नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
बंड्या! काहीसा अबोल, फारसा कोणात न मिसळणारा असा एक साधा भोळा, सामान्य मुलगा … तो तसा व्हायला कारणं देखील होती तशीच. दोन खोल्यांचं घर . कुटुंबं तसं खाऊन पिऊन सुखी असलं तरी परिस्थिती साधारण होती. बंड्याचा भाऊ त्याच्यापेक्षा जेमतेम अडीच वर्षांनी मोठा. त्यामुळे स्वाभाविकपणे लहानपणी बंड्याला दुपटी , टोपडी , खेळणी हे सगळं मोठ्या भावाचंच मिळालं.
February 4, 2026
एका कॉन्फरन्ससाठी मी दिल्लीला गेलो होतो. दुपारचा वेळ मोकळा होता. मी निवांत बसलो होतो. हातात फाइल्स घेतलेला एक तरुण मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला,“सर ओळखलं?” अर्थातच मी ओळखलं नाही. म्हणाला,”चला चहा घेऊ. ”परप्रांतात मराठी माणूस भेटला की बरं वाटतं.
“इथे हॉटेलच्या लिस्टवर मराठी माणसांची नावं शोधली. त्यात नेमकं तुमचंच नाव दिसलं. म्हणून म्हंटलं तुम्हाला भेटूया. मी लहान असताना तुमच्या गोष्टी वाचल्याचं आठवतं.”
मी त्याला नाव विचारलं. पण तो विषय बदलत इतर गोष्टीच बोलत होता. त्याची दिल्लीतली नोकरी. त्याचं घर. इथली मराठी माणसं आणि महाराष्ट्र मंडळ वगैरे.
मला पुन्हा मिटींगला हजर राहणं भागंच होतं. संध्याकाळी थोडा वेळ ठेवा असं म्हणत, तो निघाला.
त्या दिवशी संध्याकाळी त्याला भेटणं मला शक्य झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो माझ्या रुमवर आला. ”चला एकत्र ब्रेकफास्ट घेऊ.”
आम्ही ब्रेकफास्ट घ्यायला बसलो, तेव्हा तो म्हणाला, “मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.” मी खाता-खाता मानेनेच खूण करता तो बोलू लागला.
“तुम्ही मला ओळखणार नाही याची मला खात्री होती. पण न जाणो ओळखलंत तर? म्हणून मी माझं नाव काल तुम्हाला सांगितलं नाही. खूप वर्षापासून तुम्हाला एक गोष्ट सांगायची किंवा सूचवायचं मनात होतं. लहान असताना धीर झाला नाही. आताही सांगताना असं वाटतंय की, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय..” तो बोलायचं थांबला.
मला त्याच्या बोलण्यातून काहीच कळेना. काही टोटलच लागेना. मी प्रेमाने त्याला थोपटत म्हणालो,”बोल ना बिनधास बोल. जे तुला सांगावंसं वाटतंय ना, ते अगदी मोकळेपणाने सांग. खरं सांगतो मला नाही राग येत. बोल. कमॉन..”
त्याने माझ्याकडे पाहात, माझा अंदाज घेतला. त्याची बेचैनी वाढली होती. त्याचं खाण्याकडे अजिबात लक्षं नव्हतं. खूर्चीवर बसल्या बसल्या त्याचे पायसुध्दा एका लयीत हलत होते. “आपण आता बोलून तर बसलोय पण हे समोरचे गृहस्थ रागावले तर..?” असा काहीसा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता.
”सर, मी लहान असताना तुम्ही माझ्या शाळेत आला होतात. आम्हा मुलांशी गप्पा मारायला. त्यावेळी मी इयत्ता चवथीत होतो. मुलांनी खूप आग्रह केल्यावर तुम्ही एक कविता म्हणाला होतात..आईची कविता..आठवतं? त्यावेळी आमच्या वर्गातल्या सर्व मुलांनी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता.. आणि मी एक प्रश्न विचारला होता.
अजूनही 'तो प्रश्न' आणि त्या प्रश्नाच्या गाभ्यातून निर्माण झालेले अनेक प्रश्न माझ्या डोक्यात ठाण मांडून बसले आहेत.. ..”
त्याला थांबवत मी म्हणालो,'मला आठवतोय तो प्रसंग. आणि तुझा तो प्रश्न सुध्दा. खरंच. पण आपली आज अशी भेट होईल असं मात्र वाटलं नव्हतं.अं.. तुझं नाव मंदार? बरोबर..?”
माझ्याकडे किंचित अविश्वासाने पाहात त्याने मान हलवली.
इतक्यावर्षापूर्वी घडून गेलेला तो प्रसंग मला स्पष्ट दिसू लागला.
'काही वर्षापूर्वी एका शाळेने मला मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं होतं. 'मी मुलांना मार्गदर्शन करत नाही आणि मुलांसमोर भाषण ही करत नाही' असं त्यांना सांगताच ते म्हणाले, 'मग आमच्या शाळेतल्या मुलांशी गप्पा तरी मारायला या.'
प्राथमिक शाळेतल्या मुलांशी गप्पा मारायला मी गेलो. आवडती पुस्तकं, आवडती माणसं, माणसांच्या सवयी, आपल्या नाठाळ सवयी अशा कुठल्याही विषयांवर मुलांशी बोलत होतो. काही मुलांनी आग्रह केला म्हणून मी एक कविता म्हंटली. त्या कवितेच्या शेवटच्या ओळी होत्या, 'गोड गोड खाऊ आणते, माझी आई मला. गोड गोड खाऊ नको, आईच हवी मला.'
कविता ऐकल्यावर सर्व मुलांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. पण माझ्या समोरच बसलेला एक मुलगा एकदम शांत होता. कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात तो रमला होता. मी जवळ जाऊन त्याला थोपटलं. त्याने खांदे उडवून माझा स्पर्श नाकारला. त्याचं नाव मंदार.
आता शाळ सुटायची वेळ झाली होती. त्यामुळे त्याला घराची आठवण येत असेल किंवा त्याला भूक लागली असेल असा मी विचार केला.
इतक्यात एका मुलाने हात वर करुन मला विचारलं,'सर लहानपणी तुम्हाला काय आवडायचं.. म्हणजे कोणता खाऊ आवडायचा?”
आत्तापर्यंत मी मुलांच्याच आवडिनिवडि ऐकत होतो. त्याबाबत बोलत होतो. पण मला काय आवडतं, हे मात्र मी सांगितलंच नव्हतं. हे त्या मुलान बरोबर ओळखलं.
मी माझ्या आवडी सांगणारच होतो तोच मला जाणवलं कि मंदारला काहीतरी विचारायचं आहे. मी मंदारकडे सहेतुक पाहिलं आणि भुवया उंचावतच त्याला खूण केली,'विचार..'
माझ्याकडे न पाहताच मंदारने विचारलं,'सर, तुम्हाला तुमच्या आवडीचा खाऊ कोण आणून द्यायचं?”
मी काही उत्तर देण्याआधीच सर्व मुले ओरडली, “आईऽऽऽ आईऽऽऽ”
मुलांनी आईच्या नावने एकच कल्ला केला. त्याचवेळी शाळा सुटली. मग तर आईच्या नावाचा गजर करत मुले उधळली.
त्या कार्यक्रमानंतर मंदारचा चेहरा माझ्या लक्षात राहिला. त्याचा प्रश्नाचा रोख काहीसा वेगळा होता. त्याने माझा स्पर्श नाकारुन नकळत आमच्यात असणारं अंतर, त्याने मला दाखवून दिलं होतं. तो काहीसा वेगळा आहे. किंवा मुलांशी गप्पा मारताना एखादवेळेस तो माझ्याकडून नकळत दुखावला गेला आहे. असं मला सारखं त्यावेळी वाटत होतं. एखाददिवशी वेळ काढून त्या शाळेत जावं. आपण सहजच आलोय असं भासवावं पण मंदारला भेटावं असं मला खूपदा वाटे. आणि असं करणं मला सहजी शक्यं ही होतं. पण मी तसं काहीच केलं नाही.
आणि आज इतक्या वर्षानी, हाच मंदार माझ्यासमोर बसला होता.
त्यावेळी मी त्याला शोधत होतो. पण आज यानेच मला शोधून काढलं होतं.
किंचित बॅकफूटवर जात मंदारने मला विचारलं, “तुमच्या इतकं सारं कसं काय लक्षात?”
“कारण त्यानंतर मी खूप दिवस तुझ्याबद्दल विचार करत होतो.”
'म्हणजे..?'
मंदार, आता माझं ऐक. आधी हा ब्रेकफास्ट संपव. तुला काही सांगायचं होतं, ते मोकळेपणाने सांग. आणि मग भरपूर गप्पा. मी आणखी दोन दिवस आहे दिल्लीत.”
शांतपणे मनातल्या मनात वाक्यं जुळवत, मंदारने खाणं संपवलं. आम्ही चहा पीत बाल्कनीत बसलो.
'सर, मी तुम्हालाच उद्देशून बोलतोय असं कृपया समजू नका. माझं काही चुकत असेल तर मला सांगा.” माझ्याकडे एक क्षण पाहून मंदारचा बोलण्याचा धबधबा सुरू झाला,'लहानपणी पुस्तकातून, शेजाऱ्यांच्या बोलण्यातून,'आई म्हणजेच ग्रेट. मुलांवर माया करावी, प्रेम करावं ते फक्त आईनेच. घरी येणाऱ्या मुलाची वाट पाहावी, आईनेच. गोड गोड खाऊ आणावा तो ही फक्त आईनेच' असंच वाचायला किंवा ऐकायला मिळायचं तेव्हा मी खूप बेचैन व्हायचो. म्हणजे ज्या मुलांना आई नाही, त्या मुलांना असं प्रेम कधी मिळणारच नाही? ती मुलं का आयुष्यभर प्रेमाची भुकेलीच राहतील? आई नाही तर प्रेमच नाही? आई आपल्या मुलावर करते तेच खरं प्रेम? पण असं कसं होईल?
सर, मी माझी आई पाहिली ही नाहि. मी आठ दिवसांचा असताना ती गेली असं मला नंतर कळलं. माझे बाबा, माझी आत्या आणि माझी आजी या माझ्या 'आई'च होत्या. माझ्यावर निरातिशय प्रेम होतं त्यांचं. पण हे मला तेव्हा समजलंच नाही. कारण 'खरं प्रेम म्हणजे आई. आईच फक्त ग्रेट' हे समीकरण तेव्हा माझ्या डोक्यात घट्टं होतं.
'किंवा त्या समीकरणामुळेच माझ्या बाबांचं, आत्याचं माझ्यावर असणारं प्रेम मला शुल्लक वाटत होतं. आणि कधीच न मिळू शकणाऱ्या आईच्या त्या 'ग्रेट प्रेमाची' मला ओढ लागली होती. वर्गातली मुलं आईबाबत बोलत तेव्हा मला कसंनुसं व्हायचं. 'मला आई नाही' म्हणून जर कुणी मला सहानुभुती दाखवलि तर मला रग यायचा.
'सर तुमच्या त्या कवितेतली शेवटची ओळ आहे,'आईच हवी मला.' ही ओळ तुम्ही तेव्हा वेगवेगळ्याप्रकारे म्हंटलीत. बोलक्या चेहऱ्याने आवाजात चढउतार करत म्हंटलीत. त्यावेळी मुलांची मनं आईच्या प्रेमाने ओसंडून वाहू लागली. सर्व मुलांना आईच्या 'त्या ग्रेट प्रेमाची' आठवण येऊन त्यांनी टाळ्या वाजवल्या. पण मी मात्र सुन्न होऊन बसलो होतो कारण आईच्या प्रेमाचं समीकरण मला टोचत होतं.
'आईच्या प्रेमाची किंवा आईची पण महती जरुर सांगावी. पण 'ज्या मुलांना आई नाही, जी मुलं पोरकी आहेत, अनाथ आहेत त्या मुलांना ही इतर कुणाकडून आई इतकंच प्रेम मिळू शकतं' असं एखादं वाक्यं का नाही कधी ऐकायला मिळत, वाचायला मिळत? कारण तुम्हा सगळ्यांना आई आहे म्हणून? की आईच्या प्रेमाने तुम्ही इतके आंधळे झाले आहात की तुमच्या आजुबाजूची अनाथ, पोरकी मुलं तुम्हाला दिसतंच नाहित?
'सर, रागावू नका. आयुष्यात खूप उशीरा हे समीकरण सुटलं, तेव्हा प्रथम तुम्हालाच भेटायचं मी ठरवलं होतं.” अचानक हुंदके देत मंदार बोलायचं थांबला.
आपल्या हातून नकळतच पण किती मोठी चूक झाली हे कळल्याने तर मला शरमल्यासारखं झालं होतं. मी सुन्नं झालो होतो. मला बोलताच येत नव्हतं.
चटकन स्वत:ला सावरत मंदार पुढे म्हणाला,'आपल्याला 'आईचं प्रेम मिळालं नाही' ही बोच कित्येक वर्ष माझ्या मनात होती. आपल्याच नशीबात असं का, आपणच का दुर्भागी? असं ही कधी वाटायचं. मित्रांच्या घरी गेलो आणि त्याची आई माझ्याशी प्रेमाने वागू लागली की माझ्या ह्रुदयात कालवाकालव व्हायची. वेगवेगळ्या प्रकारे अनेक वर्ष ते 'आईच्या प्रेमाचं समीकरण' मला छळत होतं. शाळा संपल्यावर मी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतली आणि इथे आलो.
'माझी बायको पंजाबी आहे. माझ्या मुलीचं नाव सिमरन. सिमरनला मी माझ्या लहानपणीच्या गोष्टी सांगायचो. एक दिवस ती अचानक मला म्हणाली,'आप कितने लकी है. तुम्हाला तीन-तीन माँ. तुमचे बाबा,आत्या आणि आजी! हो ना?”
'खरं सांगतो सर, त्याक्षणी मला खूप हलकं वाटलं. इतकी वर्ष न सुटलेलं ते 'ग्रेट प्रेमाचं समीकरण' सिमरनने चुटकीसरशी सोडवलं होतं.” मंदारला पुढे बोलता येईना. त्याला खूप भरुन आलं होतं.
मी प्रेमाने त्याचा हात हातात घेतला. त्याला थोपटलं. यावेळी त्याने माझा स्पर्श नाकारला नाही.
मंदारसारख्या मुलांची आपण आता आई व्हायला पाहिजे, असं माझ्या मनात आलं. आणि जणू काही माझ्या मनातलं कळल्याप्रमाणे मंदार माझ्याकडे पाहून हसला.. ओल्या डोळ्याने!
- राजीव तांबे.
December 3, 2015
तुम्हाला नवल वाटेल की फक्त फारसीतूनच भारतीय भाषांमध्ये शब्द आले आहेत असं नाहीं, तर संस्कृतमधूनही फारसीत अनेक शब्द गेलेले आहेत. या विषयावरील श्री. राजेश कोचर यांचे लेख माझ्या वाचनात आले आहेत. मुंबईचे श्री. प्रकाश वैद्य यांनीही मौलिक संशोधन केलं आहे (आणि थोडंफार मी स्वतःसुद्धां ).
March 9, 2019
विचार निर्मीती आणि त्याचा वेग ह्या दोन्हीवर लक्ष केंद्रीत केले. एकानंतर दुसरा विचार, लगेच तिसरा चौथा विचार अशी एक प्रंचड रांगच सतत चालते. विचारांचे उत्पन्न होणे, भविष्यकाळातून लगेच वर्तमानाची रेखा पार करीत भूतकाळांत जाणे ह्या विश्लेशनासाठी वा समजण्यासाठी भिन्न बाबी आहेत. त्यांच्या वेगापुढे त्यांना विभागणे तसे अवघडच. योग सामर्थ्य व विचारांच्या उत्पत्तीकडे लक्ष केंद्रीत करण्याची प्रथम कला साध्य झाली पाहिजे. गेलेल्या विचाराला जावू देणे म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे हे आधी अवगत केले पाहिजे. त्याचक्षणी येणाऱ्या अर्थात उत्पन्न होणाऱ्या विचारावर सर्व शक्तीने लक्ष केंद्रीत करीत त्याच्या उत्पन्नावर रोख लावली पाहिजे. मनावर अर्थात विचारावर लक्ष केंद्रित करण्याची एक कला असते. एक योगीक असतो. सततच्या योग धारणेने वा प्रयत्नाने ही कला साध्य होते. विचारांचा प्रवाह थोडावेळ थांबविण्याचा प्रयत्न योग्य प्रयत्नानंतर साध्य होतो. हे अनुभवाने सांगता येते. येणाऱ्या विचाराला त्याच्या प्रवाहाला क्षणीक वा काही वेळेपर्यत थांबविणे म्हणजेच त्या विशिष्ठ वेळेत तुम्ही ‘विचार शून्य’ अशा एका स्थितीमध्ये काही वेळेसाठी जातात. गेलेला विचार दुर्लक्षीत करणे व येणारा विचार थोपवून धरणे म्हणजेच तुम्ही तुमच्यासाठीचा वर्तमानकाळातला रूंद करता आहात, वाढविता आहात. वर्तमान काळाला व्यापक करता आहात. हाच तो काळ जेथे न विचार न हालचाल न अस्तित्वाची जाण न प्रकाश न अंधकार. सर्वत्र शांततेचा भास होतो.
वर दिलेले वर्णन ‘वर्तमानकाळ’ हा तुमच्यासाठी निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे अथवा वर्तमानकाळाच्या सीमारेखा (काल्पनीक) रूंदावण्याचा प्रयत्न आहे. कारण ह्याच थोड्याशा काळामध्ये तुम्हाला त्या महान ईश्वराचे दर्शन घडणारे असमार त्यासाठीची ही वातावरण निर्मीती.
योग सामर्थ्य आणि प्राणायाम या क्रियांची शक्ती प्रचंड असते. शरीराच्या बाह्य तसेच आंतर हालचालींवर ताबा निर्माण करण्याची ही एक साधना आहे. परिणामी शरीर अर्थात इंद्रिये मन आणि बुध्दी (विचार) ह्या सर्वावर एकप्रकारे नियंत्रण करण्याची क्षमता ह्या साधनानी प्राप्त होते. ही साधना अत्यंत अवघड आहे. प्रचंड प्रमाणात केलेल्या प्रयत्नाने, नियमित दैनंदिन केलेल्या सरावाने आणि जाणीवपूर्वक अशा लक्षकेंद्रीत करण्यानेच साध्य होणारी असते. ही एक प्रकारची तपश्चर्या असते. कित्येक योगी ह्रदयाच्या, फूफ्फूसांच्या, आतड्यांचा होणाऱ्या नैसर्गीक अनैच्छीक हालचालींवरसुध्दा मर्यादीत ताबा मिळवू शकतात. हे फक्त योग साधनेमुळे, ह्याच तत्वाने मेंदूच्या हालचालींवर देखील मर्यादीत नियंत्रण करता येते. त्याच्या कार्यावर ऐच्छीक ताबा मिळवता येतो. हीच गोष्ट मेंदू अर्थात बुध्दी सतत करीत असलेल्या विचारावर मर्यादीत ताबा मिळवून त्याचे विचार उत्पन्नाचे कार्य थोडावेळ बाधीत करण्यात होवू शकते. ध्यान धारणा ही योगामधली सर्वश्रेष्ठ साधना समजली गेली. स्वत:ची ओळख जाणण्यासाठी ‘मी कोण आहे’ ‘self-realigation’ ईश्वर म्हणजे काय? जीवात्मा विषयीचे ज्ञान ह्या साऱ्या प्रश्नाची उकल केवळ ध्यानसाधनेमुळे होवू शकते.
परमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जावून त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता. पूजाअर्चा, पौराणीक ज्ञानकथा, देवस्थाने देवालयांच्या भेटी, भजनकिर्तन, नामस्मरण, मन-विचार आणि भावनांची शुध्दता, धार्मिक ग्रंथाचे वाचन, ध्यान साधनेचा सराव, त्या परमात्म्याच्या सगुण वा नंतर निर्गुण दिव्यतेची ओढ हे सारे मार्ग हलवले जात होते. संकल्प व दृढ निश्चयाला विश्वासाने सतत जागृत ठेवीत गेलो. वरील सर्व कार्यप्रणाली ही कर्मकांडाचाच एक भाग होती. हे खऱ्या अर्थाने मार्गदर्शन होते. दाही दिशांनी भटकणाऱ्या चंचल मनाला एक दिशेने मार्गस्त करण्याचे प्रयत्न होते. लक्ष केंद्रीत करण्याचे त्या साधनेमध्ये सामर्थ्य होते. खऱ्या अर्थाने मला नितांत आनंद असिम समाधान व मनाची प्रचंड शांतता लाभली ती ध्यान योगानेच.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 21, 2016

मी माझ्या मुद्रण / प्रकाशन व्यवसायात दरवर्षी सुमारे 5 दिवाळी अंक छापत असे. त्यातील ज्ञानदूत हा अंक मुंबईतून निघत असे. प्रसिद्ध नोगी कंपनी (माकडछाप काळी टूथ पावडर) यांच्या तर्फे मालक कै. प.सी.बोले व कै. तारा बोले हा दिवाळी अंक प्रकाशित करत असत. त्यांचे आणि माझे खुपच जवळचे संबंध होते. त्यांच्यामुळे मुंबईतही माझ्या खुप ओळखी झाल्या.
June 3, 2021

किशोरीताई गेल्या….. यानंतर मनात बरेचसे प्रश्न उपस्थित झाले….. आज माझ्यासकट सगळेच सौजन्याने अादरार्थी संबोधतो , पण सहेला रे मधली एखादी तान वा रंगी रंगला ची तान कानावर पडली की अापसूकंच काय गळा आहे हिचा! असंच वाक्य येतं ना ? लता , अाशा काय गाते असंच येतं ना ? या सगळ्या थोर कलाकारांशी अापण अापली तुलना करुच शकणार नाहि , पण तरीहि ते सगळे एकेरी संबोधण्याएवढे जवळचे वाटतात , हो ना ? अापल्या नेहेमीच्या अायुष्यात बर्यावाईट प्रसंगानुरुप एक निसर्ग वगळता कुठलंच पार्श्वसंगीत नसतं , तरीही संगीताच्या साथीने अालेले सूर अायुष्य व्यापून टाकतात….. रात्री एकटं असताना मुकेश सखा असतो
April 4, 2017

खेड्यातील एक तरुण आदिवासी बाई आपल्या ३ वर्षाच्या छकुलीला कडेवर घेऊन पाणी आणण्या साठी एका ओढ्याकडे चालत निघाली होती. प्रेमाने तिचे नाव ठेवले होते प्रीती झिंटा. हात पायाच्या कड्या, पुढे आलेले पोट. खोल गेलेले डोळे, डोक्यावर हातात पाण्याची भांडी, खाच खळग्याची जमीन तुडवत एका डबक्याकडे चालल्या होत्या, भांडी कपडे धुवायचे आणी तेच पाणी पिण्यासाठी घेऊन यायचे, रोज ५ किमी चालणे तर कायमचे पुजलेले, पाण्याचे कायमच दुर्भिक्ष, पिण्या करता वेगळे पाणी असू शकते हे माहीतच नाही, विजेचा दीवा कधी पाहिलेलाच नाही, जेवणात भाताची पेज, व सुकी चवळी शिजवलेली, बटाटा कधी पाहिलेलाच नाही.
February 15, 2022
आला आला पाऊस आला…मला भिजवून ओलेचिंब करून गेला…असे मनातल्या मनात गुणगुणत असेल ती उन्हाने लाही लाही झालेली आपली धरणी माता. जगभरातील शेतकरीच नव्हे तर प्रत्येक माणूस पावसाची, पावसाळा सुरू होण्याची चातकासारखी वाट पाहत असतो. त्याच्या आगमनाला जरा जरी उशीर झाला तरी शेतकर्यांसह सर्वांचाच जीव कासाविस होतो. पहिल्या पावसात सारेच भिजण्यासाठी आतूर असतात.
July 11, 2014
रविवारची सुट्टी. दुपारचं जेवण झाल्यावर मी गॅलरीत खुर्ची टाकून निवांत बसलो होतो. जूनचा महिना असल्यामुळे आभाळ भरुन आलं होतं. आता थोड्याच वेळात थेंब पडायला लागतील, असं भर दुपारी ‘नभ मेघांनी आक्रमिलं’ होतं. तेवढ्यात मला कुणाचा तरी आवाज आला. होय, पाऊसच माझ्याशी बोलत होता. तो मला म्हणाला, ‘कसा आहेस मित्रा, ओळखलंस का मला?’ मी गोंधळून गेलो. मला काय बोलावं ते सुचेना.
July 13, 2021
राजाच्या मंत्र्याचा मुलगा अजय पण मूर्त्या बनवित असे पण तो काही उत्कृष्ट मूर्तिकार नव्हता. परंतु त्याची इच्छा हीच असे की कसेही करून प्रथम पारितोषिक पटकावे. मंत्री पण चतुर होता. तो काही तरी युक्ती करून मुलाला कसे बक्षीस मिळेल याचा तो विचार करू लागला.
ठरलेल्या दिवशी सर्व मूर्तिकार मूर्त्या घेऊन आले. रामकिरण नावाच्या मूर्तिकारने राजाची अतिशय सुंदर मूर्ती तयार केली होती. ती पहाताच मंत्री समजून गेला की नक्कीच या मूर्तीला प्रथम पारितोषिक मिळेल. त्याने रामकिरणला एकीकडे नेऊन सांगितले, खरंच, तू सुंदर मूर्ती बनविली आहेस.
October 5, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti