्णा"म्हंटले आहे.

    चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणे ह्याला गीतेत " अक्षम्य अपराध " असे म्हंटले आहे.

    जेव्हा पंगतीत जेवताना मठ्ठा वाढणारा येत आहे हे पाहून पानांतील मठ्ठा गटागट पिऊन घेतो त्याला गीतेत "छळवाद" असे म्हंटले आहे.

    ही पोस्ट वाचून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणे म्हणजे " मोक्ष"

      July 9, 2017


  • नांदी… (माझी लंडनवारी – 3)

    सकाळी सकाळी व्हिसा आल्याची खबर आली. खूप खुश झाले. व्हिसा  बघण्याची खूप घाई झाली. झेराला फोन केला. ती म्हणाली, झेरोक्स घेवून पासपोर्ट पाठवून देते. मग परेश ला ईमेल टाकली.

      January 1, 2022


  • तन्मयता करी साकार

    "नारायण" "नारायण" म्हणत श्री नारदमुनी श्री विष्णूना भेटण्यासाठी गेले. नारदानी विष्णूना अभिवादन केले. विष्णूनी हास्यमुखानी त्यांच स्वागत केल.

    "हे महान ईश्वर जगदिशा आज मी माझ्या मनातली एक शंका घेऊन तुझ्याकडे आलो आहे. " विष्णूनी हासत मानेनेच त्यांना मान्यता दिली.

    "मी रात्रंदिवस सतत तुझ नामस्मरण करीत असतो. मी स्वतःला तुझा थोर परम भक्त समजतो. परंतु तुझे लक्ष्य इतर भक्तांमध्ये खूपच व्यक्त झालेले दिसते. माझ्याकडे तुझे दुर्लक्ष्य होत असावे अशी माझी आपली शंका. प्रभू मी काय करावे म्हणजे माझी शंका दुर होईल. "

    श्री विष्णू हासले. " नारदा चल आज मी तुझी एक छोटीशी परिक्षा घेतो. त्यांत जर तु यशस्वी झालास तर तुला मी सर्वांत श्रेष्ठ भक्त ही उपाधी देईन. पाण्याने काठोकाठ भरलेले एक कटोर त्यानी नारदाच्या हाती दिले. जा ! ह्या पृथ्वी भोवती एक चक्कर मारुन ये. फक्त एकच अट. ह्या कटोऱ्यातून पाण्याचा एक थेंबही बाहेर पडता कामा नये. संभाळून ने. नारदानी कटोरे हाती घेतले. शांत मनाने कटोऱ्यातील पाण्यावर लक्ष्य केंद्रीत करीत त्यानी पृथ्वीची प्रदक्षीणा पूर्ण केली. अत्यंत आनंद व समाधानाने ते श्री विष्णूला पून्हा भेटले.

    " नारदा मला खूप समाधान वाटले. तू अतिशय काळजीपूर्वक, मन एकाग्र करुन पृथ्वी प्रदक्षिणा केलीस. पाणी मुळीच हालले नव्हते. त्याचा एकही थेंब बाहेर पडला नाही. " नारदाचे ह्रदय भरुन आले. " परंतु खर सांगू नारदा. तू ह्या शर्यतीत हरलास. कारण जेवढा वेळ तू पाण्यावर मन एकाग्र करीत होतास, तुझ्याकडून नामस्मरणांत खंड पडला.

    विष्णू लगेच नारदाला म्हणाले. "चल माझ्याबरोबर पृथ्वी लोकांत. तुला एक खरा भक्त दाखवतो. " दोघानी साधूची वेशभूषा धारण केली. ते एका मंदीराजवळ आले. आंत चैतन्य महाप्रभू भजन करीत बसले होते. साधूना बघताच ते उठले. त्यानी दोघांचे स्वागत केले.

    साधू वेषातील विष्णू म्हणाले " तुमची भक्ती बघून आम्ही आनंदी झालो. प्रसन्नता वाटली. तुमच्या मनाची विचारांची लक्ष्य केंद्रीत करण्याची क्षमता आम्ही जाणली. तुम्ही आपले मन कसे एकाग्र करु शकता, हे आम्ही बघू इच्छीतो. त्यानी तोच साधा कटोऱ्यातील पाण्याचा प्रयोग चैतन महाप्रभूला करण्यास विनविले. मात्र येथे चक्कर फक्त त्या मंदीरा भोवती करण्यास सांगीतले. साधूना अभिवादन करुन ते अतीशय काळजीने पाण्यावर लक्ष्य केंद्रीत करीत निघाले. साधूवेषधारी दोघेजण मंदीराच्या दाराजवळ बसले.

    बराच वेळ झाला. परंतु चैतन महाप्रभू मंदीर प्रदक्षिणा करुन आले नाही. दोघाना शंका वाटू लागली. ते उठले व त्यांचा मागोवा घेत मंदीराच्या मागे गेले. जे त्यानी बघीतले त्याचे दोघाना आश्चर्य वाटले. श्री चैतन महाप्रभू तो कटोरा हातात घेऊन हातवारे करुन भजन म्हणत, नाचत तल्लीन झालेले होते. कटोऱ्यातील पाणी सर्वत्र विखूरले गेले होते. हाती रिकामा कटोरा, मन ईश्वराचे चिंतन,मनन, भजन यानी भरले होते. सर्व शरीर बेभान होऊन नाचत होते. हे दृष्य बघताना नारदांच्या डोळे पाणावले होते.

    ईश्वर भक्तीत " तन्मयताच करी साकार " ह्याची प्रचीती त्याना त्या भक्ताकडून आली.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 12, 2017


  • राजा

    तुझा व्याप खरच खुप मोठा आहे. तुझे उंच सिहासन, तुझा मोठा लोकसंग्रह, तुझे ऐश्वर्य सारं काही आश्चर्यचकित करणारं आहे. या सर्वांपलीकडे पाहता, तुझ्या सुंदर, उदार, भारावून टाकणार्‍या जबरदस्त आकर्षक अशा प्रभावी व्यक्तीमत्वाचे दर्शन होते. तुझी गुणग्राहक वृत्ती, स्पष्टवक्तेपणा, सर्वसमावेशक उदार प्रवृत्ती आध्यत्मिक तेज, ...धार्मिक मन या सर्वांनी तुझे लोभस व्यक्तीमत्त्व एससंघ सुसूत्र होते. वरवरचा अतिशय साधा, तरल स्वभाव त्यामागे दडलेले काटेकोर, अचूक, सखोल तत्वज्ञ व्यक्तीचे विशाल मन, कुणाच्याही मनाला जादूचा स्पर्श करून जाते. तुला अत्यंत देखण्या तारुण्याचे वरदान असूनही तुझ्या वागण्या बोलण्यात एक जबाबदारपणा व पितृत्त्वाचा जिव्हाळा दिसून येतो. त्यामुळे संपर्कात येणारी व्यक्ती तुझ्यात कायमची गुंतून पडते. तुला ओझरते पाहणाराही कधी विसरू शकत नाही. रुबाबदार राजपुत्रासारखे तुझे वागणे, चालणे, चमकता, पूर्ण चंद्रासारखा चेहरा, मोठे, भावूक बोलके डोळे आणि अत्यंत सात्विक प्रेमळ वागणूक, या सगळ्या मोहपाशातून एखादी विरक्त-योग मार्गी व्यक्तीदेखील अलिप्त राहू शकणार नाही.
    तुझ्या स्वभावात, तुझ्या व्यक्तीत्वात विरोधभास नाही असे मुळीच नाही; पण उन्हासोबत सावली असा रमणीय विरोधाभास कुणालाही आवडेल कधी तुझे बोलणे तलवारीसारखे धारदार, वार करणारे असते. तर कधी तुझ्या संतप्त नजरेत ज्वलंत निखारे दिसून येतात. अशावेळी ऐन उन्हाळ्यात बहरलेल्या, अग्नीफुलांचा साज घेतलेल्या पळसासारखा दिसतोस तू।
    दुसर्‍याच्या हळव्या दुसऱया मनावर कधी प्रेमाने तर कधी समजूतीच्या सुरात `उपचार' करीत असतांना तुझे कधी पित्यासारखे शिस्तीचे तर कधी मोठ्या भावासारखे धाकाचे बोलणे मनाला कायमची हुरहूर लावून जाते. तुझ्या धाकातही प्रेमाचे आश्वासन असते. अशा हिरव्यागार बहारदार गुलमोहराची ही रम्य सावली सोडून कुणाला जावेसे वाटेल?

    समोरच्या व्यक्तीमध्ये एकदम गुंतून गेल्यासारखे, समरस होणे तुला सहज जमते. मात्र एका

    क्षणात निघून जाताना तू कधीही विचलीत होत

    नाहीस. हृदयाची भाषा बोलून, दुसऱयाचे `विधीलिखीत' लिहिण्याची कला तू कुठे शिकलास?

    तुझ्या व्यक्तीमत्त्वाचे हे असंख्य पैलू उलगडण्यात माझे संपूर्ण आयुष्यही सरून जार्सल तरीही माझे मन अतृप्तच राहण्याची शक्यता आहे. तुझ्या नजरेतील उपेक्षा, तिरस्कार, अलिप्तपणा हे भाव मात्र असहनीय आहेत.
    तू रागवशील, बोलशील, प्रसंगी एखादे प्रायश्चित्त सांगशील इतपत सारे ठीक आहे; पण उपेक्षा मात्र मरण याताना देतील.
    तुझ्या अस्तित्वाने येते, रत्नमाणकाचे मूल्य.तुझ्या नसण्याने मनी, रित्या आकाशाचे शल्य.
    तुझ्याशिवाय माझे सारे आयुष्य, माझा संघर्ष, माझे अस्तित्व, गुण-अवगुण सारे काही व्यर्थ आहे. माझ्या आयुष्यात शिशिर असला तरी तुझा उत्कर्ष पाहून मला तृप्त वाटते. माझ्या दीपपूजनात, गायत्रीमंत्रात, शिवपूजनात तुलाही ...वाटा आहे. एकदा तुला ग्रहण लागले होते; पण तू त्यातून सहीसलामत, सुरक्षित निघालास आणि पुन्हा सर्वांग सुंदर बहरलास हे कळले तेव्हा मनात आलेल्या मिश्रभावना शब्दातीत आहेत. तुझे सारे दुःख, प्रारब्ध भोग मला मिळावे. व माझे आयुष्य तुला मिळावे. असेच मी प्रार्थनेत नेहमी मागीन.
    पारिजात नावाच्या राजकन्येने, सूर्याच्या प्रेमविरहात देहत्याग केला होता. तेव्हा त्याचा `प्राजक्त'झाला. रात्रीच `उमलून' हा वृक्ष पहाटेस सूर्याला पाहून अश्रूपात करतो. व `निषेध' व्यक्त करीत सारी फुले गळून पडतात. माझेही तुझ्याशिवाय `संपून जाणे' असेच रमणीय असावे. माझ्याही राखेतून असा बहारदार वृक्ष व्हावा व त्याच्या सुगंधाने तुला मंत्रमग्ध करावे.
    मला मृत्यूपंथी नेई, स्वैर दिशाहीन वाटमाझ्या प्रेमाची पुण्याई, तुझे चिरंजीव पद।आता नको अग्नीसाक्षी, नको वेदमंत्र थोरतुझ्या दिव्य अस्तित्वात, माझे शाश्वत सौभाग्य।

    -- किशोर कुलकर्णी

      May 21, 2006


  • कायाकल्प!

    आज कौसल्याबाईंना ते पुन्हा जाणवले. पांघरून नेहमीचेच होते. पूर्वी कधी, ते झोपताना डोक्यावरून घेतले की, पाय बाहेर जात नसत. हल्ली बरेचदा पाय बाहेर जात होते. काहीतरी बदलत होत. नक्की काय हे त्यांना कळेना. आज डॉक्टरांना सांगायला हवं. 

      December 5, 2019